Feb 29, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -८१

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -८१

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग - एक्यांशी.


"हो, ते राहिलेच. मी कृष्णा. कोल्हापूरचा आहे. आयपीएस ट्रेनिंग साठी दोन वर्षापासून इथेच हैद्राबादला होतो. आता जस्ट ते संपलेय आणि पुढच्याच आठवड्यात माझे लग्न आहे. त्यासाठी मी होणाऱ्या बायकोला रिंग घ्यायला या शॉप मध्ये आलोय. हैद्राबादचे हिऱ्यांच्या ज्वेलरीसाठी फेमस ठिकाण हेच आहे ना." कृष्णा मोठया उत्साहाने बोलत होता.


त्याने एक सुंदरसे डायमंड सेट आणि नाजूकशी डायमंड रिंग सिलेक्ट केली. अनिकेतनेही सुमीसाठी एक सुंदर ब्रेसलेट घेतले.


"कॉफी?" कृष्णाच्या प्रस्तावावर दोघांनीही संमती दाखवली.


"लव्ह मॅरेज हं?" कॉफी पिताना अनिकेतने हसून विचारले.


"हं, ॲक्च्युली." तो जरासा लाजला.


"मग आम्ही समजू शकतो." सुमी अनिकेतकडे बघून म्हणाली.


"तुमचे पण लव्ह मॅरेज? इंटरेस्टिंग." कृष्णा.


"चार वर्षाचे प्रेम आणि त्यानंतर तब्ब्ल पंचवीस वर्षांचा दुरावा. त्यामुळे आता आम्ही एकमेकांना क्षणभरही सोडत नाही." सुमीचा हात घट्ट पकडून अनिकेत म्हणाला.


"ओह, मग तुमची सिच्यूएशन मीही समजू शकतो. माझे होणारे सासू सासरे याच परिस्थितीतून गेलेत." कॉफीचा घोट घेत कृष्णा म्हणाला.


"ओह, म्हणजे आमच्यासारखे समदुःखी आहेत म्हणायचे. त्यामागचे कारण काहीही असो पण विरहाच्या यातना सहन करणे खूप क्लेशदायक असते."कॉफीचा मग टेबलवर ठेवत सुमी त्याला म्हणाली.


"नाईस टू मीट यू यंग मॅन." एकमेकांचा निरोप घेताना अनिकेत उगाच भाऊक झाला होता.


"सेम हिअर." कृष्णाने त्याचा हात घट्ट पकडून म्हटले. "ॲक्च्युली सर, तुम्हाला परत भेटायला मला आवडेल. इफ पॉसिबल, प्लीज ट्राय टू कम फॉर माय मॅरेज सेरेमनी." त्याने हसत त्यांना लग्नासाठी आमंत्रित केले.


"शुअर डिअर. आम्ही नक्की प्रयत्न करू." त्याच्या खांद्यावर हलकी थाप देत अनिकेत उत्तरला.


"मग लवकरच माझ्या लग्नात भेटूया." कृष्णा म्हणाला.अर्ध्या तासाची ती त्यांची छोटीशी भेट पण त्या तिघांचे गुळपीठ अगदी छान जमले. हसत हसत त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.


*********


"प्रीती, कॉल उचलायला किती गं उशीर?" कृष्णा काहीशा घुश्श्यात बोलत होता.


"अरे एवढा का चिडतोस? घरी पाहुणे आले आहेत, त्यांच्यात होते ना मी. मोबाईलकडे लक्षच गेलं नाही." प्रीती स्पष्टीकरण देत म्हणाली.


"सगळ्यांकडे लक्ष दे, फक्त होणाऱ्या नवऱ्याकडे देऊ नकोस." त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती.


"कृष्णा? हे काय आता?" त्याच्या अशा वागण्याचे तिला हसू येत होते.


"अरे मग काय? मला वाटलं इतक्या दिवसांनी मी आलोय तर तू रिसिव्ह करायला तरी येशील, पण नाही. तुला ना माझी काळजीच नाहीये." तो.


"अहो होणारे नवरोबा, राधाईने आपल्याला भेटायला स्पष्टपणे मनाई केली आहे, मग कसे भेटणार ना?" त्याला समजावत ती.


"असे कुठे असते यार? किती दिवसानंतर मी परत आलोय आणि भेटायचं देखील नाही?" रागाची जागा आता भावनिकतेने घेतली होती.


"काय करणार ना? राधाईचे ऐकावेच लागेल." ती.


"प्रीती, तुझे ना हल्ली माझ्यावरचे प्रेम कमी झालेय." तो.


"असे नाही रे, पण राधाई.."


"तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना?"


"हो, पण राधाई?"


