प्रतारणा .. भाग - 46

" सोडा काका, हे काय करताय तुम्ही, मी माझ्या बाबांना नाव सांगेल !" "तुझा बाप काय करणार आहे. तोच लफडे

प्रतारणा ..

भाग - 46

तिने डोळे मिटून मोठ श्वास भरला आणि बोलायला सुरवात केली.

"माझ्या बाबांच अफेयर चालू आहे." तिने एकादमात सांगून दिले.

"काय सांगतेस ?"

"हो .. आणि हे आताच नाही  तर आम्ही भावंडं जेव्हा लहान होतो तेव्हा असचं झालेलं .. तेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी आईला रडतांना पाहिले ,तिला मारतांना ही पाहिले. तिला इतका मानसिक त्रास झाला की ती आत्महत्या करायला गेली होती. कसेबसे त्या वाटेवरून तिथून माझ्या बाबांना आईने परत आणले. पण पुन्हा त्यांनी आता तेच केले. माझ्या आईच्या त्यागाची, सेवेची, प्रेमाची, सर्मपणाची ,विश्वासाची, सहनतेची त्यांनी वेळोवेळी प्रतारणा केली.बोलतांना तिच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. माझ्या बाबांच्या कॅरेक्टरशी माझं कॅरेक्टर जोडलं गेलं. मी पंधरा वर्षाची असतांना आमच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या मोहन काकांना नऊ महिन्यांची मुलगी होती . गोरी गुबाऱ्या गालांची तिला पाहून तिला घ्यायला मोह आवरत नव्हता म्हणून मग तिला घेऊन खेळवत होते. मग मी शाळेतून आल्यावर तिच्यासोबत खेळायचे असेच एक दिवस ती माझ्याकडे आली होती. तिच्या बाबांनी म्हणजे त्या मोहननी माझ्याकडून घेण्याच्या प्रयत्नांत माझ्या छातीला स्पर्श केला. मला खूप घाण वाटले. मला वाटलं चुकून धक्का लागला असेल पण नाही जाणून मला तिथे त्यांनी घाणस्पर्श केला. खूप दिवस ते माझ्या मनातून गेले नाही. सतत डोळ्यांसमोर तो क्षण येत होता. खूप राग यायचा आणि रडू ही यायचं ! मी नंतर छकुलीला कधीच जवळ घेतले नाही पण एक दिवस त्याने मी एकटी जात असतांना नेमकी लाईट गेल्याचा फायदा घेत पाठीमागून पकडून मिठी मारली. 

" सोडा काका, हे काय करताय तुम्ही, मी माझ्या बाबांना नाव

सांगेल !"

"तुझा बाप काय करणार आहे. तोच लफडेबाज आहे. तूही तुझ्या बापसारखी असशील !" मोहन.

"मी त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करून त्याला हातावर चावून , माझी सुटका करून तिथून पळाली. " हे सांगतांना तिला खूप त्रास होत होता. तिला तो क्षण जसाच्या तसा आठवला होता. तिचे हातपाय थरथरायला लागले होते. रडून श्वास जड झालेला. स्वप्लिनला हे ऐकून धक्काच बसला. स्वप्निल ने तिला पटकन मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावर केसांवर थोपटून शांत करत होता . ती त्याच्या मिठीत थोड्यावेळाने शांत झाली. त्याने तिला पाणी पाजले. तिने गटागटा पाणी पिले.

" हळू ऽ . तू ठीक आहेस का आता नाहीतर उद्या बोलू ?" तो तिच्या गालावरचे अश्रू पुसत म्हणाला. ती पुन्हा त्याच्या कुशीत शिरली.

" तुम्ही आहेत ना सोबत?"

" शेवटच्या श्वासापर्यंत !"

"मी ठीक आहे . मला सांगायचं आहे ."

"तुला त्रास तर होत नाहीये ना "

तिने डोळ्यांनी आणि मानेने नाही सांगितले .

       

" मी घरी आल्यावर आईला सर्व सांगितले. 

आईने त्याच्या घरी जाऊन त्याच्या गालावर जोरात सनकन वाजवून दिली."

"लाज नाही वाटत का रे तुला असं काम करताना तु ही एक लेकीचा बाप आहेस ना .उद्या जर तिच्यासोबत असं घडलं तर तेव्हा काय करशील ? तेव्हा कसं वाटेल तुला ? हात कसा लावलास तू माझ्या मुलीला ?" वैदेही.

"खोट बोलतेय ती तिनेच मला बोलवलं होतं. बापासारखीच आहे ती लफडी करणारी." 

 आईने पुन्हा त्याला मारले .

" काय म्हणाला तू , माझ्या लेकीला मी ओळखते ती कशी आहे हे मला माहिती आहे. माझ्या लेकीवर सर्व आड आणतो काय ! आता जर तिला हात काय डोळे उघडून जरी बघितले तर तुझे डोळे काढून हातात देईल. भर चौकात तुला नागडं करून तुझी गाढवावर बसून धिंड काढेल . लक्षात ठेवं तिच्या सोबत तिची आई आहे." वैदेही.

