प्रवास एकटीचा भाग - 20

प्रेम आंधळं असत पण ते शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असत


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग -20


       


         सकाळी सकाळी प्रियाच्या हातचा मस्त भरपूर नाश्ता केल्यावर आता भूक तर अजिबातच नव्हती .

" किरण , अरे सकाळी नाश्ता इतका झालाय की आता भूक नाही म्हणावं प्रियाला . दुपारी जास्त जेवणार नाही आम्ही दोघेही ".
आईने किरणला सांगितले , पण प्रियाच आली रूममध्ये .

" आई , कस वाटलं आमचं केरळ तुम्हांला ".

" खूपच छान ग , मला तर इथले फुलं आणि गजरेच खुप आवडले . कित्ती सुंदर वीण आहे इथली , फारच छान . बाकी आपण फिरायला गेलो ती ठिकाण ही मस्तच होती ."

" फिर भी आई , आपने अभि तक कुछ देखा ही नहीं हैं .  अगली बार आओगे तो थोडा ज्यादा दिन के लिये आना आप ."
" यहा पे बोहोत कुछ हैं देखने के लिये ".

" हा बेटा , जरूर हम सब आने का सोचेंगे अगली बार  ".

" किरण , उद्या कितीला निघायचं आहे रे आपल्याला . तिकिटं काढलेली आहेत ना आपली ?? "

" हो आई , आपली तिकिटं बुक केलेली आहेत मी आधीच ".
" उद्या आपल्याला घरातून दोन वाजता तरी निघावच लागेल ".

" बरं , तस सामान वैगरे काही आवरायचं नाहीये म्हणा मला . अगदी थोडंच तर आणलं होतं ".

" हो , तरी पण बघून घे निघतांना एकदा पुन्हा ".

" हो , बघते मी ".

" आई चलो थोडासा खाना खालो , थोडा थोडा ही बनाया हैं अभी . पापा भी रात का खाना ज्यादा नहीं खाते हैं ! "

" अरे बेटा , सच मे इतनी भूक नहीं हैं हमे ".

" अरे आई आपने तो दोपेहेर को भी खाना नहीं खाया था , सुबह बस इडली डोसा खाया था . उसपर ही पुरा दिन निकल गया ".

" अब बस थोडासा ही खालो , मम्मीने दाल खिचडी बनाई हैं ".

" अच्छा फिर ठीक हैं , आते हैं हम बाहर . सब साथ मे खाते हैं ".

" अहो , येताय ना जेवायला ?? "

      " दुपारी पण जेवलो नाही आपण , मग आता तरी चला जेवायला बाहेर . थोडंस खाऊन घ्या , पुन्हा गोळ्या पण घ्यायच्या आहेत तुम्हांला ".

" हो जाऊ या चला लवकर , पुन्हा झोपायला उशीर नको व्हायला ".
तात्या उठून तयार झाले आणि दोघे सोबत जेवायला बाहेर आले . दुपार पासून रूममध्ये बसून बसून ही कंटाळा आला होता त्यांना . पण प्रियाने खास हिंदी पेपर मागवला होता त्यांच्यासाठी . तो वाचत वाचत केव्हा झोप लागली कळालच नाही तात्यांना .

    " अरे आओ आओ कोष्टी साहब " , आप यहा बैठो मेरे साथ मे ".
प्रियाच्या पप्पांनी त्यांना जवळ बोलवून घेतलं जेवायला .

आई पण प्रियाच्या मम्मी जवळ जाऊन बसली . त्यादोघींची सुद्धा चांगली जोडी जमली होती .

प्रियाचे भाऊ , प्रिया आणि किरण हे तिघे ही सोबत बसले .

दाल खिचडी , अगदी साधीच होती ... पण चवदार झाली होती . भूक नाही म्हणता म्हणता दोनदा घेऊन खिचडी खाऊन झाली होती .

       खरंच छान झालेली दाल खिचडी . आणि कोणा दुसऱ्याच्या हातच जेवायला मिळालं की अजून छान लागते आणि दोन घास जास्त ही जात जेवण सगळ्यांबरोबर .

दुसऱ्या दिवशी आई आणि तात्या सकाळी सकाळी लवकरच उठून तयार झाले होते .

