प्रतारणा ..
भाग - 49
वैदही दुसऱ्याच दिवशी तिने एका 'आधार ' संस्थेमार्फत वकिल सोनाली महादे यांना भेटायला गेली.. तिथे तिने घटस्फोटची मागणी मागितली. वैदेहीने सर्व परिस्थिती सांगितली. तशी सोनाली मॅडमनी इंदरला नोटिस पाठवली. त्यात तिने विवाहबाह्य संबंध, शारिरीक व मानसिक मारझोड केल्याचा आरोप लावला.
ती नोटिस इंदरकडे गेल्यावर इंदर रागाने लाल झाला. पण सविताचा विचार करत त्याने पटकन घटस्फोट द्यायला हरकत नाही. 'मग तर कुणाचीच कटकट नाही.मी माझा मालक राहिल.' त्याने ही वकिलाशी बोलून त्या नोटिसचे उत्तर पाठवले. केस फॅमिली कोर्टात दाखल होऊन त्यांना तारिख देण्यात आली. ती त्या तारखेवर हजर राहणार होती .
****
वैदेही मुंबईला गेली. तिथे तिने एका हॉटेलमध्ये जेवण बनवायला सुरुवात केली. ही गोष्ट तिने सगळ्यांपासून लपवली. पण एक दिवस राहुलला ती हॉटेलमध्ये काम करतांना दिसली. राहुलने लगेच स्वप्निलला सांगितले. स्वप्निल आणि विजया लगेच तिथे पोहचले. आईला दूरूनच असे काम करतांना तिला खूप वाईट वाटले. ती तिथेच स्वप्निलच्या गळ्यात पडून रडत होती. काम संपल्यावर ती आईच्या मागे मागे लपून गेली.. एका छोट्या घरात ती राहत होती. आजूबाजूला घाणच
घाण, तिथे गटारीचा उग्र वास येत होता. विजया दाराजवळ जाऊन तिने दार ठोठावले. दार उघडले गेले तसे वैदेही त्यांना पाहून गोंधाळली.
"तुम्ही इकडे कसं काय ?" वैदेही सर्वांना पाहत म्हणाली .
"हे मी तुला विचारले पाहिजे आई. तू एकटी इथे कशी का आलीस ? का तुझ्या मुलांवर तला विश्वास नव्हता. खोटं बोलून तू इकडे का आलीस ? आई आत्ताच्या आता बॅग भर आणि चल लवकर , तू मला हवी आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ." ती रडतच म्हणत होती.
" मी नाही येऊ शकत विजू बाळ !"
"मग माझं मेललं तोंड पाहायला तयार राहा ." तशी वैदेहीने तिच्या गालावर सनकन वाजवली.
"असं अभद्र बोलू नको बाळा, आता कुठे तुझा संसार सुरु झालयं अजून तुझं बाळं फक्त तीन वर्षाच आहे गं. तू इतकी मोठी झाल्यावर तुला आई पाहिजे ते तर इवलसा जिव आहे. तुमची तर एक आस आहे गं माझ्या जीवाला ! वैदेही रडत तिला मिठीत घेत
म्हणाली .
"आई चल घरी !" विजयाने वैदेहीची बॅग भरली . तिथल्या घर मालकाला पैसे दिले आणि विजयासोबत निघाली. घरी आल्यावर सुप्रियाने त्यांचे स्वागत केले.
"आम्ही असतांना तुम्ही कसे काय गेलात तिकडे वैदेही ताई ! इकडे हक्काचं घर सोडून वणवण फिरत होत्या.
हे ही तुमचं घर आहे ना . आम्ही परके आहोत काय ? तुमची लेक जावाई आहेत. तुमच्या लेकीला दोन आईच प्रेम मिळतयं स्वराजला दोन आजीचं प्रेम मिळतयं तर का हिसकावून घेत आहे त्यांच्याकडून ?" सुप्रिया आत्मीयतेने म्हणाली.
"ताई तुम्ही बिनधास्त राहा इथे !" संजय.
" माझी काहीतरी पुण्याई आहे आणि माझ्या लेकीचे भाग्य की इतकं छान नवरा सासू सासरे नणंद मिळाली आहे." ती डोळ्यांत पाणी आणत म्हणाली तशी सुप्रियाने त्यांना मिठी मारली. वैदेही तिथे राहू लागली . इंद्राला लवकरच कॅम्पस मार्फत जॉब लागला आणि तिने आईला फोन केला पण आईने फोन उचलला नाही. म्हणून तिने विजयाला फोन करण्यासाठी नंबर डायल केला आणि लगेचच फोन कट केला . प्रत्यक्षात भेटून ही आनंदाची बातमी कळवू असा विचार करून ती तयार होऊन ती रिक्षात बसून विजयाकडे आली. .
इंद्रा आल्यावर ती शॉक झाली वैदेहीला पाहून .
"तू इथे कशी ? कधी आलीस, मला का नाही
सांगितलं ?आई माझ कॅम्पस मार्फत सिलेक्शन झालं ! आई काळजी करू नको मी लगेचच आपल्यासाठी फ्लॅट पाहतेय . आपण तिकडे शिफ्ट होऊया. वेदुला पण बोलून घेऊ आपण !" ती उत्साहाने सांगत होती . तिने सर्वांना पेढा भरवला.
"पण आई तू कधी आलीस?"
"मी आजच आले ."
"का काय झाल सर्व शांत का आहे ?"
"काही नाही." वैदेही.
"तायडे काय झाल सांग ?" मग विजयाने पूर्ण गोष्ट सांगितली.
"आई का अस केलंस तू?"
