Feb 27, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५९

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५९

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग - एकोणसाठ.


"बाबा म्हणशील?" भूतकाळातून बाहेर येत त्याने ओल्या डोळ्यांनी प्रीतीला विचारले.

"कदाचित मला ते शक्य होणार नाही." आपली नजर खाली वळवत प्रीती म्हणाली.

"हो,.समजू शकतो मी. तुझ्या मनात काय चाललंय याची कल्पना आहे. तू मला बाबा म्हणावे ही जबरदस्ती नाहीये. पण जर कधी वाटलंच तर नक्की या हाकेने आवाज दे. मी वाट पाहीन." त्याने एक आवंढा गिळला.


ते दोघे एकमेकांशी बोलत होते तेव्हा सोनियाच्या पापण्यांची पुन्हा थरथर झाली, दोघांना ते कळलेही नाही.


"तुम्हाला ऑलरेडी एक मुलगी आहे की, मग पुन्हा माझ्याकडून ही अपेक्षा का?" धीर एकवटून प्रीतीने विचारले.

"हम्म. खरं आहे तुझं. स्वीटी माझी मुलगी आहे. इनफॅक्ट ती जग आहे माझं. आजवर तिच्यासाठीच मी जगत आलोय. ती नसती ना आयुष्यात, तर कदाचित मीदेखील नसतो. आमच्या दोघांच्या विश्वात मी आनंदी होतो, पण मला कळलेय तो आनंद खरा असला तरी ते जग आभासी होते. माझे जग तर सोनिया आहे. आणि प्रीती तू माझा अंश आहेस बेटा. तुझ्याकडून तेवढी अपेक्षा करूच शकतो ना?"

तो आशाळभूतपणे तिच्याकडे पाहत होता.

"म्हणजे स्वीटी? तुम्हाला कळले की ती तुमची मुलगी नाहीये म्हणून तिला तुम्ही सोडून देणार? वाह मिस्टर मोहन, ग्रेट!" ती काहीशा उपरोधाने बोलत होती.

"नो, नेव्हर. स्वीटीला मी का सोडू? शी इज ओन्ली माईन. ती माझी बॉयलॉजिकल डॉटर नाहीये हे कळलं म्हणून मला काहीच फरक पडत नाही. तिच्यासाठी जे प्रेम माझ्या हृदयात आहे ते कधीच कमी होणार नाही. ती माझीच आहे, बट प्रीती यू अल्सो माईन. सोनिया आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू. स्वीटीसोबत मला तू सुद्धा हवी आहेस. मला काय म्हणायचे आहे हे तुला कळतंय का?"

त्याच्या चेहऱ्यावरची अगतिकता स्पष्ट दिसत होती.


तिला कळत तर सारेच होते. कृष्णा म्हणाला तसे तिलाही वाटले, सारे काही विसरून एक वडील या नात्याने त्याचा विचार करून बघायला काय हरकत आहे? पण मन मात्र अजूनही परवानगी देत नव्हते. मनातील चलबिचल तशीच होती.. अजूनही. 

बोलत असताना मोहनला सोनियाचा पकडून ठेवलेल्या हाताची बोटे हलल्यासारखी वाटली.

"मिस्टर मोहन." तो काही बोलणार त्या पूर्वीच आपल्या जागेवरून उठत प्रीतीने त्याला आवाज दिला.

"मिस्टर मोहन, लुक. माईची बोटे हलत आहेत." तिची नजर सोनियाच्या दुसऱ्या हाताकडे होती.

त्याला तेच जाणवले होते अन त्याचक्षणी तिनेही तेच पाहिले.

'मला नाकरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्रीती आपण एकमेकांशी जुळले आहोत गं. तुझ्या जन्माआधीपासूनच.' तो तिच्याकडे पाहत मनात बोलला.


"मिस्टर मोहन, माझ्याकडे काय बघत बसलात? नर्सला बोलवा मी डॉक्टरांना कॉल करते." मोबाईल हातात घेत ती म्हणाली. बोलता बोलता डॉक्टरांना कॉल कनेक्ट सुद्धा केला.


"सर, तुम्ही मॅडमशी काहीतरी बोलत रहा. त्या तुमच्या बोलण्याला रिस्पॉन्स देत आहेत." सोनियाच्या औषधाचे डोज ऍडजस्ट करत सिनिअर नर्स म्हणाली. तोवर प्रीतीने डॉक्टरांशी बोलून त्यांना कळवले होते. 


