प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 19

प्रेम आंधळं असत पण ते कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते
प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 19


बाळाचं नाव काय ठेवायचं यावरून घरात चर्चा सुरू झाली, आईंनी खूप सारी छान छान नाव सुचवली होती किरणला. ब्राम्हणाकडून अक्षर काढून आणलं त्यावरून नाव ठेवायचं अस आई बोलली. पण तिकडे प्रियाचं आणि तिच्या मम्मीच वेगळंच सुरू होत.

"किरी, हमारे बच्चे का क्या नाम रखना हैं? कुछ सोचा हैं तुमने?"

"सोचा तो नहीं हैं, पर आईने बोहोत सारे नाम बताए हैं. उसमे से हम कौनसा भी एक रख लेते हैं."

"किरी, मैने बोहोत दिनो से दो नाम सोच के रखे हैं. और मुझे अपने बेटे का वही नाम रखना हैं."

"पेहेले बोलो तो क्या नाम सोचा हैं तुमने."

"सार्थक.. मुझे सबसे प्यारा यही नाम लगा."

"नाम तो अच्छा हैं, पर पेहेले आई को पुछता हूं मैं."

"अरे, उसमे पुछने वाली क्या बात हैं. आई को भी पसंद आएगा ये नाम."

"ठीक हैं, पर मुझे बताना तो पडेगा ना."

"हा ठीक हैं, तुम बता देना. क्यूकी मुझे यही नाम रखना हैं."

"ठीक हैं बाबा, हमारे बेटे का नाम सार्थक ही होगा."

"जबसे ये आया हैं, तबसे जैसे हमारे जीवन का सार्थक हो गया हो.. हैं ना किरी."

"क्या बात हैं, बोहोत खुश हूं मैं प्रिया."

"मैं भी किरी."

असे म्हणत ते दोघे एकमेकांना किस करत होते आणि मध्येच मम्मी आली त्यांच्या बेडरूममध्ये. त्यांना बघून किरण एकदम बाजूला झाला, पण तोपर्यंत त्या तिथूनच दारातून निघून गेल्या होत्या बाहेर.

प्रियाला मम्मीने समजावून सांगितलं, आता बाळ थोडं मोठं होईपर्यंत तुम्ही नवरा बायकोने जवळ झोपायचं नसत नाहीतर दूध कमी होत.  बाळाला आईची गरज असते त्यामुळे सतत बाळाकडे लक्ष देत राहायचं.

प्रियाला पण मम्मीच बोलणं ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण तीच ऐकावं तर लागणारच होत. कारण मम्मी तिच्याकडून सगळं करूनच घ्यायची.

रोज सकाळी सकाळी उठून तिला आणि बाळाला मॉलिश करायला मावशी यायच्या, त्यानंतर दोघांची आंघोळ झाली की मग प्रियाला मोठा कपभरून दूध आणि एक लाडू खायला लावायच्या. प्रियाला ते लाडू बिलकुल आवडत नव्हते पण कसेतरी तोंड करून खाऊन घ्यायची ती. जेवणात पण अगदी साधी भाजी मीठ मिरची कमी असलेली, त्यामुळे जेवण पण करावेसे वाटत नव्हते पण भूक खूप लागायची म्हणून खावेच लागायचं ते.

मम्मी म्हणायची, अस करावंच लागत प्रत्येक आईला. आई होणं काही सोपं नसत, बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला लांब राहावं लागतं. काही काही तर त्या गोष्टी सुद्धा सोडाव्या लागतात.

प्रियाला सतत मोबाईल बघायची सवय होती, पण मम्मीने ते सुद्धा बंद करायचं अस सांगितलं होतं. आता बाळ लहान आहे तोपर्यंत जितका आराम करता येईल तितका करून घ्यायचा कारण नंतर बाळ काहीच करून देणार नाही.

तिकडे आईला दिल्लीला यायची घाई झाली होती, त्यांना सगळ्यांनाच बाळाला कधी बघायला जातोय अस झालं होतं. बाळ आता चांगलं तीन चार महिन्याच झालं होतं, बोललं की कळायच त्याला. आपल्याकडे बघून हसायचं, होकार द्यायचं.. हे सगळं किरण कमेरामध्ये टिपत होता.त्याचे दर महिन्याला वेगवेगळे फोटो काढत होता.

