प्रतारणा .. भाग - 43

"आता तूच राहिली होती सांगायची ! ही मुलगी झाली आणि मी जावाई झालो तुमचा,अरे मला कोणी म्हणत नाहीय का

प्रतारणा .. 

भाग - 43

  सुप्रिया स्वप्नाली संजय गावी जाण्यासाठी निघाले तेव्हा विजया सुप्रियाच्या गळ्यात पडून रडत होती. स्वप्निलने तिला समजावून दूर केले. तिघेही रडत होत्या. विजया त्यांच्या दोघांच्या पाया पडली . विजया स्वप्निल खाली गेलेले त्यांना गाडीपर्यंत सोडायला .

"आई काळजी घ्या ,आणि पोहचले की कॉल करा. स्वीटू स्वतःची आणि आईबाबांची काळजी घे, बाबा काळजी घ्या ."विजया त्यांना सांगत होती.

" विजू काळजी घे बाळ ! स्वप्निल विजूची काळजी घे , जप तिला, मन नको दुखवू पोरीच ." सुप्रिया ने विजयाच्या चेहर्‍यावर हात फिरवत म्हणाल्या.

" स्वप्निल, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात आलीय पोर. सगळ्यांसोबत राहायची सवय आहे तिला तर लक्ष दे तिच्याकडे, नाहीतर गुंतून जाशील तुझ्या कामात काय !" संजय.

" दादा , माझ्या वहिनीची काळजी घे ! " ती डोळ्यांत पाणी आणत म्हणाली.

 "आता तूच राहिली होती सांगायची ! ही मुलगी झाली आणि मी जावाई झालो तुमचा,अरे मला कोणी म्हणत नाहीय काळजी घे म्हणून." तो नाटकीपणाने म्हणाला. तसे सर्व हसायला लागले.

"नवीन आहे रे ती इथे म्हणून म्हणतोय." संजयराव.

एक म्हातारी आजी त्यांच्या बाजूला जात होती. त्यांच्याजवळ आली.

"मुलगी आणि जावईबापू आहेत का तुमचे?" तसे स्वप्निलने डोळ्यानी खुणावले. 'बघा आजी बोलली हेच म्हणालो ना मी ! " चेहऱ्यांवर हसू उमटले.

" नाही हो मावशी ,

 मुलगा आणि सुन आहेत माझे." सुप्रिया

"मला वाटलं ते ." आजी .

"आजी सर्वांनाच तस वाटत ग." स्वप्नाली.

आजीशी बोलून ते गाडीत बसून निघून गेले. स्वप्निल तिला वर घेऊन आला. तरीही तिचं मुसमुसणं चालूच होतं. त्याने तिला पाणी दिलं. 

"चल आपण बाहेर जाऊन येऊ !"

"नको ."

 "चल बाहेर गेल्यावर तुला थोडं बरं वाटेल . मग तीही जास्त बोलली नाही. तयार होऊन दोघही बाहेर फिरायला गेले. बाहेरून आल्यावर तिला फ्रेश वाटले . हातपाय धुवून ती स्वयंपाकाला लागली. कढी खिचडी बनवली. त्यासोबत लोणचे पापड साजूक तूप घेतले आणि गरमागरम वाढली. जेवण करून सुप्रियाला फोन लावून मग ते झोपायला गेले. विजया हळहळू पुण्यात अँडजस्ट होऊ लागली. सोसायटीत ओळखी झाल्या. आता ती रमू लागली होती.

****

इंदर पुन्हा बदलला होता. हे आताशी वैदेहीला समजायला लागले होते. त्याचे प्रेमयुगलांसारखे फोनवर बोलणे. वैदेहीला टाळणे, बाहेरचा राग तिच्यावर काढणे अस व्हायला लागले होते. आणि शेवटी ज्याची भिती होती तेच झाले. पुन्हा तिला तेच ऐकायला मिळाले. इंदरच्या ऑफिसमध्ये सविता नावाची पस्तीस वर्षाची अविवाहित महिला आली होती. ती ऑफिसमध्ये नव्हे तर त्याच्या आयुष्यात ही आली. सविता आल्यापासून त्याचे लक्ष घरात नव्हते. हीच गोष्ट त्यांच्या सहकाऱ्यांना ही कळत होती. त्यातील बरेच सहकारी मित्रांनी सांगितले पण इंदरला काही फरक पडला नाही. इंदर सर्रास खोट बोलत होता. वैदेहीला बाहेरून माहिती पडले तरीही तिने स्वतः पहिल्याशिवाय विश्वास करणार होती. तिने सरळ प्रश्न विचारून घेतले. तर त्याने स्टाफ आहे म्हणून सोबत असते म्हणून उत्तर दिले. त्यानंतर तिनेही कित्येक वेळा त्यांना सोबत जाता येतांना पाहिले.

