प्रवास एकटीचा भाग - 22

प्रेम आंधळं असतं पण ते शेवटपर्यंत निभावणं आपल्यावर असत


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 22


        किरण प्रिया रात्री बऱ्याच उशिराने पोहोचले , कारण दिल्ली ते केरळ बरंच अंतर आहे .


आई तात्या दोघे केरळ मध्ये होते म्हणून सुधाकर आणि वेदिकाला भरपूर चांगला वेळ मिळाला होता एकमेकांसोबत घालवायला .

           दोघेही मनसोक्त खूप फिरले . चित्रपट बघायला गेले होते ,  मार्केट मध्ये फिरले . जवळपास असणारी सगळी ठिकाण बघून झाली होती त्यांची . सकाळी एकदा बाहेर पडले की संध्याकाळीच घरी येत होते ते , कारण घरात दोघेच होते त्यामुळे त्यांना आई आणि तात्यांशिवाय करमत नव्हते .

     आई आणि तात्या पण पोहोचले गावी , सुधाकर त्यांना न्यायला आला होता . रात्री खूप उशिराने पोहोचले ते घरी . प्रियाच्या आईला फोन करून कळवले पोहोचलो म्हणून . घरी आल्यानंतर थोडाच वेळ झोपले ते , कारण तसेही आता पहाट होत आली होती . इतक्या लांबच्या प्रवासाची सवय नाही म्हणून थकवा जाणवत होता त्यांना .

तरीही आई उठून आवरु लागली .
" आई , अहो काय करताय तुम्ही ??"

" झोपा की थोडा वेळ अजून , सात तर वाजलेत आत्ता कुठे . तुम्ही अजून तासभर झोपल्या तरी काही हरकत नाही . मी आवरते सगळं घरातलं , तुम्ही आराम करा . जा बरं आता पडा जरा वेळ ".

वेदिका दम देऊन सांगून होती , पण आईला तीच हे हक्काने बोलणं खूप आवडायचं .
पोटची लेक नाही पण वेदीकाने ती कमी सुद्धा भरून काढली होती अगदी थोड्याच दिवसांत . दोघी एकमेकांची काळजी घ्यायची , अगदी प्रेमाने सारं काही करायच्या .


" वेदू , आठ वाजलेत ग . आता तरी उठू दे मला " . आईने हसत हसत तिला विचारले .

" हो आई , आता कशा फ्रेश दिसताय बरं तुम्ही . थांबा मी चहा घेऊन येते तुमच्या दोघांसाठी ".

वेदिका चहा आणि मऊसूत उपमा करून घेऊन आली .

गरमागरम आलं घालून केलेला कडक चहा पिताच तरतरी आली .
" वाह , आता कसं बरं वाटतंय बघ . तुझ्या हातचा चहा पिल्याशिवाय सकाळ होत नाही आमची ".
तात्या चहाचा रिकामा कप देत म्हणाले .

           आईने वेदिकाला जवळ बोलवून घेतले आणि बॅग मधून एक एक सामान काढत तिच्याशी बोलत होत्या . प्रियाने तिच्यासाठी पाठवलेल सगळं सामान वेदूला दिलं . तिलाही ते सगळं बघून खूप आवडल , वेदिका आणि प्रिया आता फोनवर बोलत होत्या एकमेकींसोबत . दोघींमध्ये आता चांगलीच मैत्री झाली होती .


दुपारी वेदिकाला घेऊन आई गुरुजींकडे गेल्या . प्रियाच्या मम्मीने त्यांनी सांगितलेले मुहूर्त बघायला पाहिजे होते आता इथल्या गावातल्या गुरुजींकडे . म्हणून ह्या दोघी सासू सुना दुपारीच सगळं आवरून गेल्या होत्या .

इतका मोठा प्रवास करून आल्या तरी आराम करायचं सोडून , पटकन आवरून दोघीही गेल्या होत्या . मुलाचं लग्न म्हटलं की उत्साह खूप होता वसुधा ताईंमध्ये . त्या आता दुसर्यांदा सासू होणार होत्या .

मुहूर्त तर सगळेच चांगले होते . पण त्यातला सगळ्यात उत्तम मुहूर्त कोणता म्हणून विचारले तर गुरुजींनी अगदी तीन आठवड्या नंतरचा मुहूर्त सांगितला .

" बापरे आई , इतक्या लवकर कस काय होणार इतकं सगळं ???" वेदिका तिथेच पटकन बोलून गेली .

" आग होईल ग सगळं बरोबर , आपण दोघी आहोत ना आता सगळं बघायला ". आईंनी तिला समजावत सर्व सांगितले .

घरी येऊन तात्यांना आणि सुधाकरला सांगितले की मुहूर्त जवळचा निघाला आहे , काय करायचे म्हणून .

    त्या दोघांनी सुद्धा ठीक आहे म्हणत संमती दिली . किरणला फोन करून सांगायला हवं म्हणून आईंनी फोन हातात घेतला .
पण वेदीकाने त्यांना थांबवले ,

" थांबा आई , आता मीच फोन करते " , असे सांगितले .

