प्रत्येक सुदामाला कृष्ण भेटत नाही ! पार्ट 1

.
कृपीनंदन अश्वत्थामा याचा राज्याभिषेक झाला. गुरू द्रोणाचार्य यांच्या नेत्रांमध्ये आनंदाश्रू वाहू लागले. ते पांडवांजवळ गेले.

" तुम्ही आज जी वीरता दाखवली त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तुम्ही माझे शिष्य आहात याचा मला अभिमान वाटतो. " द्रोणाचार्य म्हणाले.

" गुरुवर्य , भक्त कितीही श्रेष्ठ असला तरी ज्या ईश्वराची तो भक्ती करतो त्याहून श्रेष्ठ होऊ शकत नाही. तुम्ही दिलेल्या विद्येमुळेच आम्ही हा शौर्य गाजवण्यास पात्र झालो. आम्ही गुरुदक्षिणा देण्यास समर्थ ठरलो ते आपल्या आशीर्वादामुळेच." पार्थ म्हणाला.

थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या आणि उदास मुख बनवलेल्या दुर्योधनाला पाहून द्रोणाचार्य यांना वाईट वाटले. ते दुर्योधनाजवळ गेले.

" हे गांधारीनंदन , तुझ्या सुर्यासम तेजस्वी मुखावर हे नैराश्याचे भाव शोभत नाहीत. युद्धात विजय पराजय होतच असते. परंतु खरा वीर नेहमीच शौर्यतापूर्वक संकटांचा सामना करतो. तो विजयामुळे अहंकारी होत नाही वा पराजयामुळे खचून जात नाही. त्यामुळे हे धृतराष्ट्रनंदन , नैराश्य झटकून मुखावर प्रसन्नतेचे भाव आण. " द्रोणाचार्य म्हणाले.

" अवश्य गुरुदेव. " दुर्योधन म्हणाला.

थोड्या वेळाने महाराज धृपद यांना कैद्याप्रमाणे राजसभेत आणले गेले. त्यांचे बांधलेले हात पाहून द्रोणाचार्य यांना वाईट वाटले.

" माझ्या मित्राचे हात मुक्त करा. " द्रोणाचार्य म्हणाले.

सेवकांनी ती आज्ञा पूर्ण केली.

कौरव , पांडव आणि स्वतः द्रोणपुत्र अश्वत्थामा टक लावून पाहत होते. आता काय होणार ? पांचालनरेश यांना मृत्यूदंड मिळेल का ? अश्या असंख्य प्रश्नांचे काहूर सर्वांच्या मनात माजत होते. द्रोणाचार्य काही क्षण भूतकाळात गेले.

क्रमश...

🎭 Series Post

View all