"इंद्रा तूला माहिती आहे ना कोर्टात केस चालू आहे . वकिलाला त्यांची फि द्यावी लागते . तुझं शिक्षण वेदू च शिक्षणं , तुझं लग्नासाठी नको का पैसा ? म्हणून मी मुंबईला गेली. मी काम करत असल्याचं कोणाला माहिती पडणार नाही."
"पण आई आम्ही आहोत ना तुझ्यासोबत मग कशाला इतकी धावपळ करायची आहे आणि असं आहे तर मग मी लग्नच करणार नाही. तुला सोडून कुठेही जाणार नाही."
"असं नको बोलूस इंद्रा ."
"तू करू शकते आणि मी बोलूही नको. यापुढे दगदग करू नको. मी पुन्हा सांगणार नाही काय !"
वैदेही इंद्रा तारीख वर कोर्टात हजर झाल्या. वैदेहीला इंदरला जजसमोर उभ करून त्यांनी प्रश्न विचारले . ज्यांची त्यांनी आपआपल्या परिने उत्तरे दिली. पुढची तारीख देण्यात आली.
इंद्राची परिक्षा संपली रिझल्ट लागला आणि ती कंपनीत जॉइन झाली. वैदेही घरी राहून जेवणाचे डबे देऊ लागली. इंद्राने भाड्याने फ्लॅट घेऊन वैदेहीच्या हातून पुजा करून गृहप्रवेश करून घेतला. ते तिथे शिफ्ट झाले. वेदांतही आला. पण त्याचे शिक्षणाचे दोन वर्ष बाकी होते. काही दिवस राहून तो बेंगलोरला गेला.
तारीख वर तारीख मध्ये एक वर्ष लोटले आणि वैदेहीला घटस्फोट मिळाला. पगाराचा अर्धा हिस्सा वैदेहीला आणि घर प्रॉपर्टी इंद्रा आणि वेदांत ला वारस हक्क म्हणून मिळाले. वैदेही तिची लढाई जिंकली होती.
इंद्राच्या फ्लॅटवर आज गर्दी होती. विजया स्वप्नाली सुप्रिया संजय स्वप्निल स्वराज आणि राहुल आणि त्याची आई आले होते. वैदेहीला वाटले असेच भेटायला आले असतील पण नाही ते तर इंद्राला मागणी घालायला आले होते.
"ताई खरतरं मी इंद्रासाठीच इथे आले आहे.तिला सुन म्हणून मी मागणी घालायला आले." राहुलची आई. इंद्रा ला अपेक्षित नव्हते .
" पण ताई आपली कास्ट ?"
" माणूस महत्वाचा की जात महत्वाची ! त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही."
"तुम्हाला इंद्राच्या बाबांबद्दल माहिती आहे ना म्हणजे नंतर .."
"हो माहिती आहे पण यात तिचा काय दोष आहे"
" त्या दोघांनाही ठरवू द्या काय निर्णय घ्यायचा आहे
तो ."
" चालेल काहीच हरकत नाही ." राहूल इंद्रा टेरेसवर बोलायला गेले तिथे इंद्राने छान फुलांची बाग तयार केली होती.
" तुम्हाला मी कस काय पसंत पडले ?का लग्नाला होकार दिला तुम्ही ? " इंद्रा .
" माझं प्रेम आहे तुझ्यावर !"
" ते कधी झालं ?" तिने कपाळ्यांना आठ्या पाडत विचारले.
" जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच !
"डोळे आणि डोकं ठीक आहेत ना तुमचं ?"
" तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आहे. फटकळ तोंडावर बोलणारी,माझे नखरे सहन करण्याची तयारी आहे का? आणि मुख्य म्हणजे माझ्या बाबांच आईचा घटस्फोट झाला आहे. तर तो कोणत्या कारणावरून झाला तर .
"मला सर्व माहिती आहे इंद्रा आणि तुझे नखरेच तर आवडतात मला !" राहूल मध्येच म्हणाला .
"हो का , म्हणजे तुम्ही रिस्क घ्यायची ठरवली आहे तर मी काही करू शकत नाही.पण माझ्या सोबत चिंटिंग केली तर पी एस आय साहेब तुमच्या पिस्तुलीच्या गोळ्या तुमच्या डोक्यात घालेल काय समजले? मी वैदेही नाही तिची मुलगी आहे !" तिने त्याच्या शर्ट च्या कॉलरला पकडून खेचले . तो असावधपणे उभा असल्याने तिच्या अंगावर आदळणार तर त्याने सावरले. त्याचे एकदम डोळे मोठे झाले.
"च्या आयला ऑफिसर मी आहे की ही डायरेक्ट धमकी !" तो मनातच विचार करत म्हणाला..
" आणि एक गोष्ट माझ्या लग्नानंतरही आई माझ्याजवळ राहील काय समजले का? एक्सेप्ट असेल तर ठीक नाहीतर जा उडत !" ती खांदे उडवत
म्हणाली . .
" म्हणजे तू लग्नाला तयार आहेस तर ..पण मी एकटा काय करणार उडून तूही चल हनिमून तिकडेच करू ." तो हसत म्हणाला आणि तिने त्याच्याकडे पाहत गाल वरती नाटकी स्माईल देऊन डोळे मिचकवले.
"चला मग खाली सांगूया."
"त्याआधी एक हगी देना."
"काय ?" त्याने हात फैलावून इशारा केला.
"हगी बिगी ते लग्नानंतर काय ! "
तिने खाली जाऊन होकार दिला. त्याचा तर आधीच होकार होता. लवकर त्यांच जवळच्या मोजक्याच लोकांमध्ये विधीवत लग्न झाले.
क्रमश ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा