प्रतिकार ...

मैथिली सायन्सला अॅडमिशन घेऊन कॉलेजला तिच्या मैत्रिणींसोबत जाणारी अतिशय हुशार आणि चुणचुणीत मुलगी,पाच ते सहाजणींचा ग्रुप. मैथिली नीडर न घाबरता आपली बाजू मांडणारी आणि पटवून देणारी,तिला अन्याय तर अजिबात सहन होत नव्हता. दिसायला अगदी सुंदर. नेहमीचाच येणाजाण्याचा रस्ता,तिथेच कट्टयावर टवाळखोर मुलं टिंगळटवाळी करत होते,येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर घाणरेडे कमेंट पास करणे,कोणाला टॉन्ट मारणे हे सर्रास चालू होते. कपड्यावरून तर नको ते चुकून जर कोणत्या मुलीची अंतर्वस्त्र दिसलं तर त्यावरून घाण कमेंट करत होते.


 प्रतिकार..


      कधीकधी वेळीच कोणत्याही गोष्टीला प्रतिकार केला पाहिजे,गरजेचे असते ते नाहीतर समोरचा व्यक्ती आपल्याला गृहित धरून पून्हा पून्हा त्यांच चुका,अपराध करतो. प्रतिकार करत नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की,त्यांना जसं काय लायसन्स मिळाले आहे. तोंडात येईल ते बोलायला. अशामुळे त्याची हिंम्मत वाढते पुढचं पाऊल उचलायला. एक प्रकारे आपलीही जबाबदार असते,कारण वेळीच त्यांना विरोध प्रतिकार केला असता तर असे भयानक प्रकार कदाचित घडले नसते.

    



             मैथिली सायन्सला अॅडमिशन घेऊन कॉलेजला तिच्या मैत्रिणींसोबत जाणारी अतिशय हुशार आणि चुणचुणीत मुलगी,पाच ते सहाजणींचा ग्रुप. मैथिली नीडर न घाबरता आपली बाजू मांडणारी आणि पटवून देणारी,तिला अन्याय तर अजिबात सहन होत नव्हता. दिसायला अगदी सुंदर. नेहमीचाच येणाजाण्याचा रस्ता,तिथेच कट्टयावर टवाळखोर मुलं टिंगळटवाळी करत होते,येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर घाणरेडे कमेंट पास करणे,कोणाला टॉन्ट मारणे हे सर्रास चालू होते. कपड्यावरून तर नको ते चुकून जर कोणत्या मुलीची अंतर्वस्त्र दिसलं तर त्यावरून घाण कमेंट करत होते.





 मैथिली ही नवीन होती .

पहिल्या दिवशी अशीच पिंक टॉप व्हाईट कलरची लेगिंग आणि गळ्यात गुंडाळलेला पांढरा कलरचा स्कार्फ. अंगभर घातलेले कपडे तरीही त्यांच्यावर अशी घाणरेडी नजर जसं की शरीराच स्कॅन करतायत की काय? तिला हेच वाटायचं. त्या मुलांची घाणरेडी नजर बघून ती त्यांना उत्तर द्यायला जाणार तर तिच्या मैत्रीणींनी तिला अडवलं .




"जाऊ दे गं. ती मुलं चांगली नाहीत,नको त्यांच्या नादी लागू,मोठ्या घरचे बिघडलेले वाया गेलेले आहेत. आपल्या घरी माहिती पडलं तर आपल शिक्षण घेणचं बंद करतील." नैना त्यांच्यातील एक मैत्रिण.  




इथेही प्रतिकार केला नाही. पुढे जाऊन त्यांची हिम्मत आणखीनच वाढली.

   


कॉलेजमधून घरी जातांना ही असे बरेसचे नमुने भेटतात. जाणून बुजून धक्का मारणे,नको त्या ठिकाणी स्पर्श करणे, हातावर हात ठेवून दाबणे,या गोष्टीला विरोध नाही केला तर त्यांना आणखीच जोर सुटतो हे करायला .




