प्रवास एकटीचा भाग - 40 अंतिम भाग

प्रेम आंधळं असत पण ते नातं शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असतं


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 40 अंतिम भाग



       किरण प्रिया , दोघांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांच्या आयुष्यात हा क्षण इतक्या लवकर आणि इतका सुंदर पद्धतीने येईल .

    प्रियाने संपूर्ण रूममध्ये नजर फिरवली , तिलाही बघताक्षणी लक्षात आले , की हे वेदिका वहिनीने केलं असावं सगळं .

प्रिया बेडरूममध्ये नजर फिरवत होती आणि किरण तिच्यावर , प्रिया आजही तितकीच सुंदर दिसत होती जितकी पहिल्यांदा बघताक्षणी त्याच्या मनात भरली होती .

टेबलवर ठेवलेला दुधाचा ग्लास किरणने पहिले प्रियाला दिला , तिला दूध आवडत नाही तरीसुद्धा तिने थोडेसे प्यायले नंतर राहिलेलं दूध किरणने संपवले .

" किरी , वहिनी कितनी प्यारी हैं ना . सबके लिये कितना कुछ करती हैं ".

" हा , मेरी वहिनी हैं ही ऐसी ".

" हमारी प्यारिसी फोटो भी कितनी अच्छी फ्रेम कराके लगाई हैं ".

" हा , फोटो हैं ही इतनी सुंदर ".

बोलता बोलता किरण कधी तिच्या एकदम जवळ आला प्रियाला समजले सुद्धा नाही .


            मिलनाची ही रात्र
               साज ही तुझा सजला
                   पाहून तुझे हे रूप सखे
                        चंद्र ही ढगात लपला

आज त्यांच्या मिलनाची रात्र होती , दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देत होते , त्यात फक्त आणि फक्त प्रेमच प्रेम दिसत होते . तीन वर्षांचा त्यांचा सोबत असलेला काळ , त्यात घालवलेले प्रत्येक क्षण , चढ उतार , प्रत्येक आठवण नजरेसमोर येत होती . त्यांचे प्रेम जिंकले होते आज .

किरण प्रियाजवळ जात होता तशी प्रिया मागे मागे सरकत होती . भीती तर दोघांनाही वाटत होती मनातून , पण प्रेमही तितकेच होते आणि एकमेकांसाठी काळजीही .

किरणला माहिती होते , प्रवास जास्त झाला होता त्यामुळे दगदग झालेली . प्रियाच काय घरातले सगळेच दमले होते , त्याने प्रियाच्या जवळ जात तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि बेडवर ठेवलेली कॅडबरी तिला खाऊ घातली .

गुलाबाच्या पाकळ्यांचा तिच्यावर वर्षाव केला , तशी ती शहारली , अंग चोरून एका कोपऱ्यात उभी राहिली .

किरणने प्रियाला बेडवर बसवले , तिच्या बाजूला तो ही तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला . प्रियाच्या हृदयाची धडधड वाढत होती .

किरणने तिच्या हातावरची मेहेंदी बघत उगाच काहीतरी बोलत होता , मुद्दाम तिला चिडवत होता .

   अचानक किरण उठून उभा राहिला , त्याने घातलेल्या कुर्ता पायजम्यात खूप गरम होत होते , म्हणून त्याने कपडे बदलले आणि साधा टिशर्ट घालून पुन्हा तिच्यासमोर उभा राहिला .

प्रियाला मात्र साडीत कसेतरीच होत होते , पण तरीही ती किरणसाठी साडी घालून बसली होती . किरणने तिलाही बदलायला कपडे आणून दिले .

तिची धडधड बाहेर ऐकू येईल इतकी वाढली होती . किरण आता आणखीनच तिच्या ओठांजवळ जात बोलला ,

" प्रिया , आय लव्ह यु सो मच . आज तुम बोहोत ज्यादा सुंदर लग रही हो , पर तुम थक गयी हो . मुझे पता हैं , इसलीये तुम यहा आरामसे सो जाओ . मैं यही हूं बाहर , कुछ चाहीए होगा तो बता देना ".

असे म्हणून तो खरंच बाहेर जात होता झोपायला .
त्याच्या अशा वागण्याचं प्रियाला आश्चर्य वाटले , आणि त्याच्यावर तिला अजूनच प्रेम आले . तो बाहेर जात असता प्रिया पळत जात त्याला मागूनच घट्ट बिलगली .

" मुझे पता हैं प्रिया , तुम मेरे लिये आज भी तैयार होगी . पर मुझे हमारा ये पल और भी खास करना हैं , मैं इंतजार करुंगा उस पल का ".

