प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 21

प्रेम आंधळं असत पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते
प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 21



   आई तात्या येऊन गेल्यापासून किरणला त्यांची खूप आठवण येत होती. आणखी काही दिवस त्यांनी राहायला पाहिजे होत इथे अस किरणला वाटतं होत. त्याने बोलुन पण दाखवलं प्रियाला, पण ती म्हणाली की इतके सगळे पाहुणे घरात आल्यावर घर छोटं पडतं आपलं. पण किरणच म्हणणं होतं की ते माझे आई वडील आहेत, पाहुणे थोडीच होते ते.

प्रियाला त्यांचा एकट्याचा संसार हवा होता पण किरणला सगळेच पाहिजे होते. म्हणून त्याने पुन्हा मुंबईच्या एका कंपनीत इंटरव्ह्यू दिला आणि त्याचे सिलेक्शन सुद्धा झाले होते. त्याला वाटले की इथून आता मुंबईत घर घेऊ आणि तिथेच राहू, थोडे दिवस जातील सेट व्हायला पण होईल हळूहळू सवय. तिकडे गेलं की गावी आईवडिलांना पण भेटता येईल नेहमी, त्या दोघांची तब्येत हल्ली सारखीच खराब होत असते. दादा वहिनी किती वेळा जाऊन येत असतात गावी, सारखं तेच बघतात. आपली पण जबाबदारी आहेच की, असे म्हणून त्याने विचार केला की आता मुंबईत जायचं.

प्रियाला सरप्राईज द्यायचं अस ठरवलं पण नेहमीप्रमाणे त्याने सांगायच्या आधीच प्रियाला दुसरीकडून कळून गेले. आणि ती पुन्हा चिडली त्याच्यावर.

"किरी, ये क्या हुआ हैं तुमको."

"प्रिया, अब मैने सोच लिया हैं. हम मुंबई शिफ्ट करते हैं."

"पर क्यू किरी, यहा भी कितना अच्छा चल रहा हैं हमारा सब कुछ."

"प्रिया, हम दोनो बस अपना अपना ही सोचते हैं. मुझे मेरे आई डॅड को भी देखना हैं."

"उनके लिये हैं ना भैया भाभी, वो तो दर दुसरे महिने जाते हैं गाव."

"वो जाते हैं, पर मेरा भी तो कुछ फर्ज बनता हैं ना."

"बस इतनीसी बात हैं, और हम सब मुंबई जाएंगे."

"मुझे अच्छा जॉब भी मिल गया हैं, तुम कुछ दिन घर पे रेहेना. जब सार्थक एक साल का हो जाएगा तब तुम भी फिरसे अपने जॉब देख लेना."

"किरी ये क्या मजाक हैं."

"मैं मजाक के बिलकुल मूड मे नहीं हूं प्रिया."

"और मैं भी यहासे कही नहीं जाने वाली, तुमको जाना होगा तो तुम जाओ."

प्रियाच्या अशा बोलण्यामुळे किरणला खूप वाईट वाटत होतं, खूप लागलं होतं त्याच्या मनाला. हल्ली ती जरा जास्तच रुडली वागत होती त्याच्यासोबत.

फक्त स्वतःच बघायचं, बाकीचे काय म्हणताय, का म्हणताय हा विचारच करत नव्हती. आणि तिच्या बोलण्यामुळे समोरचा दुखावला जातोय ह्याची जाणीव सुद्धा नव्हती होत तिला.
पण तरी सुद्धा किरणने तिला काहीच बोलले नाही, थोड्या दिवसांनी पुन्हा बोलून बघू शांतपणे. असे म्हणून तो गप्प बसला आणि सार्थकला खेळवू लागला.

बाळ आल की स्वभावात थोडा फरक पडतो, हे माहिती होत किरणला. पण इतका बदल.. त्याने विचारही केला नव्हता ह्याचा.

सार्थक आता सहा महिन्यांचा होऊन गेला होता, त्यामुळे प्रियाच्या सुट्ट्या ही संपल्या होत्या. आता तिला ऑफिसला जायलाच लागत होते, त्यासाठी तिने तिच्या मम्मीला इथेच तिच्याजवळ ठेवून घेतले होते. सार्थकला बघायला कोणीतरी पाहिजे घरात म्हणून प्रियाची मम्मी तिच्याजवळ राहत होती.

किरणलाही ते पटले, सार्थक जवळ पाहिजे सतत कोणीतरी. अजून खूप लहान आहे तो, त्याला वरचे दूध पण सुरू केले होते लगेच. त्यामुळे त्याच पोट भरत होत छान, पण आईच ही दूध गरजेचं असत म्हणून ती ऑफिसला जाताना आणि आल्यावर त्याला थोडा वेळ तरी द्यायचीच.

"प्रिया, मैं क्या बोलता हूं. कुछ दिन तुम्हारे मम्मी को घर भेज देते हैं और हम कही छुट्टी पे जाते हैं घुमने."

"क्यू किरी?"

"अरे तुम्हारे मम्मी को भी तो घर जाना होगा ना एक ना एक दिन."