 मैथिली आणि तिचा ग्रुप बसमध्ये चढले. बसमध्ये गर्दी असल्याने त्या सर्व उभ्या राहिल्या, रस्ताही चांगला होता,तरीही मागचा माणूस मैथिलीला धक्का मारत होता. एकदा दोनदा चुकून लागेल पण तरीही याचे तेच चालू होते. मग मैथिलीने कोपरानेच एक पोटात गुद्दा मारला. त्याच्या पोटात लागल्यामुळे तो लगेच बाजूला झाला. 

   


भरपूर ठिकाणी अश्या विकृत मानसिकतेचे लोक असतात.

  


 कॉलेजमधून येता जाता ही त्या टवाळखोर मुलांचं चालू होतं. ती नेहमी पाहत होती. 



एकदा एक सुनसान रस्त्यावर कॉलेजची मुलगी एकटीच जात होती. आज तिच्या मैत्रिणी नव्हत्या,तर या मुलांना तिला छेडण्याचा त्रास देण्याचा आयता चान्स मिळाला होता, तिला रस्त्यात त्या टवाळ खोर मुलांनी गाठले. तिचा रस्ता अडवला आणि एकजण तिच्या जवळ यायचा तिच्या छाती जवळ हात नेण्याचा प्रयत्न करत होता. तर तिथे मैथिलीने येवून जाणाऱ्या मुलाचा हात पकडून त्याला मागे ढकललं. दुसराही तिच्या अंगावर धावून आला, तर मिथिलीने पायानेच एक जोरात किक मारली तसा तो दूर ढकलला गेला. तिसरा मागून तिच्यावर धावून आला त्याने तिचे हात पकडायचा प्रयत्न केला. तर त्या हातानेच त्याला उचलून कपड्यांसारखा आपटला. मारता मारता ती त्या मुलांना बोलत होती,



"आज तर तुम्ही कहरच केला. या मुलीच्या जागी तुमची बहिण असती तर असेच वागले असते?"


"जोपर्यंत आम्ही शांत असतो सहन करतो तोपर्यंत ठिक नाहीतर आमचे दुर्गा ,काली, चंडीमध्ये परावर्तीत झाले तर तुम्हाला लपायला ही धरती पुरणार नाही. धरतीचे ओझचं आहे तुम्ही आणि तुमच्या सारखे लोक समजलं."



अश्या लोकांना समजत नाही .. 


डोळ्यांत राग होता. ती त्यांना जबरदस्त मारत होती.



तिच्या मैत्रिणी आल्या आणि तिला पकडून ठेवले. बाकीच्या मैत्रिणीनी त्या मुलांच्या पूर्ण परिवाराला बोलवले होते. त्यात त्यांची आई बहिण बाबा सर्व लोक आले होते आणि मैथिली पकडून त्यांना त्यांच्या समोर हजर करत होती. त्या आई-वडिलांनी तर त्यांच्या मुलांच्या थोबाडीत मारले. वरून सर्वांसमोर त्यांच्या मुलांमुळे शरमेने त्यांना मान खाली घालावी लागली. त्यांनी स्वतः च नाही तर त्यांच्या आईवडिलांच नाव धुळीस मिळवलं होतं.

  



 थोड्या वेळात पोलिस आले आणि त्या मुलांना अटक करून घेऊन गेले. 



मैथिलीच्या मैत्रिणी तिच्याजवळ आल्या व तिला म्हणाल्या ,



"मैथिली तुझ्यात एवढी शक्ती आली कुठून?"



"माहिती नाही गं. अशी एकदम उर्जा संचारली अंगात मला फक्त तिच्या अंगावर जाणारा हात दिसला. मग मी पुढचा विचार केलाच नाही आणि गेले."



ती त्या मुलीजवळ जाऊन म्हणाली




"का ?उत्तर देऊ शकली नाहीस तू? का हिंम्मत केली नाही तू? का वाट पाहत होती की ते पुढे काय करतील म्हणून 

भारतात जन्म घेतला आहे आपण जिजाऊंच्या लेकी आहोत. आपण शरीरावर पडणारा हात त्याच्या दंडापासून छाटून टाकला पाहिजे. ही शक्ती आपल्यात असते फक्त तिला जागी करावी. आता रडू नकोस आणि काळजी घे.".

ती "हो." म्हणून निघाली . .




"चल घरी जाऊ या."



घरी आल्यावर जो तो व्यक्ती शाबासकी देत होता. कारण त्या मुलांना मारण्याचा व्हिडिओ मोबाईल वर व्हायरल झाला होता .


 तेवढ्यात शेजारची मीना काकू आली हातात मोबाइल घेऊन तो व्हिडिओ दाखवायला.



"अहो मैथिलीची आई! हे बघा मैथालीचा व्हिडिओ,माझी मैथिली कुठे आहे?" मीना काकू व्हिडिओ दाखवत म्हणाल्या .




काकूंचा आवाज आला तशी मैथिली बाहेर आली . 




"काकू या नं बसा. "



"शाब्बास मैथिली बाळा आज तू जे केलयं नं ते, मला अभिमान आहे तुझा."



"काकू विशेष असं काहीही केलेलं नाही मी."



"नाही बाळा जे काही तू आज केले आहे न तसेच जर पिंकीने केले असते तर ती आज आपल्यात असती."



"काकू पिंकीने थोडी हिम्मत केली असती तर." पिंकीच्या फोटोसमोर उभी राहत म्हणाली .



पिंकी मैथिलीची बालपणीची मैत्रिण,सोबतच वाढलेल्या पण दोन वर्षाआधी पिंकी ही देवाघरी गेली. लाजरी बुजरी स्वभावाची पिंकी. अकरावीचे पेपर देऊन मैथिली आणि पिंकी यांना सुट्ट्या लागल्या होत्या. सुट्टीत काय करायची याचे नियोजन सुरु होते. पिकनिक, क्लासेस आणखी काय काय करायचे त्याचा विचार सुरु होता.



"डान्स क्लास. " पिंकी



"नो.आधी कराटे क्लास." मैथिली.



" ये मिठ्ठु,मला नाही आवडत कराटे फराटे करायला. "



"बघ मला तर अजिबात आवडत नाही,पण तुला करायला आवडतो म्हणून मी हो बोलले नं डान्सक्लासला मग तू अशी काय करतेस?"



"बावळट आवडत नाही काय इथं तुला तुझी आवड विचारली आहे का? गरजेचे आहे ते."



शांत बस हे स्वरंक्षणासाठी करतोय आपण आणि आजच्या जगात हे धडे घेणे फार महत्त्वाचे आहेत. स्वतः च रक्षण करता यायला हवं. टिव्ही आणि न्यूजपेपरमध्ये बघते आणि वाचतेस ना, कश्या बातम्या असतात ते. सहा वर्षाच्या मुलीचा बलात्कार इथे पन्नास वर्षाची महिला ही सेफ नाही आणि लहान मुलीही. तरीही असं बोलतेस? आपण कुठे एकटे असलो, तिथे काही अश्या विकृती असलेली माणस भेटली तर मग काय करणार आहेस तू ?"



"हे असं नको बोलू ना."



"मग तर ठरलं आधी कराटे क्लास आणि नंतर डान्स क्लास."



"ओके."



दोन्हीही खुश झाल्या.



"अगं पण मला तर लग्नाला जायचं आहे. मावशीच्या मुलीच लग्नं जावं तर लागेलच गं." मैथिली आठवत म्हणाली .



"एक काम कर तू क्लासला सुरवात कर,मी आली की जॉइन करेल."


"नाही नको सोबतच करू."



नाही पिंकी तू सुरवात तर कर. तीन चार दिवसांचा प्रश्न आहे .

