Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 27

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 27


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 27      आई आणि वेदीकाची मनपसंत खरेदी झाली होती . कपड्यांची झाली आणि तसेच त्यादोघी बाजारातल्या कासारा कडून हातभार बांगड्या सुद्धा भरून आल्या होत्या , लग्नाच्या हिरव्यागार . 

       चला तर , एक बरं झालं ह्या बायकांची खरेदी झाली होती एकदाची , खरं तर त्यांनाच जास्त वेळ लागतो साडी खरेदीला त्यामुळे तात्या काही गेले नव्हते त्यांच्यासोबत . ते भले आणि त्यांचं रान भल , असा त्यांचा स्वभाव . म्हणून सासू सुना दोघीच गेल्या होत्या . आणि तसही त्यादोघी सोबत असल्या की वेगळं कुणाची गरज लागत नाही त्यांना .


      दोघीं सासू सुनाने किरणच्या लग्नासाठी मुंडावळ्या घेतल्या , मस्त बारीक मोत्याच्या त्यात मधे मधे खडे पण होते . सुंदर दिसत होत्या अगदी , त्याच घेतल्या वेदीकाने तर . अजून नवरदेव नवरीच्या टिकल्या , हातातले काकन , तसेच अजून बरंच काही सामान खरेदी केल . त्यालाच कुंकुवाचा बाजार म्हणतात , दोघींनी एकमेकींना हसत हसत गालाला कुंकू लावून घेतलं .

          दुपारचं उन्हात इतकं फिरून फिरून दमायला झालं होतं त्यांना . तिथे बरेचसे खाण्याचे गाडे होते बाजारात , गरमागरम वडापावची गाडी होती . एक बाई मस्त वडापाव तळतांना दिसली , वेदिका तिथेच उभी राहिली . आईंना समजले हिला भूक लागलीये ते . पण वेदिका कुठे बोलतेय पटकन हे . म्हणून आईच बोलल्या ,

" वेदू , भूक लागलीये ग मला . काहीतरी खाऊया का आपण ?"

" हो आई , हे काय समोरच गरमागरम वडापाव तयार होताय . आपण दोघी खाऊया का वडापाव , मला तर खूप आवडतो वडापाव ". असे म्हणून वेदीकाने इतकुस तोंड केलं .

" आग मग घे की लवकर , मस्त खाऊया दोघी मिळून वडापाव ".
दोन वडापाव प्रेमी भेटले की अजून कसलीही गरज लागत नाही , हे मात्र अगदी खरे आहे .
मग काय , दोघींनी दोन दोन वडापाव खाल्ले तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं . बाजूलाच ऊसाच गुर्हाळ पण होत , तिथून दोन फुल ग्लास ऊसाचा रस घेतला आणि जीवाला गार गार वाटलं . आणि मग तेव्हा त्या खरेदी केलेला बाजार घेऊन घरी जायला निघाल्या .

       दोन्ही हातात सामानाच्या बऱ्याच पिशव्या होत्या , त्यामुळे तात्यांनी दारात येऊन आईंच्या हातातल्या पिशव्या घेतल्या आणि त्यांना बसवून पंखा जोरात सुरू केला .घामाघूम झाल्या होत्या दोघी . पण मज्जा आली होती त्यांना अस बाजार करत फिरायला .

       तिकडे प्रियाच्या घरी पण जोरात तयारी चालू होती .
तिच्या पप्पांनी एक मोठा एसी हॉल बुक केला होता . तिच्या आवडीच डेकोरेशन निवडल होत त्यांनी लग्नाच्या हॉलमध्ये . दोघांचे प्रिवेडिंग शूटिंग करायला वेळच नव्हता , त्यामुळे त्यांचे आधीचे जितके फोटो होते तेच थोडे मोठे करून हॉलमध्ये लावणार होते . कारण लग्नाची तारीखच इतक्या लवकर धरली होती त्यांनी . त्यामुळे कोणाला सांगायला ही जमलं नव्हतं आणि घरी जाऊन पत्रिका ही देता येणार नव्हती . त्यामुळे फोनवरुनच मित्रांना , नातेवाईकांना मेसेज करून सांगितले होते .

      मोजक्याच लोकांना बोलावणार होते ते सुद्धा , पण तरीही दोनशे माणसं तरी येणारच होती . त्यांचे ऑफिसमधले मित्र , आजूबाजूचे लोकं आणि नातेवाईक वेगळे . कितीही कमी केले तरी दोनशेच्या वर होतच होते .

       आता घरात पहिलं लग्न म्हटलं की थोडक्यात काही होतच नाही . जरा जास्तच होत असत . त्यामुळे जितकं होईल तितकं करत राहायचं असत . प्रियाचे पप्पा तर अतिशय उत्साही माणूस होते .

