प्रवास... सुरूवात नात्याची भाग २

लग्न झालेल्या जोडप्याच्या देवदर्शनाचा प्रवास.. सोबत मस्ती धमाल आणि थोडासा रोमान्स
घ्यायचं ठरलं जसं दर्शन तसे सगळे लाईन मध्ये उभे राहिले... तीथे पुरूषांसाठी वेगळी तर स्त्रीयांना वेगळी लाईन होती... अवनी, पुजा, धनू,  आणि सरिता एका बाजूने तर सोप्या सोडून गण्या, अजा, मामा, सागर, महेंद्र, आणि सिद्धू  दुसऱ्या बाजूला लाईनीत उभे राहिले...

आतमध्ये गेल्यावर सगळे जण चौफेर नजर फिरून मंदिर पाहू लागले....

पुजा, अवनी, महेंद्र आणि सिद्धू ते प्रथमच आले होते कोल्हापूरला त्यामुळे ते जास्तच लक्ष देऊन पाहत होते...

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई... नाव घेताच जितकं प्रसन्न वाटतं तितकेच मंदिर पाहून वाटू लागले...

अंबाबाईचं मंदिर हे....
तारका कृती असून या मध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली ,महासरस्वती ,गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम केलेले होते... मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित होती.. महालक्ष्मीची मूर्ती उंची २ फुट ९ इंच इतकी उंच आहे. मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल ) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुग) आहे. 
महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडप आहे... जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .
देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी,  वीणावादी, आरसा देखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये आहे. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.
महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखी बरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती म्हणजे ३१ जानेवारी आणि ९ नोव्हेंबर‌ सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात आणि १ फेब्रुवारी आणि १० नोव्हेंबर सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. तसेच २ फेब्रुवारी आणि ११ नोव्हेंबर  मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.
या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.

सागर महेंद्र आणि सिद्धूला मंदिर आणि महालक्ष्मी अंबाबाई देवीची माहिती देत होता... बाकीचे फक्त इकडे तिकडे पाहत होते...

" आयला दादू... तुला बरंच की माहिती हाय... कवा शिकलास एवढं??" गण्या

" मागच्या वेळी आमची पिकनिक आली त्या वेळी एक गाईड हायर केला होता त्यानेच दिली होती.. मी लक्षात ठेवली होती.." सागर

" काय केलं व्हतंस?? गाईड बाहेर केला... कुठल्या ईषयाचं गाईड व्हतं... आन् मंदिरात कशापायी घेऊन आला व्हतांस??" गण्या

" अरे गाईड म्हणजे पुस्तक नाही... गाईड म्हणजे माहिती देणारा... माहितीगार... आणि बाहेर नाही हायर म्हणजे पैसे देऊन बोलावला होता.." सागर...

" आरं म्हन्जी.... ते बडबड करतं ते खापर तोंडाचा काय... समदं सांगत बसतं... बारिक सारीक बी... त्याला भाड्याने उचलला व्हता व्हयं.." गण्या

" अरे काय हि भाषा तुझी... थोडं नॉर्मल बोलत जा कि??" सागर

" म्हन्जी रं??" गण्या

" जाऊ दे... तु बोल तुला हवं तसं " सागर

सागरने गण्याचा विषय तिथेच बंद केला... लहानपणापासून गण्याच काय गावातली सगळी मुले, मुली, माणसे असंच बोलत होती.... सागरला आधी हीच भाषा गोड वाटायची ... पण आता नव्याने झालेल्या बायको समोर तसेच हुशार मेव्हणे आणि देखणी मेव्हणी समोर त्याचे इंप्रेशन खराब होत होते... म्हणून त्यांचा जीव खाली वर होत होता..

स्त्रीयांच्या रांगेत गर्दी कमी होती त्यामुळे अवनी आणि बाकी मुलींचे दर्शन लवकर झाले... दर्शन झालं तसं मंदिरा बाहेर येऊन त्यांचे लागलीच फोटो शुट पण चालू झाले...

