प्रतिभा (भाग ९)

प्रकाश कोण हे शोधणं....

प्रकाश कोण हे शोधणं माझ्यासाठी कठीणच होतं. माझ्या दृष्टीने जे काही झालं होतं, त्यात फक्त प्रतिभा, तिची मुलगी आणि नारायण एवढ्याच व्यक्ती समाविष्ट होत्या. पण माझी एक थिअरी होती. आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी आपण फक्त योग्य माणसाची निवड करावी आणि वाट बघावी. ती व्यक्ती स्वतः च अशी वागते किंवा बोलते की आपल्याला हवी माहिती आपोआप मिळते. पण ही थिअरी नेहमीच उपयोगी पडते असे नाही. काही वेळेला या थिअरीचा परिणाम दिसायला वेळ फार लागतो. नाहीतर मी पाठलाग केलाच नसता. ...माझ्या मनात नारायणचा प्रतिभाच्या नवऱ्याच्या प्रेतयात्रेला जाण्याचा काय संबंध आहे असेच होते. पण समोर काही वेगळेच घडायचे असावे. अचानक मला वाघमारेंचा फोन आला . " उद्या सकाळी दहा वाजता पो. स्टेशनला या. " काम किंवा कारण काहीही सांगितले नाही. विचारणंही कठीण. अजूनही मला नारायण आणि प्रतिभा एकमेकांना बरेच आधीपासून ओळखत असणार असे वाटत होते. पण काहीच माहिती मिळत नव्हती. मी नारायणकडे गेलो. तो थोडा कामात मग्न होता. मी बोलावल्याशिवाय आलेला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण मी पर्वा न करता त्याला मला उद्या पो. स्टेशनला बोलावले असल्याचे सांगितले. त्यावर तो भडकून म्हणाला, " तुम उनको मना कर सकते थे. यहां कल साडेगॅरा को अर्जंट मिटींग है. वो भी डायरेक्टर के साथ. वो अपने कामका रिव्यू भी लेगा. और तुम है कि ऐसा बर्ताव करते हो , जैसे तुम पुलिस डिपार्टमेंटमे काम करते हो. तुम्हे इतना इंक्विझिट्यूव बननेकी जरुरत क्या है ? तुम मेरेपर और प्रतिबापर नजर रखते हो. मुझे सब समझता है. " मला बोलून देण्याची संधी न देता तो भडकत राहिला. मी काहीच न बोलण्याचे ठरवले. शेवटी तो म्ह्णाला, " जाओ , तुमको जो करना , वो करो. लेकीन मुझे अब रिपोर्ट करना होगा , ये भी ध्यानमे रकना. " मी केबीन बाहेर पडलो. आता आली का पंचाइत. मी उद्या गेलो तर प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम . प्रतिभा कशीही वागली तरी त्याला चालत होतं. ती वाटेल तेव्हा येत होती. या दोघांमध्ये काहीतरी भावनिक कनेक्शन असणार याची मला आता खात्री पटत चालली होती. म्हणूनच तो भडकत होता. मी बहुतेक फार आत शिरत होतो की काय . विचारांच्या गुंत्यात मी माझ्या टेबलापाशी येऊन बसलो. यांत्रिकपणे मी काम करू लागलो. एकदाचे दुपारचे चार वाजले. प्रतिभा ऑफिसमध्ये आली. मी मुद्दामच लक्ष दिले नाही. म्हणजे तिच्या लक्षात येईल असे लक्ष. अचानक ती माझ्या टेबलाशी येऊन उभी राहिली आणि म्हणाली, " उद्या तुम्ही माझी व्हीजिट कराल का ? तसं सगळं ठरलेलंच आहे. तुम्हाला एकदा सगळं स्पष्ट करायचंय आणि ऑर्डर घेऊन यायची आहे , बस , इतकंच " मी जरा वैतागून म्हंटले, " मग तुम्हीच का जात नाही ? माझा वापर का करता ? " माझ्या तोंडून शब्द गेले आणि माझ्या लक्षात आलं की नारायणचा राग मी तिच्यावर काढीत होतो. तरीही ती मागे न हटता पुन्हा म्हणाली, " प्लीज , मि. उत्तम, उद्या मला माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारांसाठी जायचंय. तेही पोलिसांच्या उपस्थितीत. " मी पाहत राहिलो. मग मला एकदम जाणवलं. आपल्याला पो. स्टेशनला का बोलावल असावं. मी आणि प्रतिभाच्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारांसाठी ? वाघमारेंची कमाल आहे. माझा काहीच संबंध नसल्याने आश्चर्य वाटलं. मी तिला काहीच बोललो नाही. ती तिच्या टेबलापाशी जाऊन बसली. तिचा चेहरा थोडा आक्रसलेला होता. कदाचित नारायणला मी मिटिंग चालवावी असं वाटत असावं. म्हणजे तोही प्रेतयात्रेला जाऊ शकेल. ..................................................