प्रतारणा .. भाग - 45

" कठीण जाईल पण अशक्य नाही ..सत्य हे सत्यच राहणार आहे. ते लपणार नाही .. कधीतरी ते बाहेर येणारच ! " इंद्रा तिला धीर देत म्हणाली.

प्रतारणा 


भाग - 45



"पिंकू अशी काय बोलतेस मी परकी आहे का ? माझी जन्मादाती आई आहे ती, मला काहीच वाटणार नाही का तिचे?" विजयाच्या डोळ्यांत पाणी आले होते "आणि तू जे म्हणाली तेही पटतयं मला, मी खूप त्रास दिलाय त्यांना, मी विचार केलाय आणि लवकरच आमचं नात पुढे नेणार आहे." बोलतांनाही तिचे गाल गुलाबी झाले होते.



"अरे वा !अभिनंदन तायडे लवकरं कर सुरवात, तू तुझ्या संसारात आनंदी असायला हवी , सूखी हवी हेच तर आम्हाला पाहीजे आहे,आणि एक सांगू बाबांचं अफेयर बाबतीत जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सांगून दे! माझा विश्वास आहे ते नक्की तुला समजून घेतील."


" हो ... पण कसं सांगू मी मला खूप कठिण जाणार आहे सांगतांना .."


" कठीण जाईल पण अशक्य नाही ..सत्य हे सत्यच राहणार आहे. ते लपणार नाही .. कधीतरी ते बाहेर येणारच ! " इंद्रा तिला धीर देत म्हणाली.


"मी तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नाआधीच सर्व सत्य सांगून देईल. मग घेईल तो त्याचा निर्णय. लग्न करायचे असेल तर करेल नाहीतर गेला उडत ! " इंद्राने खांदे उडवून म्हणाली . तिच्या बोलण्याने विजयाच्या चेहर्‍यावर थोडे का असेना हास्य आले .


"आज खऱ्या अर्थाने माझी लहानुडी माझं बोट पकडून चालणारी, माझ्याशी भांडणारी, माझ्या मागे ताई ताई हाका मारणारी बहिण आज मोठी झालीस." विजयाने इंद्राला मिठी मारली. दोघेही बहिणी भावूक झाल्या होत्या.


"आता जास्त सेंटी नको होऊ , माझ्या बोलण्याचा विचार करू नको तर प्रयत्न कर काय !"


"येऽऽ तुम्ही दोघं सारखी धमकी काय देतात मला!"

विजयाने तोंड फुगवले.


 थोड्याच वेळात स्वप्निल आला मग तिघांनी मिळून जेवणं केले. तिला आज थांबवून घेतले. जेवणानंतर विजया किचन आवरत होती तर इंद्रा आणि स्वप्निल खाली थोड्या दूर अंतरावर असलेल्या आईस्क्रीम पार्लर मध्ये गेले. आईस्क्रीम घेऊन ते पायी चालत येत होते.


"जिजू, ही घाबरणारी अबोली कशी काय आवडली हो तुम्हाला?"


" पहिल्या दिवशी ती माझ्या मनात भरली होती. तिचे मृगनयनी डोळे मी तर तिच्यात पूर्ण हरवलो होतो. माझ्या हृदयाने तिथेच सिग्नल दिला हीच तुझी सोलमेट ! तिला दुरूनच हळूहळू ओळखायला लागलो ती आवडायला लागली. ,तिची साधी राहणीमान, तिचा स्वभाव, तिचं निरागस हास्य, तिचे वेणी, त्या वेणीला झटका देण्याची पद्धत ,तिची प्रत्येक अदा मला तिच्याजवळ घेऊन येत होती. आणि तिला पहिल्यांदा साडीवर पाहिले तेव्हा वाटलं सरळ तिला घेऊन आईबाबां समोर जाऊन सांगून द्यावं ! आई बाबा ही तुमची सून! " स्वप्निल गालात हसत होता.


" पण बघ ना मी कितीवेळा तिच्या आजूबाजूला राहायचो गं पण हिने एकदा ही नोटिस केले नाही."

इंद्रा हसायला लागली.


"बरं जिजू हे बघा ! " इंद्राने तिचा फोन उघडून व्हिडिओ प्ले लिस्ट लावली. तो पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते. तो भान हरपून तो व्हिडिओ बघत होता. त्यांच्या हळदीच्या वेळेचे तिने डान्स केलेले व्हिडिओ तो आज बघत होता.


