Feb 28, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५५(बोनस भाग.)

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५५(बोनस भाग.)प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -पंचांवन (बोनस भाग.)


"मोहन, तुला माहित आहे ना, मी सगळ्यांची लाडकी आहे. त्यामुळे नकाराचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तू आमच्या आप्पासाहेबांना भेटलासच कुठे? ते तर तुला बघताक्षणीच पसंत करतील." मघाशी त्याने पकडलेल्या हाताची पकड घट्ट करत ती म्हणाली.

"सोनिया, तू माझ्या मनावरचे किती मोठे दडपण दूर केलेस. थँक यू सो मच! आय लव्ह यू." तो.

"माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे आणि नेहमीच राहील. मोहन,मला प्रॉमिस कर काही झाले तरी आपण कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही."

"प्रॉमिस!" त्याने तिला घट्ट मिठी मारली.

क्षणभर ती त्याच्या मिठीत विरघळली. "मोहन तू तुझ्या घरी आपल्याबद्दल सांगितले आहेस?" तिने विचारले.

"नाही गं. आपली परीक्षा आटोपू दे. मग मी सांगेन घरी. तशीही ही आपली शेवटची परीक्षा आहे ना." तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला.

"नको. त्यापेक्षा निकाल लागल्यावर आपण दोघेही आपापल्या घरी सांगू या. परीक्षेच्या निकालासोबत आपलाही एकदाचा निकाल लावून टाकू." त्याच्या मिठीतून बाहेर येत ती गोड हसून म्हणाली.
"चल आता निघते मी. आप्पासाहेबांना वाढदिवशी मी त्यांच्या डोळ्यासमोर हवी असते. थोड्यावेळासाठी ते कंपनीत गेले म्हणून मी येऊ शकले. उद्या कॉलेजला भेटू." ती.

"सोनिया,थांब ना. मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेय. म्हणजे महागडे असे काही गिफ्ट नाहीये. मी स्वतः तयार केले आहे. तुला आवडेल का बघ." तो.

"अरे, काय ते लवकर दे ना. मला उशीर होतोय." ती.

"डोळे मीट बघू आधी." मोहन.

तिने डोळे मिटले. मोहनने तिच्या हातावर त्याने स्वतः रेखाटलेले तिचे स्केच ठेवले.

"वॉव मोहन, किती सुंदर काढले आहेस तू!" त्याने रेखाटलेल्या तिच्या प्रतिमेवर ती हात फिरवत म्हणाली.
"थँक यू सो मच! आजवर मिळालेले सगळ्यात भारी गिफ्ट आहे हे. बरं,बाय मी निघते आता."

ज्या घाईने ती त्याला भेटायला आली होती त्याच्या घाईने ती निघूनही गेली.
*******

मोहनने आपले मिटलेले डोळे अलगद उघडले. तो वर्तमानात परतला होता. सोनियाचा हात मघापासून त्याच्या हातातच होता.

"सोनिया, हाच हात हातात घेऊन तुझ्यापासून कधीच दूर न होण्याचे मी वचन दिले होते. ते वचन पाळलेय गं राणी मी. आपण शरीराने सोबत नव्हतो, पण मनातल्या प्रत्येक क्षणात तूच होतीस.

तुला आठवते सोनिया, तुझ्या वाढदिवसानंतर आठ दिवसांनी कॉलेजची ट्रिप होती. शेवटचे वर्ष म्हणून आपणही गेलो होतो. किती मंतरलेले दिवस होते गं ते. त्या ट्रिपच्या वेळी मनाने एकमेकांचे झालेले आपण शरीराने केव्हा एक झालो ते कळलेच नाही. कळले तेव्हा मला काहीतरी चुकल्यासारखे झाले. तू मात्र किती धीराने बोललीस. जे घडलं ते विसरून जाऊया असं बोललो होतो मी. पण तू मला समजावलं,स जे घडलं ते विसरण्यासारखे नाही आहे.आपले झालेले मिलन हे केवळ शारीरिक आकर्षण नव्हते. आपल्या प्रीतीची उत्कंठता होती ती. विसरण्यासारखे किंवा काही चुकीचे असे नव्हतेच घडले ते. ते तर आपले एकमेकांप्रतीचे समर्पण होते.

सोनिया किती कणखर होतीस तू आणि आताही आहेस म्हणून तर एकटीने सोनप्रीतचा हा एवढा डोलारा उभा केलास.

सोनिया तू ऐकते आहेस ना गं मला? आता तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. आपल्या प्रेमाची शपथ. तुझ्या माझ्या प्रीतीची शपथ!"

