Login

प्रतारणा .. भाग - 42

"काय रे काय झाले ! फोन केलास. घरी पोहचलास ना." स्वप्निल काळजीने विचारत होता. " तू काय करतोस लेका म्?

प्रतारणा ..

भाग - 42

फोनवर इंद्रा होती.

"काय मग ताई,आवडला का नाही स्मार्टफोन ."

"हो गं पिंकू." निता ने इंद्राकडून फोन घेतला.

"हॅलोऽऽ, वेदिका काय मग आज कसं वाटतयं अगदी खूष असणार !" निता म्हणाली तशी ती छानशी लाजली.

"ताई ठेवू का फोन !"

"का, स्वप्निल वाट पाहतोय का ? तो म्हणाला काही , त्याला घाई झाली असणार ."

"अगं तेऽऽ ते ऽऽ का म्हणतील मला !"

"मग तुला घाई झाली असणार ! " ताई तिची चांगलीच खेचली. तिने डोक्यावर हात मारून घेतला. हिच्या सोबत बोलणं म्हणजे ..

"ताईऽ तू खूपच मस्ती करतेस ,दोन मुलांची आई झाली तरीही तू लहान मुलांसारखे मस्ती करत असते."

"हो मग ,जाऊ दे मी तुला डिस्टर्ब करतेय का? तुम्ही तुमचं चालू द्या. असा ही तो तुला सोडणार नाही ! "निता खी खी करत मोठ्याने हसत होती. आणि फोन स्पीकर वर असल्याने स्वप्निलने हि ऐकले होते. बिचारी खूप पाणीपाणी झाली, कुठेतरी लपून जावसे वाटत होते. तिने फोन कट केला. इकडे स्वप्निलचा फोन वाजला. तो बाल्कनीत जाऊन बोलू लागला.

"काय रे काय झाले ! फोन केलास. घरी पोहचलास ना." स्वप्निल काळजीने विचारत होता.

 " तू काय करतोस लेका म्हणून फोन केलास .माझी काळजी करू नकोस रे , वहिनीची करं !" तो हसत म्हणाला .

"उड्या मारतोय, ये उड्या मारायला !"

"नको तूच मार बाबा ! मी पुन्हा फोन करेल बरं आणि फोन नाही उचलास तर पाच मिनिटानंतर तुझ्या गॅलरीत फटाके वाजवेन काय समजलास !"

"अरेऽ तसं कशाला करतोस एक काम कर तू इथेच ये ना माझ्या रुममध्ये ! "

 "ये मी तुझ्या सारखा निर्लज्ज नाही."

 "समोर ये सांगतोच तुला , नालायका, गधड्या , कुत्रा डुक्कर , रेड्या ,माकड , बोक्या !" स्वप्निलने त्याला शिव्यांची लाखोली वाहली .माकड बोक्या म्हणल्यावर त्याला माकतोंड्या बोक्या आठवलं म्हणजे इंद्रा त्याच्या चेहर्‍यासमोर आली.

"झालीत का? सगळ्या प्राण्यांची नाव घेऊन की बाकी आहेत."

"बाकी आहेत. आठवतोय !"

"मग थोड्या वेळाने दे काय !" त्याने फोन ठेवून दिला.

आता तो मात्र तिच्या विचारात हरवला. स्वप्निल रुममध्ये आला तर विजया झोपलेली होती. त्याने तिच्या अंगावर ब्लॅकेट ओढून घेतले. तिच्या कपाळाला हात लावून पाहिला मग दुसऱ्या बाजूला तिच्याकडे पाहत झोपी गेला. पण लगेच त्याला फोन वाजला . त्याने पटकन मोबाइल सायलेंट करून हळू आवाजात बोलू लागला.

"अरे मुर्खाऽ काय वारंवार फोन करतोय झोपू देना, विजयाला ताप आला आहे ती झोपलीय. आणि आता तुझा फोन आला ना तर उद्या तुझी खैर नाही." तो चिडत म्हणाला.

"कायऽ अरे मग डॉक्टारांना घेऊन येतो. "

"नको गोळी दिलीय मी तिला." 

"साँरी यार आमचा आजचा प्लॅन कॅन्सल झाला." तो चेहरा पाडत म्हणाला.