हो नाही करता करता पिंकी तयार झाली क्लासला.




दोन दिवसांनी मैथिली तिच्या परिवारासोबत लग्नाला जाण्यासाठी मावशीच्या गावी गेली.



पाच दिवसांनी मैथिली परत आली. तर तिला तिच्या पिंकिच्या फोटोला हार घातलेला पाहून धक्का बसला आणि ती जागेवरच बसली. एव्हाना ही बातमी तिच्या आई बाबांपर्यंत ही पोहचली होती. जशी त्यांना कळलं ते तिथून लगेच निघाले,पण याबाबतीत मैथिलिली काहीही कळू दिलेल नव्हतं. तिला आता समजलं की 


आई का रडत होती.

मैथिली तशीच मटकन खालीच बसली .

मूर्तीसारखी एक टक तिच्या फोटोकडे पाहत होती. पण रडत मात्र नव्हती. अश्रूचा एक थेंबही डोळ्यांत दिसत नव्हता. ती तशीच जागेवरच बसून राहिली. ही रडत नाही म्हणून सर्वच आता काळजीत पडले. तिला खूप काही सांगूनही काही फरक पडला नाही. सकाळची संध्याकाळ झाली पण ती तिथून उठली नाही आणि रडलीही नाही . आल्यापासून तिने पाण्याचा घोट ही घेतला नाही. मैथिलीच्या वडिलांनी डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी तिचा चेकअप केला.


"तिने सर्व मनात दुःख साठवून ठेवले आहे ते अश्रूच्या रुपात बाहेर यायला हवं मैथिलीने रडणे आवश्यक आहे. ती नाही रडली तर तिच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होईल."


सर्व काळजीत पडले.



मीनाकाकू डोळे पूसून तिच्याजवळ बसली. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. तिने त्यांच्या डोळ्यांत पाहिले. त्या डोळ्यात प्रचंड वेदना आणि त्रास होता .एकुलती एक मुलगी गमावली याचे दुःख , लग्न होऊन सासरी पाठवण्याचे स्वप्न होते. त्या डोळ्यांत किती तरी दुःख पाहत होती. अचानक ती त्यांच्या खांद्यावर डोक ठेवून बेशुद्ध झाली. पुन्हा डॉक्टरांना बोलवून तिला इंजेक्शन दिले. आता जर ती नाही रडली तर तिच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. अशी शक्यता दर्शवली. काही वेळाने मैथिली पिंकीचे नाव घेऊन जोरात किंचाळली आणि ढसाढसा रडायला लागली .



"काकू पिंकी,आई पिंकी."

 तोंडातून शब्द बाहेर पडत होते . तिला सर्वांनी रडू दिलं, तिच्या मनातील सर्व दुःख बाहेर पडणे महत्त्वाचें होते . .



पिंकी आपल्यात नाहीय विश्वास बसत नव्हता . मन म्हणायचं ती येईल परत . तर मेंदू म्हणायचा ती या जगात नाही तर कशी येईल . या व्दंदात मैथिली होती आणि यामुळे ती आजारी पडली.

गेलेल्या माणसावर वेळच हे एक औषध असते. हे खरं आहे.

 ती आता सावरली होती पण तिला पिंकीसोबत काय घडलं माहित नव्हतं .




ती उठून तयार झाली . पिंकीच्या घरी आली आल्यावर ती कांकूजवळ गेली कांकूनी तीची चौकशी केली. कारण ती आज खूप दिवसांनी आली.


" कसं वाटतयं बाळा "



मी मस्त हे बघा तुमच्यासमोर उभी आहे. " ती स्माईल करत स्वतःभोवती हात फिरवत म्हणाली .



"बस मी पोहे बनवत आहे नाश्ता कर."



"हो" म्हणून मान हलवून आणि "बाहेर आहे" सांगून गेली .



