Login

प्रतिक्षा फक्त तूझीच भाग ३८

तो तिच्या पाठीमागे असल्याने आत शिरल्या शिरल्या त्याने लगेच तिच्या खोलीच दार लावून घेतलं. दार लॉक झाल्याचा आवाज येताच अश्विनीने गरकन मागे वळून पहिले. तर नीरज तिच्याकडे मिश्कील होऊन बघत होता.
मागील भागात.

‘मी त्याला कॉलेजपासून आवडत होती?’ रागात असणाऱ्या अश्विनीच्या गालावर या वाक्याने हलकीशी लाज चढली. त्याने तेव्हा दिलेला शब्द आजवर पाळला होता. आपल्यावर इतकं कोणी प्रेम करू शकत का? ही भावना, हा विचार पूर्ण व्यक्ती बदलावयाची ताकत ठेवत असते. त्यापुढे अश्विनीचा हा लटका राग तरी किती टिकणार होता.

ती तिच्याच विचारात तिच्या केबिनला पोहोचली आणि त्या केबिनचं दार उघडलं. तिने समोर पाहिलं ते तिथल्या एका खुर्चीवर कोणीतरी पाठमोरी बसलेलं होत. ते बघून अश्विनी गोंधळून गेली आणि त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीच्याजवळ गेली. ती हळू हळू चालत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या समोर गेली आणि पुढे ती काही बोलणार तोच ती स्तब्धच झाली.

आता पूढे.

अश्विनीच्या घरात रक्षा, विकास, तन्वी आणि सुहास बसलेले होते आणि ते सगळेच नाश्ता करत होते. ह्या तिघांना येता येता दुपारचे बारा वाजले होते. दारात अश्विनी आणि नीरजला बघून अश्विनीच्या आईने दोघांना आवाज देत घरात यायला सांगतिले. त्या दोघांच्या पाठीमागे लपून विशाखाही येत होती. ती मागे असल्याने अश्विनीच्या आईला ती काही दिसली नव्हती.

जसे ते दोघे टेबलाजवळ पोहोचले. तस विशाखाने हळूच मागून जात अश्विनीच्या आईला “भोऽऽऽऽऽ“ असा जोरात आवाज दिला.

तसे सगळेच विशाखाकडे गोंधळून बघू लागले. अश्विनीची आई देखील घाबरून दोन क्षण विशाखाला बघत राहिली. नंतर ती आल्याची जाणीव झाली. तस त्यांनी तिला प्रेमाने कवेत घेतलं होत. प्रेम दाखवून झाल्यावर त्यांनी तिचे कानही ओढले.

तस त्या टेबलावर हास्याचे कारंजे उडाले. फक्त नीरज आणि अश्विनी या सर्वाना गोंधळून बघत राहिले होते.

“बस रे,” सुहास यांनी नीरजला आवाज दिला. “तुझीच सासुरवाडी आहे. बिनधास्त बस.” ज्याचा सूर चिडवण्याचा होता. ते वेगळ काही सांगायची गरज नाही.

तसा नीरजने दीर्घ श्वास घेतला आणि अश्विनीकडे पाहिलं. तिनेही तिच्या कपाळाला भुवयांच्यामध्ये तिच्या बोटांनी धरून दाबू लागली. आजच्या घराच्या साफसफाईच कारण तिला आता समजलं होत.

तिकडे नीरजलाही त्याच्या घरच्यांचं गालात हसणं आता समजून आल होत. मग त्या दोघांनीही एकमेकांवर नजर टाकली आणि त्या जेवणाच्या टेबलावर एकमेकांच्या शेजारी बसून घेतलं.

अश्विनी त्याला आवडते एवढचं त्याच्या घरच्यांना माहिती होत. पण नंतर फक्त एक दिवस दिसणार नाही म्हणून अस्वस्थ झालेला नीरज, तिच्यावर संकट आल म्हणून घाईघाईत आलेला नीरज, स्वतः कंपनीचा मालक असताना नोकर म्हणून काम करणारा नीरज. जिच्यामुळे आपला मुलगा बदलला तिने इतक्या दिवसानंतर दिसलेल्या नीरजचं तिच्या घरात केलेलं कौतुक. या सारख्या अनेक गोष्टी विचारात घेता विकास आणि रक्षाने सरळ अश्विनीच घर गाठलं होत.

तर दुसरीकडे आपल्या मुलीच्या चिंतेत बसलेल्या त्या आईला बघून कांताला ही राहावल गेल नव्हतं. मग तिने नीरजबद्दल सगळ काही तिला सांगून दाखवलं होत. आपल्या नंतर कोणीतरी तिला इतका जीव लावेल. हा विचार करूनच अश्विनीच्या आईला खूपच आनंद झाला होता.

