प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६३

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - त्रेसष्ट

"माई तुझा आवाज ऐकायला कान किती आतूर झाले होते म्हणून सांगू? मी रोज देवाला एकच मागणे मागत होते, माझ्या माईला लवकर बरी होऊ दे. आणखी मग मला काही नको. माई तू माझं पहिलं दैवत आहेस पण तुझ्यासाठी मी देवळातल्या देवांना साकडं घातलं होतं गं." प्रीतीने हुंदका दिला.

"प्रीत, तू देवाला मानायला लागलीस? कधीपासून?" सोनियाचा प्रश्न.

"ती एक वेगळीच स्टोरी आहे. सांगेन तुला." डोळे पुसत प्रीती म्हणाली. "आता रेस्ट घे. गुड गर्ल आहेस ना तू? कधी थोडं आपल्या लेकीचेदेखील ऐकत जा."

तिला खाली बसवत प्रीती म्हणाली. सोनिया त्यावर काही न बोलता गुमान ती म्हणेल तसे ऐकत होती. थोड्यावेळात तिने डोळे मिटले. प्रीतीने तिचा हात हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. किती दिवसानंतर तिला तिची माई परत मिळाल्यासारखी वाटत होते.


मायलेकींच्या प्रेमळ नात्याकडे मोहन डोळ्यात पाणी आणून पाहत होता. या पंचवीस वर्षात त्याने खूप काही मिस केले होते.

प्रीतीने सोनियाच्या हातावरून आपला हात काढून घेतला.

"मिस्टर मोहन, माई झोपलीय. आपण बाहेर थांबूया?" तिच्या बोलण्यावर त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून मग तिने त्याच्याकडे पाहिले.

त्याचे काळेभोर डोळे तिच्यावरच रोखले होते. त्या डोळ्यात तिच्याबद्दल जाणवणाऱ्या प्रेमाची अनुभूती तिला कळत होती.

"मिस्टर मोहन.." ती परत म्हणाली.

"अ? हं? काय म्हणालीस?" त्याने गोंधळून विचारले.

"बाहेर थांबूया?" ती परत एकदा.

"अ? हो. चल." तिच्यावर रोखलेली नजर बाजुला वळवून तो म्हणाला.

"माय माई इज बॅक. मिस्टर मोहन आय एम व्हेरी हॅपी!"
बाहेर आल्यावर बोलताना ती म्हणाली.

"आय एम अल्सो व्हेरी हॅपी फॉर यू!" तो तिच्याकडे पाहत म्हणाला. " प्रीती, तू माझ्यासाठी आनंदी आहेस ना?" यावेळी त्याची नजर परत तिच्यावर रोखली होती.

"आय एम हॅपी फॉर माई. शेवटी तिचा मोहन तिला परत मिळालाय." त्याच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली.

"अँड व्हॉट अबाऊट मी?" तो.

"तुम्हाला भेटून माई आनंदी आहे तर मग मी सुद्धा आनंदीच असेन ना." ती मंद हसली.

"प्रीती, मला भीती वाटतेय. मी गावाला परत गेल्यावर लग्न केले होते हे ऐकल्यावर सोनिया मला खरंच ॲक्सेप्ट करेल ना?" तो.

"त्यावेळी परिस्थिती तशी होती. त्यावेळी तुम्ही जे वागलात, कदाचित ते योग्य असेल. माई तेवढे समजून घेईल की."

"तुला खरंच असं वाटत?" तो.

"हम्म. इतक्या वर्षाच्या सहवासात ती कोणत्या गोष्टीवर कशी रिॲक्ट होईल याचा अंदाज येतो मला."
ती परत मंद स्मित करून म्हणाली.

"प्रीती, सोनियासारखीच तूही खूप पॉझिटिव्ह असतेस. सोनिया प्रत्येक सिच्यूएशन मधून पॉझिटिव्हली विचार करायची, तशीच तू आहेस.

मला मात्र असं कधी जमलंच नाही. जेव्हा ती प्रेग्नन्ट आहे हे कळलं होतं तेव्हा तिच्यापेक्षा मीच जास्त टेन्स होतो. गावावरून जेव्हा मुंबईला परत आलो तेव्हा त्याच निगेटिव्हिटी मुळे मी तिला हरवून बसलो. कदाचित ती आहे असा विचार करून आणखी प्रयत्न केला असता तर पंचवीस वर्षांचा हा दुरावा सहन करायला लागला नसता." तो खिन्नपणे म्हणाला.



"मिस्टर मोहन, त्या निगेटिव्हिटीमुळेच तर तुम्हाला स्वीटीच्या रूपात एक गोड मुलगी मिळाली ना? माझ्याकडे माझी माई होतीच. स्वीटीला तिचा नसलेला पण तिचाच असलेला हक्काचा डॅड तर मिळाला." प्रीती.