जोडीने दर्शनाला गेलेली जोडी.... पण... तीला साधं जोडीने एकसाथ माथा टेकवता पण नाही आला देवीच्या चरणांवर..
असंच दर्शन झाले त्यांच... एकत्र जाऊन सुध्दा वेगवेगळं....

सोप्या गेटबाहेर ड्रायव्हर सोबतच थांबला होता... सगळे आले तसं त्याने लगेच त्याच्या वडिलांना म्हणजेच मामाला जाऊन जेवायला जाऊ या सांगितले... भुक तर सर्वांनाच लागली होती.. त्यामुळे सगळ्यांनी मोर्चा हॉटेलकडे वळवला.. मंदिराजवळच्या हॉटेलमध्ये सगळे गेले... मंदिराची बहुतांश गर्दी दर्शन झाल्यावर तिथेच आली असावी... खुप गर्दी होती त्या मुळे ज्याला जिकडे जागा मिळाली ते तिथेच बसले... अवनी, पुजा, धनू सरिता यांनी एक टेबल पकडला आणि  तिथे बसले... त्यांच्या सोबत अजून दोन बायका होत्या ज्या आधीच येऊन तिथे बसल्या होत्या... सोप्या आणि मामा एकत्र किचनला लागून असलेल्या छोट्या टेबलावर बसले... बाकी गण्या, अज्या, सिद्धू , महेंद्र, आणि सागर सिंगल सिंगल जागा मिळाली तसे बसत गेले... जेवताना पण सागरला अवनी जवळ बसता नाही आले...
सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली... पुजाने डोसा मागवला तर महेंद्र आणि सिद्धूने मेंदुवडा हे पाहून गण्या लगेच म्हणाला...

" च्या आयला... इथं कोल्हापूरात येऊन‌ हे आबांवलेलं खाव्वं लागतया... लई वंगाळ...जेवण कसं पाहिजे.... एकदम झणझणीत असलं पाहिजे.... निसता जाळ अन् धूर... नाकातोंडातून पाणीच बाहीर आला पाहिजे..."

वेटर ने गण्याला मिसळ आणून दिली ती पण झणझणीत.... तरी वाली...

" अंग अशी..." गण्याने लगेच ताव मारला त्यावर...

गण्याचं बघून अजा, धनू आणि सरूने पण मिसळ घेतली... सोप्या आणि मामांनी दोन दोन प्लेट कांदा भजी आणि पाव मागवले... सागरने वडापाव... कारण त्याचा फेवरेट वन ॲण्ड ओन्ली वन वडापाव!!!
जिकडे जाईल तिकडे तो वडापाव खायचा.. दिवसातून किमान एकदा तरी खायचा म्हणजे खायचाच... डायहार्ट वडापाव लव्हर होता तो!!

अवनी ने म्हैसूर मसाला डोसा मागवला होता पण तो लवकर काही यायचं नावच घेत नव्हता... लवकर काय येतंच नव्हता... वेटर बनवायचा... पण.. त्या म्हैसूर मसाला डोस्याला किचन पासून टेबल पर्यंत येण्याचा मुहूर्त लागतच नव्हता... बिचारी अवनी शेवटी वैतागून तीने ऑर्डरंच चेंज केली आणि तीने सुध्दा मिसळ पाव मागवला...

सगळ्यांचे खाऊन झाले... सागरने बील पे केले.. महेंद्र आणि सिद्धूने त्यांच्या वाटणीचे पैसे देऊ केले पण सागरने ते घेतले नाही...

महालक्ष्मीचे दर्शन निर्विघ्नपणे पार झाले आता सगळे निघाले पुढच्या प्रवासाला!!!

----------------------------------------------

बघूया पुढे आपली गँग कुठे जातेय??

कुठे ही गेली तरी कमाल ती करणार आणि धमाल तुम्हाला येणार!!!!
वाचत रहा... एक प्रवास अंतरंगी पणाने भरलेला

धन्यवाद ?☺️


🎭 Series Post

View all