प्रेम म्हणजे

प्रेमाची व्यखा

प्रेम म्हणजे


प्रेम हा शब्द किती साधा
अवाका त्याचा अती मोठा

कुणी करी माया माणसावरी
कुणी लावी जीव मुक्या जनावरावरी

कुणास वाटे प्रेम म्हणजे फक्त पैसा
तर कुणाला आवडे फक्त तो स्वत:

कुणासाठी प्रेम म्हणजे मायभुमी

जशी रूपे प्रेमाची अनेक
तसेच प्रेमाचे ढंगही वेगळे

कधी असतो त्याचा रंग केसरी त्यागाचा
तर कधी पांघरे लाल रंग हक्काचा

कधी शिकवतो तो ठेवा समर्पणाचा
तर कधी सोसावा लागतो दाह विराहचा

कधी प्रेमासाठी असते चढाओढ
तर कधी प्रेमही राहते अव्यक्त नि अबोल

प्रेम म्हटल की का आठवावे फक्त मुलगा नी मुलगी
प्रेम म्हटलं की असावी हवीशी इतरही नातीगोती

प्रेमाचा अर्थ एकच
सदा असावे कोणी आपल्या सोबत

प्रेम करा तुम्ही चराचरावर
आणि साजरा करा आजचा प्रेमदिवस