एक आई सर्व सहन करेल पण तिच्या मुलीच्या अब्रूवर हात टाकायचा प्रयत्न जरी केला तर तिला दुर्गा काली बनायला वेळ लागत नाही. आज वैदेहीचे हे रुप पाहून सगळ्यांनाचा धक्का बसला होता .

"आई त्यांच्या अंगावर विळा घेऊन मारायला गेली होती. त्याची बायको मध्ये आली छोट्या छकुलीला आईच्या पायाजवळ ठेवले, नाहीतर आईने त्याला सोडले नसतेच !  

त्यानंतर मी धसका घेतला.अनोळखी लोकांसोबत बोलत नाही.मुलांपासून, पुरुषांपासून खूप लांब राहत होते. इतकचं नाही असे नाही. बाबांचं अफेयरच माहिती पडल्यामुळे नातेवाईकामधील माणसांच्या नजरा बदलल्या. अशा नजरा कळायला मला वेळ लागला नाही पण यात माझी काय चुकी होती. यामध्ये आम्ही खूप सहन केले .काहींना वाटे या मुलींचे लग्न कधीच होणार नाही. यांना चांगले सुशिक्षित स्थळ येणार नाहीत पण महादेवाची कृपा की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. माझ्या बाबांच्या कर्माची शिक्षा आम्हीही भोगलो. तेव्हा ही माझ्या आईने खूप सहन केले आणि आताही करतेय ."

नवऱ्याने बायकोशी केलेली प्रतारणा किंवा बायकोने नवर्‍याशी केलेली प्रतारणा यामुळे त्यांचे कुटुंब जरूर उध्वस्त होऊन घरातील व्यक्तीवर स्पेशली मुलांवर वाईट परिणाम होतो.

तिने आज मनातील असलेलं सर्व त्याच्या समोर व्यक्त केले होते.

"पण या सगळ्यामध्ये तुमच्या वर अन्यायच केला मी." तिने त्याच्यासमोर हात जोडले. त्याने पटकन तिचे हात खाली करून त्यावर ओठ टेकवले.

"विजू, शांत हो यापुढे मी आहेच तुझ्यासोबत !"

"हम्म ! त्याने तिच्या अंगावर पांघरून घातले अन् तिला मिठीत घेऊन तिला डोक्यावर थोपटत राहिला . ती झोपली पण तो जागा होऊन या सर्वांचा विचार करत होता. 

"भयंकर आहे हे , तिच्यासोबत किती काय काय घडलं आहे. आई होत्या म्हणून ठीक नाहीतर … विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला. आणि या कारणाने ती अलिप्त राहत होती. माझ्यापासून दूर राहायची . इतकं पाहिले आहे ,जवळून विश्वासघात होतांना पाहिले आहे तर ती विश्वास कसा करणार ? पण मी तिचे मत पूर्ण माझ्या प्रेमाने बदलवून लावेल . सर्व माणसे एकसारखी नसतात." विचार करतच त्याला कधीतरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार असल्याने तो झोपून होता पण तिला लवकर जाग आली तिने उठण्याचा प्रयत्न केला पण ती उठू शकली नाही. कारण ती तर त्याच्या मिठीत होती. तिने त्याच्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आले. झोपलेल्या त्याच्या चेहऱ्यावर निरागसत बघून तिला त्याच्या तीळावर ओठ टेकवले. त्याने तिला आणखीनच जवळ ओढले. तिचे गरम श्वासाला त्याच्या गळ्याला जाणवत होते. तिने हळूच फुंकर मारले. तिच्या हळूवार फुंकर मारल्याने त्यांचे अंग अंग रोमांचित झाले.. तिने पुन्हा फुंकर मारायला घेतली आणि त्याने डोळे उघडले आणि ती गडबडली.

"चल करं मी जागे आहो !" तो तिच्या मिश्किलपणे पाहत म्हणाला .

"ते मी उठवत होते तुम्हाला मला उठायचं आहे ना सकाळ झाली."

"हो का .. मला माहितच नव्हतं ते .. पण असं कोण 

उठवतं?"

"ते तुम्ही सोडत नव्हता ना म्हणून …"

"अच्छा मला नाही सोडायचं आहे. ते कर ना मगाशी जे केले.मी तर दुसऱ्या जगात पोहचलो होतो. आता अस अर्धवट सोडून जाते . ."

" आज पूर्ण करू." ती लाजत म्हणाली.

"खरचं ?" तो एक्साईड होऊन उठत म्हणाला . आणि याचाच फायदा घेऊन ती बाथरूम मध्ये पळाली.

"ये तू चिटिंग करते." तो चिडत म्हणाला. 

"हो ." म्हणून तिथे बाथरूमचे दार उघडून बाहेर डोकावून म्हणाली. आणि पटकन दार लावुन घेतले. तो खूप खूष झाला..

" लवकर आवर विजू आपण बाहेर जात आहोत."

" कुठे?" ती बाथरूममधून आवाज देत. ती पटकन आवरून बाहेर आली. तर स्वप्निल आधीच रेडी 

होऊन बाहेर आलेला .

