प्रतिभा (भाग २)

तिच्या नजरेतला कोरडेपणा मला तुच्छतादर्शक वाटल्याने.......

तिच्या नजरेतला कोरडेपणा मला तुच्छतादर्शक वाटल्याने मी घाबरून सॉरी म्हणालो आणि हात काढून घेतला. यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे कोणत्याही अनपेक्षित कृतीला आमंत्रण देणे ठरले असते. मलाही थोडी चीड आली. इतकंही कोणी कोरडेपणाने वागत नाही. लवकरच दरवाज्याशी लिफ्टमन आला आणि त्याने त्याच्या जवळच्या किल्लीने लिफ्टचा दरवाजा उघडला. आता लिफ्ट खाली जाणार नाही असे तो म्हणाल्याने आम्ही जिन्याकडे वळलो. आता मात्र मी, ती मागून येत्ये की नाही हे पाहण्यासाठी थांबलो नाही . रात्रीच्या वेळेला रिक्षा मिळणं कठिण होतं. आणि बोरिवली सारख्या स्टेशनहून गाडी मिळणंही. जवळ जवळ साडेदहा होत होते. लवकरच माझ्या मागे ती आल्याची मला जाणीव झाली. आता मात्र मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून रिक्षाला हात केला. दोन चार रिक्षा रिकाम्या असूनही न थांबता तशाच निघून गेल्या. तीही रिक्षाला हात दाखवीत होती. पण रिक्षा येण्यास तयार नव्हती. अचानक एक रिक्षा मी हात दाखवला आणि माझ्या जवळ येऊन थांबली. मी पटकन रिक्षात शिरलो आणि चलण्याची खूण केली. तशी रिक्षावाला म्हणाला, " अहो साहेब मिसेस मागेच राहून कसं चालेल ? " (त्याला काय माहीत ती माझी मिसेस नव्हती ) मग त्यानेच तिला खूण करून सांगितले, " ओ मॅडम , मिस्टर बसले पण. " त्यावर मी त्याला ती माझी बायको नाही ,असे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो , पण मला गप्प बसवून तो तिला बोलावीत राहिला. तरीही ती येत नव्हती. मग ती आली आणि म्हणाली, " मला या रिक्षातून यायचं नाही आहे. तुम्ही निघा. " असं म्हटल्यावर रिक्षावाला रिक्षा चालू करीत म्हणाला, " काय बाई आहे, हिला दुसरी रिक्षा नाही मिळाली तर चालत जायची वेळ येईल. , मग माझ्याकडे वळून म्हणाला, " तुमच्या मिसेस नाहीत वाटतं. , मी उशिरा ओळखलं, नाहीतर आपण लवकरच निघालो असतो. असे लोक वागतात आणि आमच्या विरुद्ध कंप्लेटी करतात. " मी काहीच बोललो नाही. ती त्या रात्री केव्हा घरी गेली मला माहीत नाही आणि माहीत करून घेण्याची मला इच्छाही झाली नाही.