बाहेर जाऊन सोफ्यावर बसून टिव्ही ऑन केला . टिव्ही पाहत बसली . टिव्ही बघता बघता तिचे लक्ष शेजारच्या खोली कडे गेले ती खोली पिंकीची होती . ती उठून खोलीत गेली .



" जशीच्या तशी ठेवली काकूंनी".



बेडच्यावरती भिंतीवर पिंकीचा आणि मैथिलीचा मोठ्ठा फोटो लावलेला होता आणि आजूबाजूला कधी होळी खेळतांना एकमेकांना रंग लावतांना , तर अभ्यास करतांना काकांनी काढलेला , वाढदिवसाचे केक कट करतांना, एक मैथिली फुगून बसलेली आणि पिंकी तीची माफी मागून विनवणी करत होती . पिंकीच्या डोळ्यात पाणी पाहून मैथिली ने तिला घट्ट मिठी मारली त्यांना भावूक पाहून आई बाबाच्या डोळे ओले झाले होते . फोटो पाहून सर्व आठवणी डोळ्यासमोर जाग्या झाल्या होत्या. ती एकेक फोटोवरून हात फिरवत होती . डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कपाट उघडून आत पाहिले . तिचे ड्रेस जसेच्या तसे .. तीच सामान तीचे घड्याळ तेही तिथे ठेवले होते . त्यात समोर एक कागद दिसला . तिने तो घेतला आणि वाचायला घेतली.


 मिठ्ठू सॉरी तू म्हणत होती ते खर आहे ,गं मी तुझं ऐकले नाही.

खूप त्रास होतोय मला मी ते सहन नाही करू शकत. माझ्यात जगायच सामर्थ्य नाही. मला माफ कर.

       -पिंकी


चिठ्ठी वाचून तिला कळलेचं नाही काय झाले ते तिच्यासोबत , सॉरी का म्हणतेय कसला त्रास होतोय तिला. तेवढ्यात काकू बाहेर आल्या तर ती हॉल मध्ये दिसली नाही. पिंकीची खोली चा दरवाजा उघडा दिसला मग त्या आत आल्या आणि मैथिली च्या हातातला कागद पाहिला . 



"काय झाल होतं मैथिली सोबत मला सर्व सांगा ?"



"जाऊ दे, तू आता कुठे बरी झाली आहेस नको ."



"काकू तुम्हाला माझी शपथ आहे ."



आता सांगण्याशिवाय पर्याय नव्हता.



"तू गेल्यापासून तिला करमत नव्हतं . घरात बसून कंटाळली होती तर मी तिला म्हटलं जा क्लासकुठे लावणार आहेस तिथे जाऊन अॅडमिशन करून ये .

तर ती नाही म्हणाली . मी घरीच राहून अभ्यास करते . तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे बुक नाही म्हणून ती बुक नोटबुक घेण्यासाठी बाहेर पडली . एकतास झाला दोन तास झाले, मी फोन लावला तर तीने उचलला नाही म्हटल रस्त्यात असेल .तीनतास झाले पण ती काही परतली नाही . नंतर फोन स्विच ऑफ दाखवत होता. मला खूप विचार येते. मन अस्वस्थ वाटत होत . काहीतरी घडणार अस वाटत होतं. तिच्या बाबांनी सगळीकडे चौकशी केली. दुकानावरसुद्धा गेले . त्याने सांगितले 



"ती आली होती पुस्तक घेतली आणि गेली ही."



सापडत नाही म्हटल्यावर पोलिस स्टेशनला जाऊन ती हरवल्याची तक्रार दाखल केली. पण ते चोवीस तास झाल्यानंतर नोंदवू शकता असे म्हणाले .



तिचे बाबा घरी आले आणि लगेच पोलिसांचा फोन आला की, 


"ती संजीवनी हॉस्पीटलमध्ये आहे."




