प्रवास एकटीचा भाग - 23

प्रेम आंधळं असतं पण ते नात निभावणं आपल्या हातात असतं


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 23


       आज ऑफिसमध्ये किरण प्रिया दोघेही सोबतच आले होते . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भलंमोठं हसू त्यांच्या आनंदाची सीमा सांगत होते . लग्नाची तारीख ठरली तेव्हापासून दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती .

" क्या हुआ प्रिया , क्या बात हैं आज इतनी खुश दिखाई दे रही हो ". ऑफिसमधली सहकारी मोनाने विचारले .

" हमारी शादी की तारीख पक्की की हैं घरवालो ने , इसलीये हम दोनो बोहोत ही खुश हैं ".

" अरे वाह , काँग्रेच्युलेशन "
असे म्हणत सगळे तिथं गोळा झाले . आणि सगळ्यांनी त्या दोघांचं हसून अभिनंदन केले .

" अभी तो एक पार्टी होनी चाहीए किरण , और वो भी आज ही ". त्यांचे सगळे मित्र म्हणायला लागले . आणि
पार्टी ...... पार्टी ....
पार्टी ..... पार्टी ....
असे म्हणून आनंदाने सगळेच ओरडत होते .

" अरे हा बाबा , आज कॉफी ब्रेक के साथ साथ हम पिझ्झा पार्टी करते हैं ".

हे ऐकल्यावर तर आनंदाच्या भरात सगळेच उड्या मारायला लागले .

सगळेजण संध्याकाळ कधी होईल याची वाट बघत होते . अखेर संध्याकाळ झाली आणि पिझ्झा पण मागवला किरणने सगळ्यांसाठी . मिटक्या मारत पिझ्झा संपवला आणि सगळे आपापल्या कामाला पुन्हा सुरू झाले .

पार्टी करून झाल्यावर सगळे निघायला लागले . कारण ऑफिस सुटलेच होते . प्रिया आणि किरण मात्र अजूनही त्यांच्याच धुंदीत होते .

" आज मैं उपर , आसमा नीचे " .
ह्या गाण्याप्रमाणे सेम अशीच अवस्था होती प्रियाची सध्या . त्या दोघांना आता आकाश एक बोट उरले होते फक्त .

ऑफिस मध्येच बराच उशीर झाला तरी दोघेही गप्पा मारत बसले होते त्यांच्या पुढील आयुष्याचा विचार करत .

" चलो प्रिया , तुम्हे घर नहीं जाना हैं क्या ? "

" आज मन नहीं कर रहा , बस ऐसेही तुम्हारे साथ रहू ".

" ऐसें ऑफिस मैं ??"

" किरी , हर वक्त मजाक नहीं हा ".

" हा तो मैं कहां मना कर रहा हूं , वैसे भी दिनभर तो हम साथ ही तो रेहेते हैं ना प्रिया ".

" हम्मम्म , और अब जिंदगीभर साथ ही रहेंगे ".

" हा बाबा , हमेशा के लिये ", किरण तिचा हात हातात घेत म्हटला .

" अब चलो भी , घर नहीं जाना हैं क्या तुम्हे . हम ऐसें ही और कितनी देर बैठे रहेंगे यहा ऑफिस में ".

" हा , चलो कही बाहर चलते हैं ".

" अब कहां जाना हैं ?"

" ऐसें ही कही पे भी , तुम जहा चाहो वहा ".

"कही पे ही क्यू , हमे घर के लिये कुछ सामान भी तो लेना बाकी हैं ना . तो फिर चलो जलदीसे ".

" अरे हा , मैं तो लिस्ट बना के लायी हूं . हमे क्या क्या लेना होगा और कहां से लेना होगा , ये सब पता हैं मुझे ".

" अरे वाह , तो फिर ठीक हैं . हम कल चलते हैं खरीदारी करने के लिए ".

" अभी चलो ना किरी , अभी भी बोहोत टाईम हैं हमारे पास ".

" नहीं प्रिया , कल छुट्टी हैं . हमे आरामसे वक्त मिलेगा और सब देखके लेना होगा ना ".

" फिर अभी क्या करे हम ?"

