प्रतारणा .. अंतिम भाग 50

"आई ,परत ये नं गं , मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय , तुझ्याजागी मी मेले असते तर बरं झालं असतं . तू ढकलून मला त्या ट्रकसमोर आली म्हणून तू गेली."" बाळ , माझं मरण आल होतं तेव्हा यात स्वतःला जबाबदार ठरवू नको विजू .""मला काहीही सांगू नको तू परत ये , नाहीतर मी ही येते.."

प्रतारणा ..


अंतिम भाग -50


     दिवस सरत होते तसे वैदेही खूप खूष होती दोघी मुलींचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना आनंदित पाहून ती भरून पावत होती वैदेहीने तिच्या हिंमतीने केटरींग चा व्यवसाय सुरु केला . वेदांतही जॉब ला लागून त्याने पुण्याला ट्रान्सफर करून घेतली होती. तिने कोर्टात मार्फत मिळालेले सर्व पैसे नवऱ्याने सोडलेल्या, घटस्फोटीत महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दिले. बाहेर कुणासोबत खंबीर दाखवणारी वैदेही आतून त्याच्या विरहाने व्याकूळ होत होती. तिला इंदर आठवत होता. नवीन लग्न झाल्यावर काळजी करणारा इंदर आठवत होता. त्याच्या सोबत जे क्षण जगली ती मनापासून जगली होती .या वयात जोडीदार एक आधार असतो. एकमेकांच्या आधारानेच ते म्हतारपण जगता येते. पण इंदरला वैदेहीची पर्वा नव्हतीच. वैदेही कुठेच कमी पडली नव्हती . त्याच्या आजारपणात लहान मुलांसारखी सुश्रुषा केली. 

भरभरून प्रेम समर्पण कशातच तिची चुकी नव्हती मग का वागला इंदर असा? या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले  


 काही वर्षांनंतर इंदर पुण्याच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये वैदेहीला दिसला. त्याची तब्बेत खूप खालावली होती. तो गाडीत बसून निघून गेला. तिने हॉस्पिटलला चौकशी केली तर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या 

होत्या.डॉक्टरांनी त्याला किडनी प्रत्यारोपण करायचे सांगितले होते. घटस्फोट झाल्यावर तो सविता सोबत राहत होता. वय वाढत होतं तसं त्याला इतर व्याधी उद्भवू लागल्या. अति गोळ्यांचा परिणाम झाला होता. त्याला खूप दुखू लागले तसे त्याला अँडमिट करण्यात आले . त्याची टेस्ट करण्यात आली अन् त्यात त्यात दोन्ही किडनी निकाम्या झाल्या होत्या. डॉक्टरांनी लवकर किडनी प्रत्यारोपण सांगितले. जवळची सविताच राहिली होती.


"सविता,माझ्या जवळची तूच आहे हे तर तू मला तुझी किडनी देशील ?"


" हो ,का नाही देणार साहेब ! हे काय विचारण झालं ! तुम्ही नाही तर कुणीच नाही." सविता. त्याने तिला मिठीत घेतले.


"तूच माझी खरी साथीदार आहेस."


"हो तर म्हणले आहे पण मी का देऊ त्याला माझी किडनी आणि त्यानंतर मला काही आजार झाला तर .. मी नाही देणार किडनी . याच्यात आता पहिल्यासारखा दम नाही राहिलाय. याच्याकडून सर्व तर करून घेतलयं गाडी बंगला , बँक बॅलन्स , आता काही नाही. जाऊ दे पण किडनी मॅच झाल्यावरच द्यावी लागणार ना, नाही होणार मॅच !" सविता विचार करत होती. लगेचच ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. सविताचे तपासणी करण्यात आली. जसं तिला माहितचं होतं की किडनी मॅच होणार नाही म्हणून ती बिनधास्त होती. रिपोर्ट आले आणि तिची किडनी मॅच झाली. तिचा चेहरा खाडकन उतरला. इंदर मात्र खूष होता.