तिथं जाऊन माझं पूर्ण अवसान गळून पडलं आय सी यू रूम मध्ये निपचित पडलेली पिंकी जागोजागी अंगाला लावलेल्या पटट्या तिला पाहून मी तिथेच बेशुद्ध पडले त्यांनी सावरले शुद्धीत आली तेव्हा तिचे बाबा माझ्या बेडवर बसून एकटक विचार करत होते आणि डोळ्यांतून अश्रू निरंतर वाहत होते .


"पिंकी कशी आहे ? तुम्ही का रडताय, इतकं खचलेले मी तुम्हाला कधी पाहिलेले नाही."

मी विचारल्यावर त्यानी सांगितल नाही .

त्यांनी मान हलवून नकार दिला .



मी पिंकीजवळ जायचा हट्ट केला तर मला डॉक्टरांनी नाही म्हटले आहे जायच अस मला सांगितलं .

डॉकटरांनी बोलवलं आम्हाला दोघांना कॅबिन मध्ये आत गेल्यावर त्यांनी बसायला खुणावले . मी तशीच उभी होते . त्यांनी हाताला धरून बसवलं माझा हात घट्ट पकडला.

तिचा गँगरेप झालाय असा जेव्हा कळले तेव्हा मी, काकू रडायला लागले त्यात तिच्या इंटरनल पार्ट डॅमेज झाला म्हणून सांगितल खूप रक्तस्त्राव झाला होता. दोन दिवसानंतर ती शुद्धीवर आली. मला पाहून रडायलाच लागली . खूप घाबरत होती सगळ्यांना पोलिस ही आलेत त्यांना पाहूनही ती घाबरली .

वेड्यासारखी करायला लागली. . माझ्यासोबत काय झाल हे अस म्हणून स्वतः च तोंडावर मारू लागली . सलाईन काढून फेकल्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं आणि ती झोपून गेली . डॉक्टरांनी पोलिसांना कळवले की ती बोलण्याच्या परिस्थितीत नाही . तिचा जवाब नोंदवू शकत नाही .

दुसऱ्या दिवशी तिला जाग आली . तेव्हा ती प्राण गेल्यासारखी शांत पडून होती . डॉक्टर आले त्यांनी आणि मी तिला म्हटले तेव्हा तिने घडलेली घटना सांगितले .

त्या चार नशेत असलेल्या माणसांनी रस्त्यात तिला अडवले . तिने तिथून पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला त्यात एकाने मारले तिला केस ओढले तिचे .. एक तर चवताळूनच उठला . एकाने हात पकडून ठेवले . तिचे तोंड दाबून धरले तस मागून एकाने डोक्यात काहीतरी मारलं आणि पडले. " ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली . डॉकटरांनी सर्व रेकॉर्ड केले आणि पोलिसांना दिले . नंतर ती जगायच नाही मला आता असं म्हणत होती . खूप अग्रेसिव झाली स्वतःच जीव देण्यासाठी डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन झोपवले .



मी बाहेर आल्यावर तिच्या बाबांना सांगून घरी आले. सूप वगैरे कपडे घेऊन जाऊ .



मी हॉस्पिटल ला गेल्यावर पुन्हा पोलिस दिसले. . मी आत डोकावून पाहिले तर तिथे तोंडावर कपडा टाकलेला दिसला.

मी ओरडून त्या वॉर्डबॉयला म्हटले, 


"माझी पिंकी झोपली आहे तिथे असा कसा कपडा ओढला

 तुम्ही " .



"ती उठणार नाही आता कायमची झोपली." तिचे बाबा 



मला पण जगायचं नाहीय मला ही मारून टाका म्हणून ही टाहो फोडला . तिने तिच्या हाताची नस कापली . खूप रक्त गेल्यामुळे तीची प्राणजोत मावळली होती . रूममध्ये जाण्याआधी तीने प्राण सोडला होता."



काकू ही रडत होती . हे सर्व ऐकून मैथिलीच्या डोळ्यांतून अंगार वाहत होता .



"काकू काकाला बोलाव. "

सर्वच आले काका मैथिलीचे आई बाबा ही


"काका पोलिस स्टेशनला चला."