"हम्म. तेव्हाचे काय चूक, काय बरोबर हे आता ठरवता येत नाहीये. पण प्रीती मला खरंच भीती वाटतेय. सोनियाचा नकार पाचवण्याची हिंमत आता नाही उरलीय गं माझ्यात." मोहन.

"मिस्टर मोहन, एक सुचवू?"

"काय?"

"तुम्ही परत एकदा माईला प्रपोज करा ना. अगदी तसेच, जेव्हा तुम्ही तिला पहिल्यांदा लग्नाविषयी विचारले होते." प्रीती त्याच्या समस्येवर तोडगा काढत म्हणाली.

"हे काम करेल?"

"हँड्रेड परसेन्ट." ती आत्मविश्वासाने म्हणाली.

त्याच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे हसू होते. "प्रीती तू खरंच सोनियासारखी आहेस. तुझ्या निव्वळ बोलण्यामुळे सुद्धा मला बेटर फील होत आहे." ओठ रुंदावून तो म्हणाला.

"मिस्टर मोहन, ऑफ्टरऑल मी तिचीच लेक आहे की." ती हसून म्हणाली.

"आणि माझी?"

त्याच्या प्रश्नावर तिने दुसरीकडे नजर वळवली. तिच्या डोळ्यात पाणी का आले हे तिलाही कळले नाही.

*******

"वॉव! सोना आत्तू आज घरी येतेय?" निकीने आनंदाने एक गिरकी घेतली.

"अगं ए वेडाबाई, अशाने पायावर ताण येईल ना. जरा इमोशन्स कंट्रोल करायला शिक की." स्वीटी तिला खुर्चीवर बसवत म्हणाली.

आत्ताच हॉस्पिटलमधून राधामावशीला प्रीतीचा कॉल आला होता. सोनियाची प्रोग्रेस बघून डॉक्टरांनी घरी जायला परमिशन दिली होती. पुन्हा एकदा काही टेस्ट्स, एमआरआय झाल्यावर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

त्याबद्दलच राधामावशी आणि विरेन बोलत असताना स्वीटीने ते ऐकले आणि तिने हे निकीला सांगताच तिला आनंदाने हर्षवायू झाला होता.

"स्वीटी दी, अरे या एका गिरकीने मला काहीच होणार नाही. सोना आत्तू घरी आली की मी तर फुल्ल जोशमध्ये डान्स करणार आहे." तिच्यात उत्साह संचारला होता.

त्यावर स्वीटी केवळ हसली.

"स्वीटी दी, सगळं कसं आनंदीदायक घडत आहे गं. सोनिया आत्तूचा ॲक्सीडेन्ट झाला ही फार मोठी वाईट घटना होती पण त्यानंतर सगळं छानच घडतेय. प्रीती दीला मी भेटते काय आणि मग आम्हाला आमचे नाते उमगते. अचानक तिला मोहन अंकल भेटतात आणि आत्तू बरी व्हायला लागते. सगळं अगदी मिरॅकल सारखं वाटतंय ना." स्वीटीकडे बघत ती.

"हम्म." स्वीटी कोरडे हसली.

"चिअर अप डिअर सिस्टर. आत्तूला तू जेव्हा भेटशील ना तेव्हा तुलाही कळेल की ती म्हणजे काय चीज आहे. मी तर केवढी आतुर झालीये म्हणून सांगू? आय कान्ट एक्सप्रेस माय इमोशन्स इन वर्ड्स. आत्तूसाठी बाबाला मी कित्येकदा तीळ तीळ तुटताना पाहिलंय गं. इतक्या वर्षांनी दोघे बहीणभाऊ भेटलेत त्या क्षणाची मला साक्षीदार होता आले नाही, पण आता मात्र मला तिच्याशी बोलायची खूप ओढ लागलेली आहे." निकी.

"हम्म." स्वीटी.

"दी, तू सारखी हम्म, हम्म काय करतेस? तू जेव्हा तिला भेटशील ना तेव्हा तुला कळेल की मोहन अंकल तिच्या प्रेमात इतके कासे गुंतलेत ते."

"निकी.." मोहन आणि सोनियाच्या नात्याबद्दल ऐकून स्वीटीला कसेतरी झाले. मोहन तिच्यापासून दुरावेल ही वेडी भीती पुन्हा डोके वर काढत होती.

"चिल दी. तू उगाच टेंशन घेत आहेस. मोहन अंकल जसे आत्तूच्या प्रेमात पडले ना तशी एक दिवस तू देखील तिच्या प्रेमात पडशील. लवकरच तू तिला स्वीकारशील. स्वतःहून." स्वीटीचा हात हातात घेत निकी म्हणाली.