"तुला मी आवडतो ना?"


"हा काय प्रश्न झाला? पण राधाई.."


"जा मग, त्या राधाईशीच लग्न कर. माझ्याशी बोलूच नकोस." तिची सारखी 'राधाई राधाई' ही रट ऐकून कृष्णा खरंच चिडला होता.


"अरे ए चिडक्या बिब्ब्या, आणखी किती चीडशील? मी म्हणत होते की राधाईला पटवून उद्या भेटते तुला. कारण परवा पासून आपल्या लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील, मग नाही भेटता यायचे." ती हसत म्हणाली.


बोलत असतानाच तिथे निकी आली आणि तिने तिच्या हातचा मोबाईल हिसकावून घेतला.


"ए, मग आधीच सांगायचं ना गं. किती चिडलो मी. सॉरी अँड लव्ह यू डार्लिंग. उम्मा." तो तिला मोबाईलवर एक कीस देत म्हणाला.


"ओह, जीजू हाऊ रोमँटिक यार. लव्ह यू टू." निकी खट्याळपणे म्हणाली.


"निकीऽऽ माझा मोबाईल.." प्रीती ओरडली.


"दी, राधाई तुला बोलवतेय आणि मोबाईल आता नाही मिळायचा." निकी हसत खाली बाहेर पळाली.


"निकी, थांब बघतेच तुला." प्रीती तिच्यामागे पळत गेली.

दोघींचा गलका कृष्णाच्या कानवर येत होता. त्याने हसून डोक्यावर हात मारून घेतला.


"काय दंगा चाललाय? आता चार दिवसांनी लग्न आहे आणि तुम्ही कसला पोरखेळ मांडलाय." राधामावशी कडाडली.


"राधाई, मी नाही, ही निकी माझा मोबाईल घेऊन आलीये." धापा टाकत प्रीती बोलत होती.


"निकी " राधामावशीने डोळे वटारले.


"सॉरी राधाई." निकीने एका हाताने कान पकडला अन दुसऱ्या हाताने मोबाईल समोर केला. प्रीती तो मोबाईल हातात घेणारच की समीरने तो आपल्या हातात घेतला आणि त्यानंतर स्वीटीने.


"अरे, हा कसला खेळ सुरू आहे?" आता सोनिया आणि इतर मंडळीही बाहेर हॉलमध्ये जमा झाली.


"माई बघ ना गं, माझा मोबाईल मला देत नाहीयेत." तक्रारीच्या सुरात प्रीती म्हणाली.


"एय, माझ्या लाडकीसोबत कोण असं वागतंय हं?" स्वीटीकडून मोबाईल घेत सोनिया म्हणाली आणि तिने तो मोहनकडे पास केला.


"माई? तू पण? जा बाबा कट्टी तुझ्याशी." लटक्या रागाने प्रीती.


"माईशी कट्टी घे, पण तुझा बाबा आहे ना? तो नाही असा वागणार. हा घे तुझा मोबाईल." प्रीतीला जवळ घेत मोहन म्हणाला. "आणि प्रीती उद्या कृष्णाशी भेटून घे. आमची कुणाचीही हरकत नाहीये बरं."


"ओह थँक यू बाबा. लव्ह यू." त्याच्या कुशीत शिरत प्रीती म्हणाली.


बापलेकीचे ते निर्मळ नाते बघून सोनियाला उगीचच हळवे झाल्यासारखे वाटले.


********


काळ्या रंगाच्या लॉन्ग गाऊन मध्ये प्रीती फारच मोहक दिसत होती. काळा ड्रेस, निळे डोळे अन गोरा वर्ण, याचे एक वेगळेच कॉम्बिनेशन जुळून आले होते. हॉटेल सयाजीच्या एका प्राईवेट रूममध्ये ती कृष्णाची वाट बघत बसली होती. घरी भेटायला आलेल्या मित्रमंडळी मुळे त्याला उशीर होणार होता, म्हणून निकी तिला हॉटेलपर्यंत सोडायला आली आणि निघूनही गेली.


काही वेळातच तो आत आला आणि प्रीतीचे डोळे काही क्षण अगदी विस्फारले ते मिटलेच नाही. आधीच हँडसम असणारा कृष्णा काळ्या रंगाच्या शर्टमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता. त्याचे पिळदार शरीर तिला आकर्षित करत होते.


"हेय, आय एम हिअर." तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत तो म्हणाला तशी तिची तंद्री भंग झाली.


"फायनली आपलं लग्न होतंय. मिस प्रीती, तुम्ही आता ऑफिशियली मिसेस कृष्णा होणार. हाऊ डू यू फील?" तिचा हात आपल्या हातात घेत कृष्णा तिला विचारत होता.


