Feb 28, 2024
प्रेम

प्रीती..पर्व दुसरे! भाग-४७

Read Later
प्रीती..पर्व दुसरे! भाग-४७


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -सत्तेचाळीस.".. अँड धिस इज ऑल! इफ यू आर इंटरेस्टेड टू वर्क विथ सोनप्रीत, सोनप्रीत नेव्हर डिसअपॉइंट्स यू. इफ एनी क्वेरीज, प्लीज आस्क." तिथे असलेल्या सर्वांवर नजर ती फिरवत बोलत होती.
बोलता बोलता तिची नजर मागच्या लाईनमध्ये असलेल्या एका चेहऱ्यावर खिळली आणि ती स्तब्ध झाली. काहीतरी खेचत असल्याप्रमाणे ती त्या व्यक्तीपुढे जाऊन उभी राहिली. ती नजर देखील तिलाच न्याहाळत असल्यासारखी तिला वाटली. जवळ आली तशी एक ओळखीचा सुगंध नाकात भिनला. खूप वर्षांपूर्वी माईने एकदा तिला जपून ठेवलेल्या एका महागड्या ब्रँडच्या पर्फ्युमचा वास घ्यायला दिला होता, समोर असलेल्या त्याच्या कपड्यांना तोच सुगंध होता. ती जवळ आली तसे त्याने डोळ्यावरचा चष्मा काढला. ते तेच डोळे होते, जे तिने तिच्या वाढदिवसाला माईला गिफ्ट केलेल्या पोट्रेट मध्ये रेखाटले होते.

'म्हणजे?? समोर बसलेली व्यक्ती दुसरे कोणी नसून माईचा मोहन आहे? कसे शक्य आहे हे?'
विचारांचे वादळ जोराने पळत होते. डोके अचानक जड झाले होते. त्याला ती काही बोलणार इतक्यात नजरेसमोर अंधाराचा पडदा उभा राहिला आणि ती खाली कोसळली.

त्या व्यक्तीशी नजरानजर होणे, तिने त्याच्या जवळ येणे, आणि त्यानंतर तिचे घेरी येऊन पडणे हे सारे इतक्या त्वरित घडले की काय झाले हे क्षणभर कोणालाच कळले नाही.

"मिस प्रीती.."
तो तिला सावरणार तितक्यात मिहीर तिथे आला.

"प्रीती, आर यू ऑलराईट?" तिच्याजवळ धावत येत मिहीरने विचारले.

"प्रीती मॅम." मीटिंगला आलेले तिचे स्टॉफ मेम्बर्स तिथे गोळा झाले.

"कॉल द डॉक्टर क्विकली अँड लेट हर इन द रूम!" मिहीरच्या आदेशाबरोबर दोघांनी तिला रूममधल्या बेडवर नेऊन झोपवले. डॉक्टरांना बोलावून लगेच तिची तपासणी सुरू झाली.


"सॉरी एव्हरीबडी. डॉक्टरांनी प्रीती मॅमना सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलीय, त्यामुळे ही मिटिंग इथेच बरखास्त होत आहे. वी विल प्लॅन इट ऑन अनॉदर डे. प्लीज को -ऑपरेट. नाऊ एन्जॉय द लंच." मिटिंग आटोपल्याचे मिहीरने जाहीर केले आणि तो जायला निघाला.

"एक्सक्युज मी सर, कॅन आय मीट हर?" त्या व्यक्तीने काळजीच्या सुरात विचारले.

"सॉरी मिस्टर पाटील, डॉक्टरांनी तिच्याजवळ गर्दी करायला मनाई केली आहे. तिला बरे वाटले की मी तुमचा निरोप देईन तिला. तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या."
एवढे बोलून तो आत गेलादेखील.


ती व्यक्ती काही न बोलता हॉटेलमधून बाहेर पडली. त्याच्या कारची चाके घराच्या दिशेने पळत होती. डोक्यातील विचाराचे चक्र मात्र दिशाहीन भटकत होते. राहून राहून प्रीतीचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता.

'कसे शक्य आहे हे? तोच गोरा वर्ण, तेच सौंदर्य. रुबाबदारपणाही तसाच आणि.. आणि डोळ्यातील तो निळा समुद्र? तो तर अगदी जशाचा तसाच! कसे शक्य आहे हे?' डोक्यात विचारांचा नुसता भुगा झाला होता.