वेदूचा अमय आणि अदिती पण आता एक वर्षांचे झाले होते, त्यांचा वाढदिवस सुधाकरने गावीच केला. आणि मग त्यांना घेऊन तो मुंबईला गेला त्यांच्या घरी. वेदू कशी सांभाळणार दोघा दोघांना म्हणून आई काही दिवस तिच्याजवळ गेल्या होत्या मुंबईला. महिनाभर राहून आल्या होत्या त्या चांगल्या मुंबईत, नंतर गावी त्यांना अजिबात करमत नव्हते. बाळांची इतकी सवय झालेली होती की त्या दिवसातून चार वेळा तात्यांकडून व्हिडीओ कॉल लावून बाळ काय करतंय ते बघायच्या.

वेदूला खरंच अवघड जात होतं दोघांना सांभाळून घरातलं काम आणि बाकीच सगळं, त्यामुळे सुधाकरने पण घरकामाला एका मावशींना सांगून ठेवले होते. वेदूचे अर्धे काम आता त्याच करत होत्या. तरी पण वेदू बोलली सुधाकरला,

"अहो, मी करेन हळूहळू घरातलं काम. तुम्ही उगाच मावशींना सांगितलं."

"वेदू, तू कसं करणार आहेस बरं ह्या दोघांना सांभाळून? किती दिवस झाले मी बघतोय की तू वेळेवर जेवण करत नाहीस आणि स्वतःकडे तर अजिबात लक्ष नाहीये तुझं. चेहरा बघ कसा झालाय तुझा तो! आणि तब्येत पण खराब झालीये तुझी."

सुधाकर पुढे वेदू काहीच बोलली नाही, खर तर तिलाही गरज होती आरामाची पण तरीही ती सगळं करायला बघायची आणि दमून जायची. त्यात हे दोघे चिल्लेपिल्ल तिला झोपू पण देत नव्हते वेळेवर. अर्धी रात्र तर ह्या दोघांना बघण्यात जायची तिची आणि झोप तरी किती वेळ होते मग. त्यामुळे तिने मावशींना कामं करू दिले.

तिच्या सोसायटीच्या बायका यायच्या तिच्याशी गप्पा मारायला, आणि लहान लहान मूल मुली तर खूप यायचे त्यांच्या घरी अमय आणि अदिती सोबत खेळायला. ते दोघे होतेच इतके गोंडस की कुणीही लगेच उचलून घ्यायचं त्यांना. त्यामुळे वेदूच काम ही पटापट होत होत. मुलं खेळतात तोपर्यंत ती स्वयंपाक करून घ्यायची आणि सुधाकरची वाट बघत बसायची. तो आला की दोघांना घेऊन फिरवायला न्यायचे ते, म्हणजे मुलं ही खुश व्हायचे.

किरण प्रियाचं बाळ पण आता चार महिन्याच झालं होतं, त्यांना बघायला जायला पाहिजे. अस वेदूला वाटू लागले आणि आई पण बोलल्या होत्या की आपण सगळे सोबतच जायचं आहे दिल्लीला. त्यामुळे सुधाकर सोबत बोलायला हवं कधी जायचं ते ठरवायला पाहिजे, अजून किती दिवस अशीच वाट बघायची.

"अहो, आपण दिल्लीला कधी जाणार आहोत?"

"हा बघूया आई काय म्हणतेय आधी."
सुधाकर फोनमध्ये बघत बोलत होता.

"पण मी काय म्हणते, प्रियाचं बाळ आता तीन चार महिन्याच झालं. आधीच आपल्याला खूप उशीर झालाय त्याला बघायला."

"बरं ठीक आहे, मी आत्ताच आई सोबत बोलून घेतो मग ठरवू काय ते."

"बाळासाठी काहीतरी आणावे लागेल आणि कपडे पण."

