प्रतारणा ... भाग - 47

एक दिवस विजयाला गरगरायला लागले आणि ती बेशुद्ध पडली. स्वप्निलला फोन करून बोलावण्यात आले. तिच्या

प्रतारणा ..

भाग - 47

तिला दोन्ही हातांवर उचलून बेडवर आणले आणि तिने चादर मध्ये चेहरा लपवून घेतला होता. त्याने ती चादर ओढून बाहेर फेकली. तिने त्याच्यावर डोळे मोठे केले. 

" तू जर अस करशील तर मी ही … तसचं !" त्याने ही त्यांचे खांदे उडवले. तो तिच्यावर झुकला आणि त्याने तिचे विलग झालेले ओठ त्याच्या ओठांत बंदिस्त केले. पुन्हा एकदा तो त्या ओठांची गोडी चाखत होता. तीही तितकाच प्रतिसाद देत होती.हळूहळू तो मानेवर कानावर किस करत होता. त्याच्या ती त्याच्या स्पर्शाने बेभान होत होती. त्याने त्याचा शर्ट काढला. हीने डोळे मिटून घेतले. ती आज पहिल्यांदा त्याला शर्टलेस पाहत होती. "डोळे उघड ना !" त्याने तिच्या कानात हळूच म्हटले. तिने डोळे उघडले. त्याने तिचे ओठ लॉक केले. त्याने तिच्या ब्लाऊजची नाँट सोडून त्याने साडीची पिन काढून घेतली.पदर बाजूला झाला. ब्लाऊज हि एका बाजूने खाली गेले आणि तिच्या गोरापान गळ्याशी खाली असलेला तीळ दिसला. त्याने त्यावर ओठ ठेवून हलकाच दाताखाली घेतला. ती थोडी कळवळून एक सुस्कारा सोडला. तिने पदर हाताने घट्ट पकडून घेतला . त्याने तिच्या पोटावर बोटांची नक्षी करत होता. आता तिचे श्वास कमालीचे वाढलेले. तिचा श्वास त्याला बेधुंद करत होता. दोघांचे कपडे बाजूला झाले. तो तिच्यात सामावू पाहत होता तर ती त्याला स्वतः मध्ये समावून घ्यायला अधीर झाली होती.आणि दोघंही एकमेकांत एकरूप झाले. दोघंही बराचवेळ एकमेकांत विरघळत होते. तो बाजूला झाला आणि थकल्यामुळे ती लगेच झोपून गेली. पण स्वप्निल तिला न्याहाळत होता. आज तिने स्वतःहून पुढाकार घेतला होता. यापुढे तिला कुठलाही प्रकारे दुःख होता कामा नये. तिच्या कपाळावर किस करून तिला मिठित घेऊन तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली . डोळे उघडून पाहिले तर तो अजूनही शर्टलेस होता आणि त्याचा शर्ट तिने घातला होता. तिचे कालचे क्षण आठवले तसे तिचे गाल गुलाबी झाले. त्याच्या गालावर किस करून ती उठायला गेली तर तिचे अंग खूप ठणकत होते. ती वेदनेने जराशी कळवळली.स्वप्निल

तिच्याजवळ जात म्हणाला." खूप त्रास होतोय का?"

"हम्म."

" सॉरी मी काल जास्तच वाहवत गेलो ." तो चेहरा पाडत म्हणाला. .

"नाही मी ठीक आहे. "

" खरच "

" हुँ ." 

" थँक्यू यू माय लव्ह ! कालची अविस्मरणीय रात्र दिल्याबद्दल !" तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. तिने लाजून चेहरा खाली केला होता.

   

     प्रत्येक रात्री त्यांच प्रेम बहरत असून आणखीनच दृढ होत होते.

****

      वैदेहीचे पोट खूप दुखत होते. आठ दिवसातून पाळी येत होती.इंदरने साध विचारण्याची तसदी सुद्धा घेतली नव्हती. त्याने आधीच घरात पैसे देणे बंद केले होते. म्हणून तिने घरातच बसून जेवणाचे डबे देणे सुरु केले. तिच्याजवळ पैसे आले तसे ती हॉस्पिटलला निघून गेली. डॉक्टर वर्षा पाटील त्या शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ होत्या. त्यांनी वैदेहीचे चेकअप केले. सोनाग्राफी केली. वारंवार गर्भपात केल्यामुळे तिच्या गर्भशयाला होल पडले. डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करायला सांगितले. तात्पुरत्या गोळ्या औषधी घेऊन ती घरी आली. आजारी असली तरी इंदरला सर्व हातात द्यावे लागत होते. जशा लहान मुलांना द्यावे लागते ना तसे पण इंदरचा हेतू फक्त तिला शारिरिक, मानसिक दृष्ट्या त्रास द्यावा आणि तिने घर सोडून जावे. का सोडून जावे तिने ? त्या घरात तिचं पूर्ण आयुष्य झालं असं म्हणता येईल की त्याचं घराने तिच आयुष्य व्यापून टाकाल.ते सोडून द्यावं तिने ?   

