Feb 23, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३५

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३५


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -पस्तीस.


"अहं. खरं तर तुझा आवाज ऐकायचा होता. तुझ्या आवाजावरून तुझ्या मनस्थितीचा अंदाज येतो ना, म्हणून." तो.

"कृष्णा.." तिचा आवाज थिजला होता.

"गुडनाईट, आता आराम कर. मीदेखील निश्चिन्तपणे झोपतो. सकाळी बोलूया, बाय." त्याने कॉल कट केला.

'कृष्णा किती गुंतलाय माझ्यात. हे त्याचे गुंतणे योग्य नाहीये, असं वाटतं. मग त्याने माझी काळजी करणं मला का सुखावतेय?'  ती स्वतःलाच विचारत होती. बेडवर तिने आपले शरीर झोकून दिले. बऱ्याच वेळाने तीचा डोळा लागला.

*******
"माई, मी हॉस्पिटलला जाऊन येतेय. बघू त्या मुलीच्या पेरेंट्सबद्दल काही कळलंय का."
प्रीती सोनियाच्या हातावर ओठ टेकवत हळुवारपणे म्हणाली.

"राधाई ऽऽ, मी निघतेय गं." पर्स घेऊन ती हॉलमध्ये आली.

"एकच मिनिट. हा शिरा तेवढा पोटात टाक आणि मग निवांत जा." राधामावशीने तिथे येत शिऱ्याची प्लेट तिच्या हातात दिली.

"अगं पण.."

"आता पण बिन काही नाही. जेवढं दिलंय ते गुमान खा बघू." काहीशी दटावत राधामावशी तिला म्हणाली तसे तिने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले.

"अगं राणी, तुला रागावत नाहीये. तू अशी न खाता पीता घराबाहेर गेलीस की माझा जीव नुसता टांगणीला लागतो गं. आपल्या सगळ्यांसाठी तुला स्ट्रॉंग राहावेच लागेल ना?" तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत मायेने राधाई बोलत होती. डोळ्यात थेंब जमा होऊ लागले होते.

"खाते, खाते. ठीक आहे? चमचाभर शिरा तोंडात टाकत प्रीती. "राधाई, यार अशी सकाळी सकाळी इमोशनल नको ना गं होत जावू. संपवते मी सगळं." तिच्या बोलण्यावर राधामावशीचे ओठ उमलले.

"आलेत का गं त्या मुलीचे आईवडील?" राधामावशीने चौकसपणे विचारले.

"अजुनपर्यंत नाही गं. नेमकी परिस्थिती काय आहे हे तिथे जाऊनच कळेल." ती खाता खाता म्हणाली. "आता संपवलंय बरं सगळं. निघते मी, बाय." राधामावशीच्या गालाची एक पापी घेऊन ती निघाली.

"पांडुरंगा, त्या पोरींचे आईवडील लवकर येऊ दे. बिचारी कोण कुठली पण माझी प्रीती तिच्यात गुंतलीय. तिच्या प्रयत्नांना यश येऊ दे." सावळ्या विठ्ठलापुढे हात जोडून राधामावशी उभी होती.

******
"डॉक्टर, नाऊ हाऊ इज शी? आणि तिच्या पेरेंट्सबद्दल काही कळले काय?" प्रीती डॉक्टरांशी बोलत होती.

"ती रात्रीच शुद्धीवर आलीय. पण.." डॉक्टर.

"पण काय?"

"पण ती रात्रीपासून अवाक्षारही बोलली नाहीये. इथल्या नर्स, मी स्वतः खूप प्रयत्न केलेत पण ती काहीच बोलायला तयार नाहीये. सारखी शून्यात नजर लाऊन बसलीय. ती काहीच सांगणार नसेल तर तिचे पेरेंट्स इथवर कशे येतील?"

"डॉक्टर, ॲक्सीडेन्टमुळे तिची वाचा गेली असेल का हो?" प्रीतीने काळजीने विचारले.

"नो. एक मांडीचे हाड सोडले तर बाकी तिला कुठेच काही झालेले नाहीये. मिस प्रीती, तुम्ही एक प्रयत्न करून बघता का?"

"हो नक्कीच. तसेही मला तिला भेटायचेच आहे. मला असे वाटते डॉक्टर की ती अजून धक्क्यातून सावरली नसावी. बट आय विल ट्राय अँड होप की काहीतरी बोलेल ती." खुर्चीवरून उठत ती म्हणाली.

