Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 31

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 31


विषय - प्रेमकथाप्रवास एकटीचा 31


             सुधाकर घरी आल्यापासून घरात एक वेगळाच आनंद झाला होता . वेदिका आणि सुधाकरच्या हाताने घरातल्या घरात छोटीशी पूजा करून घेतली .

आता फक्त एकच आणि सगळ्यात महत्वाचं काम बाकी होत , ते म्हणजे दागिने खरेदी . आईने मुद्दाम सुधाकर आल्यावर जाऊया म्हणून सांगितलं होतं . कारण ज्या दुकानातून ते सोने खरेदी करतात ते त्याच्या मित्राचं होत .

दुपारी सगळ्यांच लवकर आवरून ते दुकानात गेले सोनाराच्या . सुधाकरला बघून त्याच्या मित्राला खूप आनंद झाला . त्याने लगेच सगळ्यांसाठी कॉफी मागवली , आणि कुठले दागिने बघणार म्हणून विचारून घेतले .

तो प्रत्येक दागिना स्वतः दाखवत होता . डिझाइन तर एकापेक्षा एक सुरेख होत्या . पण आपलं जितकं बजेट होत त्यात बसेल इतकंच घ्यायचं होत .

वेदू ने मोठं मंगळसूत्र पसंत केलं पूर्ण चार तोळ्यांच , आणि छोटं वाटी मंगळसूत्र एक तोळ्याचं . ह्यासोबतच तिला दोन बांगड्या , पायातले पैंजण आणि जोडवी पण घेतली .

आता निवडायची होती ती त्यांची साखरपुड्याची अंगठी . त्याच्या काही स्पेशल डिझाइन होत्या , त्याच दाखवल्या . सगळ्याच एकदम भारी होत्या , पण एकच घ्यायची म्हणून निवड करायला जमत नव्हते . वेदुला तर दोन अंगठ्या इतक्या आवडल्या की तिने त्या स्वतःच्या हातात सुद्धा घालून बघितल्या . सुधाकर हळूच तिचा चेहरा न्याहाळत होता , तिच्या लक्षात आले नाही ते .

" वेदू , कुठली अंगठी आवडली तुला ?? कोणती घ्यायकगी आपण ? "

" मला ह्या दोन्ही खूपच जास्त आवडल्या आहेत , समजत नाहीये कुठली जास्त छान आहे ते ".

मग सुधाकरने किरणला विचारले , " तुला कुठली आवडली प्रियासाठी ?"

किरणने तीच माप बरोबर आणलं होतं , त्याप्रमाणे जी बसली ती घेतली . आणि जी आणखी एक दुसरी होती त्या अंगठी कडे वेदिकाची नजर खूप केव्हाची होती . त्यामुळे सुधाकरने दोन्ही अंगठ्या घेतल्या .

" अहो , मी काय म्हणते दोन का ? एकच घ्या त्यातली ".

सुधाकरने अंगठी बिल करून आणली आणि सरळ वेदिकाच्या हातात घातली , तिथेच दुकानातच सगळ्यांसमोर .  तिला मात्र ओशाळल्या सारख झालं होतं .

" अहो हे काय करताय तुम्ही , सगळे बघताय आपल्याला . आई तात्या पण आहे सोबत आपल्या , ते काय म्हणतील ".

" हेच म्हणतील की ह्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ".

     सोनं खरेदी करून झाल्यावर सगळे बाहेरच थोडं खाऊन मग घरी आले . दमले तर सगळेच होते , पण तरीही लग्नाचा आनंदच इतका होता की दमायलाही वेळ नव्हता .

           उद्या घरातून लवकर निघायचं होत , पहाटे पहाटे एयरपोर्ट वर जायला पाहिजे म्हणून आधीच सगळ्या बॅगा हॉलमध्ये आणून ठेवल्या . काय सामान घेऊन जायचं होतं त्याची एक यादी तयार करून ठेवली म्हणजे काही विसरायला होणार नाही . वेदिका यादी प्रमाणे एक एक करून सगळं पुढे आणून ठेवत होती .

          आज रात्री लवकरच जेवणं आवरून सगळे उद्याची वाट बघत झोपी गेले . किरणला तर झोपच येत नव्हती , इतका आनंदी होता तो . प्रियाला सारखे मेसेज सुरू होते त्याचे . तिकडे ती सुद्धा त्याला भेटण्यासाठी आतुर होती , दोघेही एकमेकांना बघण्यासाठी व्हॉट्स ऍप वर व्हिडीओ कॉल करत होते . रात्रभर जागरण होईल म्हणून प्रियानेच किरणला फोन बंद करून झोप म्हणून सांगितले , कारण उद्या लवकर उठून आवरायचे होते .

             तिकडे केरळमध्ये प्रियाच्या मेहेंदीचा कार्यक्रम चांगलाच मोठा होता . सगळ्या मैत्रिणी नातेवाईक आणि आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा हातावर सुंदर मेहेंदी काढून घेतली होती . प्रियाने तर संपूर्ण हातभरुन मेहेंदी काढलेली .

            बायकांचा एक प्रॉब्लेम असतो , जेव्हा मेहेंदी लावलेली असते तेव्हाच नेमकं गरज असते ते एका मैत्रिणीची . कारण प्रत्येक कामं करतांना हाताची मेहेंदी पुसू नये म्हणून काळजी घ्यावी लागते . त्यात तिने गुलाबी घागरा घातलेला होता त्यामुळे तो घागरा आणि त्याची ओढणी सांभाळताना खूप कठीण जात होते .

      पण ती ह्यासगळ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती . मैत्रिणींचे चिडवणे , त्यांचे हसणे , तिला सावरून घेणे , तिला खाऊ घालणे आणि प्रत्येक जण तिला काहींना काही आशीर्वाद देत होते . तिच्या हातावर फायनली किरणच नाव कोरले गेले , ते बघून क्षणभर डोळ्यात पाणी आले तिच्या . आज फक्त हातावर नाव कोरले होते पण तिच्या हृदयात तर गेल्या तीन वर्षांपासून फक्त किरण आणि किरणच च नाव होत .

पहाटे चार वाजताचा गजर लावला होता , सगळे आवरून लवकरच तयार झाले . बॅग उचलणार तोच आईने किरणला घरातल्या देवाच्या पाया पडून निघावे म्हणून सगळ्यांना सांगितले .

वर्हाड निघालयं केरळला .... सामान भरपूर होत , प्रत्येकाच्या दोन दोन बॅग होत्या . आता तीन दिवस तिकडे राहायचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचे वेगवेगळे ड्रेस आणि ड्रेस साधे सुधे नसून मोठे मोठे होते , वजन फार काही नव्हतं पण त्यांची घडी खूप मोठी होती . त्यामुळे बॅगेत जागा जास्त लागत होती .

एक एक करून बॅग सगळ्या गाडीत भरल्या आणि निघाली देवाच नाव घेऊन कुलकर्णी फॅमिली लग्नाला . किरण तर खूप आतुर होता , कधी एकदाच एयरपोर्ट येतंय म्हणून सुधाकरला सांगत होता गाडी जोरात चालव म्हणजे लवकर पोहोचू आपण .

" भाऊजी , आपण जरी लवकर एयरपोर्ट पोहोचलो तरी विमान जेव्हा निघायचं तेव्हाच निघणार ते . त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका , पोहोचू आपण वेळेत ". वेदिका मुद्दाम त्याला चिडवत बोलत होती .

एकमेकांसोबत गप्पा मारत मारत पोहोचले ते एकदाचे  सगळं सामान घेऊन , आता तिकिटं वैगैरे दाखवून लगेच विमानात बसावं असच वाटत होतं त्याला . पण त्यांची फ्लाईट सात वाजता होती त्यांची , म्हणजे अजून एक तासभर तरी वाट बघावी लागणार होती . किरणला तर अस झालं होतं की काय सांगायचं . तो सारखा फोनमध्ये बघायचा आणि काहीतरी टाईप करायचा . बहुतेक प्रियासोबतच बोलत असावा . कारण तिलाही तिकडे करमत नव्हते .

मैत्रिणी आणि चुलत निलत बहिणींचा घोळका प्रियाच्या आजूबाजूला होता पण तरी तिला किरणची आठवण येत होती .

इकडे वेळेवर एयरपोर्ट वर पोहोचून पण फ्लाईटला निघायला अजून वेळ होता . काहीतरी दुरुस्तीच काम सुरू होत , त्यामुळे वेळ लागणार होता . किरणला तर तिथे फिरून फिरून कंटाळा आला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर ते साफ दिसत होते .

कसाबसा एक तास घालवला आणि फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली , तेव्हा किरणला खुप बरं वाटलं . सगळे फ्लाईटमध्ये जाऊन बसले .

वेदीकाची पहिलीच वेळ होती विमानात बसायची . याआधी फक्त वर आकाशात जातांना विमान बघितलेलं , पण आज ती स्वतः त्यात बसली होती . त्यामुळे तिला खूप भारी फिलिंग येत होती . ती सुधाकरचा हात घट्ट पकडून बसलेली टेक ऑफच्या वेळी आणि उतरतांना तर डोळे एकदम गच्च मिटून घेतले होते . तिला बघून सुधाकरला खुप हसू येत होतं .

बोलता बोलता पोहोचलं वर्हाड केरळमध्ये , तिथे तर प्रियाच्या पप्पांनी गाडी आणली होती त्यांना घेऊन जायला . तिथे बाहेर एयरपोर्ट वरतीच त्यांनी एकमेकांना गळाभेट दिली . सगळे तिथून डायरेक्ट हॉलवरच जाणार होते . तिथे सगळी चांगली सोय करून ठेवली होती आधीच .

इतकं मोठ्ठ हॉटेल बघून वेदिकाला खूप आवडले ते , सगळं कसं एकदम व्यवस्थित सजवलेलं होत . एकीकडे हळदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या फुलांनी सजवलेला स्टेज उभारला होता तर संगीत कार्यक्रमासाठी रंगीबेरंगी फुलं आणि लायटिंग केली होती . बाजूलाच अजून एक मोठ्ठा हॉल होता जिथे सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती , सगळं कसं अगदी व्यवस्थित तयारी केली होती .
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//