प्रतारणा .. भाग - 44

"तायडे, मी मामा कधी बनणार आहे गं? माझे सर्व मित्र मामा झाले. मला पटापट मामा बनवं ! " वेदांत . "तुझे म

प्रतारणा ..





भाग - 44





        विजयाने स्वप्निलची हात जोडून माफी मागितली.. स्वतः चा चेहरा दोन्ही हातांनी लपवून ती रडत होती. स्वप्लिनने तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करून तिला शांत करू लागला. तोच ती त्याच्या मिठीत शिरली. तो तिच्या केसावरून हात फिरवत होता. ती बऱ्याच वेळ त्यांच्या मिठीत होती. तो तिला हलकेच थोपटत होता.





"विजू तुला एक सांगू, आय लव यू, तू माझ्यासोबत असणे हेच माझ्यासाठी खूप काही आहे. आपण मनाने कधीच एकमेकांचे झालोय गं .कदाचित तुला माझ्या या सर्व गोष्टी एकदम खोट्या वाटत असणार पण विश्वास ठेव तुझा मी विश्वासघात होऊ देणार नाही. तू आहे तर माझ्या जीवनाला अर्थ आहे नाहीतर सर्व व्यर्थ आहे. विजू ,मी तुला कधी बोललो ही नाही आणि बोलणार नाही की तुझी इच्छा नसतांना तू माझ्याजवळ यावं ! मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहिलं .. स्वप्निल तिच्या डोळ्यात पाहत तिला आश्वस्त करत म्हणाला. ती त्याच्या कुशीतच झोपून गेली. तिला नीट झोपवून तो तिच्या शेजारी विचार करत बेडवर आडवा झाला .





" किती त्रास करून घेतलाय हिने !" विचार करतच त्याला झोप लागली. ती नेहमीप्रमाणे सकाळी उठली तर स्वप्निल त्या आधीच उठलेला होता. तो किचनमध्ये काम आवरत होता. ती किचनमध्ये आली.





" अहो , तुम्ही कशाला करताय हे. मी आलेच फ्रेश होऊन." त्याने तिच्या कपाळावर हात ठेवून चेक केला तर तिचे अंग गरम होते. त्याने तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. ती फ्रेश झाली . स्वप्निलने तिच्यासाठी गुळाचा शिरा बनवला.





" अय्या ! तुम्हाला बनवता येतो ?"





"हो. येतं मला , तू खा बरं आधी हे " मग तिने शांत बसत खाऊन घेतला. त्याने तिला गोळी दिली. गोळी घेतांना तिने विचित्र तोंड केले. थोड्याच वेळात तोंडात टाकलेली गोळी तिने उलटी करून बाहेर पाडली.





" विजू काय हे सर्व खाल्लेल बाहेर पडलं, व्यवस्थित गोळी घे ."





" माझ्याकडून गोळ्या खालल्या जात नाही. 



असेच होते."





" मग लवकर कशी बरी होणार ! मग त्या दिवशी कशी गोळी घेतली होती ?"





" ती लहान गोळी होती आणि तुम्ही होता समोर .. माझ्याकडे पाहत म्हटलं आजच पचका व्हायचा म्हणून मी कशीतरी घेतली." तिचे त्या दिवसचे एक्सप्रेशन आठवून तो हसत होता.





"हसताय तुम्ही ?"





"त्या दिवशी कसा चेहरा केला होता, तू मला तेव्हाच हसायला आलं होतं ,मग ती कस तरी कंट्रोल केलं ." तो हसून सांगत होता.





 "म्हणूनच मी गोळ्या घेत नाही."





आता ही गोळी घे आणि पटकन पाणी पी. " त्याने एका हातात गोळी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास दिला. तिने डोळे बंद केले आणि तोंडात गोळी टाकली आणि तिला ओकारी येऊ लागली तसे त्याने तिला पाणी पाजलं आणि वरती पाहायला लावले. 







 तिला आराम करायला लावला. तो तिची संपूर्ण काळजी घेत होता. तिला वैदेही सोबत बालायचे होते पण स्वप्निल समोर असल्याने तिने जुजबी विचारपूस करून फोन ठेवून दिला पण डोळे मात्र पाणावले होते. तिने स्वप्निल समोर कसेबसे डोळ्यांतच अडवून ठेवले. तरीही त्याला अश्रूंनी काठोकाठ भरलेले डोळे दिसले. इच्छा तर झाली तिला विचारायची पण त्याने स्वतःला आवरले. त्याला विश्वास होता ती एकदिवस सांगेल . काय कारण आहे ते !





****







       वैदेहीला दोन तीन दिवसांनी बरं वाटले. इंदरला तितकासा फरक पडला नाही. सविताने त्याच्यासमोर आत्महत्या करायचे नाटक केले. त्याला माहिती पडले तेव्हा तो लगेच तिच्याकडे गेला. तिच्यासाठी रडला.





"कशाला करते असं, या जगात तुझ्याशिवाय कोण आहे मला ."असं म्हणून तिच्या गळ्यात पडून रडत होता. आता तिच्या म्हणण्याप्रमाणे इंदर वागत होता. वैदेही सोबत तो कुठेही लग्नसमारंभ असो, नातेवाईकांना पाहायला जाणे असो,



काहीही असो, तो जात नव्हता. सविताने इंदरला वैदेहीला घरात पैसे द्यायचे नाही असे सांगितले. रंदर सविताच्या सांगण्यानुसार वागत होता.वैदेही आजारी जरी पडली तरी तिच्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. एक वेळ तर इंदरने तिच्यावर चोरीचा आड टाकला. तिला मारहाण केली. तिला लाकडी स्टूलवर ढकलून दिले त्यातच तिच्या पोटाला स्टूल लागला.पोट दुखे लागले. आधीच तिला पंधरा पंधरा दिवसांनी पाळी यायची त्यात तिला आठ दिवस ब्लडिंग होत होती. इतक असून सुद्धा ती तिचे काम करत होती. इंदरला सर्व हातात द्यावे लागत होते. तेही वेळवर जर नाहीच झाले तर तीच वस्तू तो फेकून देत होता. जेवणाला थोडा जरी उशीर झाला तर ती भाजी तिच्या अंगावर फेकली जात होती. तिचे मन आतल्या आत आक्रंदत होते. तिची वेदना ती कुणालाच कळू देत नव्हती. 





           इंदर सवितासोबत बाहेर फिरायला जात होता. शनिवार रविवार हे त्याचे सविता सोबत फिरण्यात मज्जा मस्ती करण्यात जात होते. तिथून आल्यावर इंदर वैदेहीला त्या दोघांचे फोटो दाखवत होता. वैदेही समोर फोन लावून तासनतास प्रेमयुगलांसारखे गप्पा मारत होते. त्यांचे बोलणे तिला सहन न होत नव्हते ती तिथून उठून दुसऱ्या रुममध्ये गेली. लाज ,लज्जा , बेशरम ची सगळी मर्यादा त्याने ओलांडली होती. त्याला कसलेच भान उरले नव्हते. त्याला घरच्यांच्या माणसांची काळजी, ना लोकांची, ना समाजाची पर्वा होती. त्याने काम उत्तेजना वाढवण्यासाठी इंदर गोळ्या घेत होता. वैदेहीला तो रोज गोळ्या खातांना दिसत होता एक वेळ तिने विचारूनही घेतले.





"काय हो ही रोज कसल्या गोळ्या खातात तुम्ही?"





"तुला काय करायचं?" त्याने तिच्या प्रश्नांना धुडकावून लावले आणि तो निघून गेला. तिने खाली पडलेले गोळ्या नसलेले पाकीट उचलून घेतले. तिने ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे दाखवले. तेव्हा तिला कळले की त्या कामउत्तेजनेच्या गोळ्या आहेत आणि याच्या अति सेवनाने किडनीवर परिणाम होऊन निकामी होऊ शकते. त्यानंतर तिने त्याला प्रेमाने समजवण्याचा खूप वेळा प्रयत्नही केला पण सर्व व्यर्थ होते.