" बाळा ते पकडले गेले आहेत." पिंकी चे बाबा



"काका चला ती बाहेर निघाली." पोलिस स्टेशनला पोहचवून तिने साहेबांना विनंती केली त्यांना जास्त शिक्षा होण्याची . सीसी टिव्ही फुटेज नुसार आणि त्यांची DNA चाचणी नुसार ते आरोपी आहे सिद्ध झाले . तीने फुटेज पाहिले . सर मला एकदा त्यांना भेटायच आहे. खूप आर्जवविनंती केल्यावर ति भेटायला सोडले . लॉकअप मध्ये जाऊन एका मुलाच्या जोरात कानफटात मारले आणि दुसऱ्याच्या अशा जागेवर मारली की तिथून तो पुढे काही करणारच नाही . लेडीज पोलिसांनी तिला पकडून बाहेर आणले.




" तुम्ही असं नाही करू शकत मिस मैथिली. "



"त्यानी केले ते बरोबर होत का? नाही ना."



"मिस.मैथिली तुम्ही थोडं रागावर कंट्रोल करा. "



"यांच्यामुळे माझी मैत्रिण आज नाहीय आणि मी रागावर कंट्रोल करू अश्या नार्मदांना जन्माला घालून यांची आई सुदधा पश्चाताप करत असेल. यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे."

ती निघून गेली . त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून तीचे प्रयत्न चालू होते अखेर त्या प्रयत्नांना यश आले. . त्यांना फाशीची शिक्षा झाली. . 



तेव्हापासून ती मुलींचे छेड काढणाऱ्याना बलात्कार करण्यांना सोडत नव्हती .



हा प्रकार सोशल मिडियावर वायरल झाला . कॉलेजमध्ये गौरव पुरस्कार देऊन तिला सन्मानित केले .



मी सम्मान घेण्यासाठी केले नाही . त्यावेळी मला जे दिसलं त्याला मी न घाबरता समोर गेले त्याला जर थांबवल नसतं तर त्याची मजल आणखी वाढली असती आणि तो पुढे विपरित घडले असते. मुली का सहन करतात हे, विरोध का करत नाही का घाबरतात अश्या परिस्थितीला ? कोणी येवून आपली अब्रू वाचवणार नाही . ही लढाई स्वताची स्वतःनेच लढायला हवी . जिथे मला असा अन्याय होतांना दिसेल तिथे मी गप्प राहणार नाहीं .



प्रत्येक घरात घरात मुलांना मुलीविषयी आदर करायला शिकवले पाहिजे जसं आपल्या बहिणीचा आपण आदर करतो तस दुसऱ्याच्यांही बहिणीचा हि आदर सन्मान केला पाहिजे.

  मुलींनीही वेळीच विरोध केला पाहिजे. कोणी येवून आपले रक्षण करेल अस होत नाही प्रत्येक वेळेस कृष्ण येणार नाही असं दुसऱ्यावर विसंबून न राहता. स्वतः स्वत: चे रक्षण करायला पाहिजे .

  


एक सांगते , सगळे पुरुष सारखे असता पण एकसारखे नसतात.


       

तूच दुर्गा तूच काली !



तु गं दुर्गा, तू भवानी

संसाराची तुच जननी

सारी माया तुझी

अंबे कृपा करी

अंबे कृपा करी




हो, पायाखाली अंगार, धार डोळ्यात तलवार

हो, अंबेचा अवतार, नाश करशील अंधार

हे, लखलख तो सूर्य जणू आहे तुझ्या भाळी

महिषासुर मर्दिनी तू, रीत तुझी न्यारी

हे, लखलख तो सूर्य जणू आहे तुझ्या भाळी

महिषासुर मर्दिनी तू, रीत तुझी न्यारी. 


समाप्त


तुम्हांला जर माझी कथा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका . तुमचा एक लाईक आम्हाला लिहण्यास प्रोत्साहन देतो,

धन्यवाद .