प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 23

प्रेम आंधळं असत पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते


प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 23


गावी जायचं होतं आई तात्यांकडे, पण प्रिया अजूनही रुसून बसली होती. त्यामुळे दरवेळी प्रमाणे किरणलाच जावे लागले तिच्याकडे बोलायला, तो तिला हर एक पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करायचा पण ती काही ऐकत नव्हती. आता त्यांच्या लग्नानंतर ते मोजून तीन चार वेळेस गेले होते गावी, आता तर सार्थक पण एक वर्षांचा झाला होता म्हणजे बाहेर फिरायला जाऊ शकत होते ते त्याला घेऊन.

पण तरी सुद्धा प्रियाला नको वाटत होतं, तिला सुरुवातीला तर आवडलं होत गाव पण आता अचानक काय झालेलं काय माहिती. ती सतत त्याला खेडेगावातला म्हणून हिनवायची त्याला, त्यामुळे किरण आणखीनच चिडायचा. उलट तो तिला म्हणायचा की,"मी खेडेगावातला असूनही तुला पसंत होतो, हे विसरलीस का?"
तेव्हा मात्र प्रिया चूप बसेल अस वाटायचं किरणला, पण तेव्हा सुद्धा ती बोलायची थांबायची नाही.
"मेरी बुद्धी भ्रष्ट हो गयी थी तब."
खुशाल अस म्हणायची किरणला, तरी पण ती मजाक करत असेल असे म्हणून सोडून द्यायचा किरण. तो जास्त मनावर घेत नव्हता तीच बोलणं, त्याला माहिती होत ती जास्त वेळ नाही राहू शकत त्याच्याशिवाय. एक दोन दिवस रुसून बसेल मग पुन्हा ती स्वतःहून येईल जवळ.

"प्रिया, बॅग पॅक हो गयी क्या? हमे कल निकलना हैं सुबह जलदी."

प्रिया एक नाही आणि दोन नाही, ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती.

"प्रिया मैं तुमसे कुछ पुछ रहा हूं."

"कर ली हैं बाबा बॅग पॅक, अब सो जाओ.. ज्यादा शोर मत करो नहीं तो सार्थक उठ जाएगा."

हे ऐकून किरण खूप खुश झाला, चला म्हणजे काही न करता प्रिया तयार झाली होती गावी जायला. तो तर इतका खुश होता की त्याला स्वप्नातही तो गावीच आहे असं दिसायचं, इतकी त्याला उत्सुकता होती जाण्याची.

सकाळी आठ वाजता तरी घरातून बाहेर पडायला पाहिजे ह्या हिशोबाने किरण प्रिया आवरत होते, पण सार्थकची झोप झाली नाही म्हणून तो रडायला लागला. कारण त्याला झोपेतून उठवून आवरायला घेत होती प्रिया.

"प्रिया उसे ऐसें ही निंद मे गोदी मे उठाके चलते ना हम, खामोखा तुमने उसे जगा दिया. अब देखो उसका रोना शुरू हो गया, जलदी चूप नहीं बैठेगा अब वो."

"अरे थोडा तो तैयार कर लेती मैं उसे, ऐसें सोते सोते कैसे उठाके लेके चलू मैं उसे."

"तो क्या हुआ, छोटा बच्चा हैं प्रिया वो, और आज नहीं नेहेलाती उसे तुम तो कुछ बिगड नहीं जाता."

"बस अब तुम चूप करो, हर बात पर शुरू हो जाते हो."

"तुम काम ही ऐसा करती हो, ऑफिसमे पता नहीं क्या करती होगी."

"बस हं किरण, मुझे सब आता हैं. ज्यादा ताना मत मारो तुम."

इथे सार्थक रडायचं थांबत नव्हता आणि त्या दोघांचं वेगळंच सुरू होत.

खाली गेल्यावर गाडीत बसल्यावर सार्थक शांत झाला, त्याच्या दुधाच्या बाटल्या, त्याची आवडती खेळणी सगळं एका बॅग मध्ये वरतीच ठेवलं होतं. सार्थकचा पहिला प्रवास होता हा, आणि तो ही इतक्या लांब. त्याने काही त्रास द्यायला नको म्हणजे झालं.

पण सार्थक अगदी शहाण्या बाळा सारखा शांत झोपून होता, गावी पोहोचेपर्यंत त्याने कसलाही जास्त त्रास दिला नव्हता दोघांनाही. फक्त भूक लागली की खायला प्यायला दिलं म्हणजे झालं त्याच काम.

गावी आल्या आल्या आईंनी किरण प्रिया आणि सार्थक वरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. तो यायच्या आधीच दोन लिटर दुध जास्तीच मागवून ठेवलं होतं, आणि भरपूर खेळणी पण घेऊन ठेवली होती.

खूप म्हणजे खूप खुश होत्या आई सार्थकला बघून, गोरा गोमटा गुलाबी गुलाबी गालांचा इटूकला सार्थक घरभर पळायचा. सार्थक येणार म्हणून सुधाकर आणि वेदू आधीपासूनच तिथे आलेले होते. अमय आणि अदिती पण आता मोठ्ठे झालेले दिसत होते.

वेदू ने आल्या आल्या सार्थकला कडेवर उचलून घेतले पण तो तिला बघून रडायला लागला.
आई पण लगेच म्हणाल्या,
"नवीन जागी आलाय तो त्यामुळे करेल थोडे दिवस अस रडायचं नाटक. पण नंतर बघ तुझ्याच मागे लागेल, मोठी आई मला हे करून दे मोठी आई मला ते खायला दे अस म्हणून."