तिच्या बोलण्यावर स्वीटी बळेच हसली.

"सोनिया घरी येतेय हे कळले का पोरींनो?" राधामावशी मधुरा सोबत निकीच्या खोलीत येत म्हणाली.

"हो राधाई, आम्ही त्याविषयीच बोलत होतो. खूप ग्रेट न्युज आहे ही." निकी.

"मी काय म्हणते, त्या येत आहेत ही आनंदाची बातमी आहेच आपण तिला आणखी यादगार बनवले तर?" राधामावशीकडे बघत स्वीटी म्हणाली.

"म्हणजे?" राधामावशी.

"म्हणजे हा बंगला मस्तपैकी डेकोरेट करूया. सोनिया आँटीसाठी पायघड्या अंथरुया. त्या आत येत असताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू या. अशाप्रकारे आणखी काही." ती विचार करत.

"भारीच की. मला तुझी आयडिया फार आवडली. राधामावशी तुम्ही काय म्हणता?" मधुरा मावशीकडे पाहत बोलली.

"अरे व्वा! मलाही आवडलं गं. मिहीरला फोन करून याबद्दल सांगते मी. चल मधुरा आपल्याला आवरायला हवे. मुलींनो तुम्ही सुद्धा मस्तपैकी तयार व्हा." राधामावशी दोघींकडे बघून म्हणाली.


"दी, तुझ्या डोक्यातून असली सुपर आयडिया बाहेर पडेल असं वाटलं नव्हतं गं मला." राधामावशी आणि मधुरा बाहेर गेल्यावर निकी स्वीटीला मिठी मारत म्हणाली.

"व्हाय? सोनिया आँटीबद्दल माझ्या मनात राग नाहीये गं. त्यांच्या बद्दल मला नेमकं काय वाटतं ते मला माहिती नाही. पण इतक्या दिवसांच्या आजारपणाशी लढवून त्या आज परत आपल्या पायावर चालत त्यांच्या घरी परतत आहेत. मग हा आनंदसोहळा करायला काय हरकत आहे ना? हा दिवस बघायला सर्व मंडळी किती आतुरतेने वाट बघत होती. आता सर्वांच्या मनावरचे दडपण संपलेय. मग सर्वांनी हा क्षण सेलिब्रेट करायला हवाच. व्हाट यू से?"
स्वीटी मनापासून बोलत होती ते ऐकून निकीला फार बरे वाटत होते.

"यू आर राईट दी. आता दुःखाची किनार नको केवळ फुल टू एन्जॉय!" निकीचा चेहरा फुलला होता.


राधामावशीने स्वीटीच्या कल्पनेचे स्वागत करून लगेच मिहीरला फोन केला. त्यांचे बोलणे झाल्यावर मिहीरने लगेच इव्हेंट ऑर्गनायझरला कॉल केला आणि त्याला सगळी इंस्ट्रक्शन्स दिल्या. पुढच्या दोन तासात सोनप्रीत बंगल्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला होता.

बंगल्यावर फुलांच्या माळा सोडल्या होत्या. बंगल्याच्या मुख्य दरवाज्यापासून तर बाहेरच्या गेट पर्यंत मऊ मखमली पायघड्या पसरल्या होत्या. सोनियाच्या स्वागतासाठी तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी हातात फुलांचे ताट घेऊन दोन्ही बाजूनी बायका उभ्या होत्या. स्वीटीने सुचवल्याप्रमाणे मिहीरने सर्व ऑर्गनाईझ करून घेतले होते.

इकडे घरात कित्येक दिवसानंतर राधामावशी नटली होती. तिच्या लेकीच्या बरे होण्याचा आनंदसोहळा तिच्यासाठी खूप खास होता. मधुरादेखील मस्तपैकी तयार झाली होती. आपल्या नणंदेला भेटण्यासाठी ती सुद्धा आतूर होती.

निकी आणि स्वीटी छान रेडी झाल्या होत्या. पुरुषमंडळी एक वेगळ्याच उत्साहात होती.

"राधाई,, मी काय म्हणतो? परवा आपण केक कापला पण त्याचा आनंद लुटता आला नाही. आज आपण परत एकदा सोनियाआँटीचा बी लेटेड हॅपी बड्डे साजरा करायचा का?"

समीरने प्रस्ताव मांडला अन लगेच राधामावशी तिच्या लाडक्या सोनाच्या आवडत्या फ्लेवरचा केक बनवायच्या कामाला लागली.

केकचा सुगंध संपूर्ण बंगल्यात दरवळत होता. काही वेळातच मिहीर त्याच्यासोबत तुषार आणि माहीला (समीरचे मॉम -डॅड) घेऊन आला. सगळीकडे आनंदीआनंद होता. आता वाट होती ती सोनियाच्या आगमनाची.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all