प्रवास एकटीचा

प्रेम आंधळं असतं पण आपण ते कुठपर्यंत निभावू शकतो हे देखील जाणून घ्यायला हवं , नाहीतर मग एकटीचाच प्रवास असतो

शीर्षक - प्रवास एकटीचा भाग -1

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा 

         " सार्थक , प्लिज सो जाओ ना बेटा जलदीसे . नहीं तो कल स्कुल के लिये देरी हो जाएगी . "

" हा मम्मा , सोने की कोशिश कर रहा हूं , पर निंद नहीं आ रही . "

"तुम आखे बंद करो , फिर अपनेआप निंद आ जाएगी . "

"ओके मम्मा , गुड नाईट . "

" लव्ह यु बेटा , गुड नाईट . "

प्रिया , तिच्या आठ वर्षाच्या मुलाला बळजबरीने झोपवत होती . सार्थकला बळजबरीने झोपी तर लावलं तिने , पण तिला मात्र काही केल्या झोप येईना . गेल्या चार वर्षांपासून तिची झोप उडाली होती .

समोरच्याच भिंतीवर लावलेल्या फॅमिली फोटोकडे बघत नकळत तिच्या गालांवर अश्रू ओघळले .

" किरण "... म्हणजे प्रियाचा नवरा आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सार्थक . चार वर्षांपूर्वी काढलेला हा फोटो , किती सुंदर आला होता . परफेक्ट फॅमिली फोटो , किरणला ही खूप आवडला होता तो .
           सार्थकच्या शाळेच्या पुस्तकात एक प्रोजेक्ट होता , त्यात फॅमिली फोटो लावायचा म्हणून हा काढलेला . पण तो फोटो इतका आवडला की किरणने स्वतः जाऊन त्याची मोठी फ्रेम केली आणि बेडरूममध्ये लावून घेतली .

          आता त्याच फोटोकडे बघून प्रिया किरणला विचारत असते . त्याच्याशी बोलत असते , भांडत असते , स्वतःवरच चिडत असते , रडत असते .

"क्यू किरी ????

क्या गलती थी मेरी ????

तुम क्यू ऐसें कर रहे हो ???

           हम दोनो की वजह से हमारा बच्चा तुमसे दूर जा रहा हैं , ये क्यू नहीं समझ पा रहे हो तुम . उसे और मुझे तुम्हारी जरूरत हैं .

प्लिज किरण ... लौट आओ .

मैं तुम्हारा अभी भी इंतजार कर रही हूं .

प्लिज लौट आओ ...

प्लिज .... !

अस म्हणून म्हणून रडतच ती झोपी गेली .

     किरण आणि प्रिया , एकाच इंटरनॅशनल कंपनीत दोघेही जॉब करत होते . एकाच प्रोजेक्ट वर काम करत असल्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली . आणि ह्याच मैत्रीच रूपांतर नंतर प्रेमात कधी झालं हे कळलेच नाही दोघांना . दोन वर्षे एकमेकांना वेळ दिला , एकमेकांचे स्वभाव जाणून घेतले आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं . 


ही गोष्ट आहे बारा वर्षांपूर्वीची ......
   
       किरण कुलकर्णी , एक मराठी मुलगा आणि प्रिया नायर , एक केरळी मुलगी . दोघेही एकदम चांगल्या घरातले . प्रिया वयाने किरणपेक्षा चार वर्षे मोठी होती . उंचीने किरण सहा फुटापेक्षा जास्त आणि प्रिया त्याच्या खांद्याला लागत होती . पण म्हणतात ना प्रेम आंधळं असत , त्यात ना जात बघितली जाते आणि नाही वय .

               प्रिया मूळची केरळची . तिच्या घरी तिचे आईवडील आणि दोन लहान भाऊ . वडील फॉरेस्ट ऑफिसमध्ये कामाला होते त्यामुळे घरात कसलीच कमी नव्हती . वडील एकदम मित्रासारखे बोलायचे त्यामुळे घरचे वातावरण एकदम फ्री आणि खेळीमेळीचे असायचे .

