प्रवास का करावा!

This blog defines why we need to travel?

प्रवास का करावा!

प्रवास! अहाहा किती छान कल्पना! मी तर म्हणेन त्याहीपेक्षा घडणारी कृती-जी देते आनंद! समाधान! चेंज! आणि त्याही पलीकडे मिळते नवनवीन माहिती मग ती भाषाअसते, संस्कृती असते आणि मग त्यामधून आपले ज्ञान वाढते आणि आपण आणखी प्रगल्भ बनतो.

माझा एक मित्र खूप अतरंगी आहे! प्रवास हे त्याचं पॅशन आहे जणू. कितीही दमलेला असो अथवा थकलेला पण प्रवास हा शब्द उच्चरला की त्याची बॅटरी एकदम चार्ज!

हा माझा मित्र म्हणजे एक चालते फिरते गूगल आहे. तुम्ही फक्त ठिकाणचे नाव उच्चरले की झाले!

पुढचा सगळा विषयाचा ताबा हाच घेणार, मग ते ठिकाण म्हणू नका की त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व मग तिथली भौगोलिक परिस्थिती आणि संपत्ती याची माहिती इत्यंभूत मिळणारच.

कसे जायचे, कोणता रूट सोपा मग तेथील निसर्ग कसा हे सगळं तुम्हाला बसल्या जागी कळणार...

या त्याच्या छंदामुळे तो प्रचंड समृद्ध झालाय तो त्याच्या विचारांनी, त्याच्या ज्ञानात पडलेल्या भर यामुळे.

तर आपला मूळ मुद्दा आहे प्रवास!

खरच प्रवास करावाच!

आपल्या दैनंदिन जीवनात आपण खूप व्यस्त असतो, एक जणू मशीन म्हणून बरेचदा जगत असतो. त्यात छंद मागे पाडतात, आवडीनिवडी मागे पडतात आणि राहते ते फक्त एक रुटीन ज्यात आपण खूप भरडले जातो.

मग याच सगळ्या मध्ये जर आपण थोडा प्रवास केलात आपल्या आवडत्या ठिकाणी गेलात किंवा नवीन प्रदेश पादाक्रांत केलात तर खरं सांगतो, त्यापेक्षा सुख नाही.

कारण एक नवीन ठिकाण तुम्हाला खूप काही देत असते.

तिथली संस्कृती, नवीन भाषा, तिथला वेष, तिथला परिसर, तिथली माणसे हा सगळा अनुभव तुमच्या आयुष्यात नवीन भर घालतो आणि तुम्हाला खूप काही शिकवून जातो.

ह्या सगळ्या चेंज मध्ये तुम्ही तुमचे महत्व स्वतःला नव्याने समजावून देऊ शकता. स्वतःची परीक्षा सुद्धा घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवनवीन अनुभव घेता.

ते रुटीन लाईफ ब्रेक होऊन तुम्ही नव्या दमाने ताजे तवाने होऊन नव्याने विचारसरणी सुरू होऊ शकते. ते विचार तुम्हाला आतून आणि बाहेरून संपूर्ण बदलून टाकू शकते आणि आयुष्य काय हे समजावून तुमचा आनंद तुम्हाला मिळवून देऊ शकते.

प्रवास तुम्हाला तुमच्याच आवडीची नव्याने ओळख करून देतो. तुम्हाला नवीन जीवदान मिळवून देतो

नवीन चैतन्य निर्माण करवून देतो! व्यक्तीला समृद्ध बनवतो! नवीन कलागुणांमध्ये वाढ करवतो! व्यक्तिस्वातंत्र्य मिळवून देतो!

नव्याने जगायला प्रवृत्त करतो!

नवीन बंध निर्माण करतो!

असा हरहुन्नरी व्यक्तीमत्व देणारा हा प्रवास आयुष्यात सुगंध निर्माण करतो.

मी मी म्हणणारा सुद्दा स्वतःच्या मी पणाला विसरून जगायला शिकतो.

आणि प्रवास केला की शॉपिंग करण्याची पण तुमची ईच्छा तुम्ही पूर्ण करू शकता बरं का!

नुकताच मीसुद्धा या शहरी जनजीवनापासून दूर असे काही क्षण या निसर्गाच्या कुशीत विसावून आलो. त्या ओल्या मातीचा सुगंध, त्या निसर्गाची हिरवळ, तो गालीचा डोळ्यांना सुखावून गेला.

कानाला ऐकायला मिळाली ती पक्ष्यांची किलबिलाट, श्वास घेतला तो शुद्ध रम्य वातावरणात!

अहाहा! हे सगळे मला दिले ते माझ्या प्रवासाने! संजीवनीच म्हणा ना!

हनुमानाने कोण्या क्षणी संजीवनी आणुन लक्ष्मणाचे प्राण वाचवले, पण आपण प्रवास नावाची संजीवनी आपल्याला हवे तेव्हा अनुभवू शकतो आणि आपल्या स्वतःलाच पुनर्जीवन देऊ शकतो, नाही का!

मित्रांनो खूप प्रवास करा! स्वतःला ताजे तवाने ठेवा आयुष्य ऊपभोगा ते जगा!

नवीन अनुभव घ्या आणि आनंदी राहा.

प्रवास माणसाला खूप काही देतो याचा स्वतः अनुभव घ्या, आणि तुमचा असा काही अनुभव असेल तर या पोस्ट वर नक्की शेयर करा!

©®अमित मेढेकर