******

"मामा, ऐक ना. तू आज आमच्याकडे थांब. तुझ्या बंगल्यावर नको जाऊ." समीर कार त्याच्या बंगल्याकडे वळवत म्हणाला.


"अरे माझ्या छोट्या मित्रा, मी अगदी नॉर्मल आहे. माझ्या घरी मी एकटा राहू शकतो, तू इतके टेंशन घेऊ नकोस."


"टेंशन तुझे नाही रे, माझे आलेय. मम्मा पप्पांना स्वीटीबद्दल सांगायचे आहे ना. तू सोबत असलास की कसे एक आधार वाटतो."

तो डोळा मारत म्हणाला आणि मिहीर ओठ रुंदावून सीटला डोके टेकून बसला. त्याला माहिती होते, तो स्वीटीचे कारण पुढे करतोय पण मनात त्याचीच काळजी चालली आहे."काय सांगतो आहेस? तू स्वीटीशी लग्न करणार आहेस?" घरी गेल्या गेल्या समीर ने बॉम्ब फोडला तशी माही, त्याची मम्मा शॉक होऊन म्हणाली.

"हो, अगं. वी आर इन लव्ह." तो म्हणाला.

"अँड टुडे लव्ह वॉज इन एअर." मिहीर हसून म्हणाला.

"तू का हसतोस? गधड्या तुला माहितीये ना माझ्या मनात काही वेगळेच होते ते." माही.

"काय? मम्मा?" समीरच्या चेहऱ्यावर टेंशन झळकत होते.

"तिच्या मनात सोनप्रीतच्या नव्या एचआर ला सुनबाई करायचे होते." इतका वेळ शांत बसलेला तुषार म्हणाला.

"व्हॉट? पापा, यू आर टॉकिंग अबाऊट प्रीती?" समीर.

"हो, प्रीती आवडते मला. इनफॅक्ट तुझ्या पप्पाला देखील आवडते. आम्हाला वाटलं तुलाही ती आवडत असावी." माहीचा सूर नाराजीचा झाला होता.


"येस मम्मा, मला प्रीती आवडते. तिलाही मी आवडतो. बट वी आर जस्ट फ्रेंड्स, रादर बेस्ट फ्रेंड्स. त्याव्यतिरिक्त आमच्यात दुसरं काहीच नाहीये. मामा तू तरी सांग ना रे." समीर मिहीरकडे पाहून म्हणाला.


"मी काय सांगू? तू इतक्या चांगल्याप्रकारे खिंड लढवत आहेस, मला काही बोलायची गरजच नाहीये. लढो बेटाजी लढो." मिहीर त्याची पाठ थोपटत म्हणाला.


"मम्मा, पप्पा. आय लव्ह स्वीटी. तिच्याशिवाय मी दुसऱ्या मुलीचा कधी विचारही करू शकत नाही. तुम्हाला कळतेय ना?" तो शांत पण गंभीर आवाजात बोलत होता.

"हो, कळतंय. आमचा मुलगा मोठा झालाय हे कळतेय." माही.


"मॉम, तू नाराज आहेस का?" तिला हातांचा विळखा घालत त्याने विचारले.

"नाही रे, तू जे ठरवशील त्यात तुझ्या सोबत आहे मी." त्याच्या गालाला हात लाऊन हसत माही म्हणाली.

"आणि मी पण." त्या दोघांना हग करत तुषार म्हणाला.

"मी तर नेहमीच असतो." मिहीर अंगठा दाखवत बोलला.

"थॅंक यू सो मच. तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल याचे जरा टेंशनच आले होते. पण आता मी रिलॅक्स आहे." समीरच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

"बरं, मग सांग कधी भेटवतोस आमच्या सुनेला?" माही.

"तू म्हणशील तेव्हा. तशीही ती सध्या तुझ्या लाडक्या प्रीतीकडे थांबलीय." समीर.

प्रीतीकडे? का रे? आणि प्रीतीवरून आठवलं सोनिया कशी आहे? काही प्रोग्रेस आहे की नाही." माहीने विचारले. त्यावर मग समीरने आज घडलेला सगळा वृत्तांत सांगितला.