वेदिका - हॅलो किरण भाऊजी , कसे आहात तुम्ही ?

किरण - मी मजेत आहे वहिनी , बोला ना काही काम होत का ? आई आणि तात्या बरे आहेत ना .

वेदिका - हो दोघेही छान आहेत . ते आम्ही दोघी तुमच्या लग्नाचे मुहूर्त बघायला गेलो होतो .

किरण - अरे , काय म्हणाले गुरुजी ? कधीचा निघाला आहे मुहूर्त ?? किरण हे ऐकूनच खूप खुश होत बोलला .

वेदिका - अरे अरे , थांबा जरा श्वास तर घ्या .

किरण - सांगा ना वहिनी , कधीची तारीख निघाली आहे ते .

वेदिका - खूप लांबची तारीख निघाली आहे , दिवाळी नंतरची .
वेदिका मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी असे बोलत होती .   आईने तिच्याकडे बघून तिला हलकेच फटका मारला , " काग माझ्या पोराला चिडवतेय इतकं ".

किरण - वहिनी , जरा आईला देता का फोन प्लिज .

वेदिका - हो हो , देते थांब .
आईकडे फोन धरत वेदीकाने त्यांना बोलायला दिले .

किरण - हा , आई काय झाले ग . काय म्हणाले गुरुजी .

आई - अरे अगदी जवळची तारीख काढली बघ त्यांनी . इतकं सगळं होईल का आपल्याकडून इतक्या कमी वेळात .

किरण - आग पण तारीख काय काढली त्यांनी ते तरी सांग ना आधी .
किरण अगदी काकुळतीला येऊन विचारत होता .

आई - बरोबर तीन आठवड्या नंतरची काढली बघ तारीख .

किरण - कमालीचा खुश होत जोरात बोलला , " काय ? आई काय सांगतेस काय तू ".

आई - हो रे बाळा , तुला चालेल ना ही तारीख . की दुसरी काढून आणू पुन्हा .

किरण - नाही नाही आई , हीच ठीक आहे .

आई - बरं , मग कधी येतोय तयारीसाठी .

किरण - हो सांगतो आई , मी तुला नंतर फोन करतो पुन्हा . 

असे म्हणून किरणने फोन ठेवला आणि खुश होत प्रियाकडे गेला . ती तिच्या रूमवर झोपलेली होती . तिला फोन करून बाहेर बोलवून घेतले .

इतक्या उशिरा रात्री किरण इथे आलाय , म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल . असा विचार करत प्रिया डोळे चोळत चोळत बाहेर आली .

" क्या हुआ किरी ?? "
" कुछ बुरा सपना देखा क्या तुमने ? ".

" अरे पगली , कुछ भी बोलती रेहेती हो ".

" मैं जो बताने आया हूं , वो सूनके तो मेरी तऱ्हा तुम्हारी भी निंद उड जाएगी ".

" बोलो ना किरी फिर जलदीसे , मुझे बोहोत निंद आ रही हैं अभी ".

" प्रिया , हमारी शादी का महुरत निकल गया हैं , आजसे ठीक तीन हफ्ते बाद ".

" अरे वाह , सच मे ना किरी . मैं निंद मे तो नहीं हूं ना ".

किरणने तिला एक जोरात चिमटा काढला , तेव्हा ती जोरात ओरडली .
ओरडलीच नाही तर झोपेतून खाडकन जागी सुद्धा झाली .

" किरी , मुझे यकीन नहीं हो रहा  . क्या सचमे मैं ये सब सून रही हूं ".

तिला तर अजूनही विश्वास बसत नव्हता , पण किरण तिला हे सांगायला रात्री इतका उशिर होऊनही आलाय म्हणजे खरंच असणार .

" प्रिया , अब हमे बोहोत सारी तैयारी करनी हैं ".

" हा किरी , मुझे तो अभिसे दिखने लगा हैं हमारे शादी का मंडप ".

" निंद मे से जागो प्रिया , मे सचमुच का तुम्हारे सामने खडा हूं यहा पे और शादी की शेरवानी मे नहीं टीशर्ट और हाफ पॅन्ट मे ".

असे म्हणून दोघेही खळखळून हसू लागले .

" हा किरी , अस म्हणून तिने त्याला मिठी मारली ".

दोघेही आज खूप खुश होते , ज्या दिवसाची ते इतकी वाट बघत होते तो दिवस अजून तीन आठवड्याने येणार होता .

प्रिया तर तिच्या गोड स्वप्नामध्ये हरवून गेली होती . एका मुलीच्या आयुष्यात तिच्या लग्नाबद्दल खुप सारी स्वप्ने असतात . आणि फक्त तिचीच नाही तर तिच्या मम्मी पप्पांचे सुद्धा . पूर्ण आयुष्याची कमाई बाप आपल्या लेकीच्या लग्नाच्या वेळी खर्च करत असतो , अगदी कसलीही कुरबुर न करता .सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all