प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 14

प्रेम आंधळं असत पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते
प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 14


सकाळी घड्याळ्याच्या बेलच्या आवाजाने प्रिया दचकून जागी झाली, पण तिला अजूनही उठावेसे वाटत नव्हते. बाजूलाच किरण झोपलेला, अगदी लहान मुलासारखा दिसत होता तो.. निरागस एकदम. पण जागा झाल्यावर, आगाऊ पणा करायचा. प्रिया स्वतःशीच हसत होती, किरणच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याला मुद्दाम उठवण्याचा प्रयत्न चालू होते तिचे.

"प्रिया, मत करो ना."

"उठो ना किरी, सुबह हो गयी."

"आओ तुम भी सो जाओ थोडी देर."
असे म्हणत त्याने तिलाही ब्लॅंकेट मध्ये ओढून घेतले.

"किरी, रात को तुमने ऐसें क्यू कहां?"

"क्या प्रिया, क्या कहां मैंने?"

"यही के हमे अभी बच्चा नहीं चाहीए."

प्रियाचं पुन्हा तेच ऐकून किरण खरंच उठून बसला, म्हणजे तिच्या डोक्यातून असजूनही ते गेलेलं नव्हतं.

"देखो प्रिया, हम यहा दिल्लीमे अपने अपने घर से बोहोत दूर रेहेते हैं. यहा पे तुमको और बच्चे को सांभालने के लिये कोई तो चाहीए पास हमारे."

"हा, तुम्हारी बात तो सही हैं. पर हम इसके बारेमे सोचेंगे ना."

"उसमे सोचना क्या हैं, मेरी आई थोडी ना हमेशा के लिये यहा हमारे पास आके रेह सकती हैं. और तुम्हारी मम्मी भी कुछ दिन रहेगी, फिर बाद मे तो चली जाएगी ना अपने घर."

"फिर क्या बच्चा करना ही नहीं हैं क्या हमे?"

"वैसे नहीं प्रिया, मुझे भी बच्चा चाहीए. पर मैं सोय रहा था की हम और कुछ सालों मे यहा से कही और शिफ्ट करते हैं."

"मतलब?"

"मतलब के महाराष्ट्र मे कही भी, हम दोनो कही पे भी जा सकते हैं. मुंबई या फिर पुना!"

"पर क्यू?"

"मैं आगे की सोय रहा हूं प्रिया, कितने दिन हम यहा रहेंगे. घरसे इतना दूर, हमे कुछ हो जाए तो हमारे पास आसानीसे कोई तो जाए."

"सुबह सुबह तुम ऐसा क्यू बोल रहे हो किरी, कुछ नहीं होगा हमे."

"होगा तो नहीं, पर मैं आज की सोय रहा हूं प्रिया. भैया भाभी मुंबई रेहेते हैं इसलीये उनका गाव आना जाना लगाया रेहेता हैं. और हम यहा इतने दूर, सालभर मे बस एक बार जाके आते हैं. मेरी आई और डॅड को भी लागता होगा ना, उनका बेटा उनके पास हो."

"मैं भी मेरा घर छोड कर आयी हूं ना किरी, तुम्हारे लिये."

"वो बात नहीं हैं प्रिया, तो तुम ही सोचो की बुढापे मे हमे उनका सोचना चाहीए ना! तुम्हारे घर मे तुम्हारे भाई ऐसें ही कही दूर चले जाए घर से तो तुमको लगेगा ही ना की भाई को मम्मी पापा के पास रेहेना चाहीए."

यावर प्रिया काहीच बोलली नाही.

"मैं तुमको गाव जाने के नहीं बोल रहा, बस उनके थोडा पास जाने की सोय रहा हूं. हम मुंबई या फिर पुना जॉब के लिये देखना शुरू कर देते हैं, कही ना कही तो मिल ही जाएगा."

"और यहा का क्या, ये दिल्ली हैं किरी. यहा पे भी सब कुछ हैं."

"पर यहा इतनी दूर मेरे आई डॅड नहीं आ सकते ना."