कार त्याच्या बंगल्यासमोर थांबली. गार्डने गेट उघडले.
"साहेब तुम्ही इतक्या लवकर? उशीर लागणार होता ना?" गार्डने अदबीने विचारले.

"हं." एवढेच बोलून तो आत आला.

"स्वीटीऽऽ" त्याच्या आवाजाने कामवाल्या काकू स्वयंपाकघरातून बाहेर आल्या.

"अहो साहेब, तुम्ही आलातदेखील? स्वीटीताई तर तुमच्या आधीच बाहेर गेल्यात ना? इतक्यात नाही परतायच्या. तुम्ही जेवून आलात की जेवण लाऊ?" त्या.

"नको. मी माझ्या आर्ट रूममध्ये आहे. फक्त एक स्ट्रॉंग कॉफी पाठवून दे. त्यांनतर मला कोणतेही डिस्टर्बन्सेस नको आहेत." तो आत जात कडक शब्दात म्हणाला.

******

एका सुंदर शांत ठिकाणी असलेल्या ओपन रेस्टॉरंटमध्ये स्विटी आणि समीर बसले होते. कॉर्नरचा स्पेशल टेबल, लाल हार्ट शेपच्या फुग्यांची सजावट,तिथे सुरू असलेले मंद संगीत! दोघेही खूप खूष होते. दुपार असली तरी तिथले वातावरण सुखद होते.

तशी स्वीटी सकाळीच घराबाहेर पडली होती. एका मोठया पॉश ब्युटी पार्लरची तिने कालच अपॉइंटमेंट घेतली होती. तिथून ती निघाली तेव्हा खूप सुंदर दिसत होती. लाल रंगाचा स्लीव्ह्जलेस असलेला लॉन्ग गाऊन तिने घातला होता. हिऱ्याचे नाजूक कानातले, गळ्यात हिऱ्यांचा नाजूक सेट. हातातले मॅचिंग असे ब्रेसलेट. थोडेसे केस क्लचमध्ये अडकवून बाकीचे मोकळे सोडलेले.

समीर तिच्याकडे बघून एकदम फ्लॅटच झाला. तिला असे वेस्टर्न आऊटफिट मध्ये बघायची सवय त्याला होती पण आज ती जरा जास्तच आकर्षक भासत होती.

"लूकिंग व्हेरी ब्युटीफुल!" तो बोलून गेला.

"रिअली? इट्स ओन्ली फॉर यू." ती हसून म्हणाली.

"थँक यू. मग, काय प्लॅन आहे?" मिश्किल हसत तो.

"प्लॅन तसा रेडी आहे, पण तुला का इतकी घाई? आधी काही खायला ऑर्डर करू या ना." ती.

त्याने मेनुकार्ड तिच्यापुढे ठेवला. "काय मागवू या? बोल." तो.

"सॅम, आज तुझ्या आवडीचे मला खायला आवडेल." तिने मेनुकार्ड त्याच्यासमोर सरकवला.

त्याने मग दोघांची सारखी आवड असलेल्या पदार्थांची ऑर्डर दिली. खरं तर तिच्या वागण्याचा अंदाज त्याला येत नव्हता. कालपासून काहीशी बदलल्यासारखी ती वागत होती. म्हणजे यापूर्वी ती अशी कधी वागली नव्हती.
हसत खेळत दोघांचे खाऊन झाले. त्याने तिचे आवडते डेजर्ट मागवले. आता तो बोलत होता, ती फक्त त्याच्याकडे टक लाऊन बघत होती.

"अशी काय बघतेस?" तिच्यासमोर चुटकी वाजवत त्याने विचारले.

"सॅम, दिवस कसे भुर्रकन उडून जातात नाही? लहान असताना आपण एकाच स्कुलमध्ये होतो, प्रीतीला मी काही म्हटले तर किती भांडायचास तेव्हा तू माझ्याशी." ती किंचित हसली.
"आणि मग आपण भेटलो ते डायरेक्ट अमेरिकेत. तेव्हाचे तुझे वागणे किती वेगळे होते अरे. तो भांडकुदळ सॅम आता माझी काळजी घेणारा झाला होता." ती.


"तेव्हा तुझ्या प्रेमात मी आकंठ बुडालो होतो." तो त्या काळात परत गेला.

"नॉऊ, आय एम." तिने त्याचे बोलणे मध्ये तोडले.

