Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 21

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 21


विषय - प्रेमकथाप्रवास एकटीचा भाग - 21

   
  प्रियाने दुपारच्या जेवणाची अगदी मस्त तयारी केली होती . मेन्यू ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल अशी . शाही पनीर , मटार पुलाव , तडके वाली दाल , मसाला भिंडी और घी वाले छोटे छोटे फुलके . इतकं सगळं दुपारच्या जेवणात बनवल होत . 

एव्हढं सगळं वाढलेलं ताट बघूनच पोट भरल्या सारखं वाटतं होत . आईला तर पहिले कुठून सुरुवात करू हेच कळत नव्हते . खरंच सगळा स्वयंपाक अगदी छान झाला होता .

जेवणं उरकत आली होती , आणि तरी प्रिया पुन्हा काहीतरी घेऊन आली होती वाढायला . सगळ्यांना आग्रह करून करून अगदी आपुलकीने ती वाढत होती .

" अरे अब बस करो बेटा , पेट भर गया मेरा ".

" मिठा तो आपने लिया ही नहीं , असे म्हणत प्रियाने अगदी प्रेमाने सगळ्यांना खीर वाढली ".

पण तात्यांना अगदी एक चमचाच खीर वाढली , कारण तिला माहिती होते त्यांना शुगर आहे . हे बघून आईला फार बरे वाटले . पोरगी आत्तापासूनच सगळं व्यवस्थित बघते , सांगायची गरज लागत नाही तिला .

       आज दुपारी सुद्धा खूपच जेवण झालं होतं .  पण आज निघायचं आहे दुपारून म्हणून प्रियाने लवकर आवरून घेतलं होतं सगळंच . हुशार आहे पोरगी , असे त्या तात्यांना सांगत होत्या .

" आई , थोडा वेळ आराम कर . मग आपल्याला लवकरच निघायचं आहे ".

" किरण , तुम्ही पण आमच्या सोबतच निघणार आहात काय रे ".

" हो आई , तुमची फ्लाईट चार वाजताची आहे आणि आमची पाच वाजता आहे . त्यामुळे आपण सोबतच जाऊया ".

" हे बरं झालं , आम्हांला येतांना तर लवकर कळतंच नव्हते कुठून कुठे जायचे आहे ते . पण एक मुलगी बरोबर घेऊन गेली आम्हांला ".

" आई , आता आम्ही आहोत दोघेही सोबत , त्यामुळे काही काळजीच कारण नाही . आणि आई तिथे आतमध्ये गेल्यावर करतात सगळे मदत आपल्याला . तुम्हांला काही समजले नाही की विचारायचं तिथे कोणालाही ".

प्रियाने दार वाजवलं आणि नंतर ती आतमध्ये आली .

" आई , आप सोए तो नहीं ना ?"

" अरे नहीं बेटा , आओ ना ".

प्रिया सोबत तिची मम्मी सुद्धा आली . हातात बऱ्याच काही सामानाच्या पिशव्या घेऊन .

प्रियाच्या मम्मीने किरणच्या आईला एक सुंदर कांजीवरम साडी दिली . आणि तात्यांना एक ड्रेस पीस दिला , सोबत एक पांढरी लुंगी पण होती .

" आई , साडी खोलके देखो ना ".

" बोहोत सुंदर हैं , बिलकुल तुम्हारी तऱ्हा ".

प्रियाला खूप लाज येत होती . ती सारखी पायांकडे खाली बघत उभी होती .

" बोहोत कुछ कर रहे हो आप , इतना करने की सच मे जरूरत नहीं थी ". आई बोलली पण त्यांनी काही ऐकले नाही .

" जरूरत कैसे नहीं , आप पेहेली बार आए हो हमारे घर पे ".

" आप को अच्छा तो लगा ना ???"

प्रियाच्या आईने थोडं भीत भीतच विचारलं ...

" अरे बोहोत अच्छा लगा हमे ".

" अब आप भी आओ हमारे घर , प्रिया लेके आना सबको घर " . आई प्रियाकडे बघत बोलली .

" अब हमे शादीका महूरत भी जलदी ही निकलना पडेगा , क्यूकी अगले दो महिने के बाद कोई भी अच्छा महुरत नहीं हैं ."

" हा भाभीजी , हम घर जाते ही देख लेते हैं , कुछ होगा तो आपको बता देंगे ".