       प्रिया घरात मोठी मुलगी होती . शाळा कॉलेजमध्ये अतिशय हुशार , कायम टॉपला असणारी , गोल्ड मेडल मिळवणारी . इंजिनिअरिंग करून घराबाहेर जॉबसाठी राहिली . ती एकदम बिनधास्त मुलगी होती . त्यामुळे आईवडिलांना सुद्धा जास्त काळजी नसायची तिची . मुलगी असूनही सगळ्या जबाबदाऱ्या एका मोठ्या मुलाप्रमाणे पार पाडायची . खूप गर्व होता तिच्या आई वडिलांना तिच्यावर .

           किरण महाराष्ट्रात साताऱ्यात राहणारा . घर चांगलं टुमदार , शेती पोती भरभरून आहे त्यामुळे घरचं सगळं चांगलं आहे . किरणच्या घरात आई वडील दोघेही शिक्षक होते , त्यामुळे सतत बदली व्हायची आणि शाळा खेडेगावात असल्यामुळे थोडाफार वागण्यात फरक दिसून यायचा . त्यामुळे दहावी झाल्यावर पुढील शिक्षणासाठी किरणने घर सोडले . सगळं शिक्षण शहरात होस्टेलवर राहून पूर्ण केलं . फक्त सुट्टीत घरी जायचा इतकंच . तो ही चांगलं शिकून दिल्लीत नोकरीसाठी गेला . एक मोठा भाऊ आहे तो ही आता मुंबईत जॉब करत होता . त्यामुळे गावी फक्त आई वडील होते . 

मोठ्या भावाचं म्हणजे सुधाकरच लग्न अजून बाकी होत . त्याच लग्न झाल्याशिवाय किरणला लग्न करता येणार नव्हतं . त्यामुळे तो भावाचं लग्न लवकर व्हावं म्हणून आईला त्याच्यासाठी मुलगी बघायला सांगत असे . पण त्यामागचं कारण कोणाला अजून कळू देत नव्हता .

कारण त्याने त्याच्यासाठी आधीच मुलगी पसंत करून ठेवली होती ना ..!

           किरण घरी गेल्यावर ही सतत प्रिया सोबत फोनवर बोलत असायचा . एकदा त्याच्या आईने हे ऐकले आणि त्याला सरळ विचारून घेतले , नेमकं काय सुरू आहे तुझं . सारखं काय आहे त्या फोनमध्ये . कोणाशी बोलत असतोस फोनवर तासनतास . त्यामुळे नाईलाजाने त्याला आईला सगळं सांगावं लागलं .


        प्रियाला सांगितलं त्याने की आई आपल्या बाजूने आहे . तिला आपल्याबद्दल मी सारं काही सांगितलं आहे . तुझा फोटो देखील पाहिला तिने . आईला तू पसंत आहेस , आता मला काळजी आहे ती फक्त तात्यांची .

"वो भी मान जाएंगे किरी , हमारा प्यार देखके. "

                 खरं तर आईलाही हे मान्य नव्हतं , पण मुलाच्या सुखासाठी तिनेही होकार दिला . मोठ्याच झालं की मग घरात तुझा विषय काढेन मी . आई तर तयार झाली पण वडिलांना कोण सांगणार .


         वडिलांना ते तात्या म्हणायचे , खूप कडक शिस्तीचे , त्यांच्यापुढे कोणाची बोलायची हिंमत होत नसे . त्यामुळे ते लवकर तयार होणार नाही हे माहितीच होते . पण भीतीपेक्षा प्रियावर प्रेम जास्त होते त्यामुळे धाडस करून विचारावे तर लागणारच .


 
           आईने घरात लग्नाचा विषय काढला की किरण भलताच खुश व्हायचा . भावाच लग्न झालं की आपला मार्ग मोकळा अस त्याला वाटायचं .

