Mar 01, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७३

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७३


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -त्र्याहत्तर.

"अगं भीती काय वाटायची? मी काल रात्रीच त्यांच्याकडून परमिशन घेतली होती आणि जेव्हा त्यांना भेटायला पहिल्यांदा घरी आलो होतो तेव्हाच त्यांना तुझ्याबद्दल सांगून मागणी घातली होती की. तेव्हा त्या अनकॉंशीयस असल्या तरी त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीबद्दल बोललेले कळत होते." तो हसून म्हणाला.

"किती छुपे रुस्तम आहात तुम्ही दोघं? मला तर काहीच ठाऊक नव्हतं. घरी परतल्यावर माईसमोर मला किती लाजायला होईल अरे." विचार करूनच तिचे गाल लाल झाले होते.

"प्यार किया तो लाजना क्यूँ?" तिच्याकडे नजर रोखून बघत तो म्हणाला. त्यावर लाजून तिने डोक्यावर हात मारला.

"बरं, आता रात्र होईपर्यंत काय करायचे? चल तुला आमचे पुणे फिरवते." ती.

"प्लॅन रेडी आहे मॅडम. तीन ते सहा सिनेमा. सहानंतर पर्वती हिल्स. त्यानंतर इथे रिटर्न. आफ्टरद्याट डिनर आणि त्यानंतर एअरपोर्ट." तो हसून म्हणाला.

"हम्म! तू तर पुर्ण तयारीनिशी आलाहेस. आय एम इम्प्रेस्ड." ती.

"मग, काय करणार? होणारी बायको इतकी मोठी उद्योजिका आहे, मग तिच्यासमोर फुल प्लॅननेच जावे लागेल ना? बरंआता रूमवर जाऊया. थोडं फ्रेश होऊन मग मुव्हीला निघूया." तिच्यासमोर हात करत तो म्हणाला. यावेळी मात्र तिने त्याच्या हातात हात दिला आणि तसेच दोघे रूममध्ये गेले.

******

सिनेमा, पर्वती हिल्स, डिनर.. आजचा दिवस फक्त त्या दोघांचा होता. आजच्या इतक्या सुंदर दिवसाची प्रीतीने कल्पनाही केली नव्हती. मुळात कृष्णा तिला असे सरप्राईज देईल अशी मनात अंधुकशीही आशा नव्हती. दोघेही खूप खूष होते आज.

दोन वर्षाचा कालावधी खूप मोठा होता आणि त्याची भरपायी म्हणून आजचा अख्खा दिवस त्या दोघांनी सेलिब्रेट केला होता. प्रीतीने त्याला एक महागडे घड्याळ भेट म्हणून दिली. तिची आठवण म्हणून. प्रत्येकवेळी सोबत असावी म्हणून.

मनात दिवसभर लुटलेला खूप सारा भरला होता. रात्र होत आली आणि डोळ्यात मात्र तो आनंद सरून आता विरहाचे नभ उतरु लागले होते. त्याला एअरपोर्टवर सोडून द्यायची वेळ जसजशी जवळ येत होती प्रीतीचा चेहरा हळूहळू कोमेजत होता.

"ए,वेडूली तू मला अशा चेहऱ्याने सी ऑफ करायला येणारेस? मी हा असा चेहरा हृदयात कोरून घेऊन जाऊ अशी ईच्छा आहे का तुझी?" प्रीतीची हनुवटी वर उचलत कृष्णा म्हणाला.

तिने खाली बघूनच नाही म्हणून मान हलवली. त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची तिची हिंमत नव्हती. डोळ्यात उतरलेले नभ केव्हा बरसतील काही सांगता येत नव्हते.

"प्रीती प्लीज रडू नकोस ना गं. आपण आपल्या नात्याची एकमेकांना कबुली दिलीये ना? मग रोज आपण व्हिडीओ कॉलवर बोलत जाऊ. तू म्हणशील तेव्हा, तू म्हणशील तितका वेळ." तो तिला समजावत होता.

"हम्म." ती एवढेच बोलली. तिला माहित होते, तो म्हणतोय ते शक्य नाहीये. ती म्हणेल तेव्हा, म्हणेल तितका वेळ बोलत राहायला खरंच त्याला जमणार होते का?

"तू अशी रडशील तर मलाही रडू येईल." बोलतानाच एक थेंब तिच्या हातावर सांडला.

"अरे वेडा आहेस का तू? मी कुठे रडते आहे? आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. चल चेहरा धुऊन घे आणि तयारीला लाग. आणि.."

"आणि काय?" तो.

"आणि हा शर्ट घालून ये. बघ तुला कसा दिसतो ते." त्याच्या हातात शॉपिंगची पिशवी देत ती म्हणाली. तो हसून बाथरूममध्ये गेला.

तो आला तेव्हा त्याच्या अंगावर तिने दिलेला शर्ट होता. तिने तिच्या ड्रेसला मॅचिंग रंगाचा शर्ट घेतला होता आणि त्यात आणखीनच हँडसम दिसत होता.

"आता मी ड्राइव्ह करते. तू बसायचं." त्याच्या हातून कारची चावी घेत ती म्हणाली. एअरपोर्टवर पोहचे पर्यंत दोघेही खूप गप्पा मारत होते. मनात विरहाचे दुःख असले तरी दोघेही ते चेहऱ्यावर येऊ न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते.

एअरपोर्टला पोहचल्यावर प्रीतीला परत एक मोठे सरप्राईज मिळाले. बाहेरच समीर, स्वीटी आणि मिहीर उभे होते.

"सरप्राऽईज." सर्व एका सुरात म्हणाले. कृष्णाने सगळ्यांना एक टाईट हग केले.

