Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 10

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 10


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 10


        भाऊच्या लग्नाचा गोंधळ आटोपून आता किरण पुन्हा ऑफिसला जायला निघाला होता .
" प्रिया वाट बघत असेल माझी ", असे म्हणून मनातल्या मनात हसत होता किरण .

       ऑफिसला पोहोचताच प्रिया स्वागताला उभी होतीच ... अपेक्षेप्रमाणे . आणि ते ही चेहऱ्यावर भली मोठी स्माईल घेऊन . तिला अस पाहिलं की सगळा थकवा नाहीसा व्हायचा .

        " किरी , अस म्हणून ती त्याला अगदी घट्ट बिलगली . जस काही खूप वर्षांपासून भेटलेच नव्हते ते ".

किरण सुद्धा तिला खूप मिस करत होताच त्यामुळे तो ही तिला मिठीतून लवकर सोडतच नव्हता .

पण ऑफिसच्या आवारात उभे असल्यामुळे त्यांना त्यांच्या भावनांवर आवर घालावा लागला . पण संध्याकाळ मात्र त्या दोघांचीच होती , हे ठरलेलं असायचं .

प्रवासाचा सगळा ताण निघत होता . कामं ही खूप पेंडिंग होत त्यामुळे केलं तर पाहिजेच ,अस म्हणून तो आळस झटकून पुन्हा कामाला लागला .

संध्याकाळचे सहा वाजले , ऑफिस सुटायची वेळ झाली तरी किरण अजूनही कामच करत होता . त्याच्या समोर फायलींचा ढिगारा पडला होता .

एक एक फाईल पूर्ण चेक करून तो बाजूला करत होता . "हे सगळं काम ह्या महिनाभरात व्हायला पाहिजे " , असे बॉस ने सांगून ठेवले होते म्हणून तो लवकर आवरत होता .

" सुट्ट्या बऱ्याच झालेल्या त्यामुळे थोडा ओव्हर टाईम करून हे कामं तेव्हढं संपवायला हवं ", अस प्रियाला सांगत होता . कारण ती केव्हापासून त्याच्याकडे रागाने बघत उभी होती . आणि तो काही त्या फायलींमधून डोकं वर काढायला तयार नव्हता . शेवटी प्रियाने त्याच्यासमोरचा सगळा पसारा बाजूला केला . तेव्हा कुठे त्याला प्रियाचं तोंड दिसलं .

" तूम आओगे या नहीं ??? "
" नहीं तो मैं अकेले चली जाती हूं ! "

" अरे रुको ना डियर , यहा देखो तो कितना काम पडा हैं , और तुम हो की समझती नहीं  ." 

" किरी , काम तुम कल जलदी आके कर लेना . पर अभि हम बाहर जा रहे हैं ! "
" चलो चलो अब उठो भी ."

किरणला उठावेचं लागले . नाहीतर मॅडम काय करतील त्याचा काही भरोसा नाही .

त्याने त्याचा पसारा आवरला आणि लॅपटॉप बंद करून बाहेर आला .

दोघेही मस्त बाहेर चालत चालत घराकडे जात होते . हातात हात घालून त्यांना अस सोबत चालायला खूप आवडायचं .

" किरी , आईने तुम्हे कुछ कहां मेरे बारेमे ?"

" हा बोली ना , के लडकी कुछ खास सुंदर तो नहीं हैं , पर तुम्हे पसंद हैं इसलीये मैं .... "

" किरी .... अस म्हणून ती त्याला मारू लागली .
" तुम कुछ भी बोलते रेहेते हो , अब सच सच बताना . "

" बताया तो था , तुम अच्छी लगी आई को . और तो और भैया ने भी तुम्हे देखा हैं . दोनोंको तुम अच्छी लगी ".

" पापा जलदी से मान जाए बस , अब तो भैया की भी शादी हो गयी हैं . अब हम नहीं रुकेंगे . कुछ न कुछ तो करना ही पडेगा ".

" हा , अब तो कुछ परेशानी भी नहीं हैं ! "

" हा अब तो बस मेरी भाभी को बताना बाकी हैं हमारे बारे मे ".

" तो कब बताओ गे तुम ".

" अरे अगली बार घर जाऊंगा तब सब कुछ बताता हूं ना . अभि तो आना जाना बढेगा मेरा घर , क्यूकी कुछ दिन भाभी गाव रहेगी . मुंबई मैं भैया घर लेगा तब लेके जाएंगे भैया उसे भी . अभि संक्रात भी तो आ रहा हैं , इसलीये घर जाऊंगा मैं तभी ".

" हा , ठीक हैं . उनको भी कुछ प्रॉब्लेम नहीं होगा वैसे तो ".

" हा , मतलब अब हमारी टीम मे और एक मेंम्बर बढ गया हैं ! "

" किरी , तुम्हारे यहा शादीया बडी अच्छी होती हैं !"
मुझे सब कुछ अच्छा लगा .

" हम भी तुम्हारी मराठी स्टाईल मे शादी करेंगे और हमारे केरला साईडसे भी अगल होती हैं वैसे भी करेंगे ".

" कितनी बार शादी करने का इरादा हैं मॅडम आपका  ???"

" एकही बार , और वो भी तुम्हारे साथ ही ". अस म्हणून प्रियाने त्याच्या हाताला किस केलं .

दोघेही आता एकमेकांच्या नजरेला नजर देत होते , त्यात बस प्रेम आणि प्रेमच होत एकमेकांबद्दल . पण लग्नाच्या आधी काहीही झालं तरी आपण आपली हद पार करायची नाही असं त्या दोघांनी ठरवलं होतं .

       ऑफिसचे काम सुरूच होते , किरण प्रिया दोघेही काम करून उरलेला वेळ सोबत घालवायचे . दोघांच्या घरी तर सगळे माहितीच होते , पण तरीही त्यांना काळजी वाटायची .

          एक दिवस कळले की ऑफिसमध्ये किरणचे प्रमोशन झाले . त्याच काम बघून बॉसने त्याला प्रमोशन आणि पगार वाढ ही करून दिली . त्यामुळे तो आणि प्रिया तर खूपच आनंदात होते .

            त्या दोघांनी आता एखादं छानसं घर घ्यायचं ठरवलं होतं . लग्नाच्या आधीच ते घर शोधत होते , म्हणजे नंतर उशीर नको व्हायला . रोज काही ठिकाणी घर बघायला जायचे . काही आवडायचे तर काहींचे रेट जास्त असायचे त्यामुळे ताळमेळ लवकर बसत नव्हता .

          मोठ्या मुश्किलीने एक घर पसंत पडले आणि रेट ही ठीक होता . म्हणजे त्यांच्या बजेटमध्ये बसत होते सगळे काही आणि ऑफिसपासून जास्त दूर जी नव्हते . त्यामुळे हे घर फिक्स करून दोघांनी तेच घेण्याचा निर्णय घेतला .

        दोघांनी घरी सुद्धा हे सांगितलं होत . त्यांनाही आनंद झाला की पोरं त्यांच्या संसारासाठी आत्तापासूनच विचार करताय .

दोघांचं आता लग्न लावून दिलं पाहिजे असं प्रियाच्या घरच्यांना खूप वाटायचं , पण किरणच्या वडिलांमुळे सगळे थांबले होते .

       किरणला बोलायला गेलं की तो पुढच्या वेळी बोलू म्हणायचा , पण बोलत मात्र नव्हता . आता तर प्रिया त्याच्या मागेच लागली होती . त्यामुळे त्याला आता काहीच सुचत नव्हते .

      मागच्या वेळीच त्यांना नुसतं कळाल की मुलगी पसंत करून ठेवलीये तर त्यांनी किती ऐकवलं होत . आता तर देवजाणे काय बोलतील . पण तरीही त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे .

            इतकं सगळं होऊन ही तात्या त्यांच्या लग्नाला होकार देतील का ??? 

बघूया पुढच्या भागात ....




सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//