" हमने कुछ महुरत निकाले हुए हैं , इसमे से देख लिजीए आप ".

त्यांचे तर मुहूर्त पण बघून झाले होते . आता फक्त लग्न लावून द्यायचं तेव्हढं बाकी होत .

" अच्छा तो फिर हम घर जाके बातचीत करके फायनल कर लेते हैं सब . बडा बेटा और बहु घर पे हैं ना हमारी ".

" हम सब साथ मे बैठ कर फायनल कर लेते हैं , फिर आपको बताते हैं ".

" हा , उन्हे भी हमारा प्यार देना . और अगली बार लेते हुए आना उन दोनोंको भी ".

" जी हा जरूर , सब साथ मे आएंगे अब हम . बारात लेकर के ही . और शादी करके लेके जाएंगे तुमको हम अपने घर ". 

आई असे म्हणताच किरण आणि प्रिया एकमेकांकडे बघून हसायला लागले .

प्रियाच्या आईने वेदिकासाठी ही एक छानशी साडी दिली आणि सुधाकर साठी एक गिफ्ट , काही मिठाईचे बॉक्स होते . इतकं सगळं आता पुन्हा पॅक करावं लागणार होतं , पण प्रियाने त्यासाठी पण एक वेगळी बॅग दिली .
सगळं व्यवस्थित पॅक ही करून दिल होत तिने .

सगळं करता करता , आवरता आवरता , गप्पा मारण्यात भरपूर वेळ झाला . निघण्याची वेळ जवळ आली होती . दोन वाजतच आले होते .

सगळं सामान आता फायनली पॅक करून झालं होतं .
आणि आम्ही सगळे निघण्यासाठी तयार झालो .

" अच्छा चलो भाभीजी , फिर आते हैं . आप भी आना हमारे गावं ".

" हांजी जरूर आएंगे हम भी आपका घर देखने .
गावं पोहोचते ही फोन जरूर करना आप ".

" हा हा बिलकुल करूंगी ".

" अच्छा चलो आते हैं " ,अस म्हणत सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो .

गाडी विमानतळावर पोहोचली , सामान उतरवून आम्ही चौघे एयरपोर्टच्या आतमध्ये पोहोचलो .

बराच वेळ बाकी होता म्हणून आई आणि प्रिया दोघी फिरत होत्या . काही आवडीच दिसलं की थोडीफार खरेदी ही करत होत्या . अस करता करता तासभर होऊन गेला . आता मात्र भूक लागली होती , म्हणून मग आम्ही सँडविच घेऊन खाल्ले .

आई आणि तात्यांच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली , ते दोघेही जायला निघाले . त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा आमच्या फ्लाईटची वाट बघत तासभर बसून राहिलो .

थोडा वेळ इकडे तिकडे तिथेच फिरलो हातात हात घालून . भूक लागली प्रियाला म्हणून मग एक चीझ सँडविच आणि कोक घेतलं . किरणला जास्त भूक नव्हती त्याने त्याच्यासाठी फक्त चहा घेतला . थोडंस फ्रेश झाल्यावर मग ते पुन्हा त्यांच्या फ्लाईटची वाट बघू लागले . काही कारणास्तव त्यांची फ्लाईट एक तासभर उशिराने निघणार होती . त्यामुळे दोघांना आता खूप कंटाळा येत होता .

फिरून झालं होतं आणि खाऊनही झालं होतं . आता मात्र प्रियाला झोप यायला लागली होती . ती तिथेच किरणच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली थोडावेळ . फ्लाईटला आता अर्धा तास बाकी होता .

" प्रिया , उठो . जाओ फ्रेश होके आजाओ ".

" मुझे नहीं जाना ".

" अरे उठो प्रिया , अब हमे जाना होगा ".

" फ्लाईट का टाईम हो गया क्या ".

" हा अब बस आधा घंटा बाकी हैं ".

" और आधा घंटा , अभी तो बोहोत टाईम हैं किरी . सोने दो ना मुझे ".

" प्रिया , चलो चलो उठो ".

किरण प्रियाला जबरदस्तीने उठवून तिला फ्रेश व्हायला पाठवले . आणि तो ही फ्रेश होऊन आला . इतक्यात फ्लाईटची अनाउन्समेंट झाली आणि दोघेही घरी जायला निघाले .
सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

        

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//