पाच वाजून गेले. नारायण आज लवकरच बॅग घेऊन बाहेर आला आणि मला म्हणाला, " सॉरी उत्तम, मैने ऐसा नही बोलना चाप्रकाश कोण हे शोधणं माझ्यासाठी कठीणच होतं. माझ्या दृष्टीने जे काही झालं होतं, त्यात फक्त प्रतिभा, तिची मुलगी आणि नारायण एवढ्याच व्यक्ती समाविष्ट होत्या. पण माझी एक थिअरी होती. आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी आपण फक्त योग्य माणसाची निवड करावी आणि वाट बघावी. ती व्यक्ती स्वतः च अशी वागते किंवा बोलते की आपल्याला हवी माहिती आपोआप मिळते. पण ही थिअरी नेहमीच उपयोगी पडते असे नाही. काही वेळेला या थिअरीचा परिणाम दिसायला वेळ फार लागतो. नाहीतर मी पाठलाग केलाच नसता. ...माझ्या मनात नारायणचा प्रतिभाच्या नवऱ्याच्या प्रेतयात्रेला जाण्याचा काय संबंध आहे असेच होते. पण समोर काही वेगळेच घडायचे असावे. अचानक मला वाघमारेंचा फोन आला . " उद्या सकाळी दहा वाजता पो. स्टेशनला या. " काम किंवा कारण काहीही सांगितले नाही. विचारणंही कठीण. अजूनही मला नारायण आणि प्रतिभा एकमेकांना बरेच आधीपासून ओळखत असणार असे वाटत होते. पण काहीच माहिती मिळत नव्हती. मी नारायणकडे गेलो. तो थोडा कामात मग्न होता. मी बोलावल्याशिवाय आलेला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण मी पर्वा न करता त्याला मला उद्या पो. स्टेशनला बोलावले असल्याचे सांगितले. त्यावर तो भडकून म्हणाला, " तुम उनको मना कर सकते थे. यहां कल साडेगॅरा को अर्जंट मिटींग है. वो भी डायरेक्टर के साथ. वो अपने कामका रिव्यू भी लेगा. और तुम है कि ऐसा बर्ताव करते हो , जैसे तुम पुलिस डिपार्टमेंटमे काम करते हो. तुम्हे इतना इंक्विझिट्यूव बननेकी जरुरत क्या है ? तुम मेरेपर और प्रतिबापर नजर रखते हो. मुझे सब समझता है. " मला बोलून देण्याची संधी न देता तो भडकत राहिला. मी काहीच न बोलण्याचे ठरवले. शेवटी तो म्ह्णाला, " जाओ , तुमको जो करना , वो करो. लेकीन मुझे अब रिपोर्ट करना होगा , ये भी ध्यानमे रकना. " मी केबीन बाहेर पडलो. आता आली का पंचाइत. मी उद्या गेलो तर प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम . प्रतिभा कशीही वागली तरी त्याला चालत होतं. ती वाटेल तेव्हा येत होती. या दोघांमध्ये काहीतरी भावनिक कनेक्शन असणार याची मला आता खात्री पटत चालली होती. म्हणूनच तो भडकत होता. मी बहुतेक फार आत शिरत होतो की काय . विचारांच्या गुंत्यात मी माझ्या टेबलापाशी येऊन बसलो. यांत्रिकपणे मी काम करू लागलो. एकदाचे दुपारचे चार वाजले. प्रतिभा ऑफिसमध्ये आली. मी मुद्दामच लक्ष दिले नाही. म्हणजे तिच्या लक्षात येईल असे लक्ष. अचानक ती माझ्या टेबलाशी येऊन उभी राहिली आणि म्हणाली, " उद्या तुम्ही माझी व्हीजिट कराल का ? तसं सगळं ठरलेलंच आहे. तुम्हाला एकदा सगळं स्पष्ट करायचंय आणि ऑर्डर घेऊन यायची आहे , बस , इतकंच " मी जरा वैतागून म्हंटले, " मग तुम्हीच का जात नाही ? माझा वापर का करता ? " माझ्या तोंडून शब्द गेले आणि माझ्या लक्षात आलं की नारायणचा राग मी तिच्यावर काढीत होतो. तरीही ती मागे न हटता पुन्हा म्हणाली, " प्लीज , मि. उत्तम, उद्या मला माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारांसाठी जायचंय. तेही पोलिसांच्या उपस्थितीत. " मी पाहत राहिलो. मग मला एकदम जाणवलं. आपल्याला पो. स्टेशनला का बोलावल असावं. मी आणि प्रतिभाच्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारांसाठी ? वाघमारेंची कमाल आहे. माझा काहीच संबंध नसल्याने आश्चर्य वाटलं. मी तिला काहीच बोललो नाही. ती तिच्या टेबलापाशी जाऊन बसली. तिचा चेहरा थोडा आक्रसलेला होता. कदाचित नारायणला मी मिटिंग चालवावी असं वाटत असावं. म्हणजे तोही प्रेतयात्रेला जाऊ शकेल. ..................................................पाच वाजून गेले. नारायण आज लवकरच बॅग घेऊन बाहेर आला आणि मला म्हणाला, " सॉरी उत्तम, मैने ऐसा नही बोलना चाहिये था. तुम्हारी भी मजबुरी होगी. तुम चाहो तो निकल सकते हो. " प्रतिभाकडे न बघताच तो निघाला. मी पण पडत्या फळाची आज्ञा मानून निघालो. मला वाटतं तिची निराशा झाली होती . पण मी चुकलो होतो.