"जाना तो होगा, पर अभी क्यू."

"अभी हम दोनो को भी कुछ टाईम साथ मे बिताना चाहीए ऐसें मुझे लग रहा हैं."

"हा किरी, कितने दिन हो गये हम कही गये नहीं और नाही आरामसे बोलते बैठे."

"इसलीये तो मैं ये बोल रहा था, की तुम्हारे मम्मी को बोलो कुछ दिन घर जाके आये. वहा तुम्हारे पापा भी तो अकेले हैं ना."

"हा, पर किरी मम्मी नहीं होगी तो सार्थक को कौन देखेगा?"

"मैं हूं ना प्रिया, और हमे अपने फॅमिली के साथ टाईम चाहीए. सार्थक, तुम और बस मैं."

"नहीं किरी मम्मी को भी लेके चलते हैं, उनके बगैर मैं कुछ नहीं कर सकती."

किरणला तर अस झालं होत की कुठून हिला फिरायला चल अस बोललो. त्याला वाटत होतं की ते तिघेच असावे, त्यांच्यात आणखी चौथ कुणीच नसावं. आणि तसही तिची मम्मी अशी किती दिवस राहणार होती त्यांच्यात. वर्ष दीड वर्ष झाले असेल त्या तिथेच राहत होत्या, फक्त कधीतरी दोन चार दिवसांसाठी केरळला त्यांच्या घरी जाऊन यायच्या.

प्रियाचे भाऊ मोठे होते कॉलेजला जात होते त्यामुळे त्यांना फारशी गरज भासत नव्हती, आणि प्रियाचे पप्पा त्यांच्या मित्रांसोबत फिरायला जायचे. घरात बाई यायची सगळे काम ती करून जायची, अगदी घरातल्या साफसफाई पासून ते दोन्ही वेळेचा स्वयंपाक ही ती करून जायची. त्यामुळे तिच्या मम्मीला टेंशन नव्हते तिकडचे आणि घरी जायची घाई पण नव्हती.

पण इकडे किरणला वाटत होते की सार्थक आपला मुलगा आहे त्याला आपण सांभाळले पाहिजे, पण प्रियाला तिच्या मम्मीची सोबत राहण्याची इतकी सवय झालेली होती की त्या एक दिवस जरी नसल्या तरी तिला कसेतरी व्हायचे. ती पूर्ण वेळ सार्थकला नव्हती सांभाळू शकत. म्हणून त्याने काही दिवस त्यांच्या आईला बोलवून घेऊ इकडे दिल्लीला अस ठरवलं.
प्रिया समोरच त्याने गावी आईला सहज फोन केला,

"हा आई, कशी आहेस. आणि तात्यांना बरे वाटतंय ना आता?"

"हो रे, आम्ही इकडे सगळे ठीक आहोत. आता वयोमानाने गुडघे त्रास देतात इतकंच."

"आई, कशाला उगाच धावपळ करत असते. आराम करायचे दिवस आहेत आता तुमचे."

"कसला आलाय आराम, वेदू होती तोपर्यंत होता आराम जीवाला. आता ती पण मुंबईला आहे, येतात ते महिन्या दोन महिन्याने इकडे. सुधाकर घेऊन येतो सगळ्यांना इकडे आठवडाभर तरी, मग छान वाटते आम्हालाही. घराला घरपण आल्या सारखे वाटते, अमय अदिती पूर्ण घरात दुडू-दुडू धावत असतात. आता आम्हां म्हाताऱ्या कडून काही होत नाही जास्त, होईल तस चालू आहे हळूहळू."

"आम्ही पण बघू, तिकडे येईल म्हणतोय मी काही दिवसांनी. मग तुला इकडे घेऊन येतो मी काही दिवस."

"अरे वाह, कधी येणार आहे तुम्ही सार्थकला घेऊन. इकडे सगळ्यांनी अजून पाहिलं पण नाही त्याला."

"हो आई, कळवतो तुला तस मी आमचं ठरलं की."

"बरं बरं, काळजी घ्या बाळाची. चल ठेवते फोन."


प्रियाने सगळं अगदी कान देऊन ऐकलं, आता तिला मराठी चांगली समजत होती. फक्त बोलता येत नव्हतं इतकंच.

"किरी, क्या तुम गाव जाने की सोच रहे हो?"

"हा प्रिया, कुछ दिन जाना तो होगा ना! हम दिवाली पर भी तो नहीं गये गाव."

"पर सार्थक अभी छोटा हैं किरी!"

"प्रिया एक महिने मे सार्थक अब एक साल का हो जाएगा, बडा हो गया अब वो. पर तुम ही उसको छोटा ही रेहेने दोगी."

"किरी मैने उसके पेहेले बड्डे की सारी तैयारी करके रखी हैं."

"तो क्या हुआ, बड्डे हम वहा कर लेंगे आई डॅड के साथ."

हे ऐकताच प्रियाला पुन्हा किरणचा राग आला, आणि त्याला ती फोर्स करू लागली. जायचं असेल तर सार्थकचा बड्डे इथे करायचा आणि मग गावी जायचं.

🎭 Series Post

View all