राहुल्या गेलास तू लेका , ते सॉरी गेल खड्ड्यात आज माझ्यावर ही वेळ आली आहे उद्या तुझ्यावरही येणार आहे. तेव्हा बघ तुझी पूर्ण वाट लावतो की नाही." स्वप्निल असं म्हणाल्यावर राहुल गुलाबी स्वप्नात हरवून गेला.

"अरे येऽ परत ये परत ये स्वप्नातून परत या राहुलजी !"

"सॉरी सॉरी चल ठेवतो . त्याने फोन कट केला ." स्वप्निलने पुन्हा तिच्या कपाळाला हात लावून ताप चेक केला आणि मग त्यावर ओठ टेकवले.

    

      सकाळी लवकर उठून ती आवरून बाहेर निघून गेली. आज तिला घ्यायला वेदांत ,सिद्धु, मामा आले. स्वप्निल आवरून बाहेर आला. मामांच्या पाया पडून वेदांत आणि सिद्धार्थला मिठी मारली. चहा नाश्ता झाला . विजया रुममध्ये आवरायला गेली. स्वप्निल आत जाण्यासाठी अस्वस्थ होत होता. तो बहाणा करून वरती आला. तर ती साडीच्या निऱ्या ठिक करत होती. तर तो सॉरी म्हणून मागे वळला. ती ही पाठमोरी उभी राहिली. तिने पटकन साडी आवरली.

"काय म्हणत होता तुम्ही इथं आलात म्हणून म्हणाले

 मी ."

"तिकडून कधी येणार?"

 "जेव्हा मला घ्यायला येतील तेव्हा !"

 "मग संध्याकाळीच येतो . "

"अहोऽ काय संध्याकाळी ." तिचा चेहरा उतरला.

 "मग उद्या येतो सकाळी ."

"हो .. चालेल." तीही खुष झाली तो तिच्याजवळ एक एक पाऊल पुढे जात होता. तिला धडधडायला होत होतं. ती ही हळूहळू मागे जात होती आणि आता मागे जाण्यासाठी जागाच नव्हती ,भिंत होती. स्वप्निल जवळ आला. आता तिचे हार्टबीट्स कमालीचे वाढले. त्याने तिचे चेहता ओंजळीत पकडला. 

" मिस यू विजू !" तिच्या कपाळावर ओठ टेकवले. खालून आवाज तिला बोलवण्यात आले. मग त्याने तिला सोडलं.तो तिच्याकडेच पाहत होता. ती पुढे जाऊन थांबली आणि हलकीशी मागे वळून

 "मिस यू टू ." म्हणून निघून गेली. स्वप्निल गालात हसत केसांवरून हात फिरवला. सगळ्यांचा निरोप घेऊन ती गेली. स्वप्नालीचा चेहरा उतरला होता. तिने विजयाला मिठी मारली.

"लवकर ये गं वहिनी ."

"हो रे स्वीटू. " ती तिच्या गालांवरून हात फिरवत म्हणाली. गाडीत बसून ती निघाली .

"आई वहिनी गेली तर घर कसं लागतयं एकदम खाली खाली ."

"हो गं ."

"दोन दिवसांत माया लावली पोरीने ! " संजयराव . त्यांच बोलणं ऐकून स्वप्निलला समाधान झाले. तो रुममध्ये निघून गेला.

"अगं वेडू आता दादा पुण्याला जाईल तेव्हा तर ती ही जाईल ना त्याच्यासोबत !"

"मग मी ही जाते त्यांच्यासोबत ."

"त्यांच नवीनच लग्न झालयं मग त्यांना एकमेकांसोबत वेळ नको घालवायला ."

"हो ."

विजया माहेरी आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून वैदेही यशोदा आजी भरून पावल्या. निताने तिला चिडवायची सुरु झाली. तीही लाजत होती. विजया तिकडच्या गोष्टी सांगतांना थकत नव्हती. वैदेही ने देवासमोर हात जोडून आभार मानले.

दुसऱ्या दिवशी स्वप्निल सकाळीच घ्यायला आला. तेव्हा ती झोपलेलीच होती. त्याचे स्वागत झाले. चहा नाश्ता झाला.

"विजू उठं बाळा जावाईबापू आले."

"आई इतक्या लवकर नाही येणार आहेत ते, झोपू दे थोडा वेळ !"

"अगं त्यांचा चहा नाश्ता पण झाला."

"काय ऽ ."

 ती उठली बाहेर जाऊन हॉलमध्ये पाहिले तर तो तिथे पेपर वाचत बसलेला दिसला. ती तिथेच त्याला पाहून स्तब्ध झाली. त्याचेही लक्ष तिच्याकडे गेले. खूप सुंदर दिसत होती.तो एक टक तिच्याकडे पाहत होता. आणि ही झोपवलेल्या अवतारातच त्याच्यासमोर गेली. लवेंडर कलरच्या नाईट गाऊन, केस विस्कटलेले, गळ्यांत मंगळसुत्र आणि भांगेत सिंदूर टिका.दोघही एकमेकांकडे पाहत होते. तिच्या लक्षात आले ती आत मागे पळाली आणि मागून येणाऱ्या इंद्राला धडकली.

"आई गं हळू ना ! वाघ मागे लागल का तुझ्या किती जोरात लागलं मला." इंद्रा .

"सॉरी आलेच मी." ती आत निघून गेली .

ती गोंधळलेली बघून स्वप्निलला खूप हसायला येत होते पण ते त्याने आवरले. तो ही सगळ्यांमध्ये रुळला .पटकन बाथरूममध्ये जाऊन तिने तिचे आवरून घेतले. ड्रेस घालून छान रेडी होऊन बाहेर आली. केस मोकळे सोडलेले जे तिच्या कमेरेच्या खाली येत होते. तो आताही तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या अशा पाहण्यानेच तिचे गाल आरक्त झाले होते.

"अं .. तुम्ही कधी आलात!"

" जेव्हा तू झोपली होती तेव्हा, एक तास झाला मला येऊन ."

" हो ."

"तुम्ही चहा वगैरे घ्याल का?"

 "नाही माझा झालाय !" मग ती निघून गेली.

आज जवाई बापू आल्यामुळे घरात पंचपक्वान होत होते. सर्वांनी सोबत जेवणं केली आणि विजया तिचे आवरायला गेली. भरपूर सामान न्यायचा होता तो तिने आधीच पॅक करून ठेवला होता. ती साडी नेसून तयार झाली. अबोली रंगाची साडीत अगदी अबोलीच्या फुलासारखी नाजूक दिसत होती. ती तयार होऊन बाहेर आली. स्वप्निलला कपडे , गिफ्ट देण्यात आले. निघतांना मात्र विजयाच्या डोळ्यांत आसवांची गर्दी झाली. तिने वैदेहीकडे पाहिले तर तिच्या गालांवर अश्रू ओघळत होते. ती आईच्या कुशीत शिरली . वैदेहीने तिला मिठीत घेतले. डोक्यावरून हात फिरवत होती. वैदेहीने तिच्या कपाळावर ओठ टेकवून पप्पी घेतली. सामान गाडीत ठेवला गेला. ती गाडीत बसली. स्वप्निलने गाडी चालू केली . सर्व तिला बाय करत होते तीही त्यांना बाय करत होती. गाडीत ही ती मुसमुसतच होती. स्वप्निलने तिच्या हातावर हात ठेवून मी आहे असं आश्वासन दिले. तिने ही त्याच्या हातावर दुसरा हात ठेवला. तरीही राहून राहून तिला हुंदका फुटतच होता .

"तुला हवं तेव्हा तू आई बाबांकडे जाऊ शकते विजू, बस आता रडून रडून नाक आणि डोळे लाल झाले." त्याने तिला रुमाल दिला ,तिने चेहरा पुसून घेतला.

ते घरी आले स्वप्नाली तर तिच्या गळ्यात पडली. फ्रेश झाली आणि तिने आणलेला सामान लावायला घेतला स्वप्नाली ही मदत करत होती. सुप्रिया तिला चहा घेऊन आली.

"आई तुम्ही कशाला घेऊन आलात मी घेतला असता."

"अगं असु दे गं , तू हे आवरत आहे . तशीही चहाची वेळ झालीच होती म्हणून आणला सोबत घेऊया ." 

"थँक्यू आई ."

"जशी तू तिकडे राहायची तसचं इथेही राहा ! बोलत जा , तुला काही हवं असेल तर मागत जा , तू बोलल्याशिवाय मला कसं कळणार ना . आणि एक मुलगी एका आईला थँक्यू म्हणते का? जशी स्वप्नाली आहे तशी तू आहेस.मग मी ही तुला प्रत्येक वेळी थँक्यू म्हणेल ."

"असं काय करता आई. सॉरी !" ती चेहरा पाडत म्हणाली.

"पुन्हा तेच !"

"आता नाही म्हणणार."

"बरं बाळा ,तू जर साडीत कम्फर्टेबल नसशील तर तू ड्रेसे घाल . जीन्स टॉप ही ,मी कधीच स्वप्नालीला कपड्याबद्दल बोलले नाही पण इतकं म्हणाले की अंगप्रर्दशन होईल असे घालू नका.." 

"हो आई." सुप्रिया बोलून निघून गेली. मग विजयाही आवरून स्वयंपाकाची तयारी केली . स्वयंपाक जेवण झाले , किचन आवरून ती रुममध्ये आली. फ्रेश झाली नाईट ड्रेस घालून,वैदेहीशी थोडं बोलून ती पलंगावर आडवी पडली. त्यातच ती झोपून गेली. स्वप्निल आला तेव्हा ती गाढ झोपेत होती. तो ही फ्रेश होऊन तिच्या शेजारी झोपून गेला .

        

            विजया सासरी गेल्यावर सर्व पाहुणेही आपआपल्या घरी गेले. इंद्राही तिच्या पुण्याला निघून गेली. वेदांत ही बेंगलोरला निघून गेला. आता घरामध्ये वैदेही आणि इंदरच होते.

         विजया रोज रात्री त्याला टाळत होती. कधी लवकर झोपून जायची तर कधी उशीरा रुममध्ये यायची. तरीही स्वप्निल काहीही म्हणाला नाही. विजया सगळ्यांची काळजी घेत होती. सर्वच तिला खूप जपत होते. सुप्रिया स्वप्नाली यांची बाँडिंग तर छान झाली होती. पण स्वप्निल आणि विजयाच्या नात्यात म्हणा तसा बॉन्ड तयार झाला नव्हता पण त्याची खूप काळजी घेत होती. आणि हे त्याला ही दिसून येत होतं.

आता त्यांना पुण्याला जायचे होते . त्याला कॉलेजला रुजू व्हायचे होते. त्याआधी तो जाऊन आला होता . पुण्याला त्यांचा फ्लॅट असल्याने राहण्याचा प्रश्नच 

उरलाच नव्हता. सामान पॅक करून सर्वच पुण्यासाठी निघाले. सुप्रिया विजयाने मिळूल घर व्यवस्थित लावले. छोटा देव्हारा त्यात बाप्पाची मूर्ती , लडडू गोपालांची मूर्ती दिवा लावला ,अगरबत्तीचा सुवास दरवळला त्याने सर्वांचे चित्त प्रसन्न झाले. कामाने दोघेही थकले होते. म्हणून संजयराव बाहेर जेवणाचा आग्रह करत होते . हो नाही करता करता सर्व बाहेर जेवणाला गेले. स्वप्निलचे रुटिन सुरु झाले आणि पाच सहा दिवसानंतर सुप्रिया स्वप्नाली संजयरावांनी घरी परतण्याचा विषय काढला. विजयाचा खाडकन चेहरा उतरला तिच्या डोळ्यात पाणी आले. ती उठून बेडरूम च्या गॅलरीत उभी राहून रडत होती. तिच्या मागोमाग सुप्रिया आली , तिच्या खांद्यावर हात ठेवला. विजयाने पाहिले. आणि इतक्या वेळ अडवून ठेवलेला हुंदका बाहेर पडला.

"आई, मी कशी राहणार ना इकडे स्वीटू आणि 

तुमच्याशिवाय !" ती सुप्रियाला बिलगत म्हणाली .

"विजू शांत हो बाळा !" ते तिच्या केसांवरून पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या.

 "तू जर अशी रडशील तर माझं मन तरी लागणार आहे का ! स्वीटी चे शाळा आहे ना जावचं लागेल बाळा आम्ही अधूनमधून येऊच आणि आता तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा, एकमेकांना समजून 

घ्यायला हवं." तिने हो म्हणून मान डोलवली. स्वीटू रुममध्ये येऊन त्यांच बोलणं ऐकत होती. स्वीटूच ही मन भरून आले होते. मग ती ही त्यांना जाऊन बिलगली.

"किती घट्ट झालयं यांच नांत , पाहून कोणीच म्हणणार नाहीत या सासु सुन आणि नणंद भावजय आहेत." संजयराव त्या तिघांना पाहत स्वमिलला म्हणाले. त्याने ही होकार दर्शविला .