लवकर घरी जायचं म्ह्णून मी रिक्षा पाहत होतो. संध्याकाळी पाच ते आठ रिक्षा मिळणं कठीण असतं हे मला आता अनुभवाने कळलं होतं. एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. रस्त्याच्या दूरच्या टोकाला उभ्या असलेल्या नारायणकडे माझी नजर गेली. आणि मला आश्चर्य वाटलं तो त्याच्या गाडीजवळ उभा होता. प्रतिभाची वाट तो पाहत असावा. मी मुद्दामच एका स्टॉलपाशी सिगारेट घ्यायला उभा राहिलो. मी सिगारेट शिलगावण्यासाठी मान थोडी खाली केली आणि कोपऱ्यातून नारायण कडे पाहत असताना मला प्रतिभा रस्ता ओलांडताना दिसली. ती नारायणच्या गाडीजवळ पोहोचली. मग ते दोघे गाडीत बसून निघाले. मला भान राहिले नाही .मी पाठलाग करायला हवा होता. आज काही तरी उलगडा झाला असता. मला चुकचुक लागली त्याच भावनेत मी घरी गेलो. मी आता वेगळ्याच विचारात गुंतलो . नारायणला कामात मदत करणं माझं कर्तव्य होतं आणि वाघमारेंनी मला समन्स पाठवलेलं नव्हतं. तसच मला वाघमारेंनाही मदत करणं भाग होतं. कारण त्यांनी मला जर सह आरोपी केलं असतं तर निष्कारण एक फौजदारी खटला माझ्या मागे लागला असता. मला काही समजेना. एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा की काय या विचारात मी होतो. त्यात परत एकदा वाघमारेंचा फोन आला. खरंतर मी आत्ता त्यांचा फोन घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तरीही घेतला. ते म्हणाले, " मि. उत्तम , तुम्हाला कंपनीकडून जर काही त्रास झाला तर मी येऊन तुमच्या डायरेक्टर साहेबांना समजावून सांगेन आणि तसे लागल्यास लेखीही देईन. फक्त तुम्ही आम्ही सांगतो तसं करा. तुम्ही त्या लाइव्ह सिच्युएशन मध्ये आहात. घाबरू नका . पण जर का आम्हाला मदत करणं पटत नसेल तर मात्र बाकिच्यांनी तुम्हाला अडकवलं तर केस चालू झाल्यावर तुम्हाला त्यांच्या ग्रुप मध्ये उभे राहावे लागेल. (मी काही बोलत नाही असे पाहून ते म्हणाले )या , उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत. " फोन बंद झाला. सध्या तरी त्यांच्या बाजूने बॉल टोलवण्याशिवाय माझ्या हातात काही नव्हतं. झोप सारखी चाळवत राहिली. सकाळ झाली. मी कसातरी ऑफिसला जायला तयार झालो. मी रिताला काहीच सांगितले नव्हते. हल्ली ती माझा चेहरा गंभीर असला तरी विचारीत नसे. कदाचीत ती घाबरत असावी. तिला वाईट वाटू नये म्हणून जसं मुलांना जवळ घेतलं तसच तिलाही घेतले. तिचे डोळे ओले झाले असावेत असा मला भास झाला. ती हळवी झाली होती. पण भावूक न होण्याचं मी ठरवलं. बोरिवलीला पोहोचल्यावर प्रथम मी पो‌. स्टेशनला गेलो. वाघमारे माझी वाटच पाहत असावेत. पण ते आणखीही कोणाची वाट पाहत होते. मला बसवून चहा वगैरे झाल्यावर त्यांनी मला कालच्या दिवसाचे अपडेटस विचारले. मी प्रकाशचं नाव घेतलं आणि प्रेतयात्रेला नारायणचीही तयारी असल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले, " उत्तम, म्हणून तर आपण थांबलोय.त्याला मुद्दामच बोलावलेलं नाही त्यामुळे तो आला तरी अडकणार आहे आणि नाही आला तरी . बॉडी काल रात्रीच ताव्यात दिलेली आहे. आमच्या उपस्थितितच अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिलेली आहे. " नारायणच्या अडकण्याबाबत मला काही कळले नसल्याचे त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून वाचले असावे. त्यावर ते म्हणाले, " तेही कळेल तुम्हाला. विचार करा. " ......... पुन्हा एकदा चहा आला. तो घेऊन मग वाघमारे म्हणाले, " मला वाटतं आता तो येत नाही , निदान इथे तरी. थेट स्मशानात आला तरच. " असे म्हणून त्यांनी उभ्या असलेल्या गाडीत मला बसण्यासाठी फर्मावले. दोन चार कॉन्स्टेबल्स, अर्थातच एक लेडी कॉन्स्टेबलही होत्या.आम्ही अर्ध्या तासाच्या अवधीत बोरिवलीच्या स्मशानभूमीत पोहोचलो. ............ स्मशानातलं वातावरणं असं वैराण का असत कोण जाणे. खरतर ही मुडद्यांची वस्ती. मेलेली माणसं म्हणजे जगातली सर्वात निरुपद्रवी माणस. जे काही करायचं ते जिवंत माणसंच करतात. असो. अजून बॉडी घेऊन कोणीच आलेले नव्हते. मी सगळीकडे नजर फिरवली. मला नारायण कुठेही दिसला नाही. त्याची गाडीही . याचा अर्थ तो जवळ पास नसावा असा होत नाही. मीही आता पोलिसांसारखा संशय घेत होतो. वाघमारेंनी फोन केला. प्रतिभालाच असावा. मग ते म्हणाले, " हर्स निघालेली आहे. प्रतिभा मॅडम त्यांचा भाऊ ज्याला अजून पाहिलेला नाही , आणि जवळच राहणारी चार पाच माणसं. " त्यांनी फोन बंद केला आणि थोड्याच वेळात मुख्य गेट जवळ एक हर्स थांबल्याचे दिसले. आतून आधी प्रतिभा, मग एक मुलगासा पण अत्यंत अव्यवस्थित दिसणारा असा एक माणूस तिचा भाऊ असावा तो , इतर माणसं आणि भटजी असे उतरले. बॉडी पूर्ण झाकलेली होती. आणि डिझेलमध्येच टाकायची असल्याने विधींना अर्थ नव्हता. केवळ एक उपचार. विधी करण्यासाठी जो मुलगासा माणूस आला होता तो बसला. एक कॉन्स्टेबल आलेल्या चार पाच जणांची नावं आणि पत्ते लिहून घेत होता. लवकरच , तरीही अर्धा पाऊण तास लागला . बॉडी डिझेल भट्टीमध्ये टाकण्यासाठी तयार झाली. भट्टी तापत होती. प्रतिभा रुमालाने डोळे पुशीत होती. लेडी कॉन्स्टे. तिला धीर देत होत्या.