....... काही दिवस असेच गेले. ऑफिसामधलं काम चालूच होतं . तिचं वागणं तसंच होतं . मी लक्ष देणं बंद केलं . अचानक एक फोन आला. ती जागेवर नव्हती. नुकतीच ती कोणत्या तरी कंपनीत भेटीसाठी गेली होती. फोन जरा वेळ वाजल्यावर मीच घेतला.
पलीकडून एक पुरुषी आवाज आला. त्याचं बोलणं अर्धवट , ताबा नसल्यासारखं वाटलं. " आहे का ? प्रतिभा ? आं ...? काय विचारतोय मी ? " मला असं कोणी दमात घेतलेलं आवडत नाही. तरीही मी स्वतःवर ताबा ठेवीत म्हणालो, " ती बाहेर गेल्ये, तुम्ही कोण बोलता ? " त्यावर त्याने सणसणीत शिवी देऊन फोन खाली ठेवला. मला राग आला होता. तरीही मी प्रतिभाला काहीही न सांगण्याचं ठरवलं. फार काय तिचा फोन आल्याचंही मी तिला सांगणार नव्हतो. दुपारनंतर ती आली. ती बरीच दमली असावी. मी तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं. तिची मुद्रा जास्तच आक्रसल्यासारखी वाटली. हिला हिचा फोन आल्याचं माहीत असावं की काय अशी मला शंका आली. आता मी तिच्याशी कोणताही वैयक्तिक स्वरुपाचा संबंध न ठेवण्याचं ठरवलं. पण तिच्यावर पाळत ठेवण्यालाही मी उद्युक्त झालो. हि राहते कुठे , ऑफिस नंतर जाते कुठे, तसंच तिची व्यक्तिगत माहिती मिळवण्याचं मी ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळ नंतर मी माझ्या या कामाला सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. आज नारायणने पण जास्त वेळ बसवले नाही. ती निघाल्या बरोबर मीही निघालो. फक्त जिन्याने. जरा धावतच जावं लागलं . ती ऑफिसच्या मुख्य दरवाज्यामधून बाहेर पडली होती. तिने रिक्षा पकडली. ती नक्कीच स्टेशन कडे जाणार हे माहीत होतं. पण मी माझ्या रिक्षावाल्याला तिच्या रिक्षाचा पाठलाग करायला सांगितलं. माझं नशीब जोरावर असावं. तिची रिक्षा स्टेशन कडे न जाता बोरिवलीच्या एका अंधाऱ्या गल्लीत शिरली आणि एका बैठ्या चाळीसमोर जाऊन थांबली. ती गल्ली इतकीच रुंद होती की एका वेळेला एकच रिक्षा आत शिरू शकेल. बहुतेक आत शिरलेली रिक्षा गल्लीच्या दुसऱ्या तोंडाकडून बाहेर पडू शकत असेल. मी माझी रिक्षा पुढे जाऊन थांबवण्यास सांगितलं.

आणि मुद्दामच वेटिंगमधे ठेवली. रिक्षावाला म्हणाला, " साब ये पीछा करना हमको नही जमेगा. आप जलदी आयेंगे तोही रोकना, वरना मुझे भाडा देके छोड देना. " मी त्याला मुद्दामच पन्नास रुपये दिले आणि मी सांगेन तिथे येण्यास सांगितले. आणि मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचेही सांगितले. तेव्हा कुठे त्याने थांबण्याचे आश्वासन दिले. आता रात्रीचे साडेनऊ वाजत होते. प्रतिभा झपाझप चालत होती. तिचा माग न घालवता

