प्रवास एकटीचा भाग - 4

प्रेम आंधळं असत पण आपण ते कधीपर्यंत निभावू शकतो हे आपल्या हातात असतं


विषय - प्रेमकथा

शीर्षक - प्रवास एकटीचा भाग - 4

         आई खुणावत होती किरणला , तात्यांना काही उलट बोलू नको म्हणून . ते जे सांगतील ते ऐकून घे . पण आता काही बोलू नकोस . उगीच रागाच्या भरात माणूस काहीही बोलून जातो , त्यामुळे आता शांत रहा . आपण बोलू पुन्हा .
" तू नको काळजी करू ".

     रात्री प्रियाचा मेसेज आला ,

प्रिया - हाय किरी , क्या कर रहे हो ???

किरण - कुछ खास नहीं , तुम बोलो . खाना हो गया तुम्हारा .

प्रिया - हा मेरा खाना तो हो गया . तुम बताओ , आई ने आज क्या बनाया था अपने लाडले बेटे के लिये .

किरण - खीर और पुरी बानाई थी ,

प्रिया - अरे वाह किरी , मजे हैं तुम्हारे तो .

किरण - प्रिया ....

प्रिया - किरण ....

किरण - वो नहीं मानेंगे प्रिया .

प्रिया - क्यू , क्या बोले डॅड .... कुछ हुआ हैं क्या .

किरण - दोपेहेर मे ही बात हुई थी हमारी .

प्रिया - क्या बात हुई , ठीक से बताओ किरी .

किरण - कुछ नहीं , आता हूं कल तब आरामसे बोलते हैं .

प्रिया - मैं कल तक इंतजार नहीं कर सकती किरी .

किरण - अभि मैं बात नहीं कर सकता , मैं कल आता हूं तब बात करते हैं .

प्रिया - अच्छा ठीक हैं , तूम उदास मत होना .

किरण - हा , चलो गुड नाईट .

प्रिया - गुड नाईट किरी , लव्ह यु .

किरण - लव्ह यु . बाय .

            प्रिया सोबत बोललं की बरं वाटायचं त्याला , पण उद्या जाऊन काय सांगणार होता तो तिला . की तात्यांनी साफ नकार दिलाय हे ...!

इतक्यात आई आली खोलीत .

" बाळा , झोपलास काय रे ???

" नाही ग आई , ये ना ".

आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला , किरणने तिचा हात हातात घेतला .
" आई , मला खरंच आवडते ग प्रिया . मला तिच्याशीच लग्न करायचं आहे , तू कर ना काहीतरी ".

         " हो रे बाळा , कळतंय मला ते ". पण तुझ्या वडिलांचा स्वभाव बघितलास ना . हल्ली चिडचिड फार वाढलीये त्यांची .  बीपी आणि शुगर ही आहे त्यांना , त्यामुळे त्यांना त्रास होईल असं काहीच करू नका सध्या तरी .

" नाही करणार आई , मी अस कधीच करणार नाही ".

    
आईने तेलाची वाटी हातात घेतली आणि बोलली " ये इकडे , डोक्याला तेल लावून देते तुझ्या . म्हणजे शांत झोप लागेल .

   गरम तेल डोक्याला लावून आई मस्त मॉलिश करून देत होती .

" किरण , मला एक बोलायचं आहे तुझ्याशी ".

" बोल ना आई , काय बोलायचं आहे ".

" काहीही झालं , तरी तू परस्पर लग्न करायचं नाही . तुमचं ते कोर्ट मॅरेज का काय म्हणतात तस ".

          " नाही आई , तुम्हांला सोडून मी काहीही करणार नाही ".
भलेही तात्यांनी उशिरापर्यंत लग्नाला होकार नाही दिला तरीसुद्धा मी वाट पाहीन . कधी ना कधी होकार देतीलच ना ते मला .
" पण आई , एक विचारू तुला . अगदी खरं खरं सांगायचं हं पण ..!

" बोल ना बाळा , काय म्हणतोस ".