"ते मला माहित नाही पण आत्ता या क्षणी तुला मिठी मारावीशी वाटतेय. मे आय हग यू?" त्याच्या डोळ्यात हरवत ती म्हणाली.


"शुअर, व्हाय नॉट?" तिला हलकेच मिठीत घेत तो म्हणाला. " प्रीती, फक्त चार दिवस. त्यानंतर तुला असे विचारायची गरज पडणार नाही. तुला वाटेल तेव्हा तू माझ्या मिठीत राहू शकतेस." तिला आपल्या बाहुपाशात कैद करत तो मिश्किलपणे म्हणाला, तशी ती लाजून त्याच्यापासून दूर व्हायला गेली.


"प्रीती विल यू मॅरी मी?" तिचा हात पकडून दुसऱ्या हातात त्याचे पोस्टिंग ऑर्डरचे पत्र ठेवत त्याने विचारले.


"हे काय? आपलं लग्न होणार आहेच की आता." ती स्मित करून म्हणाली.


"हो, पण मी तुला म्हटलं होतं ना, की जेव्हा माझ्या हातात पोस्टिंग लेटर असेल तेव्हा मी तुला प्रपोज करणार. माझं हे स्वप्न पुर्ण होतेय. आता तुझे उत्तर हवेय. सांग ना लग्न करशील माझ्याशी?" त्याने तिच्यासाठी आणलेली अंगठी पुढे करत पुन्हा विचारले."येस ऑफ कॉर्स! ह्या जन्मात, पुढल्या जन्मात, पुढल्या सात जन्मात, त्यापुढील सत्तर जन्मात, शंभर जन्मात अगदी कायम मला केवळ तुझीच बनून रहायचे आहे."

ती इमोशनल होत म्हणाली.


"का? मला छळायला हा एक जन्म पुरेसा नाहीये का?" तो मिश्किलपणे हसला.


"अहं, अजिबात नाही. हा हँडसम आणि डॅशिंग नवरा मला प्रत्येक जन्मी हवा आहे." त्याच्या मिठीत अलगद शिरत ती म्हणाली.


"कृष्णा, रिंग इज जस्ट अमेझिंग. खूप सुंदर आहे ही. तुझी चॉईस फार सुंदर आहे." त्याच्याकडे बघून ती बोलत होती.


"आय नो द्याट. पण ही रिंग सिलेक्ट करायला माझ्यासोबत आणखी कोणीतरी होते हं."


"कोण?" त्याच्या छातीवरून डोके बाजूला करत ती.


"आहेत कोणीतरी स्पेशल." तो हसून.


"माझ्यापेक्षा आणखी दुसरे कोणी स्पेशल तुझ्या आयुष्यात आहेत, आय हेट यू." ती बाजूला सरत म्हणाली.


"तुझ्यापेक्षा स्पेशल दुसरं कुणीही नाही. पण तरीही ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांची बातच निराळी आहे." तिच्या गालावरची बट हलकेच बाजूला करत तो म्हणाला.


"कोण आहेत ते? मला त्यांच्याशी भेटायचे आहे."


"जेलस हं? बट डोन्ट वरी, आपल्या लग्नासाठी त्यांना मी इनव्हाईट केलंय, तेव्हा भेटशीलच की." तिचे नाक चिमटीत पकडून तो म्हणाला.


नॉऊ एंजॉय युअर फेवरेट फुड." तिला घास भरवत तो म्हणाला.


"कृष्णाऽऽ" त्याने सोनिया व्हिलासमोर कार थांबवली तसे ती त्याला म्हणाली.

"हं."

"ती स्पेशल व्यक्ती माझ्यापेक्षा सुंदर आहे?" तिने पुन्हा तो विषय उकरून काढला.

"हो. तू बघशील तर तुलाही त्या आवडतील." तो परत मिश्किल हसला.


"कृष्णा, तुला माझ्यापेक्षा सुंदर दुसरं कोणी कसे काय वाटू शकते?" ती खट्टू होत म्हणाली.


"अगं खरंच, तू त्यांना भेटशील तर तुझाही विश्वास बसेल. आणि स्टुपिड इतकं अनसेक्युअर व्हायची गरज नाहीये. आय एम ओन्ली युअर्स अँड आल्वेज युअर्स."

तिच्या गालावर ओठांची मोहर उमटवत तो म्हणाला.


त्याच्या त्या अनपेक्षित कृतीने तिचा चेहरा लाजेने अगदी लाल झाला. हाताने चेहरा झाकून घेत ती आत जायला वळली. तिची अवस्था बघून कृष्णाच्या ओठावरचे हसू आणखी रुंदावले.

:

क्रमश:

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//