प्रवास... सुरूवात नात्याची भाग ५

लग्न झालेला जोडप्याचा देवदर्शनाचा प्रवास... सोबत मस्ती धमाल आणि रोमान्स


" अजिंक्यsss  इकडे ये... "

अजा आणि गण्या पूजाला विचारण्यासाठी तीच्या जवळ जात असताना पाठीमागून सागरने हाक मारली...

"काय रं दादा... कशापायी आम्हांसी बोलवत आहेस...  जा की वैनीजवळ.. बोलत बस कि जरा वाईच.."  गण्या हसत आणि चिडवत सागरला म्हणाला

" तु थोडा वेळ थांबशील का... मला अजिंक्य सोबत बोलायचे आहे... तु गपगुमान ऐकणार असशील तरच थांब इथे नाहीतर लांब गेलास तरी चालेल.."

सागरचा आवाज थोडा वाढला होता त्यामुळे गण्या समजून गेला गोष्ट फार गंभीर आहे.. तो शांत बसला.. सागरने मग लक्ष अजिंक्य कडे दिले...

" हा बोल अजिंक्य... काय विचारायचे आहे पूजाला??" सागर

हा प्रश्न ऐकताच अजा घाबरला.. त्याच ततपप होवू लागले..

" आरं... नाय.. ते... ते... म्हन्जे... आरं दादा... तसं..‌ काय बी नाय..." अजा

" हो का... म्हणजे माझे कान वाजत आहे.. असंच ना..." सागर

" असं काय नाय दादा.." गण्या

" तुला सांगितले ना... गपगुमान... हाताची घडी तोंडावर बोट... चल ठेव.." सागर

" व्हयं..." सागरने सांगितल्या बरोबर गण्याने हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले...

सागर त्यांच्या पेक्षा काहीच वर्षांनी मोठा होता.. पण घरात मोठ्या काकांचा मोठा मुलगा तो पण शिकलेला म्हणून त्याला वेगळा मान मिळत होता.. अजा आणि गण्या त्याला सख्ख्या भावापेक्षा जास्तच मानत होते त्यामुळे त्याने सांगितलेली प्रत्येक एकुणएक गोष्ट ते ऐकत असत नेहमी....

" हा तु बोल रे... काय म्हणत होतास... पूजाच काय???" सागर पुन्हा अजाकडे वळाला

" आरं दादा... असं काय बी नाय... फकस्त आवडली ती म्हणून इचरायला जात व्हतू.. आनी काय बी नाय..." अजा घाबरला होता... सागर काही बोलेल का म्हणून

" हे बघ अजिंक्य... तु चांगला मुलगा आहेस कोणाला ही आवडेल असा... पूजा पण छान आहे... पण अजून तीच्या बद्दल तुला माहितच काय आहे... फक्त लग्नात आणि आता भेटलास तु तीला... फक्त आवडते म्हणून विचारायला जाणे योग्य वाटते का तुला?? उद्या धनूला एखाद्या मुलाने असं विचारले तर चालेल का तुम्हाला.. फक्त आवडणं हे सुद्धा एका मुली साठी खुप मोठी गोष्ट असते... तितकीच धोक्याची... कधी कधी साधं बोलणं पण वेगळं वळण घेतं.. दिसत सगळं तुम्हाला की पूजाला तुम्ही नाही आवडत मग उगाच विचारून तीला अडचणीत का टाकता... ती कोणी बाहेरची नाही घरातलीच आहे आता.. पाहुणी आहे ना आपली.. आपणच काळजी घेतली पाहिजे पाहुण्यांची हो ना... आणि कसं आहे ना... प्रेम हे सांगून होत नाही तसं लग्न डोळे झाकून जबरदस्तीने होत नाही... आधी पायावर नीट उभे रहा... काही तरी करून दाखवा... मग तुम्ही काही विचारायची गरज नाही कुठल्या मुलीला तीच येऊन विचारेल तुम्हाला... कळलं का खुळ्या डोक्याच्या माकडानों..." सागर

इतका वेळ गंभीर बोलणारा सागर आणि मन लावून माना खाली घालून ऐकणारे गण्या अजा...  सागरच्या शेवटच्या वाक्याला मात्र खळखळून हसले...