तिचे नेहमीचे रुटिन चालू होते. एका माहिन्याच्या गोळ्या औषधी ही ती दोन तीन महिने पुरवत होती. इंदर तर जेवण करण्यापुरता आणि रात्री झोपण्यासाठी घरात थांबत होता. 

****

      एक दिवस विजयाला गरगरायला लागले आणि ती बेशुद्ध पडली. स्वप्निलला फोन करून बोलावण्यात आले. तिच्याजवळ तिच्या शेजारच्या कांता नलावडे आजी तिच्या उशीजवळ बसून तिच्या कपाळावर हात फिरवत होत्या. स्वप्निल आला मग डॉक्टरांनी तिला तपासून ती आई आणि तो बाबा होणार आहे. ही आनंदाची बातमी दिली.' माझ बाळं येणार आहे ' या विचारानेच त्याचे डोळे पाणावले होते. तो भरपूर खुष होता.आता ही बातमी बाळाच्या आईला सांगायची होती.ती शुद्धीवर आली आल्यावर स्वप्नीलने ही गुड न्यूज सांगितली.तिचेही डोळे आनंदाने भरून 

आले .त्याने तिला मिठीत घेतले आणि तिच्या कपाळावर किस करीत 'थँक्यू ' म्हटले. सर्वांना एक साथ व्हिडिओ कॉल लावून सगळ्यांना ही बाळाची न्यूज सांगितली. सगळे भलतेच खुश झाले होते. वेदांत इंद्रा , स्वप्नाली , सोनू , रोहित हे तर नाचायचे बाकी होते. यशोदा आजी खूष झाल्या पंतू जे येणार होते त्याचं ! वैदेहीने आणि सुप्रियाने देवापुढे साखर ठेवून आभार मानले आणि दोघांनाही ढीगभर सूचना दिल्या .सुप्रियाने स्वप्निलला तिची काळजी घ्यायला , जपायला सांगितले . तिची डॉक्टरांकडे जाऊन सर्व चेकअप केले. दोन महिने पूर्ण झाले होते. सोनाग्राफी करतांना स्वप्निल आणि विजया हरकून गेले. बाळाचे हदयाचे ठोके ऐकतांना दोघांच्या डोळ्यांत अश्रू आले होते . गोळ्या औषधी सकस आहार याकडे स्वप्निल जातीने लक्ष देत होता.. स्वप्निल तिची खूप काळजी घेत होता. तिला वेळवर जेवण देणे ,गोळ्या देणे, तिला बाहेर फिरायला नेणे . सर्वतोपरी काळजी घेत होता सुप्रिया ,संजय , स्वप्नाली काही दिवस राहून आलेले .तेव्हा तिला भरपूर खाऊ घेऊन आलेले ..

*******

वैदेही रोज मुलांसोबत बोलत होती. तिघं मुलांनी मिळून आईला एक स्मार्टफोन दिला मग ते व्हिडिओ कॉलवर बोलत होते. तिघांना लेकरांना पाहून तिच्या चेहर्‍यावर समाधान आले.

इंदरने जागा घेऊन सवितासाठी घर बांधायला सुरवात केली. वैदेहीला माहिती झाले तेव्हा भयंकर मनस्ताप होत होता.त्याला कोण विचारणार ?तो त्याच्या मर्जीचा मालक होता ? 

वैदेही विजयाला काहीच कळू देत नव्हती आता तर ती प्रेग्नंट होती पण वैदेहीच्या चेहर्यावरून तिला सर्व समजत होते. 

" आई का बरं सहन करतेस गं ? कशाला इतकं करत ? विजया मनातच व विचार करत होती.

सुप्रिया , संजय , स्वप्नाली आले.

 विजयाचे पोट चांगलेच वाढले होते. सुप्रिया विजयाचे सर्व डोहाळे पुरवत होती लगेच त्यांनी विजयाचे होहाळे जेवण केले, तिला नववा महिना लागला होता. तिला केव्हाही हॉस्पिटलमध्ये जाव लागणार होते. इंद्राही तिथेच आलेली होती .रात्रीच तिला कळा सुरु झाल्या आणि तिला हॉस्पिटलमधे ऍडमिट केले. तिला आत नेले . विजयाचा वेदनेने किंचाळण्याचा आवाज येत होता. इकडे स्वप्निल सैरभैर होऊन ओटीच्या बाहेर फेऱ्या मारत होता. आणि थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नर्सने पांढऱ्या शुभ्र कापडात मुलायम कापसासारखे बाळाला गुंडाळून आणले आणि सुप्रियाने बाळाला घेतले.  

