Login

प्रतिक्षा फक्त तूझीच भाग २६

नीरजच्या वागण्याने अश्विनीला आता त्याच्यावर जरा शंका यायला लागली होती. कारण त्याच्या वागण्यात तिच्या कॉलेजच्या त्या आठवणींची झलक दिसायला लागली होती. ज्या की तिने फक्त तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीसोबत जागल्या होत्या.
मागील भागात.

“गुड मॉर्निंग फ्रेंड.” नीरज उगाच त्याची बत्तीशी दाखवून बोलला.

अचानक आलेल्या आवाजाने कामात असलेली अश्विनी जरा दचकलीच. तिने तिची खाली असलेली मान वर करून पाहिलं तर तिला नीरज दिसला.

“अंऽऽ” अश्विनी गोंधळून बोलली. “हा गुड मॉर्निंग सर. काही काम होत का?”

“नाही.” नीरज त्याची खांदे हलकेच उडवत बोलला. “म्हटल आपल्या फ्रेंडला भेटुया.”

“फ्रेंड?” अश्विनीच्या चेहऱ्यावर आठ्या पाडल्या.

आता पूढे.

तिच्या चेहऱ्यावरच्या त्या आठ्या बघून नीरज बोलायला लागला.

“त्या दिवशी तर झाली होती न फ्रेंडशिप.” नीरजने तिला आठवण करून दिली. “आता अस मागे फिरायच नाही.” नीरज उगाच लटका राग दाखवून बोलला.

“ठिक आहे सर.” अश्विनी हसत बोलली. कारण नीरज बाकीच्या मुलांसारखा नव्हताच आणि आताही कामाच्या ठिकाणी काम आणि मस्तीच्या ठिकाणी मस्ती, ती देखील मर्यादित. त्यामुळे त्याच्याशी ती हसतमुखाने बोलायला लागली.

परत दिवसांनी त्यांचा वेग पकडला. नीरज कामाच्या वेळेत खूपच कडक रहायचा. पण कामाव्यतिरिक्त तो खुल्या मनाने जगत होता. अश्विनीच्या सोबत राहून त्याला ऑफीसमधल्या प्रत्येक मेम्बरचे स्वभाव, कामाची पध्दत समजली होती.

लंचटाईमला नेहमीच इतर कोणासोबतही न जेवणारा नीरज आता फक्त अश्विनीसोबत जेवण करायला लागला होता. असही त्यांची आधीची ओळख होती आणि त्याची मनमोकळी वृत्ती अश्विनीला आता आवडू लागली होती. तिची सोबत सुटल्यानंतरही नीरजने स्वतःमध्ये खूप सारे बदल घडवलेले तिला जाणवून येत होते. मग त्याच्यासोबत मन मोकळ वागण्यात अश्विनीला काहीच वावगं वाटतं नव्हत.

त्याच्यासोबत रहाताना त्याची लहान मुलापासून वयस्कर मंडळीपर्यंत प्रत्येकासाठी मैत्री असल्याच तिला जाणवलं होत. आता तो नक्की कोण आहे? हे तिला जाणुन घ्यायचं होत. कारण तिच्या कॉलेजचा जुना सहकारी या व्यतिरिक्त त्याची कोणतीही ओळख तिला नव्हती. तो कामाच्या बाबतीत खुपच हुशार होताच. पण त्याचबरोबर आयुष्य जगण्यातला आनंदही तो बरोबर घेत होता. अश्विनीला नेमक तेच जमत नव्हतं. जमतं नव्हतं म्हणजे तिने ते जगणंच सोडलं होत. त्यामुळे कधीकधी त्याचा तिला राग पण येत होता आणि कधीकधी त्याचा हेवा पण वाटतं होता.

त्यांची मैत्री आता ऑफीसमध्ये पसरू लागली. तशी ती काहींना जरा खटकायलाच लागली. एवढी साधी मुलगी डायरेक्ट सीईओसोबत असते. बाकी कोणत्याही पुरुष स्टाफसोबत ती इतक मोकळ बोलत नव्हती, जेवढं की ती सीईओसोबत वागत होती. याचा वेगळाच अर्थ तिथल्या स्टाफने काढायला सुरवात केली. अधूनमधून रेवा आणि संतोषला याबद्दल विचारणा पण होत होती. पण रेवा आणि संतोष आता त्यांना चांगलच उत्तर द्यायला शिकले होती. शेवटी ते अश्विनीकडुनच सर्व शिकले होते.

नीरजच्या वागण्याने अश्विनीला आता त्याच्यावर जरा शंका यायला लागली. कारण त्याच्या वागण्यात तिच्या कॉलेजच्या त्या आठवणींची झलक दिसायला लागली होती. ज्या की तिने फक्त तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीसोबत जागल्या होत्या.

यासर्व गडबडीत तो महीना संपायला देखील आला. नीरजने त्याचे सगळेच रिपोर्ट जमा करुन त्याच विश्लेषण करायला सुरवात केली. त्या विश्लेषणाच्या निष्कर्षावर तो त्याचा निकाल सांगणार होता. आता सगळ्यांनाच त्या निकालाची आतुरता लागली.

तो निकाल लावण्याच्या दोन दिवस आधीच अश्विनीला मुंबईच्या मुख्य ऑफिसला परत बोलावले गेले. ह्यावेळेस त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पण येणार होते. म्हणून विकासने नीरजजवळ निरोप पाठवून तिला मुंबईच्या मुख्य ऑफिसला त्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले.

आता आजचा पूर्ण दिवस ती दिसणार नाही म्हणून नीरजने त्यांच्या त्या मुंबईच्या ऑफिसमध्ये असलेले सीसीटीव्हीचे सगळेच कनेक्शन त्याच्या त्या ब्रांचमधल्या कॉम्पुटरमध्ये जोडून घेतलं. आता सगळीकडे इंटरनेट असल्याने ते नीरजच्या कॉम्पुटरमध्येच काय? त्याने तर त्याच्या मोबाईलमधेही करून घेतलं होत. आता तो इथे बसून तिथे जाणाऱ्या तिच्यावर सहज नजर ठेवू शकणार होता. थोडक्यात तिला सतत बघू शकणार होता.

वाशीच्या ऑफिसमध्ये आल्या आल्या नीरजने पहिले मुंबईच्या ऑफिसची सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज चालू करून ठेवली. त्यासोबतच त्याचही काम करणा चालूच ठेवलं.

जस जसा वेळ होत चालला होता. तस तस नीरजला टेन्शन यायला लागल. कारण अश्विनी अजूनही ऑफिसला पोहोचली नव्हती. दुपारचे बारा वाजून गेले तरी ती तिथे पोहोचली नाही. ते बघून नीरजने त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि तिला फोन लावायला तिचा नंबर शोधायला लागला. तसा तो लगेच त्याला भेटलाही होता. कारण तो स्पेशल नावाने सेव्ह जो केला होता. त्या नंबरवर तो फोन लावलणार तोच तिथल्या ऑफिसच्या रिसेप्शनजवळ त्याला अश्विनी दिसली. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. मग तो निवांत होऊन परत त्याच्या कामाच्या फाईल हातात घेऊन बसला.

दुसरीकडे अश्विनी आज सकाळी जरा लवकरच उठली होती. आज मुंबईला जायचं म्हणून ती तिचं घाईघाईत आवरत होती. तिचं सगळ काही आवरून झाल्यावर तिच्या आईने तिच्यासमोर नाश्ता आणि चहा ठेवला. आज तर ती जेवणाचा डब्बा काही घेऊन जाणार नव्हती. आज तिला मुंबईच्या ऑफिसमधेच जेवण भेटणार असल्याच तिला सांगण्यात आल होत. ही खास सोय फक्त आणि फक्त नीरज साहेबांकडून अश्विनीसाठी करण्यात आलेली होती. ज्यावर आज सकाळीच घरात नीरजला सगळ्यांनीच चिडवून चिडवून हैराण केल होत.

चहा नाश्ता झाल्यावर अश्विनी ऑफिससाठी निघायला लागली. तिने नेहमीप्रमाणे तिच्या गाडीच्या चावीला हात लावला. तस तिच्या आईने तिला लोकलने जाण्यासाठी सुचवले. कारण वाशीपासून ते ऑफिस बरचं लांब होत. तरीही अश्विनीने सकाळच्या वेळेस त्या लोकलला असणारी गर्दी आठवून तिने तिची गाडीच घेऊन जाणे सोयीस्कर समजले. पण ती जस जशी वाशी ब्रिज सोडून मुंबईमध्ये प्रवेश घ्यायला लागली. तस तिला रस्त्यावरच्या गाड्यांच्या गर्दीने हैराण केल होत. त्यामुळेच तिला ऑफिसला पोहोचायला आज उशीर झाला होता.

त्या ऑफिसच्या रिसेप्शनवरून तिला मीटिंग हॉलमध्ये पाठवण्यात आले. ती जशी त्या ऑफिसमध्ये फिरत होती. तस तस नीरज त्याच्या कॉम्पुटरवर तिथले कॅमेरे चालू करून तिला बघत होता. आज त्याने इथल्या ब्रांचमधल्या कोणत्याही स्टाफला त्याला भेण्यासाठी सक्त मनाई केली होती.

थोड्याचवेळात मुंबईच्या ऑफिसमधली मिटिंग सुरु झाली. तिथे जे काही चालू होत ते सगळच नीरज ऐकत होता. आज त्या मिटिंगला सुहास देखील आले होते. त्यामुळे मिटिंग सुरु होण्याआधी अश्विनीने एक दोन वेळा सुहास यांच्याजवळ नीरजचा माकडाच्या नावाने उद्धार केला होता. आता ते सगळच नीरज ऐकत होता. ते फक्त अश्विनीलाच माहित नव्हते, त्यामुळे आता नीरजवर हसावं की अश्विनीवर हे त्यांना समजत नव्हतं.

पुढच्या तासाभरात त्यांची मिटिंग आटोपली. तसा नीरज खुश झाला. कारण त्याला वाटलं होत की आता मिटिंग लवकर संपली आहे. तर ती नक्कीच वाशीच्या ऑफिसला येणार.

पण जे आपल्याला वाटत ते होताच अस नाही ना. त्यात संधी शोधणारे जर घरातलेच असतील तर अश्या वेळेस दुष्मनांचीही गरज लागत नाही.

ती मिटिंग संपल्यावर त्यांचा जेवणाचा कार्यक्रम सुरु झाला. मग नीरज नाखुशीनेच परत त्याच काम घेऊन बसला. थोड्याचवेळात जेवण झाली. आतातरी ती निघेल ह्या हेतूने तो पुन्हा उत्साहात आला.

पण तिकडे सुहास आणि विकास यांच्या मनात तर वेगळेच काही शिजत होत.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all