"घेऊया आपण सगळं, आणि बाळाला काय आणायचं ते आई घेऊन येईल. मी इकडून सांगतो तिला, ती आपल्या सोनाराकडून घेऊन येईल छानशी वस्तू एखादी."

   पुढच्याच आठवड्यात दिल्लीला जायचं ठरलं सगळ्यांच, स्वतः किरणने तिकिटं बुक करून ठेवली होती त्यासगळ्यांची. आई आणि तात्या पण मुंबईत येऊन थांबली दिल्लीला जायच्या दोन दिवस आधी.

"बरं झालं आई तुम्ही लवकर आल्या ते, ह्या दोघांना सांभाळा तोपर्यंत मी त्यांची बॅग भरून घेते."

"वेदू, ह्यांच खायचं पण घे डब्ब्यात थोडंस. तू घरात बनवलेले डाळ तांदळाची सरलॅक, त्यांना रेडिमेड पेक्षा तीच आवडते ना जास्त खायला. त्यामुळे ते आठवणीने घे ग."

"हो आई, बरं झालं सांगितलं तुम्ही. नाहीतर विसरून गेले असते मी."

"गोंधळ होत असेल तुझा आता एकटीला आवरायचं म्हणजे."

"गोंधळ काय, चांगलीच धांदल उडते माझी. जेवायला पण मिळत नाही लवकर, ह्या दोघांना बघण्यातच इतका वेळ जातो की मला बिचारीला टाईमच मिळत नाही स्वतःला."

संध्याकाळी सगळे जण अमय आणि अदितीला घेऊन जवळच्याच गार्डन मध्ये जाऊन बसले. त्यांना खूप आवडायचं तिथे असलेल्या मुलांना खेळतांना बघायला, त्यामुळे त्यांचा खाऊ करून नेला की संपायचा तिथे आरामात आणि घरात मात्र खूप दमवायचे दोघेही खाण्यासाठी.

"वेदू, इथेच येऊन बसत जा तू कोणासोबत तरी, म्हणजे दोघेही नीट जेवतात इथे आल्यावर."

"हो ना आई, पण रोज रोज कोण येणार माझ्यासोबत. ह्यांना सांगितलं की ते ऑफिसमधून आल्यावर दमलेले असतात आणि कंटाळा करतात."

"हो ग दमतो तो ही, पण कधी कधी येत जा मग रोज नसेल जमत तर. लेकरं किती खुश होतात इथे बागेत आल्यावर."

संध्याकाळी सुधाकर घरी आल्यावर ते एका मोठ्ठ्या मॉल मध्ये गेले फिरायला, तिथून त्यांनी किरण प्रियासाठी आणि बाळासाठी छान छान कपडे आणि खेळणी घेतली.

"किती रे महाग आहे इथे सगळं."
आई तिथे सगळीकडे बघत बघत सुधाकरला बोलत होती.

"आई, मॉल म्हटलं की महाग तर असणारच ना! आणि इथे किंमत कमी काही होत नाही. जी छापलेली आहे तीच द्यावी लागते."

"आपल्या गावात बरं आहे बाबा मग, सांगताना सांगतात आठशे रुपये पण देतात पाचशे रुपयाला."
आई खूप कौतुकाने सांगत होत्या.

"आई, ते आपलं गाव आहे आणि हे मुंबई आहे. इतका फरक तर असणारच ना!"

"अहो आई, पण प्रियाला असे महागडे कपडे आणि खेळणीच आवडता वाटत. कारण तिने अमू आणि अदु ला पण खूप मस्त मस्त कपडे खेळणी हे सगळं ऑनलाईन पाठवलं होत."

"ती पाठवेनच ग, ती येऊ शकत नव्हती म्हणून पाठवले असेल तिने ऑनलाईन."

"पण आई, आपल्याला पण सार्थक साठी तसेच भारी भारी घ्यायला लागेल ना! त्यांचं राहणीमान आपल्या पेक्षा थोडं वेगळं आहे. त्यामुळे आपणही तसच घेऊया त्यांच्यासाठी, नाहीतर तिने घातलं नाही तर."

🎭 Series Post

View all