तिच्या मनातले विचार कळणं कठीण होत. नाही म्हंटलं तरी तो तिचा नवरा होता. एकेकाळी ज्याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता . अचानक तिला उमाळा आला. ती रडू लागली. वातावरणाचा परिणाम असावा. प्रतिभाचं लक्ष आजूबाजूला गेलं . तिने उत्तमला पाहिलं. तिला तो आलेला आवडला नाही. .तिला सुरुवातीचे दिवस आठवत होते. राजेशच्या आयुष्यात रंजना नसती आली तर कदाचित पुढचं आयुष्य नीट गेलंही असत. त्याच्यासाठी तिला सासू सासऱ्यांचे जातीवरचे टोमणेही सहन करावे लागले. तेही तिने केले. पण हाच असा निघाल्यावर काय करणार ? तिचा बांध आता फुटत असावा. पार अगदी घटस्फोटा पर्यंतच्या आठवणी तिच्या मनात वाऱ्याच्या वेगाने आल्या. पण तिने तटस्थ राहण्याचे ठरवले. अचानक तिने रडणं थांबवलं. सतःवर ताबा मिळवला. आता तिने चेहऱ्यावर दगडाचा मुखवटा चढवला . मी जणू अस्तित्वातच नाही अशा रितिने ती वागू लागली. बॉडी भट्टीमध्ये टाकल्यावर सगळेच निघाले. सहज म्हणून माझं लक्ष मुख्य गेटजवळ गेलं. तिथे नारायण आला होता. त्याला पाहून मला आश्वर्य वाटलं. वाघमारेंनीही त्याला पाहिलं आणि ते पुढे होऊन त्याला म्हणाले, " अरे आपको तो बुलाया नही था, आप कैसे आये ? " गेटजवळ पोहोचणाऱ्या प्रतिभाकडे बोट करून ते म्हणाले, " इन्होने बुलाया था क्या ? और वैसेभी आप लेट हो गये. " त्यावर तो फक्त सॉरी म्हणाला आणि रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या गाडीकडे गेला. वाघमारे साहेबांनी प्रतिभाला मुलगासा माणसाकडे बोट करून विचारले , " हा कोण , तुमचा भाऊ का ? " ती हो म्हणाली. त्याचं नाव प्रकाश असल्याचं कळलं. अशा रितीने प्रकाश कोण ते सापडलं. मग सगळेच निघाले. वाघमारे मला म्हणाले, " मी तुम्हाला नंतर बोलावतो, किंवा ऑफिसला येतो. म्हणजे बोलता येईल. " मी काही न बोलता रिक्षा पाहू लागलो . त्यावर नारायण मला म्हणाला, " उत्तम तुम भी चलो मेरे साथ, ऑफिसही तो जाओगे ना ? " याचा अर्थ प्रतिभा पण त्याच्याबरोबर येणार होती. वाघमारे अर्थपूर्ण नजर माझ्याकडे टाकून निघून गेले. मी गाडीत बसताना मुद्दामच मागच्या सीटवर बसलो. म्हणजे प्रतिभाला पुढे बसण्याशिवाय मार्ग राहू नये. ती पुढे बसली. ऑफिसला पोहोचेपर्यंत कोणीच काही बोलले नाही. प्रकाश आणि इतर माणसे वेगवेगळ्या रिक्षांनी आपापल्या घरी गेली. ........... आज ऑफिसमध्ये दिवसभर नारायण आणि प्रतिभा कामाशिवाय काहीच बोलली नाहीत. माझ्याशीही ते औपचारिक वागले. मिटिंग पुढे ढकलल्याने कोणालाच ताण आला नाही. मी तिने काकुळतीने सांगितलेली व्हिजिट मी मुद्दामच केली नाही. पुन्हा एक दोन दिवस काहीच घडले नाही. मी मात्र प्रतिभाचा दोन्ही दिवस पाठलाग करू शकलो. ती घरीच गेली होती. कथा पुढे सरकत नव्हती. माझ्याजवळ सांगण्यासारखं काही नसल्याने मी वाघमारेंना फोन केला नाही की त्यांनी मलाही. ते कदाचित कामात व्यग्र असावेत. तिसरा दिवस मात्र असा उजाडला, की अचानक लिंक लागल्यासारखी वाटली.