प्रिया तिच्या पप्पांची एकुलती एक मुलगी त्यामुळे त्यांना तर काय करू काय नको करू अस झालं होतं . लाडात वाढलेली हुशार मुलगी , बापाच्या मनाला पिळ पडतो जेव्हा ती त्यांचं घर सोडून सासरी जायला निघते . तिचे पप्पा तर लग्नासाठी हॉल बघत असतांनाच त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं तेव्हा तिच्या मम्मीने त्यांना सावरले .

मुलगी आई वडिलांकडे लहानाची मोठी होऊन जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा काय दुःख होते ते एखाद्या मुलीच्या बापालाच माहीत . शब्दात सांगणे कठीण आहे ते .


         प्रिया पोहोचली होती तिच्या घरी कालच . त्यामुळे आज त्यांची खरेदी होणार होती . तिला आवडेल त्या साड्या , ड्रेस , घागरा सगळं तिच्या समोर मांडल होत तिच्या मम्मीने .

     खरं तर प्रियाला जीन्स आणि टीशर्ट आवडतो , कारण ती त्यामध्ये आरामात असते . पण हे भरगच्च ड्रेस आणि वजनदार साड्या बघून तिला कसकसच होत होतं . पण लग्न म्हटले की हे सगळं आलंच , त्यामुळे आईला जे आवडेल तेच ती बाजूला काढून ठेवत होती . तिच्या हो ला हो करत सगळी खरेदी झाली .

        आता तर सगळ्यात मोठी खरेदी करायला गेले होते ते , ती म्हणजे दागिन्यांची खरेदी . केरळी म्हटले की डोक्यापासून खालपर्यंत पूर्ण सोन्याने मढलेले असतात . प्रियाच्या मम्मीने दागिने आधीच तयार करायला टाकले होते तर काही लगेच बघून पसंत केले होते .

गळ्यातले एका खाली एक असे चार सेट , हातात आठ बांगड्यांचा सेट , डोक्यावरची बिंदी , मोठे मोठे कानातले त्याला वेल , बोटांत चार अंगठ्या , कंबरपट्टा , पायतल्या साखळ्या आणि असे अजून बरेचसे दागिने त्यांनी आधीच तयार करून ठेवले होते .

" मम्मी बस ना अभि , चलो घर चलते हैं . सारी शॉपिंग हमे आजही करनी हैं क्या ?"

" और नहीं तो क्या , घर पे दुसरा कामं भी बोहोत हैं . अब ये बाहर की खरीदारी हो जाए बस फिर कोई चिंता नहीं ".  

प्रिया थकल्या सारखी वाटत होती . दिवसभर आज ते बाहेरच होते . पण बरच घेऊन झालं होतं . जवळपास तिची सगळी शॉपिंग आता आटोपली होती .

  तिने जितकी पण खरेदी केली होती , त्यासगळ्याचे फोटो काढून तिने किरणला पाठवले होते . कारण ते दोघे एकमेकांना मॅचिंग कपडे घेणार होते म्हणजे दोघांची जोडी आणखी शोभून दिसेल . 

            प्रियाच्या साड्या ड्रेस घागरा घेऊन झाला होता . आता त्यावर मॅचिंग असे डायमंडचे सँडल पण हवेत ना , मग त्या फुटवेअर शोरूममध्ये गेले . पण प्रिया लग्नाचे सोडून उंच टाचेचे सँडल बघत बसली . कारण तिला सँडल घ्यायला खूप आवडायचे . तिच्या मम्मीने तिला ओरडले तेव्हा कुठे तिने लग्नासाठी एक डायमंडची सँडल निवडली .


      साड्या घेतल्या तिथेच ओळखीचा टेलर सुद्धा होता . लगेच मापं देऊन शिवायला कपडे टाकले .लग्नाच्या चार दिवस आधी मिळतील असे सांगितले . बहुतेक आता प्रियाची खरेदी पण सगळी झालीच होती . साड्या , दागिने , चप्पल आणि अजून काही छोटं मोठं सामान .

मम्मी आणि पप्पांची खरेदी पण एकाच दुकानातून केली होती . बस आता तिचे दोन लहान भाऊ बाकी होते , ते दोघे पण त्यांच्या मित्रांसोबत जाणार होते खरेदीला . म्हणजे आता कपड्यांची खरेदी तर सगळ्यांची झालेलीच होती .

           तिकडे दिल्लीत किरण एकटाच होता , म्हणून त्याला फोन करून सांगितले प्रियाने की फोटो पाठवले आहेत तुला तेव्हढे बघून घे आणि अगदी त्याला मॅच होईल असाच ड्रेस घे स्वतःला .

      तो बिचारा फोटो मधूनच तिला बघत होता . त्यालाही आता घराची ओढ लागली होती . कारण आई रोज फोन करून सांगायची आज हे केलं आज ते केलं . कधी एकदाच घरी जातोय अस झालं होतं त्याला तर . बस आता फक्त चार पाच दिवसांतच येत्या शनिवारी तो ही निघणार होता घरी जायला .

सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//