मागील भागात.
केदारला तिथल्या स्टाफने तपासणीच्या नावाखाली त्या हॉस्पिटलच्या एक कोपऱ्यातल्या तळघरात नेऊन ठेवलं. नीरजही सरळ तिथेच गेला आणि सरळ त्याच्या समोर जाऊन बसला. केदार त्याला गोंधळून बघत राहीला. जरी तो घाबरलेला दिसत होता. तरी तो नीरजला सरळ काहीच उत्तर देणार नव्हता. म्हणून नीरजने त्याच्यासमोर बसल्यावर एक फोटो त्याच्यासमोर उघाडला आणि बोलयला लागला.
“तुझी भाची ना ही?” नीरज क्रूर हसत बोलला.
तस केदारच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. “हे बघा साहेब, काय ते आपल्यातच ठेवा तिला आपल्यात आणू नका.”
आता पूढे.
“मग अश्विनीला का घेतलं?” नीरज रागात गरजला. “आणि ती तुला का एवढं घाबरते?”
तसा केदार घाबरून इकडे तिकडे बघू लागला. त्याने फक्त तिला हात लावला तर नीरजने त्याची ही अवस्था केली होती. बाकी सांगितलं तर हा काय करेल? हा विचार करूनच त्याच्या हातापायातले त्राण गळून गेले होते.
“तुझ्याकडे फक्त पाच मिनिट आहेत.” नीरज हातातल्या फोटोकडे बघत बोलला.
“सांगतो,” केदारकडे आता कुठलाही पर्याय शिल्लक राहीला नव्हता. “त.. ते ती तिच्या बाबांचं निधन झाल्यावर तिला घरात माझ्या बहिणीने फक्त मोलकरीण बनवून ठेवलं होत. तिच्यावर कोणाचाही विश्वास नव्हता. मग दोन वेळेस मी ते जरा..” आता केदारची जीभ अडखळली.
“लवकर बोल.” नीरज त्याच्या कानात प्राण आणून आणि धीर एकवटून त्याच बोलण ऐकण्याचा प्रयत्न करत होता.
“लग्न झालं नव्हतं ना माझ,” केदार आता चाचरतच बोलू लागला. “मग तिच्यावर माझी नजर गेली. दोन वेळा प्रयत्न केला मी तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा. पण दोन्ही वेळेस ती घाबरून बेशुद्ध पडून गेली होती. पहिल्या वेळेस तर मी खूपच घाबरून गेलो होतो. म्हणून तेव्हा तिला तसचं टाकून पळून गेलो. दुसऱ्या वेळेस मात्र तिला बघून तरी घेऊ. म्हणून ती बेशुद्ध पडल्यावर मी तिचे सगळेच कपडे काढून ठेवले होते. मग तिला असं वाटायला लागल की आमच्यात सर्व काही झाल आहे. म्हणून ती घाबरायची. त्याचाच फायदा घेऊन मी तिला माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.”
केदार पुढे काही बोलणार तोच त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा पडला. सांभाळायला हातच नसल्याने तो सरळ मागे कलंडला गेला. त्याचे पुढचे दोन दातही तुटले गेले.
“तुझ्या भाचीने आमच्या ठाणेच्या ब्रांचमध्ये जॉबसाठी अर्ज केला होता.” नीरज तिरकस हसत बोलला. “तेच तुला सांगायचं होत की तुझा हा पराक्रम तिला सांगू का? पण तू तर वेगळच अर्थ घेतलास. मला काय तुझ्यासारखा समजतो काय? ****.” नीरजने त्याला रागातच शिवी घातली आणि तिथून निघून आला.
केदार जाणाऱ्या नीरजला बघून फक्त पश्चाताप करत राहीला. कारण त्याच्या बहिणीने त्याच्या चुकांवर बरोबर पांघरून घातलेलं होत. त्यासाठी तिने तिच्या माहेरी देखील अश्विनीबद्दल तिरस्कारच पसरवला होता. त्यामुळे काकुच्या माहेरी देखील जे काही झाल त्यात फक्त अश्विनीचीच चुकी दिसली होती. केदारच्या त्या चुकांची ओळख त्याच्या घरी समजूनच दिली नव्हती.
त्याच्या मोठ्या भावाला मुलगी होती. तिचा फोटो बघताच केदार पूर्ण घाबरून गेला होता. आपल्या कर्माची शिक्षा तिला नको म्हणून केदारने सगळ काही पटापट सगळ काही सांगून दिल. पण जेव्हा नीरजने त्याला त्या फोटो दाखवण्यामागच खरं कारण सांगितलं, की तिने ठाणेला नीरजच्याच कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. ते ऐकून त्याला मेल्याहून मेल्यासारखं झाल.
नीरजच हे सगळं बोलण ऐकून रक्षा आणि विकास तर धक्यातच गेले.
“तो माणूस आहे ना?” रक्षा जरा टेन्शनमध्ये येत बोलल्या.
तसे विकास आणि नीरज तिच्याकडे गोंधळून बघत राहिले.
तसे विकास आणि नीरज तिच्याकडे गोंधळून बघत राहिले.
“दादा बोलला ना की फक्त दात तोडलेत त्याचे.” तन्वीही जरा चिडून बोलली. “मी तर हातच मोडले असते.”
तसा इकडे विकासने त्यांच्या कपाळाला हात लावला. “त्याला तिकडे चालायच्या लायकीचा नाही ठेवला आणि तू हात तोडायच्या गोष्टी करतेस?”
तशी तन्वी पण नीरजला आश्चर्याने बघू लागली.
“म्हणजे ती अजूनही त्याच समजुतीमध्ये आहे की त्याने..?” रक्षा बोलता बोलता थांबली.
