प्रवास एकटीचा भाग - 30

प्रेम आंधळं असत पण ते निभावणं आपल्या हातात असत
विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 30


           लग्नाला आता तीनच दिवस बाकी होते . किरणची बॅग तर भरून झाली होती , पण वेदीकाची मात्र राहिली होती . तिच्या आधी आईंची पण बॅग भरायची जबाबदारी सुद्धा तिनेच घेतली होती . पहिल्यांदा नवरदेवाची बॅग भरून ठेवली व्यवस्थित म्हणजे काही राहायला नको आणि नंतर मग तिची आणि आईची बॅग भरायला घेतली .

    रात्रीचे अकरा वाजले होते , तरी सुद्धा वेदिका बॅगच भरत होती . बिचारी एकटी किती काय काय बघत होती आणि मदतीला कोणीच नव्हते . आईंना सांगितले असते पण त्याही खूप दमलेल्या होत्या . जास्त दगदग होत नाही आता त्यांच्याकडून पण , म्हणून वेदिका जितकं होईल तितकं सगळं करण्याचा प्रयत्न करायची .

              सगळे दमून झोपून गेले , पण वेदिका तिच्या बेडरूममध्ये बॅग भरण्यात इतकी गुंग होती की तिचा फोन वाजला आणि एकदम दचकून उठली ती . सुधाकरचा फोन होता तो , त्याला माहितीच होत त्याची वेदू इतक्या लवकर झोपणार नाही .

वेदिका - काय हो , इतक्या रात्री फोन करतात का ?

सुधाकर -  मग कधी करायचा फोन ? दिवसभर तर तू कामात असते , मग निदान रात्री वेळ मिळेल मला तुझा म्हणून मग आत्ता फोन केला .

वेदिका - किती दचकले मी जोरात , घाबरायला झालं मला त्या फोनच्या आवाजाने .

सुधाकर - आता मला काय माहिती माझ्या फोनने तुला घाबरायला होत ते .

वेदिका - तस नाही हो , मी थोडी बिझी होते बॅग भरण्यात आणि तेव्हढ्यात अचानक फोन वाजला , म्हणून दचकले .

सुधाकर - मला वाटलं माझ्या फोनने घाबरलीस की काय .

वेदिका - मी कशाला घाबरू तुम्हाला , तुमचं आपलं काहीतरीच .

सुधाकर - बरं मला सांग , सगळी तयारी झालीये का तिकडची . काय काय बाकी राहिलंय आता .

वेदिका - आम्ही बहुतेक सगळीच तयारी केलेली आहे . काही राहील असेल तर ते उद्या बघते .

सुधाकर - बरं झालं , तू आणि आई मिळून दोघींनी सगळं करून घेतलं . मला तर अजिबातच वेळ नाहीये .

वेदिका - हो , आम्ही तर तुमच्यासाठी पण कपडे खरेदी करून घेतले .

सुधाकर - अरे वाह , हे एक महत्वाच काम झालं म्हणजे सगळं काही झालं .

वेदिका - हम्मम्म , भाऊजी आणि तुमचे सारखेच ड्रेस घेतलेत फक्त रंग थोडा वेगळा आहे .

सुधाकर - ओके बॉस , अजून काही .

वेदिका - अजून काही नाही , बस लवकर या तुम्ही . आई तात्या आणि भाऊजी खूप वाट बघताय तुमची .

सुधाकर - आणि तू .....

वेदिका - हे काय विचारणं झालं का , या लवकर .

सुधाकर - येतोय राणी मी लवकरच , बस फक्त थोडा धीर धर . सकाळी लवकरच भेटू आपण .

रात्री बऱ्याच उशिराने वेदिकाला झोप लागली . घरात इतकं काम पडलं असल्याने तिला बाहेर कुठे जाताच आलं नाही आणि घरात कामं असली की ते कधी एकदाची पूर्ण करतेय अस व्हायचं तिला . जोपर्यंत व्यवस्थित सगळी कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत ती उठत नव्हती . काम झालं की कस मग निवांतपणे बसता येत , पण तिला निवांतपणा अजूनतरी मिळाला नव्हता .

आई आणि तात्या पण ती आहे सगळं व्यवस्थित करून घ्यायला म्हणून आरामात होते , कारण वेदिकाला बरीच माहिती होती . प्रत्येक रितीरिवाज , त्याची माहिती आणि कसे करतात , त्यामागचं कारण काय इथपासून सगळी माहिती होती . त्यामुळे आई खरंच थोड्या निवांत झाल्या होत्या .
आणि त्या म्हणायच्या ही , " सून असावी तर अशी " वेदू सारखी . तिला न सांगता पुढचं सगळं आवरून घ्यायची ती .

      सकाळी सहा वाजता सुधाकर घरी आला , तो आल्याबरोबर सगळेच उठून बसले . आईचा उत्साह तर इतका होता की ती सुधाकर आल्या बरोबर त्याला सगळं काही खरेदी केलेलं दाखवत बसली .

" आग निदान पोराला हात पाय धुवुन चहा तर घेऊ दे " तात्यांनी आल्या आल्या सांगितले . पण त्याचा काहीच असर झाला नव्हता , कारण आईचा उत्साहच इतका  होता की बस .

" हो , सुधाकर तू जा बर मस्त आवरून घे तुझं सगळं . मग आपण बाकीची तयारी करूया . वेळ कमी आहे आता आपल्याकडे , आजच सगळं बघायला पाहिजे .

" हो आई , तू काळजी करू नको . मी आलोय ना आता , मग आता माझ्यावर सोड सगळं ". सुधाकर अस बोलल्यामुळे आई खरंच निवांत झाली होती .

" हो रे बाळा , आता सगळं काही मी तुमच्या दोघांवर सोपवलं आहे . वेदिका आणि तू सगळं काही किती छान बघताय . वेदू सगळं कपडे खरेदीच तसेच घरातल ही बघते आणि तू बाहेरची सगळी कामं करतोस . तुम्ही दोघे आहात म्हणून तर आम्ही दोघे आरामात आहोत . खरंच वेदू खुप हुशार आहे . तिला कसलीच सांगायची गरज पडली नाही की हे कर ते कर म्हणून , मी सांगायच्या आत तीच सगळं झालेलं असायचं ".

      " आई , बास की . किती कौतुक करतेस आग तीच . उगाच हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू तिला तू ". सुधाकर मुद्दाम हसत हसत बोलत होता .

" तस नाही रे , ती आहेच गुणाची म्हणून तर कौतुक चाललंय तीच . आणि ती आल्यापासून हे घर सांभाळून घेते म्हणूनच हे घर सुरळीत चालू आहे ".

" अहो आई , मी कुठे काय इतकं करते . तुम्ही असतात माझ्या सोबत मदतीला म्हणून मी सगळं करू शकते . आपण दोघी मिळून सगळं काही करू शकतो ".

" हो ग माझी बाई ती ", आईंनी लगेच वेदू वरून बोट ओवाळून कडाकडा मोडली .

" बरं मग आता मला एक मस्त चहा देतेस का कडक एकदम , थोडं डोकं दुखतंय माझं ". सुधाकर रात्रभर प्रवासात खूप दमलेला होता .

" तू झोप जा जरावेळ , आल्या आल्या तुझ्याशी बोलत बसले मी . माझी देवपूजा व्हायची आहे अजून ".

" थोडावेळ पडतो मी , मग बरं वाटेलं मला . झोप तर काही येणार नाही पण तरीही आराम करतो थोडावेळ .

     बेडरूममध्ये गेल्यावर वेदीका सुधाकर जवळ बसून त्याच डोकं दाबू लागली .

" राहू दे वेदू , अस म्हणून त्याने तिला जवळ घेतले . ती सुद्धा त्याच्या कुशीत शिरून थोडा वेळ तिथेच झोपली . बऱ्याच दिवसांनी दोघे भेटले होते ".


    इतक्यात किरण आला दरवाजा वाजवत . वहिनी , सुधाकर उठलाय का " बाहेरूनच आवाज देऊन विचारू लागला . तेव्हढ्यात आईने त्याला सांगितले , त्याच डोकं जरा दुखतंय म्हणून आराम करतोय . तू ये जरा इकडे आपण बाहेर बसू बोलत , करू दे आराम थोडा वेळ दोघांना सुद्धा .

वेदिकाला मात्र आता चांगली पक्की झोप लागली होती . बाहेर कोणीच नाही आले म्हणून किरण पुन्हा निघून गेला .

किरणचा आणि आईचा बोलण्याचा आवाज ऐकुन सुधाकर उठून बाहेर आला , त्याच्याशी बोलू लागला .

" बोला नवरदेव , झाली का तयारी घोड्यावर बसण्याची  ".



सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all