 "अभिनंदन मुलगा झालाय ! "नर्स म्हणाली.

"नर्स , विजू कशी आहे ?" 

"त्या ठिक आहेत. आम्ही लगेच त्यांना रुममध्ये शिफ्ट करणार आहोत. ."

स्वप्निलने बाळाला घेतले . तो भावूक झाला होता. डोळ्यांत पाणी जमा झाले होते. सुप्रियाने त्यांच्या पाठीवर हात फिरवत होत्या. इंद्राने वैदेहीली व्हिडिओ कॉल लावला .बाळं दुध पिऊन झोपला होता . विजयाच्या डोळ्यांत पाणी होते तिच्या आईला पाहिल्यावर ! वैदेही लगेच गाडीत बसली आणि पुण्याला आली ती पहिल्यांदा येत होती. . वैदेहीला दोन वर्षांनी ती भेटत होती. ती वैदेहीच्या गळ्यात पडून रहू लागली

" रडू नको बाळा!" वैदेही.

दोन तीन दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला होता .घरात बाळाचं दणक्यात स्वागत झालं. राहूलही आला होता. तो 'पी एस आय ' ऑफिसर झाला होता पण यावेळी इंद्रा आणि त्याची भेट झाली नव्हती म्हणून तो मनातून खट्टू झाला . बारश्याला आईला सोबत घेऊन येणार होता .. बाळाचे आणि त्याच्या आईचे सर्व दोन दोन आई पाहत होत्या. 

लवकरच बारश्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . सर्व नातेवाईकांना मित्रमंडळींना बोलवण्यात आले. जो तो आप आपल्या परिने तयारी करत होता. तयारीला उधाण आले होते. इंद्रा ,स्वप्नाली डेकोरेशन करत होते. सजावट केलेल्यावर ते दोघं रेडी व्हायला निघून गेले. राहूल अन् त्याची आई आली होती.

इंदरला फोन करून कळवले होते पण सविताने त्याला येऊ दिले नव्हते. वैदेही त्याची वाट पाहत होती .इंद्रा पिंक कलरची साडी नेसून आली तेव्हा राहुल तिच्याकडे आवासून बघतच राहिला. विजया तयार होत होती तर स्वप्निल बाळाला घेऊन होता. स्वप्नाली बाळाला घेऊन गेली. आणि स्वप्निलने विजयाला मिठीत घेतले. 

"किती सुंदर दिसतेस ?" 

"चला लवकर हो , वेळ होतोय."

"थांब आज काल तुला मनभरून पाहाताच येत 

नाहिय ." त्याने तिला कमरेतून ओढून त्याच्याजवळ खेचले आणि डिप किस घेतला.

 "चला लवकर नाही तर पाहुणे वर येतील ." तिने ओठ पुसले . लिपस्टिक लावली आणि ते गेले . कार्यक्रम ला सुरवात झाली . स्वप्नालीने बाळाच्या कानात कुर्रर केले आणि बाकीच्यांनी तिच्या पाठीवर धपाटे घातले. स्वप्नालीने बाजूचा फुलांचा पडदा बाजूला केला त्यावर स्वराज नाव लिहलेले होते सर्वांनी टाळ्या वाजवले .राहुलने त्याच्या आईला त्यांची होणारी सून दाखवून दिली. त्यांनाही ती लगेच आवडली..क्रार्यक्रम संपला सर्व घरी गेले. वैदेही घरी निघाली तेव्हा विजया खूप रडली. वैदेही घरी पोहचातास विजयाला फोन करून कळवले.

यशोदा आजी खूप सिरयस झाली. तिला सर्व भेटून गेले. विजया चे नाव घेता तिने हळू हुंकार भरला होता आणि विजयाला बोलवण्यात आले . विजया स्वराजला घेऊन आली आजीने तिच्या डोक्यावरून आणि बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला. चेहर्‍यावर हसू आले आणि तिने डोळे मिटले. सर्वीकडे रडारड झाली विजयाच्या डोळ्यांपुढे लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.आजी तिच्या खूप जवळची होती. आजीचे दिवस संपल्यावर सुप्रिया तिला घेऊन गेली. इंदर आताही त्याच्याच विश्वात रमला होता.

क्रमश ..

🎭 Series Post

View all