"तुम्ही एकटेच असता का सविताला ने आण करण्याकरिता, शोभत नाही तुम्हाला हे असले उद्योग, जरा तरी विचार करा ! विजयाच्या सासरच्या लोकांना माहिती पडले तर काय इज्जत राहणार आहे तुमची ! " वैदेही. इंदर ने सनकन तिच्या कानाखाली मारली.

" ये जास्तीचा शहाणपणा करू नकोस , नाहीये माझ काही नाही तसं ." बोलून तो तरातरा घरातून निघून गेला.

  

सविता जेव्हा आली ती तेव्हा पर्मनंट नव्हती. इंदरने तिला पर्मनंट करून घेतली. एकवेळ वैदेहीला रस्त्यावरून दोघही बाईक वरून जातांना दिसले. तिने बाईकच्या मागेच रिक्षा घेतली. एका घराजवळ जाऊन बाईक थांबली.. ते दोघही आत गेले . दरवाजा बंद केला. वैदेही तिथे पोहचली तिला बाहेरच बाईक दिसली. तिने दारावर ठोठावले. दार उघडले गेले आणि तिने जे पाहिले त्यानंतर तिचे डोळे लाल झालेले. कारण इंदर तिथे अनपेक्षित स्थितीत दिसला. इंदर आणि सविता दोघेही तिला समोर पाहून बावरले. वैदेहीने सवितच्या गालावर दोन्ही बाजूंनी चापट मारली. इंदरमध्ये आला.

" तिला नको मारू ?"

" का नको मारु मी या सटवीने माझा संसार मोडला. आणि मीपाहत बसू का?" म्हणून तिने आणखीन दोन वाजवल्या . मग इंदर ने वैदेहीला मारायला सुरवात केली. तिला हाताला धरून घरी आणून सोडले. घरात आल्या आल्या त्याने तिला दोन तीन लावून दिल्या.

" माझी जासूसी करत होती का तू ?" .

" रस्त्याने जाताना दिसले मला ."

" हो आहे माझे तिचे संबंध ! काय करणार आहेस ?" मग वैदेहीने कपडे भरले आणि तिच्या विजय दादाकडे निघून गेली. जाऊन एकच दिवस झाला होता तर रवी दादाचा फोन आला . इंदरने गोळ्या खाऊन घेतल्या होत्या . तिला यावचं लागले . वैदेही आल्यावरही इंदरमध्ये काहीच सुधारणा झाली नाही उलट आणखीनच त्याची हिम्मत वाढली होती. त्यातच तिला सर्व शांत राहण्याचे सल्ले देत होते.

"जाऊदे त्याला जे करायचे ते करू दे, या वयात कुठे जाणार, कोणाकडे, भावांना त्यांचा संसार नाही का? बाहेर सगळ्यांना माहिती पडेल.मुलांकडे पाहून काढ दिवस ! "वैदेहीची बहिण म्हणाली. तिनेही तिचे ऐकले आणि शांत बसली. ती फक्त पाहू लागली. इंदर घर खर्च द्यायला मागे पुढे पाहत होता. वैदेहीला पैसे देणे पूर्ण पणे बंद केले.

  एक दिवस वैदेही तापाने फणफणली होती. तिने स्वयंपाक बनवला नव्हता ,त्यात तिला जबरदस्त खोकलाही लागला होता. इंदर घरातच बसून फोनवर बोलत सोबतच बाहेरून आणलेलं जेवण जेवत होता . तिला भयंकर खोकला लागून सुद्धा तो तिला पाणी द्यायला ही उठला नव्हता . ती तशीच अंथरुणावर पडून होती. अलकाला फोन केला . ते येऊन त्यांना दवाखान्यात घेऊन गेले,पण इंदर मात्र जागचा हलला देखील नाही. तिने ही गोष्टही तिच्या मुलांना सांगितली नाही.