किरणच म्हणणं अगदी बरोबर होत, पण प्रियाला ते पटवून घ्यायचं नव्हतं. ती तिच्याच म्हणण्यावर अडून होती, स्वभाव होताच तिचा तसा हे किरणला ही माहिती होत. त्यामुळे तो जास्त न बोलता आवरायला निघून गेला. तरी पण प्रियाचं बोलणं सुरूच होत.

"किरी, मुझे इतनी जलदी नहीं जाना यहासे कही दुसरी जगह. यहा अब हम अच्छेसे सेटल हो गये हैं ना!"

"सेटल तो हो गये, पर आगे का सोचना तो पडेगा ही ना."

"तुम फिर वही बात लेके बैठ गये किरी."

"जो हैं वो हैं प्रिया, अब क्या करू मैं."

"ठीक हैं छोडो ये सब बाते, चलो आओ नाश्ता कर लेते हैं."

"तुम बात मत बदलो प्रिया, मेरा फायनल हो गया हैं. मैंने जॉब खोजना शुरू कर दिया हैं और तुम भी कर दो."

"किरी.."

"जब हम वहा जाने अच्छे से सेटल हो जाए तो फिर बच्चे का भी जलदी ही सोय सकते हैं. मतलब आगे के दोन तीन सालों मैं, अब तुम सोचलो क्या करना हैं."

प्रिया काहीच बोलली नाही, तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं. ती आत्ताच्या जमान्यातली मुलगी होती, मॉडर्न विचारांची. तिला अस दुसर्यावर अवलंबून राहायला नाही आवडायचं, तीच ती एकटी सगळं मॅनेज करायची.
यानंतर तिने इतक्यात तरी बाळाचा विचार बाजूला ठेवला होता, किरण म्हणतो त्याप्रमाणे सेटल व्हायचं ठरवलं पण मेंटली नाही तर फायनानशली. म्हणजे पुढे गेल्यावर कसलीच कमी नको पडायला आपल्या बाळाला, इतकं कमवून ठेवायचं त्याच्यासाठी आधीच. 

बोलता बोलता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आणि त्यांची लग्नाचा वाढदिवस पण एकट्याने साजरा केला. कुठेतरी बाहेर फिरायला जायचं अंनिव्हर्सरीला असा प्रियाचा हट्ट होता म्हणून ते कुलू मनालीला गेले होते. तिकडेच वाढदिवस साजरा करून चार दिवसांनी परत घरी आले.

तिकडे सुधाकर वेदूच्या लग्नाला दीड वर्ष झाले होते, सहा महिन्यांपूर्वी बाळाच्या चाहुलीने आनंदित होणारी वेदू आणि बाळाच्या जाण्याने कित्येक दिवस गप्प राहणारी वेदू. आता पुन्हा एकदा तिला तसच जाणवत होतं, पण आणखी थोडे दिवस थांबून घरातच प्रेग्नंन्सी टेस्ट करून बघावी आणि नंतर सगळ्यांना सांगावं म्हणून ती शांत होती. उगाच मागच्या वेळी सारखं नको व्हायला अशी मनात भीती पण होती तिला.
अखेर पुन्हा तिला तसाच उलट्याचा त्रास सुरू झाला, मळमळणे, काहीच न खाणे यावरून सुधाकरला ही समजून गेले होते. तो टेस्ट करण्या आधीच तिला बोलला..

"वेदू, मी खूप खुश आहे. आय लव्ह यु."

"अहो पण आपण चेकअप पण नाही केलं आणि लगेच तुम्ही तस समजलात."

"मला माहितीये, आता ह्यावेळी मी तस काहीच होऊ देणार नाही. तुला कायम जपेन, पण तू मात्र उगाच करमत नाही म्हणून काहीपण कामं काढून बसत नको जाऊ."

सुधाकरच बोलणं सुरू झालं आणि वेदूला हसू येत होतं त्याच्याकडे पाहून.

हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी कन्फर्म केलं, आणि ही आनंदाची बातमी घरच्यांना सांगितली. सगळेच खूप खुश होते, पण गेल्या वेळी सारखा वेडेपणा नको व्हायला म्हणून आईंनी तिला गावी आणायचे ठरवले.