" अभी ..... अभी , क्या करे हम ??? "

किरण मुद्दाम तिच्या जवळ जात बोलत होता तशी प्रिया मागे मागे सरकत होती .

" किरी , क्या कर रहे हो ? ऑफिस हैं ये ".

" हा , पर अब कोई भी नहीं हैं यहा . बस मैं और तुम ".

" छोडो ना किरी , चलो कही घुमने चलते हैं ".

" क्या यार प्रिया , तुम हमेशा घुमने फिरने के मूड मे रेहेती हो ".

" अरे यहा पास मे ही एक छोटीसी मार्केट लगती हैं , वहा पे सारा घरका सामान मिल जाएगा हमे ".

" अच्छा ठीक हैं चलो , जो जरुरी हो बस वही लेना ".

" हा बाबा , और कुछ ".

" कुछ नहीं , चलो ".

  
      दोघेही मार्केट मध्ये घरासाठी लागण्याऱ्या छोट्या मोठ्या वस्तू घेतात . जसे की पडदे आणि त्याचे हँगर , लाईट्स , मॅट , बेडशीट्स वैगरे .
एकमेकांच्या आवडीने भरपूर खरेदी करतात आणि मग मस्त भरपेट बटर आणि चीझ वाली पावभाजी खातात . प्रियाला पावभाजी खूप म्हणजे खूप आवडते . ते सुद्धा भरपूर चीझ आणि बटर वाली . पोटभर खाल्ल्यामूळे आता सुस्ती आली होती दोघांना आणि दमले ही होते ते त्यामुळे कधी घरी जाऊन झोपतील अस झालं होतं . किरण आधी प्रियाला तिच्या रूमवर सोडतो आणि मग तो त्यांच्या फ्लॅटवर जातो .

          लग्न ठरल्या पासून दोघे अगदी जबाबदारीने वागत होते . आत्तापासूनच ते नवरा बायको असल्यासारखे वावरत होते . घरात काय लागत काय नाही , हे सगळं प्रिया बघत होती आणि किरण जे लागत तेच घ्यायचं कारण त्यांचा नवीन नवीन संसार सुरू होणार होता , त्यामुळे बजेट बघायला हवं म्हणून थोडा लक्ष देत होता .

पण दोघांना यात खूप आनंद वाटायचा . कधी कधी थोडीफार नोकझोन व्हायची त्यांची , पण किरण कायमच समजून घ्यायचा तिला .

बायका असतातच हट्टी म्हणा , त्यांच्यापुढे नवऱ्याच काही जास्त चालत नाही . आणि प्रिया तर मुळात होतीच हट्टी , तिचा स्वभाव चांगलाच माहिती होता किरणला त्यामुळे तो तिला जास्त काही न बोलता तिच्यापुढे स्वतःची हार मानायचा .
    
        पण प्रियाला ह्यासगळ्यात खूप भारी वाटायचं , ती म्हणजे एकदम डॅशिंग असल्यासारखी वागायची . तिला सगळं कळतं आणि सगळं येत असाच तिचा रुबाब असायचा कायम . कधी कधी किरण वैतागायचा तिला पण प्रेम खूप होत दोघांचं एकमेकांवर त्यामुळे तो बाकीच सगळं दुर्लक्ष करायचा . तिचा स्वभाव कसाही असला तरी तिला जस आहे तस स्वीकार केले होते किरणने , अगदी मनापासून .

      
            किरण प्रियाच्या नवीन घरासाठी आता बऱ्यापैकी सगळं काही घेऊन झालं होतं . बस सामान लावायचं बाकी होत . सोफासेट घेतला होता , डायनिंग टेबल , बेड , टिव्ही , फ्रीज , वोशिंग मशीन , मिक्सर , गिझर आणि अस बरंच काही गरजेच्या वस्तू घरात फक्त नेऊन ठेवल्या होत्या .
हळूहळू सगळं नीट व्यवस्थित लावून होईल , दोघेही त्यांच्या घरासाठी रात्र दिवस एक करत होते . त्यांच्या स्वप्नातल्या घरासाठी . आता लवकरच प्रिया किरणची बायको म्हणून येणार होती त्या घरात आणि सगळं तीच सांभाळून घेणार होती म्हणून दोघेही निवांत होते .



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा
      

🎭 Series Post

View all