"सविता तूझी किडनी मॅच झाली." इंदर खुषीतच म्हणाला.


"अं … हो … हो ." ती तिच्याच विचारात होती


इंदर ने डॉक्टरांना भेटून ऑपरेशनची डेट घेतली त्या वेळला ते हॉस्पिटलमध्ये येणार होते.


ठरलेल्या दिवशी इंदर तिची वाट पाहत होता. सकाळची संध्याकाळ झाली . फोन केला तर स्विच ऑफ दाखवत होता. नोकरला तिच्या घरी पाठवले , पण घराला कुलूप लावलेले होते. ती गेली तर अजून परत आली नाही. ऑपरेशन कॅन्सल झाले. आता तो दिवस मोजत होता त्याला डोनर ही सापडत नव्हता. डॉक्टर शोधत होते पण त्यांना ही डोनर मिळाला नव्हता.


    

वैदेहीने जेव्हापासून इंदरला पाहिले तेव्हापासून तिचे मन लागत नव्हते. नकळत तिच्या डोळ्यांत अश्रू जमा होत होते. इतके झाल्यावरही ती त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. तिने मनातच काहीतरी ठरवून झोपली.


***

 हॉस्पिटला जाऊन ती डॉक्टर साळवी यांना भेटली जे इंदरचे डॉक्टर होते. त्यांना त्याची पूर्ण हिस्ट्री माहिती होती. 


"डॉक्टर , मी वैदेही इंदर दामले. "


"तुम्ही इंदरच्या पत्नी आहात ?"



"हो डॉक्टर आम्ही वेगळे झालोय."


" ओके . मग तुम्ही इथं का?"


" मला त्यांना काय झालयं सविस्तर सांगा ?


डॉक्टर इंतभूत सर्व वैदेहीला सांगतात. डॉक्टरचे म्हणणे ऐकून तिच्या डोळ्यात आसवे निर्माण होतात. डोळे पुसून ती म्हणते,


" डॉक्टर त्यांना मी माझी किडनी द्यायला तयार आहे. पण ही माहिती गुप्त ठेवण्यात यावी."


"नक्की, तुम्ही तयार आहात त्यांना द्यायला आणि तुमचे नाव कोणालाही माहिती पडणार नाही. त्यासाठी तुमची टेस्ट केली जाईल."


" ठीक आहे." ती टेस्ट करून घरी गेली पण विजयाने तिला हॉस्पिटलमध्ये पाहिले.


 ती हात जोडून प्रार्थना करत होती की "माझी किडनी मॅच होऊदे देवा ! "रिपोर्ट आले .

वैदेही रिपोर्ट घेण्यासाठी गेली आणि वैदेहीची किडनी मॅच झाली.


ती घरी इंद्रा, विजया, वेदांत यांना कसं सांगायचा विचार करत होती. तिला लवकर सांगावे लागणार होते. तर विजयाच घरी आली .


"अरे एकटी आलीस तू पिल्लू आणि जावाईबापू कुठे ? सुप्रिया ताई का नाही आल्या . अग बोलत का 

नाहीये "


"आई काल कुठं गेली होती?"


"कुठेच नाही ."


"मी तुला संजीवन हॉस्पिटलमध्ये पाहिले आहे. का गेली होती तू ?"


" माझी तब्बेत खराब होती ." वैदेही नजर चोरत म्हणाली.


"मग नजर का चोरतेय तू अशी , आई खर सांग का गेली होती तुला माझी शपथ !"


"विजू ."


" बोल आई."


" अं .. ते .. मी तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये पाहिले.


"काय ? बाबांना तू इथे पाहिलेस !" ती आश्चर्यचकित होत म्हणाली .


"हो … त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यात विजू, डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट करायचे सांगितले ."