" तिला डान्स करायला फार आवडते आणि गाणेही सुरेख म्हणते ती!" त्याने गाणे प्ले केले.


"हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते

मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना


हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते

मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना

हमें तुमसे प्यार..


सुना गम जुदाई का उठाते हैं लोग

जाने जिंदगी कैसे बिताते हैं लोग

दिन भी यहाँ तो लगे बरस के समान

हमें इंतजार कितना ये हम नहीं जानते

मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना

हमें तुमसे प्यार."


 तो डोळे बंद करून गाणे फिल करत होता. तिचा आवाज खूपच गोड होता. 


" पिंकू हे सर्व मला पाठवं !" 


" हो.. जिजू , तुम्हाला माहिती आहे हे केव्हा म्हटले आहे ताईने ! " 


"कधी ?" 


" तुमची एगेंजमेंट झाल्यानंतर ती एकवेळ अशीच गाणं म्हणत बसली होती. मग मी मोबाइलचा व्हाइस रेकॉर्डर लावून तिज्याजवळ तिला दिसणार नाही असा ठेवून दिला .


"थांबा थांबा जिजू पुढे ऐका ना " इंद्रा म्हणाली .तो ऐकत होता. 


" काय गं ताई ,जिजूंच्या आठवणीत चक्क गाणं म्हणतेस ! "


" हूँऽ ." ती लाजत म्हणाली.


"तुला आवडता ना ते !"


"खूप आवडता गं ,स्पेशली त्यांचा ओठाखालचा तीळ मला फार आवडतो असं वाटतं ना की त्या तीळावर हलकेच ओठ ठेवून किस करावे ! " ती तिच्या तंद्रित बोलून तर गेली मग नंतर तिने चीभ दाताखाली ठेवली.


"ओठ सोडून तुला तीळाला किस करायचं आहे. तुझं काही खरं नाही. अजब गजब आहे तू . " विजयाने हलकेच तिच्या दंडावर चापट मारली .इंद्राने मनातच कपाळावर हात मारून घेतला.हिचे काहीही होऊ शकत नाही या नजरेने तिच्याकडे बघत होती . 


हे सर्व मोबाइल रेकॉर्डर मध्ये सेव झालेले होते.


त्याला तर हे आज पहिल्यांदा माहिती झाले होते.


"जिजू, ताईमध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे. मी एकदम बिनधास्त आहे तर ती लाजरी लाजाळूच झाडं ! विचारपूर्वक वागणं बोलणं असते तिचं ! मनातील लवकर बोलत नाही पण खूप प्रेम करते ती तुमच्यावर प्लिज तिला कधीही दुखवू नका, तिला समजण्याचा प्रयत्न करा ! शेवटचे बोलतांना तिचा आवाज कातर झाला होता. स्वप्निलने तिच्या डोक्यावर हलके थोपटले तिला नजरनेच मी विजयासोबत आहे हे आश्वासन दिले .




ते घरी आले तेव्हा तिचे सर्व काम झाले होते. तिघांनी आईस्क्रीम खाल्लं आणि झोपायला निघून गेले . आज पुन्हा ती नव्याने त्याला कळली होती. रोज ती जवळ असतांना तिला मिठीत न घेणं तर हा तर त्याच्या साठी टास्क होता. इंद्रा दुसऱ्या दिवशी तिच्या हॉस्टेलवर निघून गेली. स्वप्निल कॉलेजला गेला. विजयाने रात्रीचे जेवण खास स्वप्निलच्या आवडीचे बनवले होते. जेवण बनवून ती छान तयार होऊन त्याची वाट पाहत बसली. पाच पाच मिनिटांनी ती बाल्कनीत जाऊन बघत होती तर कधी घड्याळाकडे ! तर कधी बाल्कनीत जाऊन ,त्याची गाडी आली आणि तिने पुन्हा एकदा आरशात पाहून दार उघडायला गेली . त्याने बेल वाजवली आणि हिने दार उघडले . त्याने एकनजर तिच्याकडे पाहिले आणि पाहतच राहिला. ती आज व्हाईट कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये चेहर्‍यावर, डोळ्यांत काजळ घातलेलं त्यात तिच्या लांबलचक लुकलुकणाऱ्या पापण्या त्यांच्या वरखाली करण्याने नुसती त्याच्या काळजाची धडधड वाढली होती. आणि त्याच्या एकटक पाहण्याने तिच्या गालेवर लाजेली लज्जा येऊन ते गुलाबी झाले होते. केसांच्या दोन बटा गालावर रुळत होत्या. बाकीचे केस क्लचमध्ये अडकवलेले होते. गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठांना रोझ लिप बाम लावलेला, गळ्याशी त्याने गिफ्ट केलेले बदामात S V अक्षर कोरलेली गोल्डचेन आणि लांबलचक नाभीपर्यंत मंगळसुत्र अजूनही ती नविनवरीच दिसत होती. ती मनमोहक दिसत होती. दोघही नजरेतून बोलत होते. गालात हसत लाजत होते. आज तर तिचे हे रूप त्याला वेड लावत होते. ती एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ आली. आता तर तो वेडा व्हायचा बाकी होता.


"अहो, किती वेळचा मोबाइल वाजतोय ! उचला ना !" तरीही तो स्तब्ध उभा होता.


"अहो ऽऽ, मोबाइल उचला ना !" तो थोडा खाली वाकला कमेरखाली एक हात तर एक हात मानेखाली धरून तिला उचलून घेतले. तिने त्याच्या शर्टची कॉलर पकडली.


"अहो ऽऽ हे काय करताय !" ती नजर झुकवत लाजत म्हणाली.


"तू म्हणाली ना उचल मग मी उचललं तूला !" तिने मनातच डोक्यावर हात मारला.


स्वप्निल इतका हरवला की त्याचा मोबाईलची रिंग वाजली तर ऐकू येत नव्हती. तो तिच्याकडे पाहतच बसला होता.


"अहोऽऽ ! "तिने प्रेमळ हाक मारली. आता तर त्याची राहिलेली शुद्ध ही हरपली.


"हं ऽऽ ." त्याने कसाबसा हुंकार भरला.


कॉल आलेला तिने त्याच्या समोर मोबाइल पकडला. त्याने नजरेनेच तिला हात खाली नाही म्हणून सांगितले. तिने कॉल उचलून त्याच्या कानाला लावला. दहा सेकंद बोलून त्याने फोन ठेवून दिला.


" अहो खाली उतरवाना ! "


" अजिबात नाही."

  

"अहो चहा नाश्ता आणते, तुम्हाला भूक लागली असेल?"


"नाही माझं पोटं भरलयं तुला पाहुन. तू जवळ असल्यावर मला काहीच नकोय !"


" अहो हात दुखेल ना तुमचा !"


" नाही दुखणार. मी नाही तुला खाली ठेवणार , तुला मी ह्दयाशी घट्ट मिठी मारत ठेवणार !" मग तिनेही तिचे हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले. मग तिचा चेहरा त्याच्या शर्ट मध्ये लपवून घेतला.. त्याच्या मानेवर तिचे गरम श्वास जाणवत होते . त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले . दोघांनाही एकमेकांच्या हृदयाची धडधड जाणवत असून वाढली ही होती.


"अहोऽ, प्लिज ! " तिने नाक आणि डोळ्यांचे इतके सुंदर कृती केली

की .."



" अगं आज बहुतेक मला हार्ट अॅटक येणार! " तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला.


" असं काही बोलू नका ! तिने त्याला खाली ठेवायला सांगितले. तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते. ती आतल्या रुममध्ये निघून गेली.


"अगं काय झालं ? माझं काही चुकलं का? सॉरी ना ! " तिने तोंड फिरवले .


" पाहा तरी माझ्याकडे !" तिला खांद्याला पकडून त्याच्याकडे वळवले.


" विजू सॉरी ना ! बोल ना प्लिज !" तिच्या डोळ्यातून मोठ मोठे अश्रू गालावर विसावत होते.



 "मी आता कुठे तुमच्यासोबत जगायला लागली आहे मला तर म्हातारी व्हायचं हो तुमच्याबरोबर आणि तुम्ही असे बोलता !" बोलबोलता रडणं चालूच होतं . "आपल्या चिनू, मिनू, टिनू सोबत खेळायचं आहे."


"आता हे कोण? " त्याने प्रश्नार्थक नजरेने विचारले.


"आपले नातवंड !" मग तो जोर जोरात हसायला लागला.


" यात हसण्यासारखे काय आहे . हूँऽऽ !" तिने नाक आणि ओठ एक साथ डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडे फिरवले. त्याने पाहिले.