         

          विजयाने दुपारी अलका मामीला फोन करून विचारपूस केली तर अलकाने घडलेला सर्व प्रकार विजयाला सांगितला. ती खूप अस्वस्थ झाली. डोळ्यांतून कढ वाहत होते. बोलून झाल्यावर ती खूप रडली. रडून रडून डोळे सुजले होते. तिने हीच परिस्थिती ती लहान असतांना ही पाहिली होती.तिला तिच्या आईबद्दल खूप वाईट वाटत होते. तिने जेवण हि केले नाही. संध्याकाळी जेव्हा स्वप्निल कॉलेजमधून घरी आला तेव्हा तिचा चेहरा उतरलेला, डोळे लाल झालेले दिसत होते.

"विजू काय झाले, रडलीस तू?"

"नाही ." ती नजर चुकवत म्हणाली.

"तुझा चेहरा सांगतोय काय झालं सांग मला !" ती त्याच्या कुशीत शिरली आणि तिथे त्याच्या मिठीत तिचा बांध फुटला ती रडू लागली. अचानक तिच्या अशा वागण्याने तो काळजीत पडला. काय झाले त्याही कळत नव्हते. त्याने तिच्या डोक्यावरून पाठीवर हात फिरवून तिला शांत करत होता.तिने मनसोक्त रडून घेतले. ती शांत झाली तशी त्याच्या मिठीततून बाहेर झाली.

" आता सांग काय झालं ते!"

" काही नाही मला आठवण येतेय आईची !" विजया .

ती काय सांगणार होती नवऱ्याला की माझ्या बाबांचं अफेअर चालू आहे ते तिच्या आईला त्रास देताय मारहाण करताय,कशी सांगणार ती तिच्या वडिलांच कृत्य ? तिला ऐकतांना इतका त्रास झाला तर बोलणार कशी? नवऱ्याच्या नजरेत वडिलाबद्दल चा राग कसा सहन करणार ती? डोक्यांत विचारांनी धुमाकूळ घातला तिला गरगरायला आले आणि चक्कर येऊन ती त्याच्या अंगावर बेशुद्ध होऊन पडली. त्याने तिला उचलून बेडरुममध्ये आणले. तिला उठवायचा प्रयत्नही केला पण ती उठली नाही मग त्याने त्यांच्याच सोसायटीतले डॉक्टर मंदार कुलकर्णी ,त्याचा नव्याने बनलेला मित्र यांना बोलवून घेतले. मंदारने तिला चेक केले आणि इंजेक्शन दिले.

"मंदार काय झाले तिला ,केव्हा येईल ती शुद्धीवर ?" स्वप्निल.

"वहिनी लवकरच शुद्धीवर येतील. डोन्ट वरी !"

"पण तिला झाले तरी काय मंदार ! " ती काल तर ठणठणीत होती आणि आज मी घरी आलो तेव्हा माझ्या कुशीत येऊन रडत होती आणि आता अचानक बेशुद्ध पडली.

"हे बघ स्वप्निल वहिनने कसलं तरी टेंशन घेतलाय आणि बहुतेक त्यांनी आज जेवण ही केलेले दिसत नाहीये त्यामुळे चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना शुद्धीवर आल्यावर निंबूपाणी दे आणि काही तरी खाऊ घाल आणि ही औषध दे ! " डॉक्टर मंदार त्याच्या हातात औषधी देत म्हणाला.

"काही असेल तर लगेच कॉल कर !" असा बोलून डॉक्टर मंदार निघून गेला. स्वप्निल तिच्या उशीजवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.

'कसले टेंशन घेतलय हिने, किती ती रडली ती माझ्या मिठीत येऊन नक्की काय झालं काहीच कळत 

नाहीये.चेहऱ्यावरचे तेजच गायब झालय. " स्वप्निल मनोमन विचार करत होता. त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मग त्याने फ्रेश होऊन खिचडीचा कुकर लावून घेतला आणि पुन्हा तिच्याजवळ बसून राहिला. तब्बल दोन तासांनी ती चुळबुळ करू लागली मग तिन डोळे उघडले. तर स्वप्निल बसून तिचा एक हात पकडून तिच्या उशाशी बसलेला होता.

"बरं वाटतय तुला ?"

" हो " ती हळू आवाजात म्हणाली. 