"या, ऑल द बेस्ट! आणि तासाभरानंतर ऑपरेशन ठरवलेय हे तिला सांगितले आहे पण तुम्हीही एकदा कल्पना द्याल तर बरे होईल." डॉक्टर.


त्या मुलीला भेटायचे म्हणून प्रीती तिच्या रूममध्ये गेली. "हाय. कशी आहेस?" तिच्याजवळ येत तिने विचारले.

ती काही न बोलत प्रीतीकडे नजर रोखून पाहत होती. तिला ऍडमिट करणारी एक मुलगी आहे हे नर्सने तिला
सांगितले होते, त्यावरून तिला हेल्प करणारी मुलगी म्हणजे प्रीतीच असेल असा तिने कयास बांधला.

प्रीतीची नजर देखील तिच्यावर खिळली होती. सर्जरी असल्यामुळे तिला सकाळपासून काही खायला दिलेले नव्हते त्यामुळे तिचा चेहरा जरासा मलूल दिसत होता. बाकी ती बघायला फारच गोड दिसत होती. तिचे शॉर्ट केस, काळेभोर डोळे. ती तिच्या मनातच भरली.

"कशी आहेस, सांग ना. अरेच्चा! तू मला ओळखत नाहीस म्हणून बोलत नाहीयेस का? अगं मी प्रीती. मीच तुला काल इथे घेऊन आले." प्रीतीच्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.

"यू नो, तू खूप गोड आहेस. जर मला एखादी लहान बहीण असती ना तर ती सेम तुझ्यासारखीच दिसली असती. तुला बहिणीसारखीच आहे ना मी? मग माझ्याशीही बोलणार नाहीस का?" प्रीतीने आपले प्रयत्न सोडले नव्हते.

"आय डोन्ट हॅव एनी सिबलिंग्ज. आय एम सिंगल, ओके?" काहीशा अटीट्युडने ती म्हणाली.

"ओह यू आर सिंगल? आय एम अल्सो सिंगल. कॅन आय नो व्हॉट इज द नेम ऑफ धिस ब्युटीफुल लिटिल गर्ल?"

"मायसेल्फ निकी अँड आय एम नॉट लिटिल गर्ल ओके? आय एम ग्रोवन अप नॉऊ." ती.

"ओह सॉरी निकी! अँड व्हॉट अबाऊट युअर पेरेंट्स?" प्रीतीने तिच्या कलाने घ्यायचे ठरवले.

"मी त्यांच्याबद्दल काहीही सांगणार नाहीये. आय हेट देम. आणि जर का मी सांगितले तर तुम्ही मला त्यांच्याकडे नेऊन सोडाल." गाल फुगवून ती.

"तुमच्यात काय झालेय ते मला माहित नाही पण असं हेट करते वगैरे बोलू नये गं. ऑफ्टरऑल दे आर युअर पेरेंट्स. आपल्या मुलाला साधं खरचटलं तरी आपल्या पालकांना वेदना होतात. मग तुझा इतका मोठा अपघात झालाय हे कळल्यावर किती त्रास होईल." प्रीती तिला समजावत म्हणाली.

"मी ऑलरेडी त्यांना खूप त्रास दिलाय आता आणखी द्यायचा नाहीये. तुम्हाला ट्रीटमेंटच्या पैशांची काळजी असेल तर मी देते ना. पण माझी पर्स कुठेय तेच माहिती नाही." छोटुसा चेहरा करत निकी.

"पैशांचा प्रश्न नाहीये गं. सुदैवाने तुझ्यावर उपचार करता येईल इतके पैसे माझ्याकडे आहेत. पण तुझ्या आईवडिलांना तुझी काळजी वाटत असेल ना? त्यांना तुझ्याबद्दल कळायला हवे." प्रीती.

"नाही त्यांना काही कळायला नकोय. तुम्हाला कसं कळत नाहीये? नी मुळात तुम्ही मला का वाचवलत? मला जगायचेच नव्हते, म्हणूनच मी त्या गाडीखाली आले ना." निकी.

"काय बोलतेस तू? असं कोणी करतं का?" प्रीतीच्या प्रश्नावर निकीने आपली मान दुसरीकडे वळवली.
"ओके, तुला तुझ्या पेरेंट्सना कळवायचे नाहीये ना. ठिक आहे. थोड्यावेळाने तुझी सर्जरी आहे, तेव्हा हा विषय नकोच."

"आणि पोलीस आले तर? त्यांना काय सांगणार?" तिने आपले काळेभोर डोळे प्रीतीवर रोखले.