"हं?" तो काही न कळून म्हणाला.

तिने पाण्याचा एक घोट घेतला आणि जागेवरून उठली. तो तिच्याकडे बघतच होता.
"सॅम, विल यू मॅरी विथ मी?" हातात हिऱ्याची अंगठी घेऊन त्याच्यासमोर गुडघ्यावर बसत तिने विचारले.

"स्वीटी?" तो विस्मयाने तिच्याकडे पाहत होता. त्याला हे अगदीच अनपेक्षित होते.

"डू यू लव्ह मी ऍज बिफोर?" तिने निरागसपणे विचारले.

"येस, ऑफ कॉर्स." तिचा हात हातात घेत तिला उठवत तो म्हणाला.

"देन, आर यू रेडी टू मॅरी?" तिचे डोळे चमकत होते.
सॅम, आय वॉन्ट युअर आन्सर."

"पण तुलाच तर माझ्याशी लग्न करायचे नव्हते ना?" तो.

"यूएसएला असताना तू मला प्रपोज केलेस तेव्हा मी नकार दिला होता. सॅम,आय एम रिअली सॉरी फॉर द्याट. पण जेव्हा तू इंडियात परतलास ना तेव्हा मला जाणवायला लागले की मी तुला किती मिस करतेय. तुझ्या प्रेमात मी होते हे तू जवळ असताना मला कळलेच नाही. तू दूर गेलास तेव्हा समजले की तुझी मला किती गरज आहे. सॅम आय रिअली लव्ह यू!"
तिच्या डोळ्यातील थेंब गालावर ओघळला.

"आय लव्ह यू टू स्टुपिड, डोन्ट क्राय." तिच्या ओठावर आपले ओठ टेकवत समीर म्हणाला. ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली.

"सॅम आय एम सो हॅपी! सो, सो सो हॅपी!" त्याच्या बोटात अंगठी घालत ती म्हणाली.

"मी टू." तो आनंदाने म्हणाला. पण तू मला हे आजच का विचारलेस? तेही एवढया रोमँटिक डेटवर आणून. अचानक कसे प्लॅन केलेस?"

"अचानक नव्हे रे. मी तुला विचारणार होतेच पण योग्य दिवसाची वाट बघत होते आणि आजच्याइतका लकी डे दुसरा कुठलाच नाहीये." ती.

"का? आज असे काय स्पेशल आहे?" त्याने कुतूहलाने विचारले.

"टुडे इज माय मॉम्ज बर्थडे!" ती.
"यू नो सॅम? आय लॉस्ट माय मदर व्हेन आय वाज स्मॉल किड. मला तर ती कधी आठवतदेखील नाही. डॅडने सांगितलं एकदा, की मी काही महिन्यांची असताना तिने या जगाचा निरोप घेतला."

"ओह! आय एम सॉरी." तिच्या हातावर हात ठेवून समीर.

"नाही रे. डॅडाने माझ्यावर एवढे प्रेम केले ना की मला एक मॉम असावी असे कधी वाटलेही नाही. मॉम नाही याचे मला कधीच काही जाणवले नाही, पण डॅड आतून तुटलाय रे. माझ्यावर तो इतकं प्रेम करतो पण आजच्या दिवशी एकटाच आपल्या आर्टरूममध्ये बसून असतो. तिथे कोणालाच एन्ट्री नसते. मॉमचे चित्र काढण्यात तो इतका गुंतला असतो की मलाही विसरतो. आजवर त्याने मला कधी मॉमचे पिक्चर दाखवले नाही, मी कधी हट्टही केला नाही." डोळे पुसत ती म्हणाली.

"सॅम, मला त्याला असे दुःखी नाही रे बघवत. तुला आज मी घरी घेऊन जाणार होते. आपल्याबद्दल सांगणार होते. त्याला जेव्हा सांगेन की त्याची लाडकी प्रेमात पडलीय, ती लग्न करणार आहे तर तो केवढा हॅपी होईल. मला आजच्या दिवशी तो दुःखी न दिसता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, म्हणून हा सगळा खटाटोप." ती हळवी झाली होती.
त्याने उठून तिला मिठी मारली.

"सॅम तू येशील ना घरी?" तिच्या डोळ्यात पाणी होते.

काय असेल समीरचे उत्तर? वाचा पुढच्या भागात
:

क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//