मग वैदेहीने सुरवातीपासूनचे सर्व काही सांगितले आणि तिचा निर्णय हि सांगितला . विजया खूप संतापली.


"तुला आता त्या माणसाचा पुळका येतोय. अशी कशी गं तू ? आता त्या माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा भेटतेय . 



"त्यांना शिक्षा मिळली आहे विजू ."


"असं कस गं तुझं ह्दय आई ज्यात प्रेम वात्सल्य ममता इतकं आहे की ज्या माणसाने तुझ्यावर नाही तसे आरोप केले मारझोड केली तरही तुझ्या डोळ्यांत त्यांच्यासाठी पाणी येते. तू त्यांना माफ केलेस ?"


" नाही विजू मी त्यांना माफ केले नाही आणि त्यांच्याकडे परत जाणारही नाही. बायको म्हणून मी माफही करेल पण एक स्त्री म्हणून एक आई म्हणून मी कधीही माफ करणार नाही .विजू मी सप्तपदीचे कोणतेही वचन विसरले नाही . भलेही ते सर्व विसरले आहेत ."


" आई काय बोलू गं मी , तुझ्या प्रेमाला कशाचीही उपमा नाही. खरतरं निशब्द झाले गं मी आज. तू आजही बाबांवर प्रेम करते. पण त्यांना तुझी कदर नाही." विजयाचाअभिमानाने उर भरून आला . तिचे डोळे पाणावले होते. तिने आईला मिठी मारली.


आणि एक मी मेल्यावर माझे अवयव दान करायचे आहे तुला, ही जबाबदारी तुझी ."


" हे काय आई , अशी काय बोलते मला घाबरायला होतं " ती घाबरली होती. अंग घामाने भिजलेली होती.


" वेडी, मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा बारा तेरा वर्षाचा मुलाला हार्टचा प्रोब्लम होता त्यालाही डॉक्टरांनी हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचे सांगितले.आत तो मुलगा फक्त मिशिनवर जिवंत होता. बाहेर त्याचे आई वडिल मुलासाठी आक्रांत करत होते . नाही पाहवलं गेल मला मग मी तेव्हाच निर्णय घेतला माझे अवयव दान करायचा ."


"आई किडनी दिल्यावर तू अजिबात दगदग करणार नाही. माझ्याकडे येशील .दे वचन !"


"हो . "तिनेही तिच्या हातावर हात ठेवला.


"आई ,इंद्रा , वेदांत राजी होणार नाहीत."


"मी सांगेल त्यांना ठीक आहे."


" हम्म !" विजया निघून गेली. इंद्रा आणि वेदांतला सांगायचे बाकी होते.


*****

विजयाचा फोन आला 



"आई मी आणि आई, पिल्लू येतोय आपण आज शॉपिंग करायला बाहेर जाणार आहोत तर तयार रहा ! आलोच आम्ही."


थोड्याचवेळात ते वैदेहीकडे पोहचले. तिला घेऊन ते शॉपिंग करायला गेले. शॉपिंग करतात भाजी मार्केट मध्ये जाऊन भाजी घेत असतांना स्वराज हात सोडून गेला. त्याच्याजवळ रिमोटची गाडी असल्याने तो चालवत पुढे रस्त्यावर जात होता. विजया त्याला पाहते तो दिसत नाही म्हणून ती बाहेर पडते तर तो रस्त्यावर गाडी चालवत होता ती आवज देते त्याला पण त्याच लक्ष नसते ही पळते त्याच्या मागून आणि तिकडून एक भरधाव ट्रक वेगाने येत असतो. विजयाचे लक्षच नसते. ती पोहचून स्वराजला घट्ट पकडून मिठी मारते. तिकडून ट्रक वेगाने जवळ आला आणि दोघांना उडवून … तर मोठ्ठाच आवाज झाला. विजया आणि स्वराज एकीकडे पडले होते. आणि थोडं दूर अंतरावर वैदेही रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. हे इतक्या लवकर झाले की पाहणाऱ्यांना ही काही कळले नाही. तो भरधाव येणारा ट्रक विजयाला उडवून देत होता की वैदेहीने तिला ढकलून देवून गाडीची धडक वैदेहीला जबरदस्त 