" आई , तुला प्रिया आवडली ना ???
ती खरंच एक खूप चांगली मुलगी आहे ".

            "हे बघ , मी जरी एक शिक्षिका असली , एक स्वतंत्र विचारांची असली तरी मला घरात असणाऱ्या प्रत्येकाच्या बाजूने विचार करावा लागणार ना ".

          " ते बरोबर आहे आई ,,, पण तुला काय वाटतं ते सांग ना मला आता ".

          "  हो , तुझ्या सुखातच माझं सुख आहे . तू खुश तर मी सुद्धा खुश ". आई हसून बोलली .

" आई , तू जरी माझ्या सुखासाठी हे बोलत असशील तरी तुला तिच्याबद्दल सर्वकाही सांगायचं आहे मला . मग बघ नक्कीच आवडेल तुलाही ती ".

त्या रात्री प्रियाचा फोटो दाखवत आईला तिच्याबद्दल सारं काही सांगितलं किरणने . नकळत आईलाही ती पोरगी आवडली होती .

  " आई , प्रियाने तुझ्यासाठी ही साडी पाठवली आहे ". सुंदर आकाशी रंगाची कॉटनची साडी होती ती .

" अरे वाह , छान आहे रे साडी . चॉईस छान आहे हा तुझा ".

" माझा नाही ग आई , प्रियाने च पसंत केलीये ही साडी तुझ्यासाठी . मी फक्त घेऊन आलोय इथं ".

" अरे , पण प्रिया तर तुझी चॉईस आहे ना ...!

असे म्हणताच किरण हसायला लागला .
" आई काहीही काय ग तुझं ".

" तिला सांग गेल्यावर , साडी खूप आवडली म्हणा " आईला . आणि हो रंगही आवडला मला तिचा .

" हो आई , तुझ्यावर छान दिसेल ती साडी . ती साडी नेसल्यावर अजूनच छान दिसेल तू ".

" बास , कळतंय मला तुझी लाडीगोडी लावायचं काम ". बोलेन मी तात्यांसोबत योग्य वेळ आली की .

      दुसऱ्या दिवशी किरणला पुन्हा निघायचं होत . आईने त्याला थोडाफार खाऊ बनवून ठेवला होता . त्याच्या आवडीचा पोह्यांचा चिवडा  , बेसनाचे लाडू आणि खारे शंकरपाळे .
 
    किरण बॅग भरतच होता , त्याच्या जवळ सगळं काही आणून ठेवलं आईने .

"आई , इतकं सगळं कशाला केलंस तू . पण असू दे , मला खूप आवडतं ".

" वाटलंच होत मला , आणि हो तुझ्या त्या प्रियाला पण दे थोडं यातलं ".

किरण खुश होत आईला बिलगला आणि बोलला , " हो आई , ती तर वाटच बघत असते मी गावाहून येण्याची . कारण तिला तुझ्या हातचं बनवलेलं हे सगळं खूप आवडतं .

" हो का , अरे वाह ...!

निघायची वेळ झाली , किरण जड पावलाने घराबाहेर पडणार होता , नकार घेऊन .

पण आईने समजावून सांगितलं होतं त्याला . आणि ती होतीच त्याच्या बाजूने त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं .

" किरण , सांभाळून जा बाळा . आणि पोहोचला की फोन कर ".

" आणि हो तात्यांच्या बोलण्याच वाईट वाटून घेऊ नकोस , मी आहे ना ..!
अस म्हणत आईने डोक्यावरून हात फिरवला .

किरण हसून आईच्या पाया पडला , डोक्यावरून आईचा हात फिरला की आभाळ ही ठेंगण वाटायचं .

" सांगितलेलं लक्षात राहील ना बाळा ".

" हो आई , पण वाईट इतकंच वाटतंय की तात्यांनी साधं त्या मुलीबद्दल काहीही ऐकून घेतलं नाही ".
" तिचं नाव सुद्धा जाणून घ्यायची तसदी घेतली नाही त्यांनी ".


सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली सातारा

🎭 Series Post

View all