Login

प्रतारणा .. भाग - 48

तिचे ऑपरेशन करून गर्भाशय काढण्यात आले . त्यावेळी ही इंदर वैदेहीजवळ नव्हता तो तर सविता सोबत राज??

प्रतारणा ..

भाग 48

         इंदर तर त्याच्या विश्वात होता. जे त्याने निर्माण केले होते.वैदेहीने दोन वर्ष अंगावर त्रास काढला पण एक दिवस तिला पाळीत खूप ब्लिडिंग झाले तेव्हा तातडीने तिचे ऑपरेशन करून गर्भाशय काढण्यात आले . त्यावेळी ही इंदर वैदेहीजवळ नव्हता तो तर सविता सोबत राजस्थान फिरायला गेला होता. इंदरला फोन करून कळवले तर त्याने , "मी काय करू ?" म्हणून उत्तर दिले.त्याला काहीही फरक पडला नाही. त्याने फोन व्दारेही चौकशी केली नाही. वैदेही सोबत विजया,स्वप्निल ,स्वराज , सुप्रिया, संजय, इंद्रा, वेदांत अलकामामी, रवी मामा त्यांची मुलं सोनू रोहित होते. विजयाच्या डोळ्यांत राहून राहून पाणी येत होते ती देवाजवळ प्रार्थना करत होती. सुप्रिया तिला सांत्वन देत होत्या. ऑपरेशन झालं, डॉक्टर बाहेर आले. 

"ऑपरेशन यशस्वी झाले. त्या ठीक आहेत." डॉक्टर बोलून निघून गेले.

तिला शुद्ध आली तिच्यासमोर पूर्ण परिवार होता पण तिचे डोळे इंदरला शोधत होते. पण तो तिथे नव्हताच. वैदेहीला डिस्चार्ज मिळाला. इंदर आला ,त्याने एकदाही तिची विचारपूस केली नाही. वैदेहीची तब्बेत सुधारेपर्यंत विजया तिथेच राहिली .काही दिवस अलका मामी राहिल्या. विजया दिड महिना राहिली . तिला आता जास्त वेळ थांबता येत नव्हते. म्हणून ती वैदेहीला सोबत येण्याचे म्हणाली. तर वैदेहीला ते पटले नाही. 

" आई माझ्यासोबत चल ! इकडे तुला आराम मिळणार नाही ." विजयालक्ष्मी .

" नको विजू , मी नाही येतं, माझी काळजी करू नको . अलकामामी आहे ना इथे ! तू निश्चित जा !" वैदेही.

ती विजयाकडे गेली नाही. तिने पुण्याला 

जाण्याआधी आईसाठी लाडू वळवून ठेवलेत आणि तिला जबरदस्ती खाण्याची धमकी दिली. इतकं असून तो वैदेहीच्या मागे लागत होता. तिचं ऑपरेशन होऊन सुद्धा ती त्याचे खाण पिणं सर्वच करत होती. संजय सुप्रिया तिला घ्यायला आले आणि ती अन् स्वराज घरी गेले. रोज ती व्हिडिओ कॉल लावून बोलत होती. एक यशोदा आजी होती इंदर तिला थोडातरी घाबरून राहत होता पण ती गेल्यापासून त्याची हिम्मत वाढली होती.आता इंदरचे घरी राहणे ही बंद झाले होते. तो रात्री ही तिच्याकडेच राहत होता. आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात होते इंदर गेल्यावर मात्र वैदेही रात्र जागून आणि रडून काढत होती. इंदर घरी आल्यावर

" माझे पाय चेपून दे , पाठ चेपून दे !" हे कर ते कर चालू असायचे . वैदेही चूपचाप त्याचे पाय चेपून देत होती. त्याने मोबाइलच्या स्क्रीनवर ही त्या दोघांचं फोटो लावला होता. बायकोला पाण्याचा ग्लास न देणारा इंदर सविताकडे बैलासारखा राब राबत होता. सणवाराला सर्वात आधी सविताकडे सर्व वस्तू , कपडे येत होते. तिच्याकडेच सण साजरा होत होता. सविताच्या एका हाकेवर इंदर हातातील काम तशीच सोडून धावत जात होता. तिच्याच नजरेसमोर तिचा नवरा दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेऊन तिच्याशी प्रतारणा करेल तर तिला काय वाटत असेल हे आपण कल्पनाही करू शकत नाही. तेही दोन वेळेस .वेदांत घरी आला.वेदांतला ही हळूहळू माहिती पडत होते. त्यांचे फोटो,मॅसेज दिसले आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली.

"बाबा तुम्हाला काहीच वाटत नाही ? मुलं मोठी झाली आहे. एका मुलींच लग्न झालयं आणि एकीचं बाकी आहे. कोण लग्न करणार आहे तिच्यासोबत ? मुळात तिला स्थळ येतचं नाहीये तर का तर सगळीकडे तुमचं प्रकरण पोहचलेले आहे. मग कस येणार ना स्थळं . " बोलताना त्याच्या बोलण्यात राग स्पष्ट दिसत होता.

" मी आणले होते स्थळ तिलाच पसंत नाही. मग मी काय करू?" इंदर.

" चाळीस पन्नास वर्षाच्या धोड पुरुषाचं स्थळला काय हो म्हणणार आहे का ती ! तुमच्यापेक्षाही वयाने मोठा दिसत होता तो . विजु ताईची पुण्याई म्हणून काय ते विजुताईला चांगले सुशिक्षित स्थळ येऊ तिचं लग्न झालं नाहीतर तुम्हीतर तिरडीवर असणाऱ्या पुरुषासोबत लग्न लावून दिलं असतं बरोबर ना ! " आम्ही लहान असतांना ही तिने ते सर्व सहन केले. अंगावर व्रण येईपर्यंत तुम्ही तिला मारले. अस राहा तसं राहा , ब्लाऊज असे घालायचे , भांग असा पाडायचा , डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही. हे कमी काय तुमचं अफेयर आणि तुम्ही तिच्यावरच संशय घेतला . लहान असतांना समजत नव्हते पण आता सर्व समजतेय. बाहेरची लोक विचारून विचारून हैराण करत त्यांना तर एक तमाशा भेटला होता पाहायला, ऐकायला ! तुमच्यामुळेच विजूताईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्यामुळेच आम्हला आमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावे लागले. यामध्ये मुलींना किती त्रास होतो हे तुम्ही पाहिलय का कधी? यामध्ये सफर झाली आई आणि विजू ताई ! त्याने एक जळजळीत कटाक्ष इंदरवर टाकला.

" काय आहे तिच्यात जी तुम्ही घरातल्या लक्ष्मीला लाथाडून त्या बाहेरचे शेण खाताय. तुमच्याजवळ पैसा आहे म्हणून ती तुमच्याजवळ आली आहे. पैसा गेली की ती ही जाणार. माझी आई मात्र जेव्हा तुमच्याकडे काहीच नव्हत अगदी पैसा श्रीमंती नव्हती तेव्हापासून आहे. पण हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा फार उशीर झाला असेल. तुमच्याकडे प्रायश्चित्तचीही वेळ राहणार नाही बाबा ! अजूनही वेळ गेलेली नाही 

वेळीच आईची माफी मागा ती आताही तुम्हाला माफ करून स्विकारेल ! "

"तुम्हांला दोन्हीतून एकाला निवडायचे आहे. आई किंवा ती ?"

"ती माझं सर्वस्व आहे."

 इंदर तेथून सविताकडे गेला तिथे तिने आगीत तेल ओतले. त्या दिवसांपासून वेदांत त्याला खूप खटकत होता. घरी आल्यावर इंदर खूप नाटक करत होता . घरात पाय ठेवला की त्याचे नाटक सुरू होतं, पण बाहेर तो एकदम व्यवस्थित राहात होता आणि दिसत ही होता. अन्न पाणी ग्रहण त्याने करणे सोडून देण्याचे नाटक केले. वैदेहीचे अन् त्याचे जोरदार भांडण झाले. त्याने काचेच्या टिपॉय फोडला. त्याच्या काचा इतरत्र विखुरल्या . तिचे ऑपरेशन झाले होते तिथेच तिला पोटात लाथा मारल्या. पाठीवर गुद्दे मारले. .इतकचं काय तर त्याने आई आणि मुलाच्या पवित्र नात्यावर संशय घेतला, घाण घाण आरोप केले. 

"तुझं आणि वेदांतचा चक्कर आहे म्हणून तर ऐकते त्याच्या मागे पुढे करते. मस्करी करतो. तो तुझ्या गरजा पूर्ण करत असेल न " इंदर कुत्सित हसत म्हणाला.

          मुलं कितीही मोठी झाली तरी आईला ते लहान वाटतात .जिथे परमेश्वराला न पुजता आई वडिलांना पुजिले तर ते तीर्थयात्रासमान असते. आई हे देवदूत असते. देव प्रत्येक वेळेला मदत करायला येऊ शकत नाही म्हणून त्याने आई बनविली. तिची सेवा केल्याने जन्माचं पूण्य लाते 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !' असे आपण म्हणतो पण याच पवित्र नात्यांवर त्याने नको ते घाणरेडे आरोप लावले.