" मैं भी किरी , आय लव्ह यु टु ".

दोघांनी एकमेकांना गुड नाईट करून झोपायला गेले . किरण बाहेर हॉलमध्ये खाली चटई वर झोपला आणि प्रिया त्यांच्या बेडरूममध्ये शांत झोपी गेली .

पण एक मात्र खरे , की दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते . न बोलताही मनातलं सगळं जाणत होते .

प्रेम असच असतं ना , न सांगताही समोरच्याला आपल्या मनातलं सगळं काही कळत असत .

न बोलता डोळ्यांची भाषा कळते एकमेकांना , मन जुळले की काहीही बोलण्याची गरज राहत नाही . समोरच्याला काय हवं नको ते लगेच समजते , त्याची सुख दुःख , राग प्रेम अगदी सगळेच .

प्रेमाला कुठल्याही भाषेची गरज नसते , प्रेमात फक्त निर्मळ भावना असतात ज्या आपल्या साथीदाराला समजून घेतात .

प्रेमात कसला स्वार्थ नसतो , प्रेम हा एक निखळ वाहणारा झरा असतो . जो सगळ्यांना प्रवाहा सोबत घेऊन जातो . प्रेमात काही मिळवायचं नसतं प्रेमात फक्त स्वतःला हरवायचं असतं . स्वतःला हरवून समोरच्याला जिंकायचं असतं .

प्रेमात असतो त्याग , प्रेमात असतं समर्पण , प्रेम आंधळं असतं असं म्हणतात पण खरंतर प्रेम हे डोळस असतं जे समोरच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकवत .

प्रेमा तुझा रंग कसा ?
असे सगळेच म्हणतात , कसा बरे असेल प्रेमाचा रंग ?प्रेमाचा रंग असतो सफेद , ज्यात कुठलाही रंग मिसळला  तरी तो अलगद विरून जातो ....

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं असे बरेच जण म्हणतात , पण खरंतर प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असते . कुणासाठी प्रेम म्हणजे त्याग असतो तर कुणासाठी प्रेम म्हणजे ओढ असते .

कुणासाठी प्रेम म्हणजे समर्पण असतं तर कुणासाठी प्रेम म्हणजे एक कधीही ना संपणारी भूक असते .

कुणाला आपलं प्रेम कायम डोळ्यांसमोर राहाव असं वाटतं , त्या व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होतात . ती व्यक्ती आजूबाजूला असली की सगळच कसं रोमँटिक वाटायला लागत .

प्रेम म्हणजे हेच तर असते जे कधीही न संपणारे अतूट नाते भासते .

" प्रेम " खरंच किती ताकद असते ना या दोन शब्दांत .  दोन शब्द एखाद्या व्यक्तीला अगदी काहीही करायला भाग पाडत असतात . स्वभावाच्या विरुद्ध वागायला शिकवतात , शांत असणारा बोलायला लागतो , बोलणारा शांत राहून ऐकायला लागतो . प्रेमात आपण स्वतःला हरायलाही तयार असतो . कारण हरण्यात पण एक वेगळीच मजा असते . आपल्या हरण्याने समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार असेल तर आपण ती हार सुद्धा हसत हसत स्वीकारत असतो . तो हरण्याचा आनंद ही काही औरच असतो . त्या हरण्यात सुद्धा खूप काही जिंकल्याचा भास होत असतो .
तेव्हा आपलंच मन आपल्याला ओरडून सांगत असत जिंकलास हा भावा..!!!

प्रेमाच्या पहिल्या पायरीवर चढायला प्रत्येक जण घाबरतो कारण एक भीती असते की या प्रवासात आपण हरणार तर नाही ना ?
चालताना थकणार तर नाही ना ?
पण जसं जसं आपण पुढे चालत जातो तसं तसं तो प्रवासही हवाहवासा वाटतो कारण त्या प्रवासात आपल्याला कुणाची तरी सोबत असते कुणाचा तरी हात आपल्या हातात असतो त्यामुळे तो दूरचा प्रवासही आपल्यासाठी खूप खास बनुन जातो.


प्रेमाची परिभाषाच वेगळी असते , जी प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळी मांडत असतो , व्यक्त करत असतो .

प्रेम करणं सोपं असतं पण ते नातं आयुष्यभर निभावणं आपल्या हातात असतं .

किरण प्रियाच्या आयुष्याचा प्रवास आता कुठे खऱ्या अर्थाने सुरू झाला होता .

असेच वाचत रहा आणि आनंदी रहा .


समाप्त .





सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all