Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 16

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 16


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 16

  

  किरणला गावी येऊन तीन दिवस तरी झाले होते , आता निघायला हवं म्हणून संध्याकाळी किरण पण निघणार होता दिल्लीला जायला . आता कधी पोहोचतोय तो तिकडे असे झाले होते त्याला .

      प्रिया तर अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघत होती किरणची . इकडे कधी येईल तो आणि तिकडे काय काय झालं ते कधी सांगणार अस वाटतं होत तिला .

दोघेही एकमेकांना भेटायला अगदी उतावीळ झाले होते . रात्रभर प्रवास करून किरण सकाळी पोहोचला दिल्लीला . रूमवर जाऊन थोडावेळ आराम केला आणि नंतर उठून फ्रेश झाला तोच दारावची बेल वाजली .

इतक्या सकाळी सकाळी कोण आलं असणार म्हणून त्याने दरवाजा उघडला . आणि बघतो तर काय प्रिया उभी होती समोर .

" प्रिया तुम ??? इतनी सुबह सुबह कैसे ".

" आओ ना अंदर आओ ".

तिला बघताच किरण एकदम खुश झाला . त्याने तिला आत बोलवून दरवाजा लावून घेतला .

दोघेही एकमेकांकडे बघत होते . प्रियाला थोडा अंदाज आलाच होता , कारण कुंडली मागितली म्हणजे आईंनी काहीतरी केलंच असेल असा डाऊट होता तिला . 

किरण ... असे म्हणून आवेगाने पुढे येऊन प्रिया किरणला घट्ट बिलगली . त्यानेही तिला प्रेमाने जवळ घेत त्याच्या मिठीत बंदिस्त केले .

काही वेळ ते दोघे तसेच उभे होते एकमेकांच्या उबदार कुशीत . दोघांनाही दूर व्हावेसे वाटतं नव्हते . प्रियाच्या हृदयाची धडधड किरणला स्पष्ट जाणवत होती .
त्याने तिच्या कपाळाच हलकेच चुंबन घेतले . प्रियाचे पाणी भरलेले डोळे पाहून किरणने तिला विचारले ,

" प्रिया तुम ठीक हो ना ?"

" हा किरी , मैं ठीक हूं ."

" आई डॅड क्या बोले किरी ? "

" डॅड अभि भी मानने को राजी नहीं हैं प्रिया . हमे कुछ दिन और इंतजार करना पडेगा ".

" झूठ मत बोलो किरी , मुझे पता हैं . तुमने मेरी कुंडली मांगी तभी मुझे थोडा डाऊट आया था ".

" अरे वाह , बोहोत होशियार हो तुम तो ".

    किरणने तिला सगळं काही सांगितलं गावी काय काय घडलं होत ते . तात्यांचा राग , जोरात बोलणं , त्यांचं चिडणं सगळं अगदी सगळं सांगितलं .
आई , सुधाकर आणि वहिनीने कशी त्याची बाजू घेतली हे ही सांगितले .

" मैं बोहोत खुश हूं प्रिया , अब हमारी जलदी ही शादी होगी ".

प्रियाच्या डोळ्यात पाणी होते , आणि किरणच्याही . दोघेही इतके आनंदी होते की त्यांना काय करू असे झाले होते .

" किरी , कुछ देर मुझे ऐसें ही तुम्हारी बाहोंमे रेहेने दो ".

" और ऑफिस कौन जाएगा फिर ??"

" रुको ना किरी , इतनी भी क्या जलदी हैं ".

" लेट हो जाएगा हमको प्रिया ".

" नहीं होगा लेट ".

" अच्छा ठीक हैं , तुम बैठो तो . कि ऐसें ही खडा रेहेना हैं तुमको ".

" रुको , मैं चाय बनाती हूं तुम्हारे लिये . तब तक तुम जलदी से रेडी हो जाओ ".

" हा , ये हुई ना बात ".

दोघेही आज अगदी आनंदात होते . ऑफिसमध्ये ही त्याच्या जवळच्या मित्रांना कळल्यावर त्यांनी दोघांचं अभिनंदन केले .

    संध्याकाळी मात्र दोघेही पुन्हा आपलं नवीन घरटं शोधायला निघाले होते . पहिले जे पसंत करून ठेवल होत तेच पुन्हा बघून फायनल करायला पाहिजे . असे म्हणून दोघांनी तेच फायनल केलं .