"होप सोनिया लवकर बरी होईल." तीने एक सुस्कारा टाकला.

'मम्मा, स्वीटीचे खरे मॉमडॅड कोण आहेत हे माहित नाही, त्याबद्दल तुमचा काही आक्षेप नाही ना?" त्याने चाचरत विचारले.


"नाही रे. जे घडून गेलेय त्याबद्दल कशाला विचार करायचा? तुमचे एकमेकांवर प्रेम आहे हेच तुमच्या नात्यासाठी पुरेसे आहे." त्याच्या खांद्यावर हात ठेवत माही म्हणाली.

सर्वांचे चेहरे आता समाधानाने फुलले होते.


******


डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार नर्सने सोनियाचे डोजेस ॲडजस्ट केले होते. बोटांच्या हालचालीबरोबरच आता पापण्या हळूहळू हलत होत्या.


"माई.." हर्षाने प्रीतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते कारण डॉक्टरांनी त्यांना चोवीस तासात शुद्ध आली तर पॉझिटिव्ह चान्सेस आहेत हे सांगितले होते.


"सिस्टर, मॅमचा रिस्पॉन्स कसा आहे?" दहा मिनिटात डॉक्टर तिथे पोहचले.

"सर तुम्हीच बघा ना." स्मित करून नर्स बोलली.

सोनियाला बघून डॉक्टरांच्या चेहऱ्यावरसुद्धा समाधानाचे भाव उमटले.

"इट्स मिरॅकल सर. सोनिया मॅम इतक्यात अशा रिस्पॉन्ड करतील ही आशा आम्ही सोडली होती. तुम्ही आलात आणि तुमच्या येण्याने एका दिवसात जादू झालीये." डॉक्टर मोहनकडे बघून म्हणाले.


"माई? डॉक्टर, माईच्या डोळ्यातून पाणी वाहतेय." इतका वेळ तिच्या चेहऱ्यावर नजर खिळवून बसलेल्या प्रीतीला सोनियाच्या गालावरचे ओघळ दिसले.


"इट्स गुड इंडिकेशन प्रीती मॅम. याचा अर्थ सोनिया मॅम तुमचे बोलणे ऐकू शकताहेत. आपण काय बोलतोय हे त्यांच्या मेंदूपर्यंत पोहचते आहे. केवळ त्या सध्या बोलण्यातून व्यक्त होऊ शकत नाहीयेत. पण त्यांचे अश्रू म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे असे आपण समजू शकतो."डॉक्टर आत्मविश्वासाने बोलत होते.


"डॉक्टर, तिला हॉस्पिटलाईज करावे लागेल का?" मोहनचा प्रश्न.


"खरं तर तशी त्याची गरज नाहीये कारण जी ट्रीटमेंट आपण हॉस्पिटलमध्ये देऊ तीच इथे देत आहोत. या रूमचे आपण आयसीयूत रूपांतर केले आहेच की. पण आपल्याला त्यांच्या ब्रेनचा एकदा एमआरआय करावा लागेल त्यासाठी आपल्याला त्यांना घेऊन जावे लागेल.


आपण एक कामं करूया, पुढच्या आठवड्याभरासाठी त्यांना तिकडे शिफ्ट करूया. नंतर मग परत घरी इथेच ठेवता येईल. आपल्या माणसात राहून त्या लवकरच बोलायलाही लागतील." डॉक्टरांनी त्यांना सविस्तर समजावून सांगितले. 

"आत्ताच करावे लागेल?" प्रीती.

"हो, उशीर का करायचा? मी ॲम्ब्युलन्स मागवतो." त्यांनी हॉस्पिटलमध्ये फोन लावला.

"पुन्हा हॉस्पिटल?" दारात ॲम्ब्युलन्स बघून राधामावशीचा स्वर ओला झाला.

"डोन्ट वरी, आता त्या ॲम्ब्युलन्सने जात आहेत पण येताना त्यांच्या कारने परत येतील. तेव्हा काळजी करू नका, देवाची तेवढी प्रार्थना सुरू ठेवा."

डॉक्टरांच्या पॉझिटिव्ह बोलण्याने सर्वांना एक बळ आले.


आता सोनियाचा प्रवास पुन्हा एकदा रुग्णवाहिकेतून सुरू झाला होता.

:

क्रमश:

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//