"ते मी हॅन्डल करते. तू आता रिलॅक्स हो." प्रीती म्हणाली तशी निकी गोड हसली.

"थँक्स दी." हसून तिने प्रीतीला धन्यवाद दिले.

"हं? अचानक दी?" प्रीतीच्या ओठावरही हसू होते.

"ते तूच म्हटलंस ना की मी तुझ्या लहान बहिणीसारखी आहे, म्हणून तुला दी म्हटलं. तुला आवडलं नाही का?" डोळे बारीक करून निकीने विचारले.

"आवडलं की. आता मला दी म्हटलंस तर माझं ऐकावे लागेल हं. कसलेही टेंशन न घेता सर्जरीला सामोरे जा. सगळं ठीक होईल. घाबरू नकोस." तिच्या केसातून हात फिरवत प्रीतीने तिला धीर दिला.

"निकी कधी घाबरत नसते." ती पुन्हा गोड हसली.

*******

"प्रीती, आर यू मॅड? तिचे ऐकून तू तिच्या पेरेंट्सबद्दल काहीच माहिती घेतली नाहीस? ॲटलीस्ट ती कुठली आहे हे तरी विचारायचेस ना?"
मिहीर हास्पिटलला आला होता. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रीतीनेच त्याला बोलावून घेतले होते आणि आल्या आल्या तो तिला ओरडत होता.

"अंकल, प्लीज कुल डाऊन! अहो त्यावेळी तिची सर्जरी जास्त इम्पॉर्टन्ट होती ना म्हणून तिचे म्हणणे मी ऐकले आणि मुळात ती आहेच इतकी गोड की मला तिचे मन मोडताच आले नाही. तुम्ही तिच्याशी बोलणार ना तेव्हा तुमचा राग देखील कुठल्याकुठे पळून जाईल."
ती त्याच्याकडे पाहत एका वेगळ्याच विश्वासाने बोलत होती.

"माझा राग पळून जाणार की नाही माहित नाही पण ती तिच्या घरून पळून आली आहे हे मला नाही रुचलेय. तू म्हटलेस म्हणून मी इन्स्पेक्टरांशी बोललोय खरा, पण मलाच ते योग्य वाटत नाहीये." मिहीर.

"अंकल, निकी हट्टी आहे, तेवढीच इनोसंटसुद्धा आहे हो. ती लवकरच तिच्याबद्दल सांगेल सगळं. माझ्या निर्णयावर विश्वास ठेवा." ती हळुवारपणे पण ठाम स्वरात म्हणाली.

"हम्म. सोनप्रीतमध्ये घेतलेला तुझा प्रत्येक निर्णय योग्यच असतो. सोनियाच्या अंगी असलेला निर्णयक्षमतेचा गुण तुझ्यात आहे म्हणून तर तू म्हटलेस ते ऐकले मी. तू म्हणतेस तसेच होईल ही आशा ठेऊया." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.


चार दिवसांनी निकीला डिस्चार्ज मिळाला. या चार दिवसात प्रीतीची धडपड निकी जवळून बघत होती. सुरुवातीला तिच्यावर चिडणारी ती, आता काहीच ओळख नसतांना आपल्यासाठी एवढं करतेय हे बघून तिच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडली होती. या चार दिवसात प्रीतीने तिच्याशी बोलताना तिच्या घरच्यांविषयी विचारले नाही आणि निकीनेदेखील त्याबद्दल चकार शब्दही काढला नाही.

हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर प्रीती तिला घरी घेऊन आली. तिच्यासाठी एक स्पेशल रूम तयार करून ठेवली होती.

"राधाई, ही निकी, आणि निकी ही माझी राधाई. तू सुद्धा तिला याच नावाने हाक मारू शकतेस." तिच्या खोलीत शिफ्ट केल्यानंतर राधाईला भेटवत तिने दोघींची ओळख करून दिली.

"राधाई, तुमच्या हातचं जेवण खूपच चविष्ट असतं." राधामावशीकडे स्मित करून निकी म्हणाली.

"आवडले ना तुला? आता रोज तुझ्या आवडीचे जेवण करून तुला खाऊ घालत जाईन. लवकर बरे होऊन आपल्या पायावर उभे व्हायचे आहे ना तुला?"

राधामावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. निकीने मान हलवून होकार दिला. आज पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
:
क्रमश:
कोण आहे ही निकी? कळेल लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड!
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//