बसली. डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्या डोक्याला मार लागला होता. इंद्रा वेदांत स्वप्निल विजया सर्वच आले


 डॉक्टरानी वैदेहीला तपासले आणि ब्रेन डेड घोषित 

केले. सर्वांना हे वैदेही गेल्याचे अशक्य वाटत होतं . विजया तर आल्यापासून रडत होती. आणि तिला आईचे शब्द आठवले. इंदरला किडनी देण्याचे आणि अवयव दान करण्याचे . तिने इंद्रा वेदांतला सांगितले. आई डॉक्टरांना कशी भेटली . तिचा निर्णय ही सांगितले .दोघही खूप भडकले.


"आई बाबांवर आताही प्रेम करत होती . तिला त्यांच दुःख पाहवल गेले नाही म्हणून तिने हा निर्णय घेतला. आणि आपण आईची इच्छा पूर्ण करायची नाही का?" तिने दोघांना समजवले. 




"आईची शेवटची इच्छा तेही बाबांचे चांगले व्हावे म्हणून, इतक कोणी कसं चांगले असू शकते." वेदांत.

डॉक्टरांनी फॉर्मवर तिघांचे सह्या घेतल्या आणि ते पुढच्या प्रोसिजरला सुरवात झाली. डॉक्टर साळवींना बोलवण्यात आले. विजया इंद्रा वेदांत त्यांना भेटले. इंदरची माहिती मिळाली. आईची इच्छा आहे म्हटल्यावर त्यांनी विरोध करायचा प्रश्न नव्हता. डॉक्टर साळवींनी इंदरला फोन करून बोलवून घेतले. लगेच इंदरच किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झालं. तेव्हा तिघही तिथेच बाहेर होते. बाहेरून इंदरची विचारपूस केली . 


नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. रवी, अलका सोनू रोहित सिद्धु त्यांच्या आक्कासाठी रडत होते.


 ऑपरेशन झाल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


वैदेही इहलोकातून परलोकात गेली. पण जातानाही तिने इंदरला जीवनदान दिले होते.


विजया तर वैदेही गेल्यापासून सुन्न होऊन बसली होती. तिच्या मनावर मोठा आघात झाला होता. वेदांत एकटा पडला होता. इंदरला आता पश्चाताप होत होता पण वेळ निघून गेली होती. इंदरला शेवटी बायकोनेच जीवनदान दिले. सविता ने नाही. तो पूर्ण बरा होऊन वैदेहीला शोधत होता. पण ती कुठे सापडणार होती? त्याने रवी चे पाय धरुन माफी मागितली . 


"मला तिची माफी मागायची आहे रवी ती कुठे आहे?" इंदर . 


"दाजी ती या सर्वांतुन सुटून कायमची निघून गेलीय. "

रवी डोळ्यात पाणी आणून फोटोकडे हात दाखवतो. 

वैदेहीच्या फोटोला हार लागलेला होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. इंदर स्वतःला कोसत 

होता. 

"वैदेही तू देवीचा अवतार होती. मी तुझी कदर नाही केली. मला जीवनदान देऊन गेली. मी तुझा अपराधी आहे." इंदरने हात जोडत तिची माफी मागितली. ढसाढसा रडत होता.


 विजयाला वैदेहीची खूप आठवण येत होती आणि ती स्वतःला जबाबदार समजत होती. तिने तिची तब्बेत खराब करून घेतली होती. सर्वांनी समजवले पण तिच्यावर काही फरक पडला नाही. ती वैदेहीच्या फोटो सोबत बोलत होती. 


"आई , ये ना परत ! " ती रडत रडत म्हणत होती.