          मोठ्या सोबतच लहाण्यासाठी देखील स्थळ बघायला पाहिजे , अस आई जेव्हा वडिलांना सांगायची तेव्हा ते म्हणायचे, " पहिले मोठ्याला तर पसंत करू दे ..मग लहाण्याचं बघा . उगाच आत्तापासूनच त्याच्या डोक्यात हे लग्नाचं खुळ घालू नका . राहू द्या त्याला एकट्याला निवांत . नंतर लग्न झाले की आहेच संसार मागे ."

        "  पण किरणने तर मुलगी बघून ठेवलीये आधीच" , आई पटकन बोलून गेली . भीती तर तिलाही वाटली होती त्यावेळी . हे जेव्हा तात्यांना कळले तेव्हा ते खूप नाराज झाले ," मोठ्याच अजून व्हायचं आहे आणि ह्या लहाण्याला काय घाई झालीये लगेच . मुलगी पण पसंत करून ठेवली ह्याने , ते ही आम्हांला न विचारता . नको ते उद्योग करायला कस जमत बरं ह्याला .

          घरी बोलवून घ्या किरणला , बोलायचं आहे म्हणा मला त्याच्याशी जरा . ताबडतोब निरोप द्या त्याला . बाहेर शिकायला पाठवलं , नोकरीसाठी ही बाहेरच राहिला .... हे असलं प्रेम बीम करण्यासाठी का ????

           म्हणून सांगत होतो तुला पोरांचे नसते लाड करू नका . पण तुम्हालाच लै काळजी त्याची , थोडं काही झालं की लगेच पाठीशी घालायचं त्याला . पण आता मी सांगेन तेच होणार . आणि तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही . "

            आईने भीत भीतच फोन केला किरणला , "ह्या आठवड्याच्या सुट्टीला घरी ये म्हणून सांगितलंय तात्यांनी . त्यांना कळलंय तुझ्याबद्दल , म्हणजे माझ्याकडूनच चुकून बोलल्या गेलं ते . "

      "आई , तू काळजी करू नकोस . मी येतो घरी , शुक्रवारी बसेन इथून मग शनिवारी पोहोचेन मी घरी सकाळी . आल्यावर बोलू आपण . "

           " सांभाळून ये रे पोरा , तू घरी येईपर्यंत जीव लागत नाही माझा कशात . आणि हो , तात्या काहीही बोलले तरी ऐकून घे त्यांचं , मनाला लावून नको घेऊ . आपण बघू काय करायचं ते पुढे . पण आत्ता तू काहीच बोलू नकोस त्यांना , त्यांचं मन नको दुखवू . "

"हो आई , चल ठेवतो मी फोन आता . आल्यावर बोलू आपण . "

एसी मध्ये बसून सुद्धा किरणला चांगलाच घाम फुटला होता . कामात लक्ष लागेना त्याच , सारख्या चुका होत होत्या त्याच्याकडून . एकदा तर बॉसचा ओरडा पण बसला .

             प्रियाला समजले , नक्कीच काहीतरी गडबड आहे . ऑफिस सुटायच्या वेळी ती त्याच्या डेस्क वर जाऊन त्याच्याशी बोलू लागली .

        " किरण , क्या हुआ हैं . तुम क्यू इतना परेशान हो . मैं सूबह से देख रही हूं तुमको . बोलो ना कुछ तो . मैं कुछ हेल्प करू तुम्हारी . "

"नहीं प्रिया , कुछ खास नहीं . "

"अगर बताना नहीं चाहते तो ठीक हैं , मैं जबरदस्ती नहीं करुंगी तुम्हे . "

"ऐसा नहीं हैं प्रिया .... !"

"तो फिर क्या प्रॉब्लेम हैं ??? "

"तात्यांना समजलंय आपल्या बद्दल प्रिया ...!"



सौं तृप्ती कोष्टी 

जिल्हा - सांगली , सातारा . 

🎭 Series Post

View all