"विजयाचे बाबा तुम्ही ज्या गोळ्या खात आहेत त्याचे परिणाम फार मोठे आहे. किडनीवर परिणाम होतो . तुम्ही हे खाऊ नका."





" कोणी सांगितल तुला हे ?"





" डॉक्टरांनी !"





"तू त्यांना विचारले !"





" हो." 





"माझी बदनामी करते काय !"



 त्याने तिच्या गालावर सनकन देऊन दिली. आधीच तिला कानांनी कमी ऐकू येत होते. ती तशीच आसवे गाळत बसली. नंतर तिने ते सांगणे सोडून दिले.







ही कसली धुंदी होती इंदरवर, हे असे कसले प्रेम ! जे बायकोची प्रत्येक बाबतीत प्रतारणा करत होते! हा तर व्याभिचार आहे आणि तो आनंदाने करत होता. 'पालथ्या घडावर पाणी ' असे त्याचे झाले होते.







*******



         





          विजया पूर्णपणे ठणठणीत झाली होती. तिने वैदेहीला फोन करून तिची चौकशी करून घेतली. वैदेहीने तरी ही तिला काहीही सांगितले नाही .विजयाने वैदेहीला समोरूनच विचारले. तिने वैदेहीला पुण्याला येण्याचे सांगितले. "मी येते तुला घ्यायला ही म्हणाली पण तिला मुलगी जावाईकडे राहणे पसंत नव्हते. म्हणून तिने स्पष्ट नकार दिला. दोघी मायलेकी फोन वर खूप रडल्या. रवी मामाची ही परिस्थिती बेताची होती.म्हणून वैदेही तिथेही गेली नाही. इंद्रा आणि वेदांतला यातली काहीच कल्पना नव्हती. इंद्राला सुट्टी असल्यावर इंद्रा विजयाकडे भेटिला येत होती. स्वप्निलने विजयाचा बी एड कॉलेजला प्रवेश घेतला होता. तो तिला स्वतः ने - आण करत होता. सुप्रिया स्वप्नाली दोन तीन दिवस राहून खूप माया लावत होत्या. जातांना नेहमी विजयाचे डोळे भरून येत होते.लवकरच तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होतं.





यशोदा आजीचा फोन आला .





"वेदिका बाय माझी, कशी आहेस वेदिका बाळा, जावाईबुवा कशे हाहेत? "





"आजी मी मजेत आहे पण तू कशी आहेस. ? हल्ली तू जेवण खूप कमी केल आहे ."





 "वयानुसार हे होतच बाळा, मरण्याअगोदर तुझं बाळाला या हातात खेळवायचे आहे. मग मरायला मोकळी !" यशोदा आजी.





"खबरदार आजी पुन्हा अशी बोललीस नाहीतर मी अजिबात बोलणार नाही बरं !"





" मरणाचा भरवसा नाय वेदिका ." आजी म्हणाली. आजीशी मामीशी बोलून तिने फोन कट केला. तर वेदांतने फोन केला.





"तायडे, मी मामा कधी बनणार आहे गं? माझे सर्व मित्र मामा झाले. मला पटापट मामा बनवं ! " वेदांत .





"तुझे मित्र मामा झाले म्हणून तुला मामा व्हायचे आहे का?"





"तसं नाही,पण मलाही इटकुलं पिटुकलं मामा म्हणणारे पाहिजे आहे की !





"तू तर असा ऑर्डर देतोय जसं काही हॉटेलमधून जेवणच मागवतोय ." 





" हवं तर तसं समज आणि पटापट माझे काम झाले पाहिजे ." आणि त्याने तशी ऑर्डर देऊन तिच्या उत्तराची वाट न पाहता लगेचच फोन कट करून दिला.. तिने मनातच कपाळावर हात मारला.





'वा रे वा ! कमाल आहे वेदूची ! ' ती मनातच 



म्हणाली ..



  सुट्टी असल्याने इंद्रा विजयाला भेटायला आली. मग तिने यशोदा आजीच फोन आला होता. तर मरण्याआधी तिला माझं बाळ खेळवायचे म्हणाली. 