त्याच्या सुरू असलेल्या एकतर्फी संवादाला सोनियाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. खोलीबाहेर भिंतीला टेकून असलेली प्रीती मात्र त्याचे संपूर्ण बोलणे ऐकत होती. ते ऐकताना तिचे मन भरुन येत होते.
******

"स्वीटी, राईट?" स्विटीकडे बघून मिहीर म्हणाला.

"येस अंकल." तिने मंद स्मित केले.

"मी ओळखलं नाही गं बाळा तुला आणि तुझा चेहरा असा का पडलाय?" राधामावशी तिच्या जवळ जात म्हणाली.
राधामावशीच्या प्रश्नाने स्वीटीच्या डोळ्यात पाणी आले.

"अगं बाई, तू का रडते आहेस?" राधामावशी.

तिने 'काही नाही' म्हणून मान हलवली.

"स्वीटी दी, रिलॅक्स. लाईफ इज ब्युटीफुल सो डोन्ट क्राय. तुझ्या आजूबाजूला बघ, सगळी किती प्रेमळ माणसं भरली आहेत. आता हा सॅम दादाच बघ ना, त्याच्या डोळ्यात किती प्रेम आहे. आणि एक सांगू का? यू बोथ लुक्स ग्रेट टुगेदर."
निकी आपली चेअर तिच्याजवळ नेत म्हणाली.

"तू ओळखतेस मला?" स्वीटीचा प्रश्न.

"हो. प्रीती दी मला तुझ्याबद्दल सांगते ना कधीकधी." ओठ रुंदावून निकी.

"अरे हो, माझ्या लक्षातच आले नाही. समीर तुम्ही दोघे एकत्र कसे? म्हणजे प्रीतीने इन्व्हाईट केलेय का?" समीर कडे बघून मिहीरने आश्चर्याने विचारले.

"मिहीर अंकल, असे कसे हो तुम्ही बुद्धू आहात? समीर दादा आणि स्वीटी दी दोघं कपल आहेत, हे तुम्हाला कळत कसं नाही?" निकी आता मिहीरकडे वळली. तिच्या बोलण्यावर स्वीटीला हसू आले.

"मामाश्री, ते.."

"थांब सॅम मला सांगू दे. अंकल आम्ही लग्न करणार आहोत." मिहीरकडे बघून स्वीटी.

"द्याट्स ग्रेट! पण समीर तू बोलला नाहीस माझ्याशी?" मिहीर.

"ॲक्च्युअली अंकल हे आजच ठरले. सॉरी. त्याने माझ्यामुळे तुम्हाला काही नाही सांगितले." स्वीटी.

"अगं,सॉरी काय त्यात? आय एम हॅपी फॉर यू. समीर यू आर ग्रोवन अप नॉऊ."
समीरला मिठीत घेत मिहीर म्हणाला.

"खरंच आनंदाची गोष्ट आहे ही. पण बाळा तू नेमकी कोण आहेस? मी तुला कधी पाहिलं नाही." राधामावशीच्या प्रश्नाला अजूनपर्यंत उत्तर मिळाले नव्हते.

"काय सांगू?" स्वीटी खिन्न हसून म्हणाली. "मलाच माहित नाही की मी कोण आहे ते, तर तुम्हाला कुठली ओळख देऊ?"

"इफ आय एम नॉट रॉंग, तुझे फादर खूप मोठे बिझनेस मॅन आहेत, राईट?"
मिहिर बोलला तसे पुन्हा तिचे डोळे पाणावले.

"अगं तू का सारखं सारखं रडतेस?" राधामावशी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"राधाई, अंकल, ॲक्च्युअली स्वीटी ही मोहन सरांची मानसकन्या आहे." समीर शांतपणे म्हणाला.

"मानसकन्या?" मिहीरच्या डोळ्यात प्रश्न होता. राधामावशी देखील प्रश्नार्थकपणे तिच्याकडे पहात होती.

"समीर मी सांगतो." समीरच्या खांद्यावर हात ठेवून कृष्णा समोर आला.
"राधाई, स्वीटी ही मोहन सरांची मुलगी आहे."

"काय बोलतो आहेस कृष्णा? हे कसे शक्य आहे, मोहन असे चुकीचे काही वागूच शकत नाही." राधामावशीचा स्वरात कंप होता.

"राधाई शांत व्हा. तुमचा मोहन सरांवरचा विश्वास अगदी रास्त आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते कधीच चुकीची वागले नाही. तुम्ही मुंबई सोडून पुण्याला आलात आणि त्याच काळात मिस्टर मोहन मुंबईला परतले."

"काय? मोहन मुंबईला आला होता?" राधामावशीचा ऊर दाटून आला.

मोहन मुंबईला आल्यावर काय काय झाले ते कृष्णाने सर्वांना थोडक्यात सांगितले.

"बापरे! माझ्या मोहन आणि सोनियाच्या आयुष्यात काय काय घडून गेले. पांडुरंगा, आता तरी त्यांना एकत्र येऊ दे रे." राधामावशीने हात सोडले.
"स्वीटी बाळा, तू अशी रडू नकोस. तुझ्या मनात काय चाललंय याचा अंदाज आम्हाला आला आहे." तिचे डोळे पुसत राधामावशी म्हणाली.

"होय स्वीटी, रिलॅक्स. तू पॅनिक होऊ नकोस गं." मिहीर तिला जवळ घेत म्हणाला.

"खरं तर मला खूप एकटं एकटं वाटतेय. लोनलीनेस फिल होत आहे. अंकल, आय वॉन्ट माय डॅड बॅक. मला माझा डॅड हवाय. मी त्याच्या शिवाय नाही राहू शकत." तिने पुन्हा हुंदका दिला.

"स्वीटी तुझ्या डॅडला कोणीही हिरावून घेत नाहीये. प्रीती त्यांना इथे केवळ सोनिया आँटीसाठी घेऊन आली आहे."
कृष्णा तिला समजावत होता.

"एका घटनेने सगळ्यांच्या आयुष्यात कशी उलथापालथ झाली आहे. पण आता आपण सर्वांनी भूतकाळातील घटनांचा विचार सोडून सोनिया बरी कशी होईल याकडे लक्ष द्यायला हवे. हो ना बाळा?" इतका वेळ शांत बसलेला विरेन म्हणाला.

"होय, मला कळतेय. सोनिया ऑंटी बऱ्या व्हाव्यात असे मलाही वाटते. पण तरीदेखील मला माझा डॅड परत हवाय." ती.

"स्वीटी.."
"अंकल." मिहीर काही बोलणार तोच ती बोलली.

"इतकी वर्ष आपल्या हक्काचची वाटणारी व्यक्ती अचानक दुसऱ्या कुणाची आहे हे कळते, तेव्हा कसे वाटते हे तुम्ही समजू शकता ना?" ती मीहीरच्या डोळ्यात बघून बोलत होती.

"हो, मी समजू शकतो." मिहीर म्हणाला.

मोहनच्या अशा अचानक येण्याने त्यालाही धक्का बसला होता. तो आणि स्वीटी दोघांचीही मनस्थिती जवळपास सारखी होती. दोघांच्याही डोळ्यात कुणीतरी जवळचे हरवल्याचे दुःख होते.

"तू बरोबर बोलते आहेस. पण स्वीटी, या घडीला स्वार्थी न होता आधी सोनियाचा विचार करणे आपल्याला जास्त आवश्यक आहे." मिहीरने तिला समजावले.

"हम्म. आय ॲग्री." एक लांब श्वास घेऊन ती म्हणाली. त्याचे म्हणणे तीला पटले होते.

"समीर, तू डॉक्टरांना कॉल करून बोलावून घे. मिस्टर मोहनमुळे सोनियाने काही प्रतिसाद दिला तर, वेळेवर डॉक्टर लागतील आपल्याला."

हो. मी त्यांना लगेच बोलावून घेतो." समीरने मोबाईल कानाला लावला.

*******

"सोनिया, तू ऐकते आहेस ना मला? मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. आपल्या प्रेमाची शपथ तुझ्या माझ्या प्रीतीची शपथ!" मोहनचा एकतर्फी संवाद सुरूच होता. ती काहीतरी प्रतिसाद देईल या वेड्या आशेवर तो सगळा भूतकाळ तिच्यासमोर उलगडत होता. सोनिया अजूनही तशीच पहुडली होती. शांत, निश्चल!

आपले डोळे पुसत तो उठला. डोळ्यातील संततधार थांबायचे नाव घेईना. मास्क लावलेल्या तिच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याची त्याची तीव्र ईच्छा झाली. तिच्या चेहऱ्याजवळ तो वाकला आणि त्याच्या डोळ्यातील थेंब तिच्या गालावर पडले. तिच्या मस्तकाला ओठांचा स्पर्श करायला गेलेल्या त्याचे श्वास तिच्या कानाजवळ स्पष्ट जाणवत होता.

त्याच्या डोळ्यातील अश्रुंचा तिच्या चेहऱ्यावर होणारा अभिषेक, तो मस्तकाला झालेला ओठांचा स्पर्श, कानाजवळ जाणवलेले त्याचे उष्ण श्वास..

सोनियाच्या पापण्यांची थरथर होतेय असा भास मोहनला झाला.

"सोनियाऽऽ" त्याने जोरात साद घातली.
आणि…
:
क्रमश :
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//