प्रीती... भाग -2

प्रेम... तडजोड.... नात्यांची गुंतागुंत... उलगडनारी नवी कथामालिका.. प्रीती...

"...तुमचीच लेक आहे मी... 

दिलेला शब्द फिरवनार नाही कधी... 

आता मेले तरी ह्या घराचा उंबरठा चढनार नाही कधी.... "

...सोनिया चे शब्द आईसाहेबांच्या कानात फिरत होते.... 

"आमची लेक आहात हिच तर खंत आहे.... 

तुमच्या ठिकाणी दुसऱ्या कुणाची लेक असती तर तिच्या आई वडिलांना मीच समजावून सांगितलं असतं... 

पण जेव्हा आपल्याच घराच्या इभ्रतिचा प्रश्न येतोय .... तेव्हा मला कठोर व्हावंच लागतंय... 

तुमच्या एका चुकीमुळे इतक्या अथक मेहनतीने उभारलेला आप्पासाहेबांचा हा डोलारा कोसळायला नको... 

...आम्हाला माफ करा.. सोनिया... तुमच्या आईसाहेब होण्याआधी आप्पासाहेबांच्या पत्नी आहोत आम्ही... "

...डोळ्यातून गळ्लेले  दोन टीप त्यांनी हलकेच पुसली... 

...आप्पा साहेब.. कोल्हापूरातील एक खूप मोठी हस्ती होती. एवढा मोठा त्यांचा बिजनेस होता... आजही ते बिजनेस मिटिंग साठी बेंगलोर ला गेले होते.. महत्वाची डिल होती.. त्यांच्या कामात व्यतय नको म्हणून घरातील सर्व आईसाहेबच हाताळत. आजचाही एवढा मोठा निर्णय त्यांनी स्वतःच घेतला होता. 

रजत... वीरेन... विश्वास. तिन्ही मुलं आता मोठी होती.. हळूहळू बिजनेस मध्ये उतरत होती... पण तरीही आईसाहेबापुढे कोणी तोंड वर करून बोलू शकत नव्हती... त्यांचा धाकच तसा होता. 

"...रखमा... सर्वाना जेवायला आवाज दे... "

घरातील बाईला त्यांनी सांगितलं. तस तिने सर्वांना आवाज देऊन डायनिंग वर जेवण वाढायला सुरुवात केली.. 

तिन्ही मुलं आणि आईसाहेब जेवायला बसली... त्यांनी रखमाला जायला सांगितलं. 

काही घडलंच नाही अशा प्रकारे सर्व जेवत होती... 

पण.. वीरेन... त्याच्या घशाखाली घास उतरत नव्हता.... 

तिन्ही भावनंडानंतर ची शेंडेफळ होती सोनिया.. तिघांचीही खूप लाडकी... पण वीरेन आणि तिचं जरा जास्तच गूळपीठ होतं... 

न जेवताच तो उठला... 

"वीरेन... जेवणावरून असं उठू नका... अन्नाचा अपमान होतो अशाने... "

त्यांचं बोलण ऐकून बळेबळेच दोन घास खाल्ले त्यानं. 

"आज जे घडलं ते आप्पासाहेब इथं यायच्या आधी त्यांच्या कानावर पडणार नाही याची काळजी घ्या सर्वांनी... स्पेशली वीरेन तुम्ही... "

वीरेन कडे बघत त्या बोलल्या आणि रूम मध्ये निघून गेल्या... 

...वीरेन खिडकीतुन बाहेर बघत होता... बाहेर पाऊस पडत होता... 

ह्या अशा अवस्थेत... अशा वेळी कुठे गेली असेल सोनिया... 

त्याला रडायला येत होत... भाऊ असूनही काहीच करू शकत नाही याची हतबलता जाणवत होती... 

"सॉरी गं सोना... माफ कर मला... मी तुझी काहीच हेल्प करू शकत नाही... "

त्याचा हुंदका फुटला होता आता... 

"... एवढ्या रात्री कुठे गेलीस असशील गं तू... "

तिच्या आठवणीत तो रडत होता.... 

खरंच कुठे गेलीये सोनिया... काय घडलं असेल तिच्या सोबत... जाणन्यासाठी वाचा नेक्स्ट पार्ट ... 

🎭 Series Post

View all