प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५७

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!

प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - सत्तावन.


"स्वीटी आय कान्ट लिव्ह विदाउट सोनिया." स्वीटीला मिठी मारुन तो रडायला लागला.

"डॅड, आय नो. सोनिया आँन्टी या जगात नाहीत हे गृहीत धरून जगतानाही तू कायम त्यांना आपल्या हृदयात ठेवून जगत आलास. आता तर त्या प्रत्यक्षात तुझ्यासमोर आहेत ना? मग असा का बोलतोस तू? बी पॉझिटिव्ह अँड डोन्ट क्राय लाईक अ सिली बॉय. माझा सुपरडॅड आहेस ना तू? तुला मी असे हताश नाही बघू शकत."

त्याच्या केसातून हात फिरवत स्वीटी बोलत होती. तिच्याही डोळ्यातील पाणी केव्हाच वाहायला लागले होते.
तिने सोबत आणलेल्या प्लेटमधील जेवण चमच्यात घेऊन त्याच्या समोर धरले.


"डॅड, तुझ्या आयुष्यातील सुंदर दिवस आहे ना हा? मग रडतोस कशाला? उलट सोनियाआँटी क्युअर झाल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायला लागतील. त्यांना मनवावे लागेल. त्यासाठी तुला स्ट्रॉंग रहावे लागेल की नाही? या बायकांचं काही खरं नसते अरे. त्यांना मनवणे खूप कठीण असतं. मी पाच मिनिटं नाराज झाले तरी सॅमला मला खूष करायला दोन तास लागतात. सोनिया आँटीचा तर तुझ्यावर पंचवीस वर्षांचा रुसवा असेल मग त्यांचा राग घालवणं तुला किती कठीण होईल सगळं. म्हणून हे खा. माझ्यासाठी नाही किमान त्यांच्यासाठी तरी?"

"स्वीटी, खूप हट्टी आहेस तू आणि तितकीच गोड सुद्धा." तिच्या हातून खाताना तो म्हणाला.

"डॅड, तुझ्यासारखीच आहे मी. शेवटी तुझीच मुलगी आहे ना." त्याच्यासमोर चमचा पकडून ती म्हणाली. "खरंच आहे ना रे?" कातर स्वरात तिने विचारले.

तिच्या त्या स्वराने मोहनच्या काळजात चर्र झाले.

"स्वीटी तू माझीच मुलगी आहेस आणि कायम राहशील." त्याच्या शब्दात तिच्यासाठी केवळ प्रेमच होते.. वडिलांचे प्रेम.

"आता पुरे गं. आणखी नाही खाल्ले जाणार." तो.

"डॅड?" स्वीटी.

"स्वीटी, प्लीज."

"ओके. तू एवढा खाल्लंस, हेच माझ्यासाठी खूप आहे. मी प्लेट ठेवायला जाते." असे म्हणून ती स्वयंपाक घरात गेली

"सोनिया, ही स्वीटी. माझी लेक. माझ्या मनातील तुझी नी माझी लेक. माझे खुप प्रेम आहे गं तिच्यावर. तू ना लवकर बरी हो.मला सगळं सांगायचे आहे. तुला माफी मागायची आहे.आणि स्वीटी म्हणते तसा तर मी खरंच रडणार नाही. तू माझ्या आयुष्यात परत आलीहेस हा माझ्यासाठी तेवढा आनंदाचा क्षण आहे. मग मी का रडू बरं? मी स्ट्रॉंग राहीन. तुझ्यासाठी. आपल्या लेकींसाठी."
मोहनचा पुन्हा एकेरी संवाद सुरू झाला.
******

"हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू!"
टाळ्यांच्या गजरात सोनियाचा वाढदिवस साजरा होत होता. तिच्या खोलीत गर्दी करायची नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते त्यामुळे सगळ्यांनी खोलीबाहेरच टाळ्यांचा फेर धरला होता.

"प्रीती, तू आता केक काप." राधामावशी तिच्याकडे सूरी देत म्हणाली.

"राधाई मी?"

"हो, तू नाहीतर आणखी कोण? सोनियाला आवडते तसा मी केक तयार केलाय पण तीच खाऊ शकणार नाही. असे असले तरी आपण तिचा वाढदिवस उत्साहाने साजरा करणार होतो ना? काप तो केक आणि सोनियाच्या वतीने सर्वांना दे."

प्रीतीने मिहीरकडे नजर टाकली. त्याने इशाऱ्याने राधामावशीच्या बोलण्याला दुजोरा दिला. तिची नजर कुणास ठाऊक का, मोहनकडे वळली. त्यानेही नजरेनेच केक काप म्हणून सांगितले.

