प्रतिभा

Writting is my passion

पेन खाली पडताच शितल एकदम शुध्दीवर आली. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेली तिची तगमग रेवाच्या लक्षात येत होती पणं रेवा मात्र दुर्लक्ष करत.आज मात्र रेवाने शीतलला गाठले. इतर वेळी दुर्लक्ष करणारी रेवा जरा संतापली.

नविनक्लाएंट सोबत ही पहिलीच कॉन्फरन्स असल्यामुळे तिने रागावर नियंत्रण केले आणि पुढचं प्रेझेंटेशन अगदी क्लाएंट खुश होईस्तोवर हाताळले. प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला म्हणून रेवा फार खुश होती दिवसरात्र एक करत तिने हे विश्व उभ केलं होत.  म्हणूनचं की काय सर्वांनी तिचे तोंड भरून कौतुक केले आणि पुढची मीटिंग लवकरात लवकर ठरवू म्हणून सर्व कॉन्फरन्स रूम मधून निघून गेले.

पणं शितल मात्र अजूनही तिच्याच विचारात गुंतलेली होती .एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला होता त्याचा जराही आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

शितल ..

अग ए ...लक्ष कुठे तुझ?

कुठल्या विचारत असतेस सारखी?

गेली कित्येक दिवस बघते तुझ कामात अजिबात लक्ष नाही. आज तर तुझ हे वागणं अतीच झालं.. .नविन क्लाएंट समोर तोंडावर पडले असते ना..!

रेवाचे शब्द ऐकून शितलचे डोळे खळखळून वाहू लागले. रेवा शितलची बॉस असली तरी त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं होत. ऑफिस मधली कुजबुज रेवा ला ऐकू येतं होती पणं कधी तिने त्याकडे लक्ष केले नाही पणं आज मात्र शीतलची अवस्था बघून रेवाला राहवलं नाही..

शितल बोलू लागली अश्रुंच्या ओघात आवाज जरा अस्पष्ट होता तरी सर्व काही समजत होते....

अविनाश गेला...!

रेवाला पूर्व कल्पना असल्यामुळे आश्चर्यकारक असं काही वाटलं नाही फक्तं पाठमोरी आकृती करून खिडकीबाहेर एक टक बघत होती... अविनाश आणि शितलच लग्न होऊन जेमतेम 2 वर्ष झाली आणि आता त्यांचा घटस्फोट होतोय म्हणून शीतल पूर्णपणे हरताना दिसत होती...गोड गोंडस कामात अगदी चपळ असलेली आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या उलथापालथ मुळे कुठेतरी नाहीशी होताना दिसत होती.

शीतल तुला का वाटतं ग?

मी दिवस रात्र राबते,या कंपनी साठी वाटेल ते करते, कशासाठी? पैशासाठी?