त्याचं असं झालं, संध्याकाळी मला नारायणने बोलावले आणि एक दोन कंपन्यांमध्ये व्हिजीटला जायला सांगितले. अर्थातच आता तो अगदी सौम्य वागत होता. त्याला कदाचित मी त्याच्या पार्टीत यावं असं वाटत असावं. तो म्हणाला, " देको, तुमको खुदको ऍडजस्ट करना है, व्हिजिटको कभीभी जा सकते हो. बस काम होना चाहिये. मतलब ऑर्डर चाहिये. " आता तो प्रतिभाला केबीन मध्ये क्वचितच बोलवू लागला. का ते कळलं नाही. त्यांच्यात काहीतरी समझौता झाला असला पाहिजे. किंवा त्यांचा काहीतरी प्लान असला पाहिजे. कदाचित पोलिसांची पण त्याच्यावर नजर असावी आणि त्याला ते कळलं असाव, प्रतिभाचा पाठलाग करण हे आता माझं ऑफिस रुटीन प्रमाणे रुटीन झालं होतं. त्यामुळे होणारा उशीर घरी रिता सहन करीत होती आणि मला नाराज करीत नव्हती. तिच्याबरोबरच्या प्रणयाच्या धुंदीत मी हे सगळे विसरून जात होतो. तसा माझा काहीही संबंध नव्हता. ही सगळीच परिस्थिती माझ्या आजूबाजूने होती. आणि माझ्या आयुष्यावर त्याच परिणाम होणे शक्य नव्हते. एक दिवस मी या सगळ्यावर जाम विचार केला. जास्तीत जास्त काय वाईट होईल हे पाहिलं आणि स्वस्थ झालो. आता मला भीती वाटत नव्हती. भीती ही एक स्टेज असावी. ती एकदा का ओलांडली की माणूस स्वस्थ होत असावा आणि परिस्थिती स्वीकारणं त्याला सोपं जात असावं. असो. मला आता या परिस्थितिचे टेन्शन येईनासे झाले. असाच मी एकदा माझ्या व्हीजीट संपवून घरी निघालो होतो आणि आज माझ्या मनात देखील पाठलाग करण्याचं नव्हतं. पण अचानक प्रकाश की कोण तो मला प्रतिभाला संध्याकाळी ऑफिस बाहेर भेटायला आलेला दिसला. तिच्यात आंणी त्याच्यात काहितरी वादावादी चालू असावी . मी लांब असल्याने ऐकू शकलो नाही मग तो भडकून निघून गेला. प्रतिभाही निघून गेली. पण ती घरी गेली नाही . तर ती अचानक बांद्याला गेली. म्हणजे तिला उतरताना पाहून मी घाईघाईने उभ्या असलेल्या प्रवाशांच्या शिव्या खात उतरलो. काय झालं होतं कोण जाणे पण ती फार भराभर चालत होती. आज मला तिचा पाठलाग करणं कठिण जात होतं. संध्याकाळची वेळ असल्याने गर्दी होती. ती चुकवीत तिचा माग सांभाळणं मला जिकीरीचं वाटू लागलं अचानक तिला रस्ता ओलांडल्यावर नारायण दिसला. तो गाडीला टेकून उभा होता . आता हे जर गाडीने गेले तर मागे लागणं कठिण होतं. पण माझं नशीब जोरावर होतं. ते दोघेही पायी निघाले. काही अंतर चालल्यावर ते एका लॉजसमोर आले. त्याचं नाव रमेश लॉज होतं. आता आत कसं जाणार ? साधं हॉटेल असतं तर मी आत जाऊ शकलो असतो. मला अचानक वाघमारेंची आठवण झाली . मी त्यांना फोन करण्याचं ठरवलं. मुख्य दरवाज्यापासून थोडा लांब उभा असल्याने मला प्रकाश तिथे येताना दिसला. अर्थातच ते दोघे आत गेल्यावर. याचा अर्थ त्यांनी तिघांनी आज भेटण्याचं ठरवलं होतं. वाघमारेंना फोन लावण्यापेक्षा मी स्वतःच एक रूम बुक करण्यासाठी कौंटरकडे पोहोचलो. तो पर्यंत प्रकाश जिना चढून जाताना दिसला. याचा अर्थ प्रतिभा आणि नारायण पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच गेले असले पाहिजेत. मी पण त्याच्यामागे जिना चढून जाण्यास सुरुवात केली. मला कौंटरवर बसलेल्या मॅनेजरने हटकले. " ओ मिस्टर , कुठे निघालात ? ही काय धर्मशाळा वाटली की काय ? " मी एकदा प्रकाशकडे पाहून घेतले. माझ्या अंदाजाप्रमाणे तो बरोबर पहिल्या मजल्यावरच्या जिन्यावरून डावी कडे वळला. मग मी मागे वळत कौंटरपाशी गेलो. आणि म्हणालो, " अहो, आमचे साहेब वर गेल्येत . आमची आत्ता मिटींग ठरली आहे. हे पाहा माझं ओळखपत्र म्हणून मी त्याला कंपनीचे कार्ड दाखवले. माझ्याजवळ असलेल्या व्हिजीट फाइल्सही दाखवल्या. त्याला हे पटलं असावं. तो म्हणाला, "ठीक आहे, पण तुमचं आय कार्ड तेवढं माझ्याकडे जमा करून जा. जाताना परत मिळेल. " मी वेळ न घालवता जिन्याकडे निघालो, कारण मॅनेजरला दुसरा विचार सुचायच्या आत मला वर जाणं भाग होतं. त्याने माझ्यासाठी अडचणी निर्माण केल्या असत्या. मी एक महत्त्वाची गोष्ट केली. ती म्हणजे प्रथम वाघमारेंना फोन लावला. आणि मी कुठे आहे आणि इथे काहीतरी घडण्याची शक्यता आहे असे सांगितले. ते काहीच बोलले नाहीत. आता मला रुम शोधणं भाग होतं. मी मॅनेजरला विचारले नाही. पण एका दरवाज्याजवळ काहीतरी पडल्याचे जाणवल्याने ती वस्तू उचलली. ती होती कीचेन. त्यात कोणत्या चाव्या होत्या कोण जाणे. पण त्या कीचेनवर "पी " हे अक्षर रंगवलेले दिसत होते. मला उगाचच ती कीचेन प्रकाशची असावी असे वाटले. म्हणजे प्रकाश याच खोलीत शिरला होता. मी दरवाज्याला बाहेरून कान लावून ऐकू लागलो. दरवाज्या उघडा असावा. तो हळूहळू अर्धवट उघडला गेला. आत कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज येत होता. त्यात " मुझे पैसा चाहिये " असे वाक्य ऐकू आले. मला अचानक तो आवाज त्या दिवशी नारायणला आलेल्या फोनवरच्या आवाजासारखा वाटू लागला. मग मला प्रतिभाचा किंचाळल्यासारखा आवाज आला. शब्द नीट कळले नाहीत. . ....आता मला प्रतिभाचे ओरडणे ऐकू आले. ती म्हणत होती, " तुला पैसे कशासाठी हवेत. मी देते ना नेहेमी ? त्यांच्या कडून पैसे का मागतोस ? " मध्येच नारायण म्हणाला, " तुमको कितना पैसा चाहिये एक बार बोलो. .... बोलो कितना पैसा चाहिये ? " त्यावर खवचट पणाने प्रकाश म्हणाला, " अरे जीजाजी , अब तो हमारे जीजा बनेंगे, इसलिये तो सब कुछ किया ना ? अपना तो लेन देन चलताही रहेगा. " नारायणलाही समजावण्याचा कंटाळा आला असावा. पण मध्येच प्रतिभा भडकून म्हणाली, " जा देत नाही काही. काय करणार आहेस ? " ........ मग नारायणही म्हणाला, " हां जाव जाव जो करना है वो करो. " मग प्रकाश म्हणाला, " ताई तुला जे पाहिजे ते सगळं मी केलं. तुला सगळं मिळेल असं म्हणाली होतीस ना ? मग शब्द का फिरवतेस ? आणि मी काय करीन , पोलिसांकडे जाईन . मग तर सगळी मजाच आहे आपण तिघेही मिळून बसू जन्मभर चक्की पिसत. चालेल ......? " मधला वेळ असाच गेला. म्हणजे काही क्षण कोणीच काही बोलले नाही. नारायणने खिशात हात घातला. मी ऐकण्याच्या भरात मागे पाहिलेच नाही. अचानक माझ्या कमरेच्या भागात काहीतरी अणकुचीदार वस्तू टोचत असल्याची जाणीव झाली. आणि शब्द ऐकू आले. " मि. उत्तम , यासाठी आला होतात नाही का ? चला आत . " त्याने पायाने दरवाज्या ढकलला आणि बंद केला. मी घामट आणि घाबरलेल्या चेहऱ्याने आत शिरलो. आतले तिघेही धक्का बसलेल्या अवस्थेत माझ्याकडे पाहू लागले. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होती. प्रतिभाच्या डोळ्यात अंगार फुलला होता. नारायण अचंब्याने माझ्याकडे पाहत होता. आणि प्रकाशच्या चेहऱ्यावर अनोळखी भाव होते. मागून मॅनेजरचा आवाज आला, " सॉरी सर, पण हा माणूस दरवाज्या बाहेरून तुमचं बोलणं ऐकत होता. " माझ्याकडे पाहत नारायणने मॅनेजरला जाण्याची खूण केली. तो गेला.


मॅनेजर गेल्यावर प्रकाशने माझ्याकडे निरखून पाहिलं. मग तो म्हणाला, " अरे बॉस आप तो हमारे बिरादरीके लगते हो. " मग तो हात पुढे करून म्हणाला, " आय ऍम प्रकाश , ग्लॅड टु मीट यू. " मी हात मिळवला नाही. नारायण मधेच म्हणाला, " उत्तम तुम यहाँ क्या कर रहे हो ? मैने तुमको वॉर्न किया था .... फिर भी तुम हमारे पीछे लगते हो ? " . एकूण परिस्थितीत आपल्या फायद्याच्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत असे दिसल्यावर प्रकाश म्हणाला, " जीजा , अरे यार मेरे पैसे का क्या करोगे ? कमसे कम एक दो लाख रुपिया तो देदो. कुछ दिनके लिये तो मै मुह बंद रखूंगा . वरना ये मूह को खुलने की बुरी आदत है. ताई तू तरी सांगना भावजीना. " प्रतिभाच्या तोंडावर एवढा तिरस्कार होता की ती त्याला मारण्याच्या पवित्र्यात केव्हाही आली असती. पण नारायणने विवेक करून म्हंटले, " देको प्रकाश इसपर बादमे बात करते है . " ते ऐकल्यावर प्रकाश भडकून म्हणाला, " मतलब आप कुछ देना नही चाहते है. ठीक है. मै पह्यले इस बॉस को पूरा स्टोरी बताउंगा, फिर पुलिसको. फिर चलेंगे सब मिलके चक्की पीसने. " नारायणची पोझिशन अवघडल्यासारखी होत होती. कारण सगळं माझ्यासमोर उघडं होणार होतं. नक्कीच काहीतरी या तिघांचा स्वार्थ असला पाहिजे. नारायण आणि प्रतिभा फार जवळ आले होते. हे आता अगदी स्पष्ट झालं होतं. माझ्या अंगावरून सरकणाऱ्या घामाच्या धारा थांबायला तयार नव्हत्या. मग नारायणने त्यातून मार्ग काढला. " प्रकाश तुम इस आदमीको तुम्हारे घर लेके जाओ और बांधके रखना. " त्याबरोबर प्रकाश म्हणाला, " मैने इतना कुछा किया है अभी ये भी करूंगा लेकीन पह्यले दाम बादमे काम " ......... थोडा वेळ तसाच गेला. त्या तिघांनाही अस्वस्थता घेरू लागली. मला पकडून ठेवून नारायण आणखी गोष्टी क्लिष्ट करीत होता. त्याने जवळच ठेवलेल्या ब्रिफकेस मधून चेकबुक काढले. आणि भराभर एक लाखाचा चेक लिहून त्याने प्रकाशपुढे धरला. प्रकाशने त्याच्या हातातून तो खेचूनच घेतला. न जाणो नारायणचा विचार बदलला तर ......?? आता जवळ जवळ साडेनऊ वाजले होते. वाघमारेंना फोन करून मी चूक तर केली नाही ना , मला कळेना. ते येतील का. कारण तेच या परिस्थितीतून माझी सुटका करू शकतात. उभं राहून माझे पाय दुखायला लागले होते. नारायणने फोन करून मॅनेजरला बोलावले. थोड्याच वेळात बेल वाजली. मला आशा वाटली. मॅनेजर ऐवजी पोलिस आले तर ? पण प्रकाशने दरवाज्या उघडला आणि मघाचाच मॅनेजर आत आला. तो माझ्याकडे संशयाने आणि रागाने बघत होता. अचानक प्रतिभाला कंठ फुटला. ती नारायणला म्हणाली, " देखो इसको पकडके हम और फस जायेंगे. .... सोचो जरा. पुलिसको इसके बारेमे सब कुछ मालूम है. इसकी वाइफ पुलिस स्टेशन गयी तो ? हम तीनो फालतूमे फस जायेंगे. इसे छोडनेमेही अपनी भलाई है. " त्याबरोबर नारायण म्हणाला, " इसको बहोत ज्यादा जानकारी है. ये जिंदा रखनेके लायक नही है. " त्यावर प्रकाश म्हणाला, " देखो , जीजा इस बार मै कुछ नही करनेवाला. वो भी इतने कम पैसोमे. " मग नारायण भडकून म्हणाला, " तुमको पहले काम का पैसा बहोत बार दे चुका हूं. और ये हर बार ये जीजा , जीजा कहना बंद करो. समझे ? " मग मॅनेजर कडे वळून म्हणाला, " ये गाडीका चाबी लेलो और गाडी लॉजके गेटके सामने खडी करो. जाओ जल्दी . " असे म्हणून त्याने मॅनेजरला चावी दिली. तो दरवाज्या लावून बाहेर गेला. आता मात्र आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. मी दरवाज्याकडे पाहू लागलो. ते प्रकाशच्या लक्षात आलं . तो पुढे होऊन माझा दंड पकडीत म्हणाला, " ज्यादा स्मार्ट मत बनना बॉस. भागनेकी कोशिश मत करना. " नारायण हसून म्हणाला, " उत्तम तुमने क्यूं इतना स्मार्टनेस दिखाया. तुम्हे इसमे क्या फायदा था ? अब तो तुम कामसे गया. जिंदाभी नही रहोगे. " मी पण मग स्पष्ट बोलायचे ठरवले, " मतलब तुम तीनोने मिलकर राजेशको रास्तेसे हटाया ? " त्यावर निर्लज्जपणे तो म्हणाला, " ये बोलना चाहिये क्या ? अब तुम्हे बतानेमे कोई हर्जा नही. (प्रतिमॅनेजर गेल्यावर प्रकाशने माझ्याकडे निरखून पाहिलं. मग तो म्हणाला, " अरे बॉस आप तो हमारे बिरादरीके लगते हो. " मग तो हात पुढे करून म्हणाला, " आय ऍम प्रकाश , ग्लॅड टु मीट यू. " मी हात मिळवला नाही. नारायण मधेच म्हणाला, " उत्तम तुम यहाँ क्या कर रहे हो ? मैने तुमको वॉर्न किया था .... फिर भी तुम हमारे पीछे लगते हो ? " . एकूण परिस्थितीत आपल्या फायद्याच्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत असे दिसल्यावर प्रकाश म्हणाला, " जीजा , अरे यार मेरे पैसे का क्या करोगे ? कमसे कम एक दो लाख रुपिया तो देदो. कुछ दिनके लिये तो मै मुह बंद रखूंगा . वरना ये मूह को खुलने की बुरी आदत है. ताई तू तरी सांगना भावजीना. " प्रतिभाच्या तोंडावर एवढा तिरस्कार होता की ती त्याला मारण्याच्या पवित्र्यात केव्हाही आली असती. पण नारायणने विवेक करून म्हंटले, " देको प्रकाश इसपर बादमे बात करते है . " ते ऐकल्यावर प्रकाश भडकून म्हणाला, " मतलब आप कुछ देना नही चाहते है. ठीक है. मै पह्यले इस बॉस को पूरा स्टोरी बताउंगा, फिर पुलिसको. फिर चलेंगे सब मिलके चक्की पीसने. " नारायणची पोझिशन अवघडल्यासारखी होत होती. कारण सगळं माझ्यासमोर उघडं होणार होतं. नक्कीच काहीतरी या तिघांचा स्वार्थ असला पाहिजे. नारायण आणि प्रतिभा फार जवळ आले होते. हे आता अगदी स्पष्ट झालं होतं. माझ्या अंगावरून सरकणाऱ्या घामाच्या धारा थांबायला तयार नव्हत्या. मग नारायणने त्यातून मार्ग काढला. " प्रकाश तुम इस आदमीको तुम्हारे घर लेके जाओ और बांधके रखना. " त्याबरोबर प्रकाश म्हणाला, " मैने इतना कुछा किया है अभी ये भी करूंगा लेकीन पह्यले दाम बादमे काम " ......... थोडा वेळ तसाच गेला. त्या तिघांनाही अस्वस्थता घेरू लागली. मला पकडून ठेवून नारायण आणखी गोष्टी क्लिष्ट करीत होता. त्याने जवळच ठेवलेल्या ब्रिफकेस मधून चेकबुक काढले. आणि भराभर एक लाखाचा चेक लिहून त्याने प्रकाशपुढे धरला. प्रकाशने त्याच्या हातातून तो खेचूनच घेतला. न जाणो नारायणचा विचार बदलला तर ......?? आता जवळ जवळ साडेनऊ वाजले होते. वाघमारेंना फोन करून मी चूक तर केली नाही ना , मला कळेना. ते येतील का. कारण तेच या परिस्थितीतून माझी सुटका करू शकतात. उभं राहून माझे पाय दुखायला लागले होते. नारायणने फोन करून मॅनेजरला बोलावले. थोड्याच वेळात बेल वाजली. मला आशा वाटली. मॅनेजर ऐवजी पोलिस आले तर ? पण प्रकाशने दरवाज्या उघडला आणि मघाचाच मॅनेजर आत आला. तो माझ्याकडे संशयाने आणि रागाने बघत होता. अचानक प्रतिभाला कंठ फुटला. ती नारायणला म्हणाली, " देखो इसको पकडके हम और फस जायेंगे. .... सोचो जरा. पुलिसको इसके बारेमे सब कुछ मालूम है. इसकी वाइफ पुलिस स्टेशन गयी तो ? हम तीनो फालतूमे फस जायेंगे. इसे छोडनेमेही अपनी भलाई है. " त्याबरोबर नारायण म्हणाला, " इसको बहोत ज्यादा जानकारी है. ये जिंदा रखनेके लायक नही है. " त्यावर प्रकाश म्हणाला, " देखो , जीजा इस बार मै कुछ नही करनेवाला. वो भी इतने कम पैसोमे. " मग नारायण भडकून म्हणाला, " तुमको पहले काम का पैसा बहोत बार दे चुका हूं. और ये हर बार ये जीजा , जीजा कहना बंद करो. समझे ? " मग मॅनेजर कडे वळून म्हणाला, " ये गाडीका चाबी लेलो और गाडी लॉजके गेटके सामने खडी करो. जाओ जल्दी . " असे म्हणून त्याने मॅनेजरला चावी दिली. तो दरवाज्या लावून बाहेर गेला. आता मात्र आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. मी दरवाज्याकडे पाहू लागलो. ते प्रकाशच्या लक्षात आलं . तो पुढे होऊन माझा दंड पकडीत म्हणाला, " ज्यादा स्मार्ट मत बनना बॉस. भागनेकी कोशिश मत करना. " नारायण हसून म्हणाला, " उत्तम तुमने क्यूं इतना स्मार्टनेस दिखाया. तुम्हे इसमे क्या फायदा था ? अब तो तुम कामसे गया. जिंदाभी नही रहोगे. " मी पण मग स्पष्ट बोलायचे ठरवले, " मतलब तुम तीनोने मिलकर राजेशको रास्तेसे हटाया ? " त्यावर निर्लज्जपणे तो म्हणाला, " ये बोलना चाहिये क्या ? अब तुम्हे बतानेमे कोई सर्जा नही(प्रतिभाकडे बोट करून तो म्हणाला ) मै और प्रतिबा एक दूसरेको जानते है कॉलेजके टाइमसे. राजेश और हम दोनो क्लासमेट थे. राजेश अच्छा था . लेकीन इसको बहोत तकलीफ दिया और मेरेसेभी पैसा लेकर वापिस किया नही. मै प्रतिबाको बहोत चाहता था. उसकी बच्चीसे मुझे कोई शिकायत नही. उसको मै सम्हाल लूंगा. अब हम दोनोंको शादी करनेसे कोई रोक नही सकता. तुमको जरुरतसे ज्यादा जानकारी है. इसलिये तुम्हे छोड नही सकते. दुसरेके लाइफमे इतना ज्यादा इंटरेस्ट नही लेना चाहिये. जो तुमने लिया. कोई बात नही. अब गाडीसे तुम्हे प्रकाशके घर लेके जायेंगे और वही रकेंगे. ". माझे हात पाय आता थरथरायला लागले. मी शेवटचा प्रयत्न म्ह्णून प्रकाशला म्हंटले, " प्रकाश तुला पैसेच पाहिजेत ना मी तुला पाच लाख द्यायला तयार आहे, तू पोलिसांना शरण जा आणि माफीचा साक्षीदार बन. हे दोघेही संधिसाधू आहेत. माझ्या नंतर तुझीही अशीच वाट लावतील . विचार कर. " मला माहीत होतं मी वेळ काढीत होतो. मी खिशात हात घातला. माझा मोबाइल मी आतल्या आत उघडू लागलो. एकदा तरी वाघमारे साहेबांना

मिस कॉल तरी द्यावा . म्हणून मी संधी घेण्याची ठरवली. मला माहीत होतं की पाहिल्याशिवाय मी त्यांना कॉल करू शकत नव्हतो. पण आतल्या आत कॉलचे बटण टच केलं. शेवटचा कॉल त्यांनाच केला होता. त्यांनाच लागला तर लागला. मी परमेश्वराचे नाव घेतले. नक्की काय झालं असावं मला माहित नाही. पण नारायणने माझी खिशातली हालचाल टिपली असावी. तो पटकन पुढे झाला आणि त्याने माझ्या खिशातला मोबाइल खेचून काढला. त्याने उघडला. आणि त्याला वाघमारेंन कॉल लावल्याचे दिसले. त्याने प्रकाशला खूण केली. त्याने पुढे होऊन माझ्या इतक्या जोरात कानफटात मारली की मी भेलकांडलो. आणि प्रतिभाच्या बाजूला पडलो. ती तिरासारखी पळून नारायणकडे गेली. मग प्रकाश मला पुन्हा पुन्हा मारू लागला. तो बॉक्सींगच्या कोणत्या तरी घाणेरड्या ट्रिक्स शिकला असावा. मीही बॉक्सींग शिकलो होतो. म्हणून मी पण त्याला एक दोन ठोसे देऊ शकलो. आणि माझा एक ठेवणितला ठोसा होता. ज्याला हॉर्स शू फाइट म्हणतात , ती मी दिली . अचानक इतक्या जोरात त्याच्या डाव्या जबड्यावर ती फाइट बसली की त्याचा परिणाम म्हणून त्याचा जबडा डिसलोकेट होऊन जागेवरून वर सरकला. तो वेदनेने तळमळत होता. तेवढ्यात दरवाज्या उघडण्याचा आवाज झाला. जवळ आलेल्या नारायणला मी धक्का देऊन दरवाज्याकडे धावलो. दरवाज्या उघडून मॅनेजर आत येत होता. आणि त्याच्यामागे वाघमारे साहेब त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहित आत शिरले. त्यांना पाहून माझ्या जिवात जीव आला.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all