केक कापून तिने पहिला घास राधामावशीला भरवला. त्यानंतर मिहीर आणि मग मोहनजवळ येऊन उभी राहिली.

मोहनला भरवताना तिच्या डोळ्यात पाणी झळकले. त्याच्या मनाची अवस्था तिच्यासारखीच झाली होती.

"डॅड, तू केक खाणारेस? अरे तुझी शुगर लेवल वाढेल ना." दोघांच्या मध्ये येत स्वीटी म्हणाली.

"स्वीटू, सोनिया भेटल्याच्या आनंदात मी गोडच काय एखादे कडू जहर देखील खायला तयार आहे."

"मिस्टर मोहन, आय एम सॉरी. तुम्ही डायबेटीक आहात हे मी विसरले होते." प्रीती केक प्लेटमध्ये ठेवत म्हणाली.

"अगं नाही, मी खरंच बोलतोय. इतक्या वर्षांनी माझी सोनिया मला मिळाली, मग तोंड तर गोड करायलाच हवे ना?"
ती केकचा तुकडा प्लेटमध्ये ठेवत असताना त्याने तिचा हात पकडून आपल्या तोंडाजवळ नेला आणि केक जिभेवर ठेवला.
दोघांची नजरानजर झाली आणि ओठ किंचित रुंदावले, दोघांचेही.

त्यानंतर तिने निकी, विरेन, मधुरा आणि समीरला केक चारला. स्वीटीजवळ आली तशी स्वीटी चुळबुळ करायला लागली.

"स्वीटी, इतर नात्याचे जाऊ दे पण तू माझी मैत्रिण आहेस. किमान या नात्याने तरी घे ना." तिच्यासमोर केकचा तुकडा धरत ती म्हणाली.
कसेनुसे हसून स्वीटीने तिच्या हातून केक घेऊन तोंडात टाकला.

"कृष्णा." प्रीती त्याच्याजवळ येत म्हणाली.

"अगं, मला एवढ्यानेच कसे होईल? चांगला मोठा पीस दे." केक खात तो.
खाताखाता त्याने तिलाही एक छोटा तुकडा भरवला. त्यावेळी त्याच्या बोटांचा तिच्या ओठांना नकळत झालेल्या स्पर्शाने ती शहारली.

*******

"राधाई, प्रीती आता मला निघायला हवे." कृष्णा म्हणाला.

"कृष्णा, असा कसा अचानक निघालास? थांब ना." प्रीती.

"नाही ग. ऍक्च्युली मी दोनच दिवसाच्या सुट्ट्यावरती आलो होतो. पुढल्या महिन्यात ट्रेनिंगला जावे लागेल त्याआधी इथला कारभार व्यवस्थित पार पाडावे लागेल ना?
आणि मी इथे ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं की. मला सोनिया मॅडमशी महत्वाचं बोलायचं होतं आणि मिस्टर मोहन यांना तुझ्याशी भेट घडवून द्यायची होती. पहिलं काम तर मी केलं दुसरा दुसरे काम मात्र तू स्वतःच केले." तो.

"हां." तिच्या डोळ्यात पाणी होते.

"प्रीती, दोन मिनिटं जरा बाहेर येशील?" तो म्हणाला.

"ऐक ना, अशी नर्व्हस नको होऊस. हसताना जेवढी तू गोड दिसतेस ना, तेवढी रडताना अजिबात दिसत नाहीस. सो, प्लीज चेहऱ्यावर थोडी स्माईल आण ना." त्याचे बोलणे ऐकून ती हलकेच हसली.

"द्याट्स लाईक अ गूड गर्ल." त्याने एक स्मित केले.
प्रीती, इफ यु डोन्ट माईंड एक सांगू? मिस्टर मोहन सोबतच्या नात्याला जास्त ताणू नको. हि इज युअर फादर डोन्ट फारगेट द्याट."

"कृष्णा, हे सगळं सोपं नाही रे. असे अचानक मी त्यांच्याशी नवीन नाते नाही जोडू शकत."

"प्रीती नवीन नाते जोडायचे नाहीच आहे. ते तर आधीच होते, फक्त आता तुम्हाला कळतेय. एकदा त्यांची मुलगी म्हणून त्यांच्याकडे बघ. मग बघ, तुला वाटतेय तेवढं अवघड असं काहीच नाही. एकदा ट्राय तर कर." तो.

"मी माझ्या माईसोबत खुश आहे ना. मग मला नकोय ना पुन्हा काही."

"खुश तर आहेसच. पण जर तुझे संपूर्ण कुटुंब मिळत असेल तर त्याला का नाकरतेस? एकदा या अँगलने विचार करून बघ ना." कृष्णाचे समजावणे सुरूच होते.