"देन? हॉऊ वाज युअर डेट?" स्वीटीने डोळा मारत विचारले.

"म्हणजे तुम्हालाही ठाऊक होतं?" प्रीतीने लाजून डोळे झाकले.

"क्या बात? ब्लशिंग हं." स्वीटीने तिला कोपराने धक्का दिला.

"तुम्ही सगळे इथे कसे?" विषय टाळत तिने विचारले.

"शेवटी फ्रेंड्स आहोत आपण. शेपटासारखे मागे मागे राहणारच ना?" समीर म्हणाला तसा एकच हशा पिकला.

प्रीतीच्या मुखावर आलेले निखळ हसू बघून कृष्णा सुखावला. तिला सोडून जाताना त्याला हाच चेहरा तर हवा होता. आणि म्हणूनच त्याने समीरला बोलावून घेतले होते. त्याच्या सानिध्यात प्रीती आनंदी असते हे ठाऊक होतेच की त्याला.

कृष्णाच्या विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा प्रीतीच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या पण समीरच्या जादूच्या झप्पीने ओठावर हसू रेंगाळले.


"चला, आम्ही तुला घरी सोडतो." तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला.

"अरे कशाला? जाईन ना मी. तुम्हाला उगाच त्रास नको." ती.


"त्रास होईल की नाही माहीत नाही पण तुला सोडायला आलो नाही तर आयपीएस साहेब आम्हाला सोडणार नाही हे मात्र नक्की." मिहीरने तिच्यावर कोटी केली.

"अंकल, तुम्ही सुद्धा?" तिला परत लाजायला झाले.


"चल कीज दे. मी ड्राइव्ह करणार. तू बैस." तिच्या हातातील चावी घेत मिहीर.


"आता हे काय आणखी? एवढी स्पेशल ट्रीटमेंट?" ती हसली.


"हम्म. स्पेशल व्यक्तीला स्पेशल ट्रीटमेंट. वरून तसे आदेशच आलेत." कार चालवत मिहीर म्हणाला.

स्वीटी आणि समीर त्याच्या कारमध्ये होते तर मिहीर प्रीतीची कार चालवत होता.

"अंकल काय हो." तिला काय बोलावे सुचत नव्हते. ती गप्पच बसली.


" यू नो प्रीती, तू आज खूप सुंदर दिसते आहेस. कृष्णाच्या प्रेमाचा गोडवा पसरलाय तुझ्या चेहऱ्यावर. आय एम सो हॅपी फॉर यू. नेहमी अशीच आनंदी रहा.त्याला कधी दुखावू नकोस. ही इज सच अ नाईस गाय. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर." मिहीरच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक प्रसन्नतेची झालर उमटली.


"येस अंकल. खरंच खूप प्रेम आहे त्याचे. आय एम रिअली लकी." त्याच्याबद्दल बोलताना तिचे डोळे चमकत होते.


"अरे, हो. या गडबडीत एक सांगायचे राहिलेच. आज सकाळी गुरुजी घरी आले होते. पंधरा दिवसांनी आणि त्याच्या पुढच्या दोन महिन्यांनी शुभ मुहूर्त आहे असे ते सांगत होते. सोनियाच्या लग्नासाठी कुठला मुहूर्त फिक्स करायचा ते सांग." त्याने शांतपणे विचारले.


"पंधरा दिवसानंतरचा करूया? आता माई आणि बाबांना जास्त दिवस दूर नको ठेवायला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटते?" तिने त्याला प्रश्न केला आणि लगेच जीभ चावली.


"सॉरी अंकल." त्याला सोनियाबद्दल उगाचच विचारले असे वाटून तिने मान खाली घातली.


"सॉरी म्हणायची गरज नाहीये प्रीती. मी आता सगळे स्वीकारलेय आणि त्यामुळे मला हलके झाल्यासारखे वाटत आहे." तिच्याकडे बघून त्याने स्मित केले.


"आणि मला देखील त्यांच्या लग्नासाठी हाच मुहूर्त योग्य वाटतोय. कारण आपले लव्हबर्ड्स यांचे केव्हा लग्न होते आणि ते केव्हा लग्न करतील याची वाटच पाहत आहेत. तेव्हा पुढचा मुहूर्त त्यांच्यासाठी ठेऊया." आरशातून मागच्या कार मध्ये असलेल्या समीर आणि स्वीटीकडे बघून तो म्हणाला.

"यू आर राईट!" ती उत्तरली.

बोलत असतानाच ते घरी पोहचले. तिची कार पार्क करून मिहीर समीरच्या कारमध्ये बसला आणि मग ते त्यांच्या घराकडे निघाले.

*******

"वेलकम होम सिस!" प्रीती आली तेव्हा निकी दारात उभी होती.

प्रीतीने तिला मिठी मारली आणि ती सरळ सोनियाच्या खोलीत गेली.

"माई." तिने सोनियाला प्रेमाने आलिंगन दिले.

"हॅपी टुडे?" सोनियाने तिला कुरवाळत विचारले.

"माई थँक यू सो मच! यू गेव्ह मी सच अ ब्युटीफुल रिटर्न गिफ्ट." प्रीती गोड हसून म्हणाली.

"तुला द्यायलाच हवे. माझी लाडकी लेक आहेस तू." तिच्या कपाळावर ओठ टेकवत सोनिया म्हणाली.

"प्रीती दी, रिंग इज सो ब्युटीफुल." निकी आत येत म्हणाली.

निकी आहेस छोटीशीच, पण डोकं फार चालतं हं." प्रीतीने तिचा कान हलकेच ओढला.

"हां, पण चांगल्या कामासाठीच चालतो बरं." तिने प्रीतीकडे बघून डोळा मारला आणि प्रीतीने डोक्यावर हात मारला.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//