प्रवास... सुरूवात नात्याची अंतिम भाग

लग्न झालेल्या जोडप्याचा देवदर्शनाचा प्रवास.. सोबत मस्ती धमाल आणि रोमान्स
थोड्या वेळ फिरून सगळे परतीच्या वाटेवर निघाले... पण जाण्याआधी थोड्या वेळ पन्हाळा गडाच्या कुशीत निवांत बसले होते...

संध्याकाळ होत आली होती... सगळीकडे वातावरण एकदम शांत झाले होते... मंद मंद वारा सुटला होता... पन्हाळा गडावरची ती मोकळी हवा जो तो आपल्या श्वासात भरून आठवणी स्वरूपात नेण्याचा प्रयत्न करत होता‌‌..‌..

अवनी आणि सागर.... एका कठड्यावर बसले होते... बाकी सगळ्यांनी त्यांना जाणूनबुजून थोडी मोकळीक दिली होती....

" छान वाटतं ना इथे... मस्त... मोकळी हवा... सुंदर स्वच्छ आभाळ.... असं वाटतं इथेच थांबावं आयुष्यभर...." अवनी

" आयडिया वाईट नाही आहे... आयुष्यभर नाही पण वर्षांतून दोन तीन वेळा येऊ शकतो राहायला इथे..." सागर हसत म्हणाला

" तुम्ही मस्करी करत आहात का माझी???" अवनी डोळे बारीक करून सागरला म्हणाली...

प्रवासाच्या सुरूवातीचे अवघडलेपण आता थोडं कमी झालं होतं दोघांत...

" नाही गं... खरंच बोलतोय मी... तसं हि गावाला येणं होत राहतं आपले... गावाला आलो की येत जाऊ मग..." सागर

" हम्म... मग ठिक आहे..." अवनी

एकीकडे सागर अवनी बोलत होते... तर दुसरीकडे नविन ओळख वाढवू पाहणारे अजून एक जोडपं मनाचे कप्पे उघडत होते...

" तुला शिकायचे होते तर तु का नाही सांगितले तुझ्या वडिलांना... मोठे भाऊ आहेत की तुझे... ते सोडायला आणायला आले गेले असते ना..." सिद्धू

" इतकं सोपं गणित नाय ते... दादांना म्हन्जी माझ्या पप्पांना नाय आवडत मुलींनी घराबाहिर जास्त राहिलेलं... लांबच्या शाळाला जायचं म्हन्जी सकाळचं लवकर निघून सांचाला येणं.. इतका येळ नाय देणार ते... आणि दादू आणि भैयाच काय... ते त्याच्याच नादात राहणारी हायती... माझ्या कडं कवा बघणार..." धनू

" हम्म... लग्न झाल्यावर नवऱ्याला सांग तो पुढचं शिक्षण पूर्ण करील तुझं..." सिद्धू भोळ्या पणाने बोलून गेला... यावर धनूला खुप हसायला आले...

" आरं... येडा की खुळा तु... लग्न झाल्यावर कुठला नवरा आपल्या बायकुला पाठवलं शाळाला.... हाहहाहाहहाहाहह" धनू

" असं काही नाही... माझं ठरले आहे.. माझ्या बायकोला मी पुढे शिकायला सांगणार आहे..." सिद्धू धनूकडे एकटक बघत बोलला... जणू तीच्या चेहऱ्यावरून तीच्या मनातलं ओळखत असावा..  त्यावर धनू कमालीची लाजली...
तीच्या लाजण्यातच सिध्दूला त्याच उत्तर मिळाले..

दोघे हि आता मनमोकळे बोलायला लागले...

" अरे माही... काही ठरलं का तुझं??" पूजा

" कशाच???" महेंद्र

" अरे डफ्फरsss आता दि च लग्न झालं आता काय??" पूजा

" हो ना... आता पप्पा मम्मीना करमणार नाही ना... आणि तु... तुला तर किती सवय अवनी दिची... सगळीकडे सोबतच असायचा तुम्ही... आता एकटी कशी हॅण्डल करणार तु??" महेंद्र

" माही... तु बरा आहेस ना... अरे ती माझी बहिण आहे...तीच लग्न झाले तर मी सेन्टी व्हायला पाहिजे... पण इथे तर माझ्या ऐवजी तुच होतोस... आणि मी... माझं... माझ्या घराच काय होणार किंवा अवनी दी नांदायला गेल्यावर काय करणार ते नव्हते विचारत... आपल्या लग्नाच काय हे विचारले मी तुला.... इडियट..." पूजा

" ते!!! अगं ते काय ठरलं आहे आपलं तसंच होईल... माझ्या घरी मी ऑलरेडी सांगितले आहे.. त्यांना मान्य पण आहे... तुझ्या घरून पण संमती आहेच की.. जॉबच पण काम ऑलमोस्ट झालं आहे... सो... घर फायनल झाले कि लग्न.. चालेल ना..." महेंद्र

" चालेल काय धावेल.... लव्ह यु माही.." पूजा अति आनंदाने महेंद्रला मिठी मारायला गेली.. पण महेंद्रने तीला थांबवले... आजूबाजूला नजर फिरवून बघ आपण एकटे नाही आहोत याचा इशारा दिला... त्यावर पूजा लाजली.... आनंदात आपण काय करत होतो हे लक्षात आले तीच्या... आणि तीला लाजताना पाहून महेंद्र गालात हसत होता....