कांता मावशीने नीरजकडून काही इमर्जन्सीसाठी त्याच्या घराचा नंबरही आधीच मिळवला होता. नीरजलाही तो नंबर देण्यात काही वावगे वाटले नाही. कारण ती त्या नंबरवर जरी फोन करेल तरी ती फक्त त्याच्याशीच बोलेल हा त्याचा समज होता.

मग काय? जसा तो नंबर मिळाला तसा तिने सरळ रक्षासोबत संपर्क साधला. नीरजच्या बोलण्यावरून कांताला समजलं होत की त्याने त्याच्या घरच्यांना अश्विनीबद्दल सगळ काही सांगितल होत आणि त्यांनाही अश्विनी आवडली होती. म्हणून कांताने अश्विनी आणि नीरजला अंधारात ठेवून त्यांच्या कुटूंबाला एकत्र आणण्यासाठी हा मार्ग निवडला होता.

काही दिवसांपूर्वीच तर ते अश्विनीच्या घरी येऊन गेले होते. आज तर त्यांचा हा दुसरा राउंड होता.

आता सगळं काही क्लीअर झाल होत. ते सगळेच ह्या दोघांना बघून गालतच हसत होते. मग तिथे अश्विनीला कुठे बसवलं जात होत? ती तशीच लाजून उठली आणि तिच्या खोलीकडे पळून गेली. कारण आज नीरजने तिला प्रपोज केल्याचं आणि तिने त्याला होकार दिल्याचं देखील त्याच्या घरच्यांना माहिती असल्याच तिला समजून गेल. जशी ती आत गेली तशी तिच्यामागे विशाखाही गेली.

त्याच दिवशी पसंती ठरली आणि अश्विनीच्या प्रमोशनची ऑफीशियल अनाऊन्समेंट झाल्यानंतर लगेच त्यांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. सध्यातरी त्या दोघांना बोलायची एकही संधी दिली गेली नव्हती. लाजून आत पळालेली अश्विनी बाहेर यायचं नावच घेत नव्हती. मग तन्वी देखील तिच्या खोलीत गेली. तशी ती पण त्या दोघींसोबत गप्पा मारण्यात रमून गेली. शेवटी अश्विनीच्या आईने तिला बाहेर बोलावलं. तेव्हा कुठे ती जराशी तयार होऊन बाहेर आली.

बाकीच्यांच्या गप्पा चालू होत्या. अश्विनीही रक्षा आणि विकाससोबत बोलत होती. पण नीरज तो मात्र अश्विनी कधी त्याच्याकडे बघते याकडे त्याच सारखं लक्ष लागून होत. ती देखील तितकीच हट्टी होती. इतके दिवस ऑफिसला राहून मैत्रीण बनवण्यासाठी त्याने जो तिला त्रास दिला होता. त्याचा बदला ती आता घेत होती. त्यात तिची परवानगी न घेता आधीच त्यांच नात जगापुढे जाहीर केल होत. ह्या सगळ्या गोष्टी आता जश्या तिला आठवत होत्या. तस ती आता त्याच्याकडे बघण्याच टाळून त्याला त्रास देणार होती.

नीरजची चाललेली ही चलबिचलता तन्वीच्या लक्षात आली. तिनेही नीरज आणि अश्विनीवर एकामागे एक चोरटी नजर टाकली. मग तिला अश्विनीचा तो नटखटपणा समजून गेला. ते बघून तिला तिच्या भावावर जरा दया आली. तिने जरा विचार केला आणि तिला एक कल्पना सुचली.

“आपण तर वहीनीच घर बघून घेतलं.” तन्वी जाणून मोठ्याने बोलली. तस सगळ्याचं लक्ष तिच्याकडे गेल.

तन्वीच्या तोंडून वाहिनी हा शब्द ऐकून अश्विनीच्या अंगावर लाजेने सरकन काटे आले.

“मग?” तन्वी तेवढचं बोलून थांबली म्हणून रक्षाने विचारलं.

“आपल्या दादाने तर पहिलाच नाही की.” तन्वी उत्साहात बोलून गेली.

इकडे नीरजच्या मनात लगेच आनंदाचे कारंजे उडाले ना. तिकडे अश्विनीला पण तन्वीचा रोख समजून आला.

‘ही पण जाम बदमाश दिसते, अगदी त्याच्यासारखी.’ अश्विनी तन्वीकडे लटक्या रागात बघत मनातच बोलली.

एवढा वेळ गप्पात रंगलेल्या मोठ्या माणसांना आताशी नीरज दिसला होता. जो तोंड पाडून बसला होता. अश्विनीची आई पुढे काही बोलणार तोच विशाखा उत्साहात येऊन बोलली.