आणि तिला न कळत जाताना मला बरेच प्रयास पडत होते. पण मी आज चंगच बांधला होता. अचानक ती डावीकडे वळली. जिथून दुसऱ्या चाळी सुरू होत होत्या. म्हणजे त्याही पहिल्या चाळींना चिकटूनच होत्या. मला चांगलाच घाम फुटला होता. अचानक पावसाची बुरबुर चालू झाली. प्रतिभा आत आत जात पुन्हा डावीकडे वळली. जिथे दुसऱ्या चाळीची शेवटची खोली असावी. त्या खोलीला दरवाज्या वळून जाऊन होता. मी जरा थांबलो. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये पिवळट प्रकाश दिसत होते. ही वेळ झोपेची नक्कीच नव्हती. लोक साधारणपणे जेवत असतात आणि त्याबरोबर टीव्ही पाहत असतात. म्हणजे आत्ता सध्यातरी कोणी बाहेर येण्याची शक्यता नव्हती. मी चाळीच्या शेवटून दुसऱ्या खोली जवळ भिंतीला चिकटून उभा होतो. प्रतिभाने दारावरची बेल दाबली. पण आतून दरवाज्या लोटलेला असल्याचं सांगितलं गेलं असावं.
ती दरवाज्या लोटून आत शिरली आणि तिने तो आतून लावून घेतला होता. आता मी दरवाज्या ओलांडून खोलीच्या मागच्या भिंतीजवळ आलो. आतून एका ड्रिंक घेतलेल्या माणसाचा आवाज येत होता. " आत्ता आलीस , नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आं ? " प्रतिभा किंचाळून म्हणाली, " ऑफिसमध्ये फोन करायचा नाही मी सांगितलं होतं ना ? " तो म्हणाला, " का ? का नाही करायचा ? मला शुचिताला भेटायचंय . तिला मी उद्या भेटायला येणार. " ........ " अजिबात यायचं नाही सांगून ठेवत्ये तुम्हाला. , तुमचा आता काहीही संबंध नाही. " "नाही कसा ? कोर्टाचा हुकूम आहे ,महिन्यातून दोनदा मी तिला भेटू शकतो. " मग थोडा वेळ जाऊन देऊन तो पुन्हा म्हणाला, " चार महिने झाले , शुचीला भेटलो नाही. कुठे आहे तो तुझा तांबडे वकील , साला मला बदफैली म्हणतो , भर कोर्टात ? आपण कमवित नाही पण आपण
बदफैली पण नाही. आणि काय गं ए, पैसे कुठे आहेत ? मला पैसे देण्याचं ठरलं होतं ना ? गेले दोन महिने पैसे पण दिले नाहीस,. कोर्टाचा अपमान करतेस ? आणि माझाही ? अपमान ? " असं म्हणून त्याने तिचा हात पिरगळला असावा . ती वेदनेने कळवळून ओरडली, " अग आई गं, सोडा माझा हात. मी पोलिसांकडे जाईन. " ती सुटण्याची धडपड करीत असावी . हे सगळं ऐकण्यात मी इतका रंगलो होतो, की माझ्या मागे कोणी येऊन उभं राहिलं आहे , याची मला जाणीवच झाली नाही. अचानक रस्त्यावरचे लाइट गेले. म्हणजे घरातलेही गेले असावेत. म्हणजे लोक लवकरच बाहेर येतील. आपल्याला निघायला पाहिजे या जाणिवेने मी पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात मी मागे वळून पाहिलं. एक म्हातारी स्त्री गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली उभी होती. तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण तिचे शब्द ऐकू आले. " काय रे , लोकांच्या घराशी चोरून ऐकतोस काय ? " मग तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. ......... " ए, कमळे, ए दादा, भायेर ये, हा बघ कोण हाय त्यो...... "आणि मुद्दामच वेटिंगमधे ठेवली. रिक्षावाला म्हणाला, " साब ये पीछा करना हमको नही जमेगा. आप जलदी आयेंगे तोही रोकना, वरना मुझे भाडा देके छोड देना. " मी त्याला मुद्दामच पन्नास रुपये दिले आणि मी सांगेन तिथे येण्यास सांगितले. आणि मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचेही सांगितले. तेव्हा कुठे त्याने थांबण्याचे आश्वासन दिले. आता रात्रीचे साडेनऊ वाजत होते. प्रतिभा झपाझप चालत होती. तिचा माग न घालवता
आणि तिला न कळत जाताना मला बरेच प्रयास पडत होते. पण मी आज चंगच बांधला होता. अचानक ती डावीकडे वळली. जिथून दुसऱ्या चाळी सुरू होत होत्या. म्हणजे त्याही पहिल्या चाळींना चिकटूनच होत्या. मला चांगलाच घाम फुटला होता. अचानक पावसाची बुरबुर चालू झाली. प्रतिभा आत आत जात पुन्हा डावीकडे वळली. जिथे दुसऱ्या चाळीची शेवटची खोली असावी. त्या खोलीला दरवाज्या वळून जाऊन होता. मी जरा थांबलो. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये पिवळट प्रकाश दिसत होते. ही वेळ झोपेची नक्कीच नव्हती. लोक साधारणपणे जेवत असतात आणि त्याबरोबर टीव्ही पाहत असतात. म्हणजे आत्ता सध्यातरी कोणी बाहेर येण्याची शक्यता नव्हती. मी चाळीच्या शेवटून दुसऱ्या खोली जवळ भिंतीला चिकटून उभा होतो. प्रतिभाने दारावरची बेल दाबली. पण आतून दरवाज्या लोटलेला असल्याचं सांगितलं गेलं असावं.
ती दरवाज्या लोटून आत शिरली आणि तिने तो आतून लावून घेतला होता. आता मी दरवाज्या ओलांडून खोलीच्या मागच्या भिंतीजवळ आलो. आतून एका ड्रिंक घेतलेल्या माणसाचा आवाज येत होता. " आत्ता आलीस , नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आं ? " प्रतिभा किंचाळून म्हणाली, " ऑफिसमध्ये फोन करायचा नाही मी सांगितलं होतं ना ? " तो म्हणाला, " का ? का नाही करायचा ? मला शुचिताला भेटायचंय . तिला मी उद्या भेटायला येणार. " ........ " अजिबात यायचं नाही सांगून ठेवत्ये तुम्हाला. , तुमचा आता काहीही संबंध नाही. " "नाही कसा ? कोर्टाचा हुकूम आहे ,महिन्यातून दोनदा मी तिला भेटू शकतो. " मग थोडा वेळ जाऊन देऊन तो पुन्हा म्हणाला, " चार महिने झाले , शुचीला भेटलो नाही. कुठे आहे तो तुझा तांबडे वकील , साला मला बदफैली म्हणतो , भर कोर्टात ? आपण कमवित नाही पण आपण
बदफैली पण नाही. आणि काय गं ए, पैसे कुठे आहेत ? मला पैसे देण्याचं ठरलं होतं ना ? गेले दोन महिने पैसे पण दिले नाहीस,. कोर्टाचा अपमान करतेस ? आणि माझाही ? अपमान ? " असं म्हणून त्याने तिचा हात पिरगळला असावा . ती वेदनेने कळवळून ओरडली, " अग आई गं, सोडा माझा हात. मी पोलिसांकडे जाईन. " ती सुटण्याची धडपड करीत असावी . हे सगळं ऐकण्यात मी इतका रंगलो होतो, की माझ्या मागे कोणी येऊन उभं राहिलं आहे , याची मला जाणीवच झाली नाही. अचानक रस्त्यावरचे लाइट गेले. म्हणजे घरातलेही गेले असावेत. म्हणजे लोक लवकरच बाहेर येतील. आपल्याला निघायला पाहिजे या जाणिवेने मी पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात मी मागे वळून पाहिलं. एक म्हातारी स्त्री गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली उभी होती. तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण तिचे शब्द ऐकू आले. " काय रे , लोकांच्या घराशी चोरून ऐकतोस काय ? " मग तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. ......... " ए, कमळे, ए दादा, भायेर ये, हा बघ कोण हाय त्यो...... "

ती आणखीनही लोकांना बोलवीत राहिली. पण ते ऐकायला मी थांबलो नाही. तसाच पळत सुटलो. आता फक्त बाहेर पडायला हवं एकच विचार माझ्या मनात होता. नशिबाने मी चाळींच्या कोंडाळ्यातून मुख्य रस्त्यावर आलो. माझ्या रिक्षावाल्याने लाइट चालूच ठेवल्याने मला तोओळखता आला. घाई गर्दीने मी रिक्षात बसलो आणि त्याला "चलो " म्हणालो. मी प्रतिभा येत्ये की नाही हे पाहिले देखील नाही. विनाकारण माझा श्वास जड झाला होता. शर्ट घामाने आणि पाण्याने पाठीला चिकटला होता. एकदाचं बोरिवली स्टेशन गाठलं. सुटणारी एक गाडी मी कशी तरी धडपडत पकडली. आत बसून जागा पकडली. घाम टिपत मी स्वस्थ झालो. माझी नजर सहजच बाजूच्या बाकड्याच्या खिडकीच्या सीटवर गेली. तिथल्या स्त्रीने मान वळवली. ती प्रतिभा होती. आता मात्र मी चिमटा काढून पाहिलं. मी झोपेत नव्हतो की स्वप्नातही. माझ्या आधी ही कशी आली . मला कळेना . याचाच अर्थ तिने पण रिक्षा थांबवली असणार , आणि तीही जवळच. माझ्यासारखं तिला मुख्य रस्त्यावर यावं लागलं नव्हतं. मी मान खाली घातली. ते केवळ तिने माझ्याकडे पाहून काही संवाद साधू नये यासाठी. मला तिच्याशी आत्तातरी संपर्क नको होता. तिचे थंड डोळे माझे निरीक्षण करीत होते. पण मी उठलो. आणि जागा असतानाही दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिलो.


तिला संशय आला असेल का , की मी तिच्या पाळतीवर होतो. माझं मन मला अपराधीपणाची जाणीव करून देऊ लागलं. मी कसा तरी विवेक करून ती जाणीव दाबली. आणि तिला मदतीची गरज असेल तर आपल्याला ती केली पाहिजे असे म्हणून मी त्या जाणिवेवर पांघरूण घातलं. तिचा तो प्यायलेला माणूस नवरा असेल का ? त्याचा आवाज आणि ऑफिसमध्ये फोन करणाऱ्याच आवाज मला सारखा वाटू लागला. मला त्याचा चेहरा पाहायला मिळाला नव्हता. नवीन माहिती म्हणजे तिला एक मुलगी आहे. तिचं नाव शुचिता आहे , हे नक्की. ती घटस्फोटित आहे. विचार थांबेनात. मी तसाच घरी गेलो. माझी बायको रिता , तिने जांभया देत दार उघडलं. तिच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करीत मी झोपण्याच्या तयारीला लागलो. .....

(क्र म शः)

🎭 Series Post

View all