" मग त्यांची इच्छा कधी पूर्ण करणार आहेस तू ?" इंद्रा .





" पिंकू तू ही त्यांच्या सूरमध्ये सूर लावतेय."





"बर सांग काय चुकीची मागणी करतेय ते? आजीचे ऑपरेशन झाले आहे. तिची सब्बेत साथ देत नाही तिला आणि तू किती लाडाची आहे माहितेय आहे ना तुला !" इंद्राने उलट प्रश्न केला.





" चुकीची नाही गं , माहीती आहे ना मी किती लाडाची आहे ती. मी तर तिच्याकडेच राहिली ना, पण आमचं नातं अजून पुढे गेलेलो नाहिये म्हणजे ते .. ते आम्ही ते .. आमच्यात नाही झाले ते.."





"का? तुला भिती वाटते की ते बाबांसारखे … की तुला पसंत नाहित का ते !"





"अगं काही काय बोलतेस पिंकू,माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर !"





" माहिती आहे प्रेम आहे ते दिसतही तुझ्या डोळ्यांत ! लहानपणापासून ओळखते तुला, कधीच तसं बोलून दाखवत नाही. फक्त प्रेम करत राहणार पण ते समोरच्याला सांगाव ही लागतं तायडे ! लग्न झाल्यावर नवऱ्याजवळ जाणे शरीराने एकत्र येणे यात काहीही अनैतिक नाही ताई ! अनैतिक तर बाबा करताय ! "





"तुला विश्वास नाही का त्यांच्यावर ? असा विचार कर ना की ते किती प्रेम करता तुझी किती काळजी घेता. आजारी पडल्यावर बायकोची सेवा करता. तू खूप लकी आहे ताई. आपण लहानपणापासून आईची अवस्थाही पाहिली होती ना .आणि आता तर त्याहूनही वाईट झालीय."





"तुला माहिती पडलं पिंकू ? म्हणूनच तर मन घाबरते गं बाबांनी आईसोबत दुसऱ्यांदा अस करावं ?" तिच्या डोळ्यांत पाणी आले होते.





"हो .. मला माहिते आहे ते आणि मला बोलू देत नाहीये ती. म्हणते तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आपल्या पायावर उभे राहा. वेदूला तर माहित पण नाही हे जेव्हा त्याला माहिती पडेल तेव्हा काय होईल !काय माहिती! म्हणून मी लवकरच जॉब शोधून आईला इकडे घेऊन येईल. जे आईसोबत झाले तेच उद्या तुझ्या सोबत होईल कशा वरून? जसे बाबा भाग्यवान की त्यांना लाख मोलाचा जीवनसाथी मिळाला होता पण त्यांना तिची कदर नाही. तसा तुला ही आयुष्यभर सांभळणारा जीवनसाथी भेटलाय तर तू त्याला जप ! जिंजूच्या ही काही इच्छा असतीलच ना का दूर करतेय त्यांना ?



 का त्यांना त्यांच हक्काचं प्रेम देत नाही. प्रेम आहे म्हणून ते थांबलेत तुझी वाट पाहत ! दुसरा असता तर कधीच जबरदस्ती केली असती. इतकं फ्रिडम तुला आपल्या घरी तरी मिळालं का? तुझं लग्न झालयं तू तुझ्या संसारात रमायला हवी, किती छान परिवार आहे तुझा ! सासूबाई सासरे नणंद अगदी जीव ओवाळून टाकता तुझ्यावर , तू त्यांची काळजी घे,तू जिंजूची काळजी घे,भरपूर प्रेम दे त्यांना. माहेरच्या गोष्टींचे परिणाम तुझ्या संसारात नको व्हायला आणि हीच गोष्ट आईल जर माहिती झाली तर .. तुला तर माहिती आहे . किती विचार करते ती .. तिला वाटणार माझ्या मुलीच्या संसारात माझं दुःख आड येतयं. आईची ,वेदांतची काळजी घ्यायला मी समर्थ आहे."





क्रमश ..




🎭 Series Post

View all