“एवढचं ना,” विशाखाने आता अश्विनीला तिच्या हाताने हलकेच कोपरा मारला. “आशु दाखवून आणेल ना जीजूंना.” विशाखाचा स्वर बराच खट्याळ होता.

अश्विनी मनातच ‘कुठल्या जन्मीचा बदला घेत आहेत ह्या दोघी? आता मी बघत नाही म्हटल्यावर तो नक्कीच काहीतरी..’ पुढची तिला कल्पनाही करवली जात नव्हती.

“जा आशु,” अश्विनीची आई शेवटी बोललीच. “त्यांना आपल घर दाखवून ये.”

मग अश्विनी हलकेच उठली. तिकडे नीरज तर केव्हाचा तयार होता. तो तर लगेच उठून तिच्या मागे येऊन उभाही राहीला. तस बाकीच्यांच्या नकळत तिने त्याच्यावर डोळे देखील वटारले. मग अश्विनी त्याला त्यांच घर दाखवायला घेऊन गेली. तर बाहेर परत त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. त्यात तन्वी आणि विशाखा खूपच वैतागून गेल्या. मग त्याही हळूच तिथून सटकल्या आणि त्या घराच्या बाल्कनीत गेल्या.

इकडे अश्विनी नीरजला घर दाखवता दाखवता तिच्या खोलीत जाऊन पोहोचली. तो तिच्या पाठीमागे असल्याने आत शिरल्या शिरल्या त्याने लगेच तिच्या खोलीच दार लावून घेतलं. दार लॉक झाल्याचा आवाज येताच अश्विनीने गरकन मागे वळून पहिले. तर नीरज तिच्याकडे मिश्कील होऊन बघत होता.

“आता कशी दुर्लक्ष करशील?” नीरजने तिच्याजवळ जात तिला विचारलं.

तशी अश्विनीने लाजून तिची नजर खाली करून घेतली. ज्याची तिला भीती वाटत होती शेवटी तेच झाल होत. आजवर त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारी ती आज त्याच्यासमोर नाजूक ससा झाली होती. आजवर तिने त्याला कोणकोणत्या नावाने आणि कोणासमोर बोलली होती. ते सगळचं तिला आठवलं होत.

“काय गं?” ती काहीच बोलत अथवा करत नसल्याचे बघून नीरजने तिला विचारलं. "आज नाही काही बोलणार? माकड? आं?”

“सॉरी, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे.” अश्विनी तिची नजर खाली ठेवत नाजूक आवाजात बोलली.

“ही ती अश्विनी नाही जिच्या मी पेमात पडलो होतो.” नीरज जरा गंभीर झाला.

तस तिने नीरजकडे चमकून पाहिलं.

“हो, जी अश्विनी मला हवी आहे, ती ही नाहीये.” नीरज तिच्या डोळ्यात हरवत बोलला.

“ती अश्विनी तर तुमच्या प्रेमापुढे कुठल्या कुठे पळून जाते.” अश्विन लाजतच बोलली.

तस नीरजने तिला तिच्या कमरेतून पकडून स्वतःकडे ओढले. हे सगळ अचानक झाल्याने अश्विनी जरा घाबरलीच आणि तिचा पाय आपोआप पटकन वर आला. जसा तो वर आला तसा त्याच्या पोटात तिचा गुढघा बसला. हे पण अचानक झाल्याने नीरज त्याचा पोटाला पकडून लागलीच तिच्यापासून लांब झाला. तो सरळ तिच्या बेडवर जाऊन पसरला.

“स... सॉरी.” त्याला कळवळताना पाहून अश्विनी लगेच त्याच्या जवळ गेली. “म्हणून त्या अश्विनीला मी लांब पाठवून देते.”

अश्विनीला जवळ आलेलं बघून नीरजने पटकन तिला जवळ ओढून घेतले आणि तिला त्याचा खाली आणत तो तिच्यावर ओणवा झाला. त्याच्या हातांनी दोघांमध्ये अंतर ठेवलं होत.

“हे काय?” अश्विनीने आठ्या पाडून विचारलं.

“शिक्षा,” नीरज “माझ्या अश्विनीला लांब पाठवल्याबद्दल.”

अश्विनीने लाजून तिची मान बाजूला वळवून घेतली. तस त्याने लगेच तिची मान धरून सरळ केली आणि तिच्या चेहऱ्यावर तो झुकू लागला. अश्विनीनेही तिचे डोळे मिटून घेतले. थोड्याचवेळात ओलसर ओठांचा स्पर्श झाला. जिथे स्पर्श झाला तिथे लगेच आठ्याही जमा झाल्या.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all