तीन्ही जोड्या तर आपल्या प्रेमाच्या वाटेवर चालत होत्या... पण अजून कोणीतरी होत जे फक्त दुरून... चोरून प्रेम करत होते... आणि आज पर्यंत फक्त एका संधीच्या शोधात होते...
आज ती संधी मिळाली..

" एकलीच बसली हायस.. मामा कुणीकडं गेलेत.." गण्या सरूच्या शेजारी बसत म्हणाला..

" पप्पा सोप्याला बघायला गेलेत... गाडी जवळ.. तुला बरा टायम मिळाला इचारायला आता..." सरिता

" अगं‌.‌... तसं नव्हं... तु आल्यापासून मामा संगतच हायसं मग कवा इचारू तुला...." गण्या आपली बाजू मांडत म्हणाला...

सरूला काहितरी आठवलं तशी ती लगेच उत्साहात बोलली...

" अयं... गण्या.... आता तुझाच नंबर हाय ना व्हं.." सरिता

" माझा नंबर... कशाचा... कशापायी..." गण्या

" आरं... खुळ्या... आता सागर दादुच लग्न झाले म्हन्जी आता तुझंच लग्न असेल ना..." सरिता

"आयला... हि दादूला दादू म्हणते म्हन्जी मला बी भाऊच मानत आसलं का??? अवघड आहे गड्या तुझं..." गण्या सरू कडे एकटक बघत मनात म्हणत होता...

" आरं... निस्ता बघणार आहेस कि काय बोलणार बी हाय.." सरिता

" मला तु आवडतीस... मला तुझ्याशी लगीन करायचं हाय.... तु व्हयं म्हटलीस तर ठिक.. नाहीतर गावात दोघीं तयारच हायती..." गण्या सुपरफास्ट एक्स्प्रेस होऊन सगळं बोलून गेला.. पण नंतर त्याच तोंड बघण्यासारखं झाले होते...

सरूला पण आधी तो काय बोलला तेच नाही समजले... पण जेव्हा लक्षात आले तेव्हा...

" थोबाड फोडीन मला सोडून कुणाकडं बी बघितलं तर..." सरू

" आता तु नाय म्हटली तर गं..."

गण्या पटकन बोलला पण जेव्हा त्याला सरूच बोलणं आठवलं आणि समजलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही... हसत हसतच तो सरू कडे बघून डोळ्यांनीच पुन्हा तेच विचारत होता... सरू मात्र बोलल्या नंतर आपण काय बोलून गेलो आणि त्यात गण्याच असं खुणावणं तीला अजूनच लाजवत होते...
सरूच लाजणं म्हणजेच तीने दिलेला होकार होता...

" अयं... चला पोरांनो लवकर चला... अंधार पडायच्या आत घरला पोहचायचं आहे नव्हं... चला मग..." मामा सगळ्यांना गाडीत बसायला सांगत होते...

सगळी जोडपी निघाली गाडीकडे... एकमेकांना बघत... थोडं लाजत...

फक्त अजा आणि सोप्या हेच राहिले.. ते आधीच गाडीत जाऊन बसले होते...

गाडी आता जागा बदली झाल्या होत्या....

मधल्या सीटवर अवनी, पूजा, सरिता आणि धनू बसले होते.... त्यांच्या मागे सागर, महेंद्र, गण्या, सिद्धू आणि अजा.... ड्रायव्हर शेजारी मामा आणि सोप्या....

नवं विवाहित दाम्पत्य एका दिवसाच्या देव दर्शनाला आले होते... आपल्या कर करवल्या सोबत... पण जाताना मात्र एक जोडी मिळून चार जोड्या तयार झाल्या...

हा प्रवास इथं संपला तरी या जोडप्याला नविन प्रवासाची वाट भेटली...

कोणी नविन वैवाहिक जीवनाच्या प्रवासाला निघाले...

कोणी भविष्यात अतुट बंधनात अडकायला निघाले...

कोणी नविन नातं तयार करू पाहत होते तर कोणी नात्याला नविन नाव देऊ पाहत होते...

हा प्रवास इथे थांबला तरी यांचा पुढचा प्रवास नक्की सुखाचा.. सोयीचा होवो हिच इच्छा!!

_______________________________________

एक प्रवास अंतरंगी आज इथेच संपला... पण पुढचा प्रवास नव्याने सुरू होईल!!!

कथेला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ?☺️


🎭 Series Post

View all