मी सुध्दा काही वर्षांपूर्वी शीतलच होती फरक फक्त एवढासा की,अविनाश तुझा नवरा आहे तुमचा 2 वर्षांचा संसार आहे आणि माझ वर्ष महिने दूरच काही दिवसांच प्रेम होत.अगदी मला हवं ते सर्वकाही त्या आयडॉल मध्ये होत, तुम्हा सर्वांचा प्रश्न आहे ना माझ्या टेबल समोर जो लोगो आहे त्याचा अर्थ काय? तर तो अर्थ म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे त्या. यासाठी नाही की माझं प्रेम होत. ते यासाठी आहे की चुकून मी कधी थकले तर ते नाव मला आजही ऊर्जा देत. कधी हरले तर जिंकण्याची जिद्द देतं. माझ्या आयुष्यतील सर्वात आनंदाचे क्षण होते जेव्हा तो होता, कारण सर्वकाही बाजूला सारून मी फक्तं आणि फक्त त्या आनंदात जगायची आणि इथेच चुकली, कदाचित प्रेम करताना आपण स्वतःला विसरतो, खरतर मी अगदीच खूप हुशार नव्हती पणं काही काळासाठी का होईना स्वताकडे दुर्लक्ष केलं. ना करिअर बघितलं नाही दुसर काही.... मनात फक्तं एकच स्वप्न आम्ही दोघं राजा राणी आणि असावी आमची गोड कहाणी.... पणं स्वप्न अखेर स्वप्नच होत... तो गेला आणि तुला आज दिसणारी रेवा पूर्णपणे कोसळली... डोक्यात प्रश्नाचं काहूर पणं सर्व प्रश्न अनुत्तरीत... डोळ्यात पाणी जेवायची आणि जगायची ईच्छा पूर्णपणे संपली होती.... दिवसांमागे दिवस जात होते तशी तशी मी डिप्रेशन मध्ये अडकत होते. खरतर त्यात माझी चूक नव्हती किंवा त्याचीही नाही. पणं परिस्थितीला हाताळणे आम्हाला कधी जमलेच नाही... कळत नव्हत एवढी कशी काय मी त्याच्या आहारी गेले? पणं कितीही डिप्रेशन मध्ये असली तरी एक विचार ठाम होता जिवाचं वाईट करायचं नाही बसं! आणि मग जिद्दीने ठरवलं मला आयुष्यात जे करायचं आहे त्याला सुरुवात करायची. का म्हणून दुसऱ्यांच्या आधाराची गरज वाटून घ्यायची?. जे जमेल जसं जमेल तसं करायचं आणि सुरुवात केली ती 12 हजार पगार असलेल्या नोकरी पासून, सुरवातीला दिवसाचे 17 ते 18 तास कामात गुंतवून घेतलं, पणं त्याची आठवण आणि नकारात्मक विचार काही कमी होईना. तरीसुध्दा हरले नाही, प्रयत्न सुरूच होता.. चांगल्या पगाराची नोकरी मिळत असताना सुरवातीला नाकारल्या होत्या. कारण नोकरी करण्यात कधीच रस नव्हता पणं वेळेनुसार स्वतःला सांभाळायचं होत म्हणून नोकरी, करून इतरही काही ठिकाणी क्लासेस घेतले. थोडफार का होईना गोष्टी रुळावर येऊ लागल्या, पणं आठवण आणि डिप्रेशन काही कमी होईना, त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून आर्थिक मंदी आली आणि हातची नोकरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काम नाही म्हणजे डोक्यावर बॉस नावाचा प्राणी नाही त्यामुळे अपडेट्स देण्याचा किंवा कामाचं टेन्शन नाही. अशातच त्याच्याशी बोलले, प्रेम म्हणून नाही पणं एक माणुसकीच्या नात्याने तो समजून घेईल अशी भोळी आशा होती. पणं मी विसरले होते जो व्यक्ती गेल्या कित्येक महिन्यात समजू नव्हता शकला, तो या परिस्थितीत काय समजणार? आणि परत झाले ते शेवटी गैरसमज. आणि संपला शेवटचा तो प्रश्न कारण खरं काय आणि खोट काय याची जाणिव नसलेल्या त्याने घेतला होता तो संशय. संशयास्पद नव्हतच काही, पणं काही गोष्टींचा वेळा चुकल्या की निर्माण होणारे गैरसमज कधीही संपुष्टात येऊ नये असे भासतात. जीवापाड जपलेल्या माणसाला कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही असं ठरवलं तर खरं, पणं शेवटी मनाचं काय? शेवटी रडून रडून दमले आणि मग विचार केला, का होत असेल माझं असं? आणि मग मिळायला लागली ती अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे. माणसाचं मन फार चंचल असत ग..!

अभ्यासातून कळलं की माणसाच्या मनात एका दिवसात जवळपास १२ हजार ते ६० हजार विचार येतात, त्यात ९५%विचार हे पुन्हा पुन्हा येतात म्हणजे त्यांची पुनरावृत्ती होते आणि ते विचार असतात ज्यामध्ये आपण भावनिकरित्या गुंतलेले असतो आणि त्यातही ८०% विचार ही नकारात्मक असतात. कधी विचार केला का? दिवसभरात एवढे विचार येतात तरीसुध्दा आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात असते का? नाही....! का? तर आपण त्यात भावनिकरित्या गुंतलेलं नसतो उदा. तू गाडीची चावी कुठे ठेवलीस यावरून सुध्दा   ओरडत असते, बऱ्याच वेळा तू फाईल सुध्दा कुठे ठेवलीस हे सुध्दा तुला आठवत नाही. पणं तेच ४ते ५ वर्षांपूर्वी तुला कुणी दुखावलं असेल तर ते मात्र अचूक लक्षात असते वेळ काळ प्रसंग अगदी सर्वकाही.का? कारण त्यात तू भावनिक रित्या गुंतलेली असते. आणि ज्यात आपण भावनिकरित्या गुंतलो ते विचार आपल्या subconscious mind म्हणजेच अवचेतन मनामध्ये घर करून बसतात. आणि subconscious mind २४  तास कार्यरत असते. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर किंवा कामाच्या वेळात सुध्दा आपल्याला नको त्या गोष्टी वारंवार आठवत असतात.

आणि ज्यावेळी या गोष्टी माझ्या लक्षात आल्या मी माझा इमोशनल इंटेलिजन्स वरती अभ्यास केला. त्यामागचं कारण असं की, एकदा तुझा बुध्यांक कमी असला तर चालेल पण इमोशनल इंटेलिजन्स कमी असला की, लोक आपल्याला मुर्खात काढायला लागतात. माझ्या आयुष्यातील महत्वाची दिवस मी चुकीच्या पद्धतीने घालवली पणं   तू एवढी कर्तृत्ववान आहेस आणि एका वैयक्तिक कारणामुळे आज प्रोफेशनल लेव्हल ला एवढ्या निष्काळजीपने वागताना बघितलं आणि राहवलं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी , दुःख असतात पणं त्यामुळे खचून जाणे हा कुठला मार्ग आहे.? आम्ही खचलो त्यावेळी आम्हाला यातून काढायला कुणी नव्हत, पणं माझ्या अनुभवातून जर कुणी यशाच्या पायरीवर पुढे जाणार असेल तर नक्कीच मी त्याची मदत करेल. तू उपाशी राहून जर तुझा जाणारा नवरा परत येत असेल तर नक्कीच उपाशी राहा... तुझ्या अपयशावर जर तो सांत्वन करायला येणार असेल, तर तू ते अपयश स्वीकार, तुझ्या डोळ्यातील पाण्यामुळे त्याच्यातली आपुलकी निर्माण होणार असेल, तर नक्कीच दिवसरात्र पाणी वाहू दे..! फक्तं एका प्रश्नाचं उत्तर दे, ज्या व्यक्तीला तुझ्या अस्तित्वाने, तुझ्या डोळ्यातील पाण्याने काही फरक पडणारच नाही त्या व्यक्तीसाठी स्वतः ला का त्रास द्यायचा? असेल उत्तर तर नक्कीच बोल मला. आज एवढं अस्तित्व निर्माण केलं त्यामागे केवळ हुशारी नव्हती किंवा फक्तं पैसाही नव्हता. हे विश्व उभारायचं कारण म्हणजे आपल्यात असलेली क्षमता, आपण नको त्या कारणामुळे हरवत जातो. आपल्यात एवढी क्षमता आहे की, दुसऱ्यांच्या आधाराची नाही तर स्वतःला स्वतःच्या आधाराची गरज आहे. ठरवलं तर आपल्याला कुणी हरवत नसत आपण हरतो ते फक्तं आणि फक्तं स्वतः मुळे,मग का म्हणून आपण इतरांसाठी हरायच? एक व्यक्ती म्हणून आपले वैयक्तिक पातळीवर हवे तेवढे प्रयत्न करायला हरकत नाही पण ती पातळी किती असावी याची जाणिव  आपली आपल्याला असणे आवश्यक असते. तो जाण्याचं कारण त्याच काही वेगळं असू शकत पणं मला जेवढं कळलं ते हेच असू शकत की मी त्याच्यावर निर्भर झाले होते. कौशल्य असून सुध्दा मातीमोल ठरवत होते... आज माझी प्रतिभा मी सिध्द केली. जर त्या क्षणी उठले नसते तर आजही कुठेतरी स्वतःचे कौशल्य हरवून बसले असते. अविनाश गेला तर जाऊ दे.. सांभाळायचं प्रयत्न केलाच होता ना तू? मग ज्याला थांबायचं नाही त्याच्यासाठी अगदीच डिप्रेशन मध्ये का जायचं? येणार आहे का कुणी तुला सावरायला? जेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती आहे तर का? मैत्रिण होतीस म्हणून समजावून सांगितलं.. आणि बॉस म्हणून सांगते या कंपनीत तुला कामाची पैसे मिळतात आणि जर तुझ्या कामाशी तुला प्रामाणिक राहणं जमत नसेल तर सुट्ट्या घेऊन निवांत हो. कामात होणारा निष्काळजीपणा इथे खपवून घेतला जाणार नाही...... रेवा पाठमोरी असतानाच शीतल वर्क स्टेशन मध्ये निघून गेली.....

ऑफिस सुटायच्या आत फुलांनी बहरलेला बुके रेवा च्या केबिन मध्ये सदाकाका घेऊन आले त्यासोबत असलेलं पत्र बघून रेवा शीतलच्या टेबल कडे बघते आणि एक मोठा श्वास घेत निश्चिंत होते.

एका प्रतिभेची प्रतिमा..