"हम्म." तिने मान डोलावली.

"बरं,मी निघतो आता. सोनिया मॅमच्या तब्येतीचे अपडेट्स देत रहा."

"कृष्णा,मित्रा, चल मी येतो सोबत." समीर बाहेर येत म्हणाला.

"अरे, नको जाईन मी."

"चल रे. येतोय मी." त्याने कार काढली.

कृष्णा जायला निघाला तेव्हा राधामावशी, विरेन, मधुरा दारात आले होते. सगळ्यांचा निरोप घेऊन तो कारमध्ये बसला.

तो गेल्यावरही प्रीती बाहेरच उभी होती. त्याने इथून जाऊच नये असे कित्येकदा तिच्या मनात येऊन गेले. पण त्याचे जाणेही तेवढेच महत्त्वाचे होते.

"मित्रा, तुम्हा दोघांचे एकमेकांवर एवढे प्रेम आहे, मग किमान तिला प्रपोज तरी केलेस की नाही?" ड्राईव्ह करताना समीर कृष्णाला विचारत होता. त्याच्या प्रश्नाने कृष्णाचा चेहरा उजळ्यागत झाला.

"कृष्णा, क्या बात है? यू ब्लशिंग लाईक अ गर्ल!" तो हसून म्हणाला. त्यावर कृष्णानेही स्मितहास्य केले.

"मी कालच बोललो." कृष्णा.

"वॉव! द्याट्स ग्रेट. प्रीती हो म्हणाली ना?" समीर एक्साईट होत म्हणाला.
त्यावर कृष्णाने पुन्हा स्मित केले.

"मी बोललो खरा, पण प्रीतीशी नव्हे तर सोनिया मॅमशी बोललो. त्यांना माझ्या मनातील प्रस्ताव सांगितला." तो.

"अरे वाह, भारीच की. पण जी तुला हवी आहे तिच्याशीही एकदा बोलून बघ ना." समीर.

"माझे ट्रेनिंग संपले की मी रीतसर प्रपोज करणारच आहे. तू सांग, तुझे नि स्वीटीचे कुठवर आले?" त्याने बॉल समीरच्या दिशेने भिरकावला.

"आजच मी स्वीटीशी आयुष्यभराची कमीटमेंट केलीये." समीर गोड हसून म्हणाला. " सोनियाआँटी बऱ्या झाल्या की एकदाचा लग्नाचा बार उडवून टाकणार." तो.

"मस्तच. अभिनंदन मित्रा." कृष्णा आनंदाने म्हणाला.

"फक्त एक सांगायचे होते, स्वीटी आणि प्रीती दोघींच्याही आयुष्यात निराळे तरी काहीसे सारखे प्रश्न उद्भवले आहेत. तेव्हा गर्लफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड दोघींनाही तुलाच सांभाळून घ्यायचे आहे बरं. त्यांच्यात मध्य साधता आला चांगलंच आहे. पण जरी ते नाही जमले तरी दोघींची मने एकमेकींबद्दल कलुषित होणार नाही याची तुला काळजी घ्यायची आहे."

"डोन्ट वरी ब्रो, मी आहे ना? मी दोघींनाही सांभाळेन." समीरने त्याला आश्वस्त केले.

बोलता बोलता ते एअरपोर्टला पोहचले. थोड्याच वेळाने कृष्णाची फ्लाईट होती. समीरला बाय करून तो आत गेला.

******
"बरं, राधामावशी आम्ही निघतो आता. मिस्टर मोहन, रात्री काही मदत लागली तर खुशाल कॉल करा. आम्ही येऊ." मिहीर मोहनला हस्तांदोलन करत म्हणाला. समीर कृष्णाला सोडून परतला होता.

मोहनने मान डोलावली.

"डॅड, मी पण घरी जाते." स्वीटी.

"आता कुठे जातेस? थांब ना इथेच." राधामावशीने तिला रोखले.

"बेटू, थांब तू." मोहन तिला समजावत म्हणाला.

"डॅड, मला आक्वर्ड फील होतेय. मी अशी यापूर्वी कुठे थांबली नाहीये ना." एकवार मोहनकडे आणि नंतर प्रीतीकडे बघून ती म्हणाली.

"स्वीटी दी, डोन्ट वरी. आपण दोघी माझी रूम शेअर करू. आय होप, तुला माझी कपंनी नक्की आवडेल."

स्वीटीच्या मनाची अवस्था हेरून निकीने त्यावर तोडगा काढला.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
__________

🎭 Series Post

View all