" ते नव्हं... पर दादा तुला कसं रं माहित... आम्ही पूजा कडे जातोय आन् कशापायी जातोय ते.." गण्या

" आरं माझ्या... रिकाम्या टुकूऱ्याच्या भावा... तुझा आवाज म्हणजी त्या अजिंक्यताऱ्यावरून चार भिंती वर बसलेल्या माणसाला बी ऐकू जाईल.. मीच काय तुमच्या वहिनीने पण ऐकलं आहे सगळं.." सागर

" कायssss!!! आरं वहिनीने पण ऐकलं... आरररर्.. काय इचार करलं ती आता... आम्ही थोबाड दाखवायच्या पण लायकीचं नाय राहिलो.. दादा आम्ही बस पकडून इथंनच जातो बग माघारी..." गण्या

" अरे शांत हो... ती आहे समजूतदार... समजून घेईल... आणि अजून काही बोलली का तुम्हाला आतापर्यंत... तुम्ही एवढं तीच्या बहीण आणि भावाला त्रास देत आहात... चिडवत आहात तर.. मग उगाच काही डोक्यात आणू नका... फक्त सांभाळून रहा... मस्ती ठिक आहे पण कोणाला दुखवू नका... मस्करीची कुस्करी करू नका.. प्रवास आहे तर मज्जा मस्ती चालू द्या.. समजलं का.. चला आता.."

गण्या आणि अजाला समजावून सागर अवनी एकटी बसली होती तिथे गेला...

गण्या आणि अजा तिथेच एका खडकावर बसून सागर म्हणाला त्याचा विचार करत होते...

" लगेच काय बोलायची गरज होती... बिचाऱ्यांचे चेहरे बघा लगेच उतरले... नंतर सांगितले असते ना त्यांना.."

सागर जवळ बसताच अवनी त्याला म्हणाली...
तीने सुध्दा गण्या आणि अजाच बोलणं ऐकलं होतं... अजाने आता पूजाला विचारले असते ते पण महेंद्र समोर तर माहित नाही काय झाले असते.. कारण महेंद्र जेवढा शांत दिसतो.. वागतो त्याहून जास्त पूजाच्या बाबतीत पझेसिव्ह आहे हे तीला माहित होते... म्हणून जराशी घाबरली होती पुढे काय होईल या विचाराने... सागरने ते पाहिले म्हणूनच त्याने आताच अजाला सांगणं योग्य समजलं..  पण अजा आणि गण्याचा पडलेला चेहरा पाहून तीला सुध्दा वाईट वाटू लागले...

" काही नाही एवढं झालं... थोड्यावेळाने आधी सारखेच होतील... माहित आहे मला...लहानपणा पासून ओळखतो मी त्यांना.. जास्त वेळ एकाच गोष्टीचा विचार नाही करत ते दोघे पण... तु नको काळजी करूस... सांगणं महत्त्वाचे होते.. ते सांगितले... अजून इथेच थांबायचं की पुढे पण जायाचं.." सागर

" थोडा वेळ थांबूया.... मस्त मोकळी हवा छान वाटतेय..." अवनी

" ठिक आहे... थांबू अजून... तसं पण बाकी सगळ्यांची अजून इथेच थांबायची इच्छा आहे असं दिसतेय... सगळे निवांत आपल्याच विश्वात रमलेले दिसत आहेत.."

सागर सगळ्यांना बघत म्हणत होता.. कोणाचं लक्ष नाही बघुन सागरने हळूच अवनीचा हात हातात पकडला... सागरच्या थंड हाताचा स्पर्श अवनीच्या हाताला होताच तीला करंट लागल्याचा फिल झाला.... ती लगेच मनक्यातून ताट झाली..
सागरने नजरेनेच 'शांत हो'  म्हणून खुणावले...
तशी ती लगेच शांत झाली... आता फक्त ती मोकळी हवा... हवेतला तो गारवा... आणि सागरच्या हाताचा स्पर्श एवढंच अनुभवत होती... सगळ्यां जगाला विसरून.... ती आता सागरमय झाली होती...

_______________________________________

वाचत रहा....
एक प्रवास.... अंतरंगी
धन्यवाद ?☺️


🎭 Series Post

View all