सकाळी लवकर उठल्या मुळे ते बाहेर थोडं बागेत फिरून आले . बाहेर खूप छान वातावरण झालं होत , फ्रेश वाटत होतं .
सुगंधी फुलांवर दवबिंदु जमा झाले होते , फुलपाखरं फुलांभोवती बागडत होती . सूर्य त्याचा केशरी रंग घेऊन नुकताच वर आला होता . त्याच कोवळं कोवळं ऊन घेत फिरायला छान वाटत होतं .

प्रियाने त्यांना बाहेर बघितल्यावर ती सुद्धा बाहेर अंगणात आली .
" आई , बाहर का मौसम अच्छा लग रहा हैं ना आज ".

" हा , एकदम फ्रेश लग रहा हैं ".
यहा पे अच्छा हैं तुम्हारे लिये पास मे ही गार्डन हैं टेहेलने के लिये ."

" हा , छोटे छोटे बच्चे भी आते हैं खेलने के लिये , अभी आएंगे थोडी देर मे ".
" आप चलो अभी घर , सब साथ मे चाय लेते हैं ".

फिरून घरात आल्यावर प्रियाने त्यांना मस्त कडक चहा करून आणला . बाहेर अंगणातच चार खुर्च्या मांडल्या आणि तिथेच बसून चहा घेतला कोवळ्या उन्हात .

तिकडे बंगलो सिस्टीम होती , त्यामुळे बंगल्या भोवती बरीचशी जागा मोकळी होती . आजूबाजूने छान फुलझाड लावलेली . झोपाळा पण लावलेला , आणि सोबतच छोट्या चार खुर्च्या टेबल पण होते . खर तर खूप वाटत होतं हे सगळं .

बराच वेळ उन्हात बसल्यामुळे आता चटके लागायला लागले होते . घरात गेल्यावर प्रियाच्या आईने नाश्ता दिला , आणि पुन्हा एकदा चहा झाला सगळ्यांचा .

   किचनमध्ये जाऊन आईने बघितले , तर तिकडे भरपूर काही तयारी करून ठेवली होती प्रियाने आणि तिच्या आईने मिळून .

" अरे इतना सब कुछ , मैं कुछ मदत करू ".

" अरे नहीं आई , हो गया बस अब ".

" कितना कुछ बनाया हैं आज भी आपने ".

" अरे आप खाके तो देखीए प्रिया के हाथ का बनाया हुआ पनीर , बोहोत अच्छा बनाती हैं वो ".

" अरे वाह , प्रिया तुम तो ऑल राउंडर हो . खाना बनाना आता हैं और ऑफिस भी जाती हो ".

" अरे आई ज्यादा कुछ नहीं , बस जो अच्छा लगता हैं , वो सीख लेती हूं ".

" ये भी तो अच्छी बात हैं बेटा ".

" हा , वो हमेशा कुछ ना कुछ नया बनाती रेहेती हैं ".

" हा आंटी , ये दीदी कुछ भी बनाती रेहेती हैं और हम दोनों पर ट्राय करती रेहेती हैं ", तिचे दोन्ही भाऊ बोलले तसे सगळे एकदम हसायला लागले .

" अरे अब तो मैं किरण को खिलाती हूं , और वो अच्छी अच्छी कमेंट भी देता हैं ".

" हा हा क्यू नहीं देंगे , बिचारे जीजू बुरा केह के भी फस जाएंगे इसलीये पेहेले ही अच्छा बना हैं बोल देते होंगे " क्यू जीजू .

" अरे नहीं , ठीक ठाक बना लेती हैं अब तो ". किरण अस बोलताच प्रियाने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं .

" क्या बोले तुम ???

" अरे कुछ नहीं , मैंने कहां अच्छा ही बनाती हो तुम तो ".

आता तर सगळेच मोठं मोठ्याने हसायला लागले होते , त्यादोघांना बघून . किती छान वाटत होतं असं सगळ्यांसोबत हसत खेळत जेवण करतांना .
आणि खरंच प्रियाने खूप छान स्वयंपाक केला होता . तीच कौतुक करत थकत नव्हती आई तर .



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all