प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 28

प्रेम आंधळं असत पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते


प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 28


किरण आला आणि रागातच पुन्हा निघून गेला, प्रियाच्या हातात होत ह्यावेळी त्याला प्रेमाने स्वतः जवळ ओढून घ्यायचं. पण तिने तस काहीच केलं नाही, उलट त्याच्यावरच संशय घेऊ लागली. यामुळे तो तिच्या जवळ येण्या ऐवजी आणखीनच लांब गेला. बरं तिला तिच्या अशा वागण्यावर पश्चाताप सुद्धा होत नव्हता हेच विशेष.


कसलीच कमी नव्हती घरात, सार्थक झाल्यापासून तर किरणने चार चाकी गाडी पण घेतली होती. त्यांना बाळाला घेऊन आरामात फिरता यावं म्हणून. सार्थक झाल्यावर अगदी काही दिवस फिरले असतील ते पण त्यांना एकमेकांना वेळच देता येत नव्हता. त्यात प्रियाची मम्मी नाहीतर पप्पा कायम त्यांच्या मध्ये असायचे.

सगळं असूनही कधी कधी एकटं एकटं वाटायचं किरणला, तो बोलायला बघायचा प्रिया सोबत पण तीच आपलं वेगळंच काहीतरी सुरू असायचं.

त्यांच्यात आता जास्त बोलणं होत नव्हतं, किरण ऑफिस आणि घर ह्या दोघात एकदम बिजी झालेला होता. नवीन प्रोजेक्ट्स वर त्याच काम सुरू होत हे प्रियाला माहिती होत, तरी पण ती म्हणायची की किरण लवकर दिल्लीला घरी येत नाही. कसा येणार तो? त्यांचं काम खूप मोठं होत, आणि त्याला आता सारख सारखं बाहेर देशात जावं लागायचं.


प्रियाच बोलणं हल्ली किरणला खूप खटकायला लागलं होतं, केव्हाही तिच्याशी चांगलं बोलायला जावं तर ती आपलं काही तरी वाकड्यातच बोलायची त्याच्याशी आणि भांडत बसायची. त्यामुळे तो त्याचा जास्त वेळ ऑफिसमध्येच घालवायचा, त्याच्या स्वतःच्या घरी जायची त्याची ईच्छा ही व्हायची नाही.

कंटाळला होता तो ह्या सगळ्याला, ईथुनही कुठेतरी दूर निघून जावं अस वाटत होतं त्याला. त्याच्या मनाची होणारी चलबिचल त्याला कोणाला सांगताही यायची नाही आणि कोणासोबत बोलताही यायचं नाही. करावं तरी काय? असा प्रश्न पडायचा त्याला.

पण लग्नाच्या आधीपासूनच त्याला प्रियाचा स्वभाव कसा आहे हे माहिती होत, लग्नानंतर तिच्यात थोडाफार तरी बदल होईल अस त्याला वाटलं होतं. पण इथे बदल झालेला दिसुन येत होता तिच्या स्वभावात, पण उलटा बदल झाला होता. ती आधी पेक्षा पण जास्त हट्टी आणि जास्त फाडफाड बोलायला लागली होती. त्याला तर त्याला, पण त्याच्या आईवडिलांना सुद्धा विनाकारण काहीही बोलायची, हे किरणला बिलकुल पटत नव्हते. तो तीच सगळं काही ऐकून घ्यायचा पण आईवडिलांना बोललेलं त्याला आवडत नव्हतं.

आपण आपलं म्हणणं सांगावं, समोरच्याला बोलावं, पण त्याने काय करावं आणि काय करू नये हे त्याच्यावर लादू नये. बस इतकंच किरणला म्हणायचं होत.

काही दिवसांनी किरणने युरोप मधली कायमस्वरूपी जॉबची ऑफर स्वीकारली आणि तो तिकडे जाण्यासाठी निघाला. खरंतर त्याला जायचं नव्हतं पण प्रियाच्या ह्या अशा स्वभावामुळे त्याला जायला भाग पाडले. त्याला प्रिया आणि सार्थक दोघेही ही हवे होते, पण प्रियाला फक्त आणि फक्त तीच स्टेटस जपायला हवं होतं.

तिकडे गेल्यावर त्याला पुन्हा श्रेया भेटली, तिला पाहून त्याला आनंद तर झाला होता पण लगेच प्रियाचे शब्द आठवले आणि आनंद नाहीसा झाला.

पण यात श्रेयाने चुकीचं काहीच वागलं नव्हतं, मग तिच्यापासून लांब का जायचं आपण. तिला जशी एका चांगल्या मित्राची गरज होती तशीच किरणलाही एक समजून घेणार कुणीतरी हवं होतं.

त्या दोघांना एकमेकांची सोबत आवडायला लागली होती, ह्यावेळी दिल्लीला गेल्यावर काय काय घडलं हे किरणने तिला सगळं सांगितलं होतं. तिलाही प्रियाचा स्वभाव काही कळत नव्हता.

पण किरणच खूप कौतुक वाटायचं, त्याने घरच्यांशी भांडून त्याच्या लग्नासाठी त्यांना तयार केले आणि लग्न केले प्रियासोबत. जिच्यावर तो खूप प्रेम करत होता, तिच्यासाठी अगदी काहीही करायला तयार होता. पण प्रियाचं अस बदलेल रूप बघून श्रेयाला हेवा वाटायचा तिचा.

कारण श्रेयाला अशाच एका जीवनसाथीची गरज होती, जो तिच्यावर खूप प्रेम करेन, तिच्यासाठी वाट्टेल ते करेन. तसा व्यक्ती तर आला तिच्या आयुष्यात पण फार काळ टिकला नाही. त्याच ही बरोबरच होता म्हणा.. कारण आईवडिलांना दुखावून लग्न करून तरी काय उपयोग. म्हणून ती त्याच्यावर नाराज सुद्धा नव्हती, पण स्वतः मात्र कधीच लग्न न करण्याचं ठरवलं तिने.

युरोपला गेल्यापासून किरण आठवडा भराने सुद्धा फोन करत नव्हता, प्रियाचं करायची त्याला फोन.. का तर सार्थकला आठवण येतेय म्हणून आणि तो रडतोय. अस ऐकलं की किरणला राहवलं जायचं नाही, मग तो सार्थक साठी का होईना दिल्लीला जाऊन यायचा पण घरात थांबत नव्हता कधी, बाहेर हॉटेलमध्ये थांबायचा राहायला. दिवसभर सार्थक सोबत घालवल्यावर संध्याकाळी तो निघून जायचा पुन्हा हॉटेलवर.


घरात होणाऱ्या वादामुळे त्याच बाहेर खाणं आणि पिणं हल्ली खूप वाढलेल दिसून येत होतं प्रियाला. त्यावरूनही ती त्याला बोलायचा एक चान्स ही सोडत नव्हती, मग अजून जास्त वाद वाढायचे त्यांच्यात.

किरण ऑफिसच्या कॉल मुळे सारखा बाहेर असायचा, त्यामुळे प्रियाला वाटायचं की ह्याच काहीतरी बाहेर सुरू आहे. तिने एक दिवस त्याला डायरेक्ट बोलून दाखवले,

"किरी, मैं कुछ दिनो से नोटीस कर रही हूं. तुम रातको लेट आते हो और बिना खाते ही सो जाते हो. और वो भी यहा सोफे पर!
क्यू करते हो किरी तुम ऐसा.. तुम्हारे मन मे कोई दुसरी लडकी तो नहीं..?

तिच्या अशा बोलण्यावर काय उत्तर द्यावे किरणला समजत नव्हते.

"तुम सोच भी कैसे सकती हो मेरे बारे मे ऐसा? तुमको मैं ऐसा दिखता हूं?"

किरण तिच्यावर ओरडून बोलला, त्यामुळे तिला त्याचा आणखीनच राग आला.

"मुझे क्या पता तुम कैसे हो, शादी से पेहेले तो नहीं थे ऐसें."

"तुम भी तो ऐसी नहीं थी, अरे तुम तो बिलकुल वैसी नहीं रही जैसे मैने सोचा था!"

"हा हा, अब मैं तुमको क्यू अच्छी लगुंगी भला. कोई दुसरी आ गयी होगी तुम्हारे जिंदगी मे."

किरण थोडी ड्रिंक घेऊन आलेला होता, त्यामुळे तो काय बोलतोय हे त्याला कळत नव्हते. पण प्रियाला ही कळायला हवे होते, तो अशा अवस्थेत असताना त्याच्याशी अस बोलायला नको पाहिजे. पण ती सुद्धा चिडून अजूनच काही पण बोलायला लागली म्हणून वाद जास्त वाढत गेला.

त्याच्या दुसऱ्या दिवसापासून किरण घरातून निघून गेला.
त्यांच्यात एकमेकांवरचा राग हा वाढत जात होता, पण त्याचे परिणाम त्या इवल्याशा सार्थकला भोगावे लागतील हे त्यांना कळत नव्हते.
चार वर्षांचा सार्थक, त्याला काय कळत होते आपले मम्मी पप्पा का असे भांडताय म्हणून.

असे त्यांचे कित्येक महिने वर्ष चालू होतं. किरण अधूनमधून दिल्लीला जात होता पण फक्त सार्थक साठी. प्रियाला त्याचा राग यायचा, त्यामुळे प्रिया त्याला सार्थक जवळ येऊ देत नव्हती.

पण तो अस का करतोय यामागचं कारणही तिला माहिती होत, त्यांच्यात होणारे वाद! हे एकमेव कारण होत. दोघांनी एकमेकांना समजून घेणे, वेळ देणे, एकमेकांसोबत बसून शांत बोलणे हे कधी झालंच नव्हतं त्यांच्यात.

किरणला वाटायचं, आज नाहीतर उद्या प्रिया येईल त्याच्याजवळ बोलायला. पण ती कशी आलीच नाही. असेच म्हणता म्हणता वर्ष होऊन गेले, तिकडे गावी आई आणि तात्या वाट बघत होते. पण हे अस वातावरण घेऊन तिकडे ही जावस वाटायचं नाही किरणला.

आई आणि तात्यांशी भांडून मी प्रिया सोबत लग्न केले, आणि तीच प्रिया त्यांना वाईट साईट बोलतेय हे त्यांनी ऐकल्यावर काय होईल. याची भीती वाटायची त्याला, आणि त्यामुळेच त्याला सिगरेटची पण सवय लागली होती.

प्रेम असो वा काहीही असो, लोकांना जास्त दिलं की त्याची किंमत राहत नाही. आणि मग ते अर्ध्यातच सोडून जातात, हेच खरंय.
किरणच्या बाबतीत तेच झालं होतं, त्याने प्रियाला सगळं काही दिलं. पण तिने काय केलं त्याच्यासोबत..

🎭 Series Post

View all