वैदेहीने आतापर्यंत सहन केले पण हा आरोप ती सहन करू शकली नाही. ती चवताळून उठली .

" माझ्यावर आणि आपल्या अंश वेदुवर असा संशय घेताय असं बोलतांना काहिच कसं वाटलं नाही." तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. श्वास वाढला होता. अंग थरथरायला लागले होते.

तिने इंदरची कॉलर पकडून त्याच्या गालावर मारायला हात उचलला पण ती त्याला मारू शकली नाही. तिने त्याला बाजूला ढकलून दिले.

"माझ्यावर हात उचलते तू ?" त्याने तिच्यावर हात उचलला होता की त्याचा हात हवेतच राहिला कारण वैदेहीने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता . तिने इतका घट्ट धरून ठेवला की त्यांच्याकडून सोडता येत नव्हता.

" हात मला ही उचलता येतो . कळलं !" वैदेहीने त्याचा हात जोरात झटकला.

" तुम्ही तर इतका खाली त्या घाणमध्ये गटारीत उतरले आहेस ना कि ते वर येणे अशक्य आहे. डोक्यात घाण किडे भरलेत तुमच्या ,वाटत होतं की भटकलेला माझा नवरा आज नाहीतर उद्या येईल परत पण नाही आणि तूम्ही उद्या आला जरी तरी मी तुम्हाला स्विकारणार नाही." 

"इतकेच वाटत आहे तर निघं माझ्या घरातून ! बघतोच आता राहते कशी तू?"इंदर रागात तावातावाने

 म्हणाला. 

" निघतेच आहे मी आणि मेले तरी मी पुन्हा या घरात येणार नाही. पण माझ्या मुलांचा हक्क या घरावर आहे. आता मी जे काही घ्यायचं ते कायद्याने घेईल. आतापर्यंत मी लोकांचा, नातेवाईकांचा ,समाजाचा विचार करून थांबले पण आता नाही. यापुढे आपण कोर्टात भेटू !" ती रडत रडत म्हणाली. तिने तिचे कपडे भरले आणि ती निघाली तर खाली पडलेली काच तिच्या पायात घुसली. तशी तिच्या तोंडातून "आईऽऽ" हाक बाहेर पडली. तिने खचकन ती काच उपसून काढली तशी तिच्या पायातून रक्ताची धार लागली . रक्ताने भरलेल्या पायाने ती लंगडतच ती चालत होती आणि फरशीवर तिच्या रक्ताने भरलेल्या पायाचे ठसे उमटत होते. ती तशीच तिथून निघाली पायांना कपडा बांधून ती तिच्या भावाकडे आली. भावाला बहिणीला सर्व सांगितले.

"आता या वयात कोर्टकचेरी करतेय का? लोक काय म्हणतील. समाज काय म्हणेल ? वेदिकाच्या सासरचे मंडळी काय म्हणतील? या वयात ही बाई फारकत घेतेय. याचा तरी विचार कर, घरात बसून गुपचूप खा ! कशाल हे सर्व .. वैदेही बाई घरी जा !" रवी म्हणाला.

" कशाला पाठवता आहे त्यांना किती सहन करताय ते , बाई मी आहे तुमच्यासोबत ." अलका.

"दादा सहनच करत आलेय नं मी इतकं वर्ष, लोक समाज यांचाच विचार केला होता मी आतापर्यंत . त्यापेक्षा विरोध केला असता. वेगळी राहिले असते तर बरं झालं असतं. तूच मला जबरदस्ती पाठवल होतं. माफ करून स्विकारल ना पण आता नाही. यावेळी मी झुकणार नाही. यावेळी माझ्या मान सम्मान आणि आईपणाचा अपमान केला आहे. काय नाही केले मी या माणसासाठी . आणि यांनी .." तिला हुंदका आला.

"तूला जर आजची रात्र राहायची जागा द्यायची नसेल तर सांग नाहितर जाते मी. " तिचा निर्णय झालेला होता. 

"कुठे जातेस तू इथेच राहा , मी तुला काय खाऊ घालू शकणार नाही का असे वाटते तुला?"

" नाही दादा , पण आता मला माझी लढाई लढायची आहे."

अलकाने फोन करून विजया आणि इंद्राला सांगितले . वेदांतला ही सांगितले पण जन्मदात्याने जन्मदाती आणि त्याच्यांत संशय घेऊन लांछन लावले. हे सांगणे तिने टाळले. विजयाने सुप्रिया सर्व सत्य सांगितले तेव्हा सुप्रिया तिच्या व वैदेहीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले .

क्रमश ..

🎭 Series Post

View all