      किरणने घरी सुद्धा सांगितलं की घर फायनल करतोय आम्ही आणि फोनवर फोटो सुद्धा पाठवले होते त्या फ्लॅटचे . आईला आणि वहिनीला ही खूप आवडल होत घर .

       त्या घरात प्रियाला आत्ताच सगळे चित्र दिसत होते पुढचे . लग्नानंतरची स्वप्न ती आत्ताच उघड्या डोळ्यांनी बघायला लागली होती . त्या रिकाम्या फ्लॅटला आता घरात रूपांतरीत करायचे होते . त्यांच्या स्वप्नातल घर . आणि हे काम करण्यासाठी किरण प्रिया तयारच होते .

       घरासाठी एक एक वस्तू आत्ताच खरेदी करायला हव्या म्हणून दोघेही लिस्ट तयार करण्यात मग्न होते . रोज ऑफिस सुटल्यावर हेच कामं करायचे दोघेही . हे स्वप्नांच घर खूप सारे आनंद घेऊन येणार होत त्या दोघांच्या आयुष्यात .

        किरणने तर लगेच त्याच सामान शिफ्ट केलं होत त्या नवीन घरात . त्याच सामान तरी काय होत म्हणा , एक सिंगल गादी दोन उश्या आणि मोजके कपडे . ह्यापलीकडे त्याने फक्त गरजेपुरता सामान घेतले होते . हळूहळू सगळं लावून पण झालं होतं . फक्त किचन तेव्हढं राहील होत . घरात बाई असल्याशिवाय ते तर अपूर्णच राहत म्हणा . प्रिया आली की ते ही पूर्ण होईलच .

   " बरं प्रिया , आपण इथे सगळी तयारी करतोय . पण तुझ्या घरी मी माझ्या आई वडिलांना कधी घेऊन येऊ . हे जरा तुझ्या मम्मीला फोन करून विचारून घे . म्हणजे मला त्याप्रमाणे तिकिटं बुक करायला बरं आई वडिलांची ".

" अरे हा , मम्मीसे बात हुई हैं मेरी . उनकी तबियत थोडी ठीक नहीं हैं ! "
" अगले हफ्ते चले क्या हम ??"

" कोई बात नहीं , उनको थोडा आराम करने दो फिर चलते हैं हम सब ".

     आईला फोन करून सांगितलं , पुढच्या आठवड्यात जाऊया म्हणून प्रियाच्या घरी . तीने तर आत्तापासूनच तयारी करायला घेतली होती .

कसे असतील ते लोकं , चांगले तर असतीलच पण तात्यांना आवडायला पाहिजे सगळं . नाहीतर आत्तापर्यंत केलेले प्रयत्न सगळे वाया जातील . पण आता तात्या अस काही करणार नाही कारण त्यांचा होकार मिळावा म्हणून घरातील प्रत्येकाने त्यांची मनधरणी केली होती .

आई तर इतकी खुश होती की तिला काही कळतच नव्हतं . तिकडे जातांना काय काय घेऊन जायचं , तिथे गेल्यावर काय बोलायचं कस बोलायचं ह्याची मनातून उजळणी चालूच होती . पण मनातल्या मनात तिची अजूनही देवाला प्रार्थना सुरूच होती , जोपर्यंत सगळं पार पडत नाही तोपर्यंत तिच्या जीवाला चैन पडणार नव्हता .

    शेवटी एकदाची आई आणि तात्यांची विमानाची तिकिटं बुक झाली होती पुढच्या आठवड्याची . दोघेही पहिल्यांदाच विमानात बसणार होते . त्यामुळे दोघेही खूप उत्सुक होते . आणि मुलाने विमानाची तिकीट पाठवली म्हणून आईने अख्खा गावात पोरांचं कौतुक सांगितलं होतं . आई असतेच अशी , मुलांचं कौतुक तोंडभरून करणारी .
    
        आईला मदतीला वहिनी होतीच त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं . ती व्यवस्थित बॅग भरून देईन त्यांची . आणि एयरपोर्ट वरती सुधाकर सोडवायला येणारच होता , त्यामुळे किरण निवांत होता .

      प्रिया आणि किरण ज्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होते , तो दिवस शेवटी उगवलाच . आता बघूया पुढच्या भागात काय होतंय ते .


सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//