" विजू परत एकदा करं ना तू केले तसे ."


" मी नाही करत !" म्हणून तिने त्याला पुन्हा करून दाखवले .


" ओ विजू काय भारी केलेस तू ते !" त्याने तिचे नाक आणि गाल ओढले .


" अहो दुखतय ना !" ती गाल चोळत म्हणाली.


" दुखतय का?" तिने हो मध्ये मान डोलावली. मग त्याने तिच्या गालावर ओठ टेकवून किशी घेतली. तिचे डोळे मोठे झाले. इतक्या लवकर झाले की तिला काही कळाले ही नाही. तिने तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपवला..


" तू अशी तुझ्या अदांनी माझं काळीज घायाळ करते ना म्हणून म्हणालो मी आज मला हार्ट .. पुढे बोलायला गेलेच नाही तिने त्याच्या शर्टच्या कॉलरला खेचून तिच्याकडे ओढले .


" तुम्ही फक्त माझे आहेत. त्या देवाला सुद्धा माझ्या मर्जीशिवाय नेता येणार नाही, पुन्हा असं बोलायचं नाही. कळलं !" तिने प्रेमाने पण धार असलेल्या आवाजात धमकी दिली आणि त्याच्या ओठांवर हलकेच ओठ ठेवून तिने त्याच्या शर्टात चेहरा लपवला. हे इतक्या अचानक झाले की स्वप्निल तर सातव्या आसमात होता. ती अशी हक्क गाजवण्याची भाषा आणि त्यात त्यांच्यात झालेला पहिला वहिला किस . त्याने त्यांच्या हातांचा वेढा तिच्याभोवती करत घट्ट केला.


" विजू, तुझ बोलणं खूप म्हणजे खूपच आवडलं , मला हीच विजू पाहायची आहे माझ्यावर हक्क गाजवणारी आणि हे असं लक्ष नसताना किस केलंसं चिंटिंग करतेस तू , असं कोण करत?" तो नाटकीपणाने म्हणाला.


" मी नाही केली चिटिंग ." ती त्याच्या मिठीतुन 

लाजत उत्तरली पण तिने चेहरा वरती केला नाही .


" मला तर काही कळालं हि नाही . वरती बघ ना , किती लाजतेय तू , अशी जर लाजत राहिली तर चिनू मिनू टिनू कसे येतील. " ती आणखीनच लाजली. तिची धडधड वाढली.दोघांचीही स्पंदने एकमेकांना जाणवत होती.

  

 तिला त्या मिठीतून बाहेर यायचे नव्हते. आणि दोन्ही एकमेकांची मिठी अनुभवत होते. उन्हाने तापलेल्या जमिनीवर शितल पाण्याची बरसात होऊन ती धरित्री शांत व्हावी तशी ती त्याच्या मिठीत शांत सुखावत होती. हा तर स्वप्निलसाठी सुखद धक्काच होता. काय नव्हते त्या मिठीत सर्वच तर होते. काळजी ,आदर, विश्वास,अतोनात प्रेम होते त्या मिठीत. ती इतके दिवस तिने अनुभवलीच नव्हती.


"साँरी !"


" का ?" 


"मी मिस केली ही मिठी , दूर ठेवले ना तुम्हाला आणि स्वतःलाही. स्वर्गाची अनुभूती आहे या मिठीत ." ती त्याच्या कुशीत शिरूनच म्हणत होती.


"मी पण खूप मिस केले हे सर्व, तुला असं मिठीत घ्यायला तरसलो होतो." त्याने तिच्या कपाळावर किस केले.


"म्हणून तर सॉरी म्हणाले ना !"



"सॉरी नको म्हणू पण यापुढे स्वतःपासून दूर नको ठेऊस मला ."


"हो .. दूर नाही ठेवणार कधीच ! वचन देते !"



" अहो , ऐका ना ! मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे."


" हम्मऽऽ , बोल ना ",


" आधी जेवण करूया मग मी सांगेल !" दोघांनी जेवण केले. जेवणातील प्रत्येक पदार्थ त्याच्या आवडीचा होता तो भलताच खूष झाला होता दोघही एकमेकांना भरवत होते. जेवण झाली . सगळी आवराआवर झाल्यावर तिने बोलायला सुरवात केली.

क्रमश ..



🎭 Series Post

View all