अस म्हणून किरण आई आणि वेदू हसायला लागल्या. प्रिया येणार म्हणून वेदूने त्यांच्या बेडरूममध्ये साफसफाई करून ठेवली होती. त्यावर प्रियाने वेदूला थॅंक्यू सुद्धा म्हटले, फॉरमिलिटी म्हणून.

नवीन जागा होती त्यामुळे सार्थकला झोपही लागत नव्हती तिथे, रोज रात्री रडायचा तो आणि झोपायला खूप दमवायचा. शेवटी तात्या त्याला कडेवर घेऊन बाहेर फिरायचे मग कुठे तो झोपायचा.

खरंच सार्थक आल्यापासून सगळेच खुश होते घरात, किचनमध्ये रोज किरणच्या आवडीचं जेवण बनत होत. त्यामुळे किरण अगदी पोटभर जेवायचा आणि मस्त ताणून द्यायचा. पण प्रियाला ते जेवण तेलकट आणि मसालेदार वाटायचं म्हणून तिच्यासाठी ती वेगळी भाजी बनवायची. पण बाकीच्या कुठल्याच कामाला हात लावत नव्हती, त्यामुळे आई अजूनही नाराज होत्या.

एक वेळ आईच्या मनात येऊन ही गेलं,
"की लग्नाच्या आधी मग जेव्हा हिच्या घरी गेलो होतो तेव्हा खरंच प्रियानेच बनवला होता का स्वयंपाक? की फक्त आपल्याला दाखवायचं म्हणून देखावा होता तो?"
आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
पण कुणालाही तिच्याकडे बघून असेच वाटेल, कारण आत्ताच्या प्रियामध्ये आणि आधीच्या प्रियामध्ये बराच फरक जाणवत होता.

आईला बस काय वाटायचं, की ते दोघे कुठेही राहो फक्त एकमेकांसोबत चांगले राहू देत. बाकी काही म्हणणं नाही माझं.


गावी किरण मस्त ट्रॅक्टर वर बसवून सार्थकला फिरवून आणत होता, सोबत सुधाकर आणि अमय ही होताच. पण प्रिया घाबरायची त्याला अस कुठेही घेऊन जायला, ती किरणलाच ओरडायची. पण किरण ऐकेल तेव्हा ना!
तो आता त्याच्या राज्यात आलेला होता, त्यामुळे त्याला प्रिया काहीच बोलू शकत नव्हती. त्याचा राग जरी आला तरी तो दाखवू शकत नव्हती की भांडू शकत नव्हती. त्यामुळे तिला तिथे सगळ्यांसोबत हसून राहावच लागायचं.

पण असंही नाही की तिला सासरी खूप कामं सांगायचे, वेदू तर अजूनही सगळं काही करून घ्यायची. प्रिया फक्त वर वर काहीतरी करायची आणि सार्थक रडतोय म्हणून निघून जायची, पण वेदूने कधीच तिला काम सांगितले नाही. फक्त आईंना जाणवायच ते की वेदूला कामाचा ताण पडतोय, शिवाय अमय अदिती होतेच कामं वाढवायला. त्यामुळे आई स्वतः अर्ध काम करून घ्यायच्या किंवा बसल्या बसल्या बरंच काही करून द्यायच्या. त्यांच्या वयोमानाने आता त्यांना जास्त वेळ उभं राहायलाही जमत नव्हते. पण तरी सुद्धा त्या वेदूला मदत करायच्या आणि किचनमध्ये लक्ष ठेवून असायच्या, पोरांना खाऊ घालायच्या त्यांना आंघोळी घालायच्या. इतकं काम केलं तरी पुरेशी मदत होती वेदू साठी.

प्रिया सरळ जमत नाही म्हणून हात झटकून मोकळी व्हायची, तीच वेदूला पहिल्या पासून माहिती होत. मोठ्या घरातली मुलगी म्हणून वेदू ने जास्त काही सांगितलं नव्हतं तिला कामं, आणि तिला करता येत की नाही हे सुद्धा कळायचं नाही.

कधी कधी करायला लावलं की भलतंच काहीतरी करून ठेवायची आणि मग सगळं बिघडून जायचं. पराठे मात्र तिला छान जमत होते, म्हणून एक दिवस तिलाच सगळ्यांसाठी नाश्ता बनवं म्हणून आईंनी सांगितले. पण तिला त्याचच खूप टेन्शन आलेलं दिसत होतं. कारण आता कामं करायची सवय सुटली होती तिची घरात मावशींना कामाला लावल्यापासून, तिच्या घरातलं सगळं काम मावशी बाई करायच्या.

पराठे करता तर येत होते पण प्रमाणात चूक होऊ शकते म्हणून प्रिया जरा बिचकत होती. पण त्यावेळी सुद्धा वेदू तिच्यासोबत उभी होती किचनमध्ये, तिनेच सगळी तयारी करून दिली आणि मग प्रियाने फक्त पराठे भाजून घेत सगळ्यांना वाढले. खर तर वेदू आणि प्रिया यांच्यातल नातं अजूनही तसच होत, फरक फक्त इतकाच होता की तेव्हा ते नवीन होते त्यामुळे जरा सांभाळून बोलावं लागायचं प्रियाला कारण वेदू जरी तिच्यापेक्षा वयाने लहान होती पण मानाने तर वेदूच मोठी होती आणि आता प्रियाला लग्न होऊन चार पाच वर्षे झालेली होती त्यामुळे तिचा स्वभाव सगळ्यांना हळूहळू माहिती झाला होता.

तापट हट्टी आणि हेकेखोर प्रिया नव्यानेच सगळ्यांना जाणवत होती.

🎭 Series Post

View all