     

  त्याच रात्री तिला स्वप्न पडले. वैदेही तिच्या स्वप्नात आली.


"आई ,परत ये नं गं , मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय , तुझ्याजागी मी मेले असते तर बरं झालं असतं . तू ढकलून मला त्या ट्रकसमोर आली म्हणून तू गेली."


" बाळ , माझं मरण आल होतं तेव्हा यात स्वतःला जबाबदार ठरवू नको विजू ."


"मला काहीही सांगू नको तू परत ये , नाहीतर मी ही येते.."


"नाही असं बोलू नको." वैदेहीने तिच्या तोंडावर हात ठेवला. विजयाने तिचा हात पकडून ठेवला.


"मी तुला काहीही करून जाऊ देणार नाही. बस्स !" तिने हात छातीशी घट्ट पकडून ठेवला होता. वैदेही स्मित हास्य करत होती.


"तू हसतेस !" विजयाने गाल फुगवून विचारले .


"हो .. कारण मी नाही जाणार तुला सोडून ,खुष !"


"भरपूर खुष ."


स्वप्न पडल्यापासून ती खूप आनंदात दिसत होती. महिन्याभरात तिला गोड बातमी आली ती पुन्हा एकदा आई होणार होती स्वराज नंतर ती सात वर्षांनी प्रेग्नंट राहिली. ती खूप आनंदात राहत होती . नऊ महिन्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिला हातात घेतल्यावर तिला आईचं जवळ आहे असे वाटले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ओठांवर हसू आले होते. स्वप्निल ची अवस्था वेगळी नव्हती बाळाला घेतल्यावर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले होते . त्याने बाळाच्या कपाळावर किस केले तसं बाळ गालात हसले. सर्व आनंदी होते . स्वराज तर त्याची लिटल सिस्टर आली म्हणून उड्या मारत होता.विजयाने स्वप्निलने बाळ्याच्या बारशाची तयारी जोरदार केली. सर्व जमले बाळाला पाण्यात ठेवले. आणि स्वप्नालीने त्याच्या कानात नाव सांगून कुर्रर्र केले. 


"आम्हाला पण नाव सांगा?


बाळाच्या नावाचा पडदा बाजूला केला आणि वैदेही हे नाव झळकले.



समाप्त !


नमस्कार वाचकहो ,

ही एक सत्य घटनेवर आधारीत असून त्यात 

काल्पनिकतेने रंगवले आहे. कथा मालिका लिखाणाचा माझा पहिलाच प्रयत्न होता पण त्याआधी माझी दूसरी कथा पूर्ण झाली. या कथे मागचा उद्देश की आज इंदर सारखे खूप असतील पण कोणी वैदेही इतके साधे भोळे ही राहू नये. ती बनू नये. रिअल वैदेही आज ही नवऱ्याचा त्रास सहन करते. तिच्यासमोर इंदर तिची प्रतारणा करतो. कथा लिहण्याचा हेतु असा की वैदेही ची कहानी मला सगळ्यांसमोर आणायची होती. 



नवरा फक्त बायकोशी नाही तर मुलांचीही आणि पूर्ण कुटूंबाशी प्रतारणा करतो. यामध्ये त्यांच्या मुलांनाही , ते तर चक्की सारखे वाटले जातात .खूप अडचणींना सामोरे जावे लागते मुली असल्या तरी बाबांच चारित्र्य तसं म्हणून त्यांच चारित्र्य तसेच. लोकांची घाणरेडी नजर .. त्यांना सेक्यशुअल हॅरॅस करण्याच प्रयत्न केला जातो . असे करतांना एकदा तरी आपल्या कुटूंबाचा विचार करावा.

       अशी प्रतारणा माफीच्या लायकीची नसते .


         सगळ्या वाचकांचे मनापासून आभार 


धन्यवाद


©® धनदिपा


🎭 Series Post

View all