" तू उठू नकोस ! "

" संध्याकाळ झाली मला दिवाबत्ती करायची आहे." ती हळू आवाजात म्हणाली.

"एक दिवस नाही लावला दिवा तर देव काही रागवणार नाही ." तरीही ती उठायचा प्रयत्न करीत होती.

"मी करतो दिवाबत्ती. त्याअगोदर तू हे पिऊन घे !" तो तिच्यासमोर निंबूपाणी धरत म्हणाला. त्याने जबरदस्तीने निंबूपाणी पाजून दिवा आणि अगरबत्ती लावली. तिला थोड्यावेळाने त्याच्या हाताने खिचडी भरवली. तिला गोळ्या औषधी दिल्या.

" प्लिज इतकं माझ्यासाठी करू नका मला गिल्टी फिल होते."

"विजू हे माझं कर्तव्य आहे गं, तू माझी अर्धांगिनी आहेस आपले दोन वेगवेगळी शरीर जरी असलीस तरी माझा आत्मा श्वास आहेस तू , तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दांतही सांगू शकत नाही."

" माझ्यावरचं हेच प्रेम किती वर्ष राहिलं ! पाच वर्ष दहा, वीस की तीस वर्षापर्यंत, एकदा पुरुषांना हव ते मिळाले की झाल मग आणि मुल झालीत तेव्हा तर स्त्री च्या शरीरात आणखीनच बदल होतो आणि मग ती केव्हा तिच्या नवर्याला नकोशी होते आणि नवरा खुशाल बाहेर लफडी करत बसणार ! " बोलतांनाही डोळ्यांतून सतत अश्रू येत होते.

"हे बघ विजू दुसऱ्यांच मला माहीत नाही पण माझं प्रेम तुझ्यावर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिल.सगळ्या पुरुषांना तू एकाच माळेत कशी ओवू शकतेस."

"कारण मी हे जवळून पाहिले आहे. नवर्याने वेळोवेळी बायकोची प्रतारणा केलेली पाहिली आहे. विश्वासाचा विश्वासघात करतांना पाहिला आहे. त्या बायोकाला रडतांना, कुढतांना आणि प्रत्येक वेळी मरण यातना सोसतांना पाहिले आहे आणि पाहत आहे."

"तुम्हाला प्रश्न पडला असेल न की, आपल्या लग्नाला इतके महिने झाले तरी ही तुमच्या जवळ का आली 

नाही? असं नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाही. प्रेम तर खूप आहे अगदी कॉलेजमध्ये असतांना जेव्हा ते तुमच्या डोळ्यांत दिसत होते. आणि मी कधीच त्या डोळ्यांच्या प्रेमात पडली माझं मलाच कळले नाही. मला माहिती होते की कधीच आपण एकत्र येणार नाहीत, माझ्या घरचे लव मॅरेजला परवानगी देणार नाहीत म्हणून मी तुम्हाला माझ्यापासून दूर करत होते. आता तर आपलं लग्न ही झालं आहे आणि हे लग्न तुम्ही घडवून आणले आहे हे मला क्षणाक्षणाला जाणवले आहे. मला भिती वाटायची मी जे पाहिले ते जर माझ्या आयुष्यात घडलं तर माझा नवरा माझ्याशी असा वागला, त्याने काहीवर्षातच , मुले झाल्यावर किंवा जेव्हा मला त्यांची जास्त प्रमाणात तो माझ्या जवळ असायला पाहिजे अशा वेळेस जर त्याने एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर केले तर मी तिथेच या शरिरातले प्राण …" पुढे त्याने बोलू दिले नाही. त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला. यामध्ये नकळत मनात दडलेले प्रेम कबूल करत होती . तिने त्याचा ओठांवरचा हात काढला . 

"प्लिज मला बोलू द्या . मी तिथेच माझे प्राण सोडून देईल ! हे प्रश्न मला आजही पडतात. या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाहीत. मला हे ही माहिती आहे की मी तुमच्यावर अन्याय करते. तुमच्या प्रेमाची संयमाची परिक्षा घेते. तुम्हाला तुमच्या हक्कांपासून दूर ठेवते. 

 अहो ,माफ करा मला ! मी तुमची अपराधी आहे." तिने हात जोडले. नंतर तिने चेहरा तिच्या हाताने झाकून ती ओक्साबोक्शी रडू लागली.

क्रमश ..

🎭 Series Post

View all