"अहो तुम्ही तयार पण झालात !"

"हो .."

"चल आवर लवकर ! " तो चहा आणत म्हणाला. तिने पटकन आवरले आणि ते दोघ चहा नाश्ता करून बाहेर निघालेत. सर्वात आधी ते पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आले. रांगेत उभे राहून ते पुढे गेले बाप्पाची पुजा अर्चना केली. आणि दोघांनी सहजीवनाचा आरंभ करत आहे म्हणून आशीर्वाद मागितला. नंतर ते शॉपिंगला मॉलमध्ये गेले. त्याने तिच्यासाठी एक साडी तिच्या नकळत पॅक करून घेतली. तर हिने हि त्याच्यासाठी एक शर्ट त्याच्याही नकळत पॅक करून घेतला होता. सर्वांसाठी काही ना काही घेतले. तिथेच जेवण करून ते दुपारी मुव्ही पाहून घरी आले. फ्रेश होऊन बेडवर पडले तर दोघांना झोप लागली. थोड्यावेळात तिला जाग आली तर तिच्यासमोर साडी एक चिट होती. त्यावर लिहलेलं "मला तुला या साडीत पहायचं आहे." तिने ओपन केली त्यात रेड कलरची नेटची साडी त्यावर फुले लावलेले त्यात फुलांमध्ये एक डायमंडचा खडा लावलेला होता. . "खूपच सुंदर साडी " ती तयार व्हायला आत गेली . छान साडी नेसून, नेटच्या फूल स्लिव्हज असलेला, साडीचा सिंगल पदर लावून त्यावर छोटसं मंगळसुत्र घालून , हातात रेड बांगड्या , कानात रेड एअररिंग, आणि चेहर्‍यावर थोडासा मेकअप, ओठांवर रेड लिपस्टिक , कपाळावर सिंदूर पेन्सिलीची बारीक रेघ आणि एकदम छोटिशी रेड टिकली. केस मोकळे सोडलेले. तयार होऊन ती बाहेर आलेली तर बाहेरची लाईट गेलेली. तिने त्याला आवाज दिला आणि लाईट लागलेली. समोर तो उभा जो तिच्या कडे अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे बघत होता .

"मार्व्हलस !" त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले .

तिने लाजत खाली नजर झुकवली. तिने त्याच्याकडे पाहिले त्यानेही तिने गिफ्ट केलेला शर्ट घातला होता. त्यात तो खूपच हैण्डसम दिसत होता. तिने त्याला ब्लॅक कलरचा पातळ शर्ट गिफ्ट केलाला त्यातून त्याची भारदस्त छाती आणि बायसेप उठून दिसत होते. ती एकटक त्याला पहात होती .दोघंही एकमेकांच्या डोळ्यांत पाहत होते . तो तिच्याजवळ आला आणि दारावरची बेल वाजली. जेवणाचे पार्सल आले होते.

त्याने पार्सल घेतले .

"अहो हे कशाला मागवलं घरीच केले असते 

काहीतरी !"

"आपण कुठे रोज मागवतो गं .!"

जेवणाला बसले पण जेवण काही जाईना , नुसती धडधड होत होती , जेवणं झाली. तिने बाकीच्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या आणि आवरून रुममध्ये आली तर स्वप्लिने मंद तेवत असणारे लाईट लावले होते.रुममध्ये जॅस्मीन फ्रेशनर मारलेला त्या वासाने मन प्रफुल्लित झालेले. एकंदरित ते वातावरण मदहोश न करणारे होते.तो तिचा हात पकडून रुममध्ये घेऊन आला. तिचे हृदय आता जोरजोरात धडधडत होते. हात गार झालेले. बर्फ गोठल्यासारखे वाटत होते तिला. तो एकसारखा तिच्याकडे बघत होता. जणू तिचे सौंदर्य नजरेनेच पित होता. तिने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. त्याने हात काढून घेतला, ती लाजली , 

जाण्यासाठी वळली तर त्याने तिचा हात पकडून तिला त्याच्याकडे ओढून तिला पाठीमागून मिठित घेतले. त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. हातांनी तिच्या कमरेपासून पोटाला वेढा घातला त्याच्या हातावर तिचे हात विसावले. त्याने तिच्या मानेला किस केला. ती शहारली. पोटात कालवाकालव झाली. तिने तिचे अंग चोरून घेतले. तिने हात सोडून पुन्हा जायचा प्रयत्न केला पण त्याने तिच्या हाताला पकडून जोरात खेचले खेचल्यामुळे ती त्याच्या अंगावर आली. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. तिने डोळे मिटून घेतले आणि त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना अलगद ओठांमध्ये घेऊन तिच्या ओठांचा रसपान करायला सुरवात केली . दोघांचे श्वास जड झाल्यावर त्याने सोडले. लाजून तिने तर त्याच्या शर्टमध्ये चेहरा लपवला. तिला दोन्ही हातांवर उचलून बेडवर आणले. तिने चादर मध्ये चेहरा लपवून घेतला.

क्रमश ..

🎭 Series Post

View all