

लहानमुलांना पाऊस,म्हणजे मनसोक्त भिजत होड्या सोडणं..थोडेमोठे झाल्यावर पाऊस म्हणजे,शाळेला बुट्टी मारायची संधी...धबधब्यावर जाणे..शाळेची वर्षा सहल त्यात केलेली मस्ती
त्यानंतर त्याच्या/तिच्या सोबत पावसात भिजणं म्हणजे प्रेम..
प्रत्येक वयात पाऊस वेगळाच भासत असतो...पण हाच पाउस जेव्हा रौद्र रूप घेतो....
पाऊस वाढत जाऊन त्याचे रुपांतर निसर्ग कोपात होते.पुरयेतो गावांमधून पाणी जाते कधीकधी आख्ख गाव त्याला बळी पडते,काही ठिकाणी दरडी कोसळून असंख्य जीव त्यात जिवंत गाडले जातात,काही वाहून जातात त्यांचा काहीच पत्ता लागत नाही,कितीतरी संसार उध्वस्त होतात,सगळीकडे हाहाकार माजतो त्यातून कॊणी पूर्णपणे खचून जातो,तर नव्याने उभे राहायचं प्रयत्न करतो.अशा कटू आठवणी आठवल्या की,हाच पाऊस यमराजाचे रूप वाटून नकोसा होतो.
पाऊस हा स्वतंत्र आहे,त्याला हवा तेव्हा तो पडतो,अन थोड्या वेळाने कमी होतो.अतीवृष्टी झाली तरी नुकसान होते, अनावृष्टी झाली तरी नुकसान होते.....