“हो, म्हणून तर ती लग्नासाठी नाही म्हणत आहे.” नीरज उसासा टाकत बोलला.
“मग लवकर दूर कर हा गैरसमज.” रक्षा काळजीने बोलली.
“ते तर करणारच आहे.” नीरज विचार करत बोलला. “पण समजा तस काही झाल असतं तर तुम्ही तिला स्वीकारलं असत? कारण मी लग्न तर तिच्यासोबतच करणार होतो ना.”
तशी रक्षा विचारात पडली. तिकडे तन्वीपण तिच्या आईच्या उत्तराची वाट बघत होती. शेवटी ती पण एक मुलगीच होती ना.
“का नाही?” रक्षा ठोस आवाजात बोलली. “ती स्वतःहून थोडीच गेली असती? आणि मी एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच मन समजून नाही घेतलं तर माझ्यातली ममता उद्या मलाच प्रश्न विचारेल.”
“खूप खूप धन्यवाद आई.” नीरज भावूक होवून बोलला.
“पण तुला खंबीर उभ राहवं लागेल हं.” विकास नीरजला धीर देत बोलले. “आम्ही तर नेहमीच तुझ्यासोबत असू.”
“उद्या बरचं काही क्लिअर होणार आहे.” नीरज जरा निवांत झाला होता. “जरी ती नकारावर ठाम राहिली तर तुम्ही प्लीज.” नीरज विनवणीच्या सुरात बोलला.
तसा विकासला ठसका गेला. तर रक्षा गालातच हसू लागल्या. तिकडे तन्वीने पण तिला येणार हसू कसबस आवरून घेतलं.
“तुम्ही काही केल तर नाही ना?” नीरज ह्या तिघांकडे बारीक डोळे करून बघू लागला.
तसे ते तिघेही एका सुरात बोलले. “आम्ही साधी माणसं काय करणार?”
तसे ते तिघेही एका सुरात बोलले. “आम्ही साधी माणसं काय करणार?”
तस नीरजचा संशय अजूनच बळावला.
“तुला माझ्यावर विश्वास आहे ना?” रक्षा नीरजच्या डोळ्यात बघून बोलली. तस नीरजने होकारात मान हलवली.
“बरं ते उद्या तू काय करणार आहेस ते तिला सांगितलं नाही ना?” विकासने विषय बदलला.
“ते तुम्हीच तर तिला सांगितलं ना.” नीरज विचार करत बोलला.
तसे बाकीचे तिघेही उठून जाऊ लागले.
“बाबा तुमचा मुलगा कामातून गेलाय.” तन्वी हसतच नकारार्थी मान हलवत बोलली.
तसा नीरज उठून जाणाऱ्या ह्या तिघांकडे बघत विचारात पडला. ‘आता मी काय केल?’
पण त्याच्या ह्या शंकेच निरसन करायला कोणीही तिथे थांबल नाही. मग तोही गपचूप त्याच्या खोलीकडे निघून गेला.
अखेरीस तो निकालाचा दिवस उजाडलाच. पण अश्विनीला त्याची काहीच उत्सुकता नव्हती. कारण तिच्या मते तो खरा सीईओ नव्हताच. एवढं सगळं काही बघूनही तिला तो अजूनही खरा सीईओ वाटत नव्हता. त्यात येणारा नवीन प्रोजेक्ट तिच्याकडे देण्याचाही निर्णय आधीच झाला होता. म्हणून ती जरा निवांतच होती.
अश्विनीची ह्या दिवसाची सुरवातही नेहमीप्रमाणे आईच्या कमरेवर हात ठेवलेल्या रुक्मिणी मातेच्या रुपात दिलेल्या दर्शनाने झाली. पण आज चक्क ती अश्विनीला काहीच ओरडत नव्हती. एक खुशीची चमक तिच्या चेहऱ्यावर अश्विनीला दिसत होती. त्याच कारणही तिने तिच्या आईला विचारलं. पण तिच्या आईने मात्र काहीही उत्तर देत तिला सरळ सरळ टाळलं. मग अश्विनी उठून तिचं तिचं आवरायला गेली.
अश्विनी तिचं आवरून जशी हॉलमध्ये आली तस कांता मावशीचीही नजर तिच्याचवर असल्याचे तिला जाणवायला लागले.
‘ह्या दोघींनी काही करामत तर केली नाहिये ना?’ अश्विनीच्या मनात हा प्रश्न फिरू लागला. मग अश्विनीची नजर त्या हॉलमध्ये फिरू लागली. तिथे सगळं काही स्वच्छ दिसत होत. अगदी दिवाळीत सफाई करावी तशी साफ सफाई केलेली तिला जाणवली. आता तर अश्विनी त्या दोघींना अजूनच बारीक डोळे करून बघू लागली.
‘नक्कीच काहीतरी उचापती केलेली दिसत आहे या दोघींनी.’ अश्विनी मनातच विचार करत किचनकडे जाऊ लागली. त्या दोघींना ती जाऊन सरळं सरळं काय केलं? ते विचारणार होती.
ती किचनमध्ये जाऊन काही बोलणार तोच तिच्या आईने तिच्या हातात चहाचा कप दिला आणि तिला सरळ नाश्त्यासाठी टेबलाकडे पाठवलं. तेही तिला बोलायची एकही संधी न देता तिच्या हाताला पकडून तिच्या आईने तिला टेबलापर्यंत पोहोचवले.
आपल्या आईच असं वागणं बघून अश्विनी पुरती गोंधळून गेली. आजवर काम करत नाही म्हणून तासभर प्रवचन देणारी आई, आज चक्क मला बसायला लावत आहे. हा विचारच तिला स्वस्थ बसवून देत नव्हता.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा