प्रवास एकटीचा भाग - 19

प्रेम आंधळं असतं पण ते निभावणं आपल्यावर असत
विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 19


         सगळा कार्यक्रम छान पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी आई आणि तात्यांना जवळच फिरायला घेऊन आम्ही सगळे गेलो होतो . किरण प्रिया आणि दोघांचे आईवडील . तिथे सगळीकडेच खूप सुंदर फुलांचे गजरे मिळत होते . प्रियाच्या आईने दोन गजरे घेतले . एक त्यांनी स्वतःच्या केसांत माळला आणि एक किरणच्या आईला माळायला दिला .

पहिले एका मंदिरात गेलो , तिथेही खूप प्रसन्न वातावरण होते . मंदिराचे कोरीव काम खूप छान होते . तिथल्या प्रत्येक मंदिराची बांधणी एकदम कोरीव आणि सुबक होती . मनाला अगदीच शांत शांत वाटतं होते . तिथल वातावरण मनाला एकदम प्रसन्न करणारे होते . धूप दिपाच्या सुगंधाने मंदिरात एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती .

       त्यानंतर तिथेच जवळ एक छोटंसं मार्केट होत . रंगीबेरंगी फुलांचे तोरणं खुप सुंदर होते . नकली फुलं असूनही ते हुबेहूब असली फुलांचे तोरण वाटतं होते . किरणला सांगून त्यातील दोन तोरणं विकत घेतले घरासाठी .

           पुढे पितळाच्या भांड्यांच्या एका भल्या मोठ्ठ्या दुकानात घेऊन गेले . तिथे फुलांनी सजवलेले एक छोटेसे भांडे खूप आवडले आईला , तिच्यासाठी तेच घेऊन दिले . आता घरी गेल्यावर ती असेच सजवून ठेवणार हे भांडे काही कार्यक्रम असला घरी की . असे आईनेच सांगितले ते घेतल्या बरोबर आणि वेदिकाला ही आवडेल असे म्हणाली .

          दिवसभर खूप फिरले वेगवेगळ्या ठिकाणी . उशीर झाला मग रात्री सगळे बाहेरच जेवून घरी आले . फिरून फिरून सगळेच दमले होते , त्यामुळे रात्री गप्पा न मारता सगळे गुड नाईट करून सरळ झोपायला गेले . आजचा पूर्ण दिवस बाहेरच फिरत असल्यामुळे पाय खूप दुखत होते दोघांचे .

बेडरूममध्ये जाताच किरण आई आणि तात्यांना म्हणाला ,
" कसे वाटले तुम्हांला प्रियाच्या घरचे ?"

" छान तर आहेच सगळे , फक्त मला त्यांच्याशी बोलायला जरा अवघट वाटले . पण नंतर त्यांनीच समजून घेतलं बहुतेक मला आणि त्या ही हिंदीत बोलायला लागल्या . हिंदी पण फार जमत नाही म्हणे त्यांना , तरीही बोलल्या त्या छान ".

" बाकी काहीही असो , पण माणसं खरंच चांगली आहेत ही , आवडलं मला ".

आई किरणच्या तोंडावर प्रेमाने हात फिरवत बोलली . किरणला खूप छान वाटले हे ऐकून . खूप खुश होता तो .

" आणि तात्या तुम्हांला कसे वाटले ?"

      तात्यांना काय उत्तर द्यावे याला , काही सुचले नाही . 

" आहेत सगळे चांगले ", इतकंच बोलून त्यांनी बेडवर पाठ टेकवली . दमले तर ते ही होते चांगलेच त्यामुळे आणखी काही न बोलता किरण बाहेर निघून आला .

तात्यांच्या इतक्याच बोलण्यात पण किरणला समजून गेले होते . तो ही जास्त काही न बोलता झोपायला गेला .

        तिसरा दिवस उगवला , सकाळी जरा उशीरानेच जाग आली . काल फिरून दमलो त्यामुळे झोप कधी लागली हे समजलेच नाही .

उठल्या बरोबर प्रिया रूममध्ये चहा घेऊन आली .

" आई , आपल्यासाठी चहा आणली आहे ".

" घेतात ना तुम्ही चहा ??

" हो आओ ना प्रिया , चाय तो पिते हैं हम , पर बाहर आके लेते हैं ना सबके साथ ".

" अच्छा , तो फिर मे आपका बाहर वेट करती हूं ".

असे म्हणून प्रिया निघून गेली . आई आणि तात्या तयार होऊन बाहेर आले .
त्यांना पाहिल्या बरोबर प्रियाने गरमागरम वाफाळता चहा आणून दिला आणि सुप्रभात बोलली .
हे खूप आवडल आईला तीच . तिनेही हसून प्रियाला आणि तिच्या आईला सुप्रभात केलं .

" आओ आई साथ मे नाश्ता करते हैं ". अस म्हणून सगळे जण डायनिंग टेबल वर बसले .

टेबल वरती गरमागरम पांढरीशुभ्र ईडली , सांबार , नारळाची चटणी , बटाटा भाजी आणि डोसे तयार होते .

इतकं सगळं पाहून आईला आश्चर्य वाटले .
" अरे इतना खाना हैं हमे ".
आईने विचारताच सगळे हसायला लागले .

" हा खाना तो पडेगा ही आपको , क्यूकी आज सब कुछ  हमारी प्रियाने बनाया हैं ! "

" ये सब खास आपले लिये हैं आई ! "

" अरे इतनी क्यू तकलीफ की आप सबने . सच मे बोहोत कुछ बनाया हैं बेटा तुमने ".

" अरे आई आप पेहेले खा के तो देखो ".

" हा , चलो अब सब कुछ थोडा थोडा ही देना ".

आज आई एकदम फ्री बोलत होती . काल सारखी वाटत नव्हती अवघडल्या सारखी .किरणला हे बघून आणखीनच छान वाटले .

    सगळे जण नाश्ता करत करत बोलत होते . आईला सगळेच पदार्थ खूप आवडले .

" तुम्हारे हाथ मे तो जादू हैं प्रिया , सब कुछ एकदम टेस्टी बनाया हैं तुमने ."
" हम घर पर बनाते हैं तो ऐसा टेस्ट नहीं आता , तुमने कैसे बनाया ये बाद मे बताना मुझे ".

" हा आई , पर अब बताने से अच्छा हैं की आप मेरे साथ ही रहो और मे सब आपको बनाके खिलाती हूं ना  ".

" हा ये भी ठीक हैं , अब सोचना पडेगा मुझे ".

" प्रिया , मुझे गरमागरम क्रिस्पी डोसा खाना हैं ! "
किरण हे म्हणताच प्रिया लगेच किचनमध्ये गेली .

" अरे इतकं सगळं बनवलं आहे तिने आणि तू काय पुन्हा बनवायला सांगतोय तिला ". आई किरणला बोलली पण तोपर्यंत प्रिया गेली सुद्धा होती किचनमध्ये . 

" आई , आग ती खूप छान बनवते डोसा . मला तोच आवडतो तिच्या हातचा ."

" कधी कधी ती ऑफिसमध्ये ही बनवून आणत असते त्यामुळे मला जास्त आवडतात तिच्या हातचे डोसे ".

आईला हे समजल्यावर तर आणखी कौतुक करेन ती म्हणून किरण चुपचाप खाऊ लागला .

" प्रिया अब ज्यादा नहीं बनाना , नहीं तो दोपेहेर का खाना ही हो जाएगा मेरा तो ".

" अरे नहीं आई , थोडी जगह बचा के रखना , खाना खाने मे अभि बोहोत वक्त बाकी हैं ! "

पण तरीही विशेष कौतुक प्रियाचे होते , कारण तिने सकाळी लवकर उठून इतकं सगळं बनवलं होत . प्रत्येकाच्या आवडीच काही ना काही . डाळ तांदूळ भिजवून ते काल रात्री स्वतः दळून ठेवलं होत तिने . रात्री सगळे दमून झोपले होते पण प्रिया हे सगळं करून मग झोपायला गेली . आणि सकाळी पटकन इतकं सगळा गरमागरम नाश्ता बनवला ते ही खास आमच्यासाठी .

       आई तर रोज प्रियाला वेगवेगळ्या रुपात बघत होती . तिला खरंच कौतुक वाटत होते तिचे . इतकी शिकूनही ती घरातलं सगळं अगदी बारकाईने स्वतः बघत होती . तिच्या वडिलांची तर खूप काळजी घ्यायची ती , आणि ते ही तिला विचारल्या शिवाय काहीच करत नव्हते .
लग्न झाल्यावर कसं होणार तिच्या घरच्यांच , हा विचार करून आईला थोडं वाईट वाटलं . पण प्रत्येक मुलीला कधी ना कधी ह्या प्रसंगाला सामोरे जावेच लावते ना , त्या स्वतःच्याच मनाला समजावत होत्या .



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all