पहिले तीन महिने झाले तेव्हा वेदूची आई आणि सुधाकरची आई मुंबईला आल्या. त्यांनी वेदू साठी खूप काय काय बनवून आणले होते. लाडू, चिवडा आणि  तिला आवडतात तसे खारे शंकरपाळे.. जणू काही दिवाळीच आलीये.

तीन महिन्यात चोर ओटी भरतात म्हणून त्यांनी दोघींनी ओटीच सामान आणलं, वेदूच्या आवडीच्या मिठाई आणल्या आणि तिची ओटी भरली.
तिला हे सगळं करतांना खूप आनंद होत होता. काही दिवस आई तिथेच राहिल्या वेदू ची काळजी घ्यायला आणि नंतर पुन्हा गावी गेल्या, पण तिला लवकरच गावी ये म्हणून सांगून गेल्या.

पाच महिने ती मुंबईतच राहिली,  नंतर जास्त दिवस झाल्यावर प्रवास करायचा नाही असे सांगितले होते म्हणून सुधाकरने तिला तेव्हाच गाडी करून गावी घेऊन गेला. सातव्या महिन्यात ओटी भरुन घेतली आणि डोहाळजेवण झालं तेव्हा किरण प्रिया सुद्धा आले होते गावी. आल्याबरोब किरणच्या आवडीचं रोज जेवण बनवत होते, त्याला आणि प्रियाला काय हवं नको ते बघत होती वेदू. वेदू ला त्रास नको म्हणून प्रिया तिला थोडं थोडं करू लागत होती, प्रिया जिथे असायची किरणची तिथेच बसायचा. अगदी ती भांडी जरी धुवत असली तरी तो सुद्धा तिच्याजवळ बसायचा, जोपर्यंत तीच काम होत नाही तोपर्यंत.

इतक्या दिवसांनी त्या दोघांना बघून आईला खरंच खूप आनंद झाला. एक वेळ तर डोळ्यात पाणीच आले त्यांच्या, इतक्या लांब राहतय पोरगं आणि वर्षातून एकदाच घराकडं येतं. म्हणून त्यांना काळजी लागून राहते सारखीच, पण पोरं काही ऐकत नाहीत त्याच्याच मनाचं करतात.. अस म्हणून मनात काही न ठेवता त्या तिथेच सोडून द्यायच्या.
तात्या तर एकदा म्हटले पण होते दोघांना की,
"इकडे या आता घराजवळ जरा, किती दिवस असे लांब राहणार. आईला बरं नसत हल्ली सारखंच काही ना काही दुखत असत तीच. किती दिवस तुमची वाट पाहायची आम्ही म्हातार्यांनी."

यावर किरण त्यांना फक्त बघू म्हटला पण प्रियाच जास्त बोलली.
"डॅड यहा पे उतना नहीं मिलेगा हमे, जितना हमारा खर्चा हैं उससे ज्यादा चाहीए."

"तो खर्चा कम करो थोडे दिन, पर यहा अपने लोगोकें पास तो आओगे ना तुम."

"अभी फिलहाल ये तो नहीं सोचा हैं, देखते हैं." प्रिया अस म्हणताच पुढे तात्या पण काही बोलले नाही, पण आईला असे वाटले की आपलं पोरगं काही बोलत नाहीये पण ही का बोलतेय तात्यांना. त्यांच्यापुढे अजून घरातलं कोणीच बोलत नाही.

किरणला पण वाईट वाटलं, त्याने प्रियाला खुनवुन चूप बस म्हणून सांगितले होते पण तिने ऐकले नाही. तरी सुद्धा बोलतच राहिली, त्यांना काही बोलून दुखवायचं नाही म्हणून सांगितलं होतं किरणने तिकडून निघतांनाच आणि तरीपण प्रिया फटकन बोलून गेली. त्यामुळे किरणला तिचा जरा रागच आला होता, तो तिला न सांगता सरळ